ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे
अ
द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स
ब
(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस
क
(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया
ड
(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना
इ
(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून
फ
इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया
ग
(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)
ह
(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली
उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने
उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)
उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)
उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)
तिसर्या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)
अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)
ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/
तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...
ब्राझीलच्या संघातून
ब्राझीलच्या संघातून रोनाल्डीन्हो बाहेर ! अर्थात, ब्राझीलमध्ये शैलीदार खेळाडूंचं भरघोस नवीन पीक येतच असतं !
छान. नंतर इथे मॉदलेतल
छान.
नंतर इथे मॉदलेतल लागेल.
अमेरिका इंग्लंडवर विजय मिळवणार..!
रोनाल्डीन्हो, झिदान, बॅलॅक,
रोनाल्डीन्हो, झिदान, बॅलॅक, बेकहॅम, कान्ह ह्यापैकी कोणी आहे का ?
जर्मन संघ कसा आहे... मला गेले दोन्ही वेळी वाटलेलं जर्मनी जिंकावे पण ऐनवेळी हरले..
फिफाचे अँथम
फिफाचे अँथम
http://www.youtube.com/watch?v=5CFyigM6Tek
गाणे चांगले आहे, ठेक धरायला लावते. आमच्याकडे तर दररोज हेच गाणे वाजवतात सध्या.
यंदा युरो २००८ विजेता स्पेन, गतविजेते इटली, ग्लॅमरस इंग्लंड, रडत-रखडत पात्र झालेली पण ताकदवान अर्जेंटिना, स्टायलीश ब्राझील, ताकदवान जर्मनी यांच्यात फार चुरस असेल असे वाटतेय.
फ्रांस, कोरीया, कॅमेरून (दरवेळी आश्चर्यचकित करणारा एकतरी आफ्रिकन संघ असतोच), जपान, मेक्सिको यांच्याही कामगिरीकडे लक्ष ठेवावे लागेल.
स्पर्धेच्या वेळापत्रिकेची पीडीफ:
http://www.fifa.com/mm/document/tournament/competition/64/42/24/2010fwc_...
भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सामने 7:30 PM पासून सुरू होतील.
ही स्पर्धा जागतिक रंगमंचावर खेळवली जात असल्याकारणाने खेळाडूंमध्ये चुरस असते.
या स्पर्धेत पोर्तुगालचा रोनाल्डो, इंग्लंड चा रूनी व वॉलकॉट, फ्रांस चा रिबेरी, अर्जेंटिनाचा प्रतिभावान खेळाडू मेस्सी , टेवेझ, स्पेनचे टोरेस, शावी (Xavi), फॅब्रेगस , ब्राझीलचा काका, फॅबिआनो, कॅमेरून्च्या इटो , आयवरी कोस्ट्चा ड्रोग्बा, जर्मनीचा श्वाइन्सटाइगर, इटलीचा महान गोलकीपर बफॉन, कॅनॅवारो, हॉलंडचे पर्सी व रॉबेन व इतर अनेक प्रतिभावान खेळाडूंमध्ये आपली प्रतिभा सादर करण्याची चढाओढ असेल.
विश्वचषकात सहभागी देशांनी आपले प्राथमिक संघ जाहीर केलेत.
http://www.fifa.com/mm/document/tournament/competition/01/20/86/87/provi...
मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेतच
मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेतच 'कॉन्फेडरेशन कप' स्पर्धा झाली, ही स्पर्धा विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणूनपण पाहिली जाते. या स्पर्धे दरम्यान प्रेक्षकांकडून चित्र-विचित्र आवाज करणारे बिगुल वाजवले जात होते व त्याचा परिणाम खेळाडूंवर होतोय अशी तक्रार केली गेली तसेच टीव्ही वरील प्रेक्षकांना पण माशा गुणगुणल्यासारखा आवाज आल्याची तक्रार झाली.
तेव्हा या बिगुलांवर सामन्यांदरम्यान वाजवण्यास बंदी आणावी यासाठी अनेकांनी FIFA कडे अर्ज केला होता व फिफाने बंदी घालायची तयारीही दर्शवली होती. तेव्हा यंदाच्या विश्वचषकात हे बिगुल वाजवले जातात का हे पाहायला हवे.
10 Things We Learned From Confederations Cup 2009
The 2009 Confederations Cup was a nice little preview of World Cup 2010. Here’s what we learned:
1. Cold weather = High tempo
June in South Africa is pretty cold. The heat and humidity that usually slows down summer tournaments was absent. A few players had to wear gloves and Dani Alves wrapped half a bear around his neck. But the huge upside was the high tempo of the games, which wouldn’t be possible in other countries at this time of year. If that doesn’t get you excited for World Cup 2010 then I can’t help you.
http://www.worldcupblog.org/world-football/10-things-we-learned-from-con...
मॅन यु सोडल्यापासून रोनाल्डो
मॅन यु सोडल्यापासून रोनाल्डो फारसा पहायला नाही मिळाला. पण विश्वचषकात तो चमकणार हे निश्चित.
इंग्लंडच्या रूनीची आक्रमकता जरा "डायल्युट" झालीय; ती परिपक्वता आहे कीं मरगळ व ते इंग्लंडच्या दॄष्टीने बरं की वाईट हे आता कळेलच. इटलीच्या संदर्भात "रॉसी" नाव वाचनात आलं आणि पूर्वीच्या
इटलीच्या हीरोची आठवण झाली ! मॅराडोना अर्जेंटीनाच्या टीमबरोबर असणारच - निदान प्रेक्षक म्हणून तरी व कॅमेराचं लक्ष स्वतःकडे खेचत ! पण माझी पसंति नेहमीप्रमाणे - ब्राझील ! पैशांची पैज लावायची झालीच, तर मात्र नाईलाजाने जर्मनीच्या बाजूने !! एकंदरीत, पुढील दोन महिने खरीखुरी धमाल ! जाणकार मायबोलीकर मजा वाढवायला इथं टीप्स देत रहातीलच.
मॅराडोना अर्जेंटीनाच्या
मॅराडोना अर्जेंटीनाच्या टीमबरोबर असणारच - निदान प्रेक्षक म्हणून तरी व कॅमेराचं लक्ष स्वतःकडे खेचत >>>
अहो भाऊ... तो अर्जेंटीनाचा सध्याचा कोच आहे.... त्यामुळे कदाचित बेंचवर बसूनच परत एकदा हॅण्ड ऑफ गॉड दिसणार..
काही संघातील महत्त्वाचे खेळाडू..
रोनाल्डो, कारव्हालो, डेको - पोर्तुगाल,
बलॅक, क्लोस, श्वाईनस्टायगर, लॅम - जर्मनी,
मेस्सी, व्हेरॉन - अर्जेंटीना,
काका, ज्युलिओ सीझर - ब्राझील,
द्रोग्बा - आयव्हरी कोस्ट,
रुनी, लँपार्ड, जेरार्ड - इंग्लंड,
ओन्री, व्हिएरा - फ्रान्स,
काहिल, केवेल - ऑस्ट्रेलिया,
बफून, कॅनव्हरो - इटली,
वॅन डर सार, निस्टलरॉय - नेदरलॅण्ड,
केसिलास, व्हिला, टोरेस - स्पेन..
<<अहो भाऊ... तो अर्जेंटीनाचा
<<अहो भाऊ... तो अर्जेंटीनाचा सध्याचा कोच आहे.... >> I am caught very badly on the wrong foot ! नशीब म्हणायचं, मायबोलीवर घरच्या मंडळीसमोरच उघडा पडलो !! धन्यवाद.
फार फुटबॉल नाही पहात हल्ली. चालेल का जरा तुमचं डोकं खाल्लं अधूनमधून तर ?
पराग, तुमच्याप्रमाणे मलाही
पराग, तुमच्याप्रमाणे मलाही जर्मनीच जिंकावी असे वाटत आहे पण खात्री देता येत नाही.
कागदावर जर्मनीची बाजू वरचढ दिसते. २००६ वर्ल्डकपमध्ये तिसरे, युरो २००८ मध्ये उपविजेतेपद आणि आता २०१० मध्ये विजेतेपद असे झाल्यास बहार येईल.
पण प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळे असू शकते. सध्या जर्मनीचे बरेच खेळाडू बाहेरच्या लिगमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्यांचा कोच जोकीम लो ने तक्रारीचा सूर लावला आहे असे वाचण्यात आले. अजून चॅम्पियन्स लीग फायनल, आणि जर्मन कप व्हायचे आहे. तोपर्यंत एकसंघ असा सराव होण्यासाठी खेळाडू मैदानावर एकत्र येणार नाहीत. (सध्यातरी)
दुसरे म्हणजे, विश्वचषकावेळी जर्मनीच्या आक्रमणाची एक स्टाईल बनून गेली होती. दोन्ही बाजूच्या विंगर्सनी बॉल पुढे सरकावयचा आणि तिथून आत आणायचा. अगदी टिपीकल. आणि त्याचा फटका त्यांना सेमीफायनलमध्ये बसला. सुदैवाने त्यांनी नंतर त्यात बदल केला पण एकदंरीत त्यांच्या खेळात वैविध्यपणा कमी आढळून येता. (असे माझे वैयक्तीक मत आहे, त्यावर कोणाचा आक्षेप असू शकेल)
आता या वेळीही जर्मनीची मदार त्यांचा कर्णधार मायकल बलॅकवर असेल. जेव्हा जेव्हा बलॅक फेल गेलाय तेव्हा तेव्हा जर्मनीची मिड-फिल्ड लुळी पडलीये.
आक्रमणाला लुकास पोडलस्की आणि भरवशाचा मिरास्लाव क्लोस
मधल्या फळीत - बलॅक आणि बॅस्टियन श्वाईनस्टीगर
बचावफळीत - पेर मॅर्तेसॅकर आणि फिलीप लॅम (ज्याने गेल्या विश्वचषकाचा पहिला गोल मारला)
गोलरक्षक - हॅन्स बट्ट आणि टीम वाईस
इथेच थोडी बोंब वाटत आहे. गोलरक्षकापैकी एकही फारसा अनुभवी नाही. रेने अडलर दुखापतीमुळे बाहेर आहे. महान गोलकिपर ऑलिव्हर कानची उणीव नक्कीच भासत रहाणार आहे.
मी जर्मनीचा जबरदस्त फॅन आहे पण माझ्या अपेक्षेप्रमाणे यंदा उपान्त्यफेरीची अपेक्षा बाळगावी. त्यापेक्षा पुढे गेले तर बोनस.
देव करो आणि माझे भाकित खोटे ठरो.
लाल-काळा-सोनेरी झेंडा विश्वचषकावर रोवला जावो.
<<ब्राझीलच्या संघातून
<<ब्राझीलच्या संघातून रोनाल्डीन्हो बाहेर ! >> आजच एका मित्राने जगातल्या "मोस्ट ब्युटीफुल" सदरात मोडणार्या गोष्टींचे फोटो "फॉरवर्ड "केलेत. घरांमध्ये, बार्सिलोनातलं [स्पेन] ब्राझीलच्या रोनाल्डीन्होचं घर आहे !
आता या वेळीही जर्मनीची मदार
आता या वेळीही जर्मनीची मदार त्यांचा कर्णधार मायकल बलॅकवर असेल. जेव्हा जेव्हा बलॅक फेल गेलाय तेव्हा तेव्हा जर्मनीची मिड-फिल्ड लुळी पडलीये>> परवाच्या FA Cup च्या मॅच मध्ये लागल्यामुळे बलॅक पुढचे आठ आठवडे खेळूच शकणार नाहीये... त्यामुळे जर्मन संघ बलॅकविनाच द.आफ्रिकेला जाणार...
२००६ ला जर्मनी मस्त खेळली
२००६ ला जर्मनी मस्त खेळली होती, खासकरून फिलीप लाम व स्वाइन्सटाइगर यांचे डाव्या-उजव्या विंग्समधून होणारे आक्रमण जबरदस्त होते, पण उपांत्य सामन्यात लामच्या आक्रमणाची धार बोथट झाली होती व जर्मन संघ निष्प्रभ वाटला. प्रशिक्षक क्लीन्समनचा जोष पण जबरा होता. पण यंदा स्पेन अथवा ब्राझील जिंकावी अस मला वाटतय.
कॅपॅलोचा इंग्लंड संघ काही चमत्कार करतोय का हे पाहायला हवे.
नेहमीप्रमाणे, "Curtain
नेहमीप्रमाणे, "Curtain Raiser" मध्ये प्रत्येक संघाची इथ्यंभूत माहिती [त्यांच्या सरावाच्या चित्रफितीसह ]आताही देतीलच. कोणत्या चॅनेलवर ते पहायचं.
बहुतेक ESPN-STAR Sports वर
बहुतेक ESPN-STAR Sports वर दाखवतील. Times Now / CNN IBN या चॅनेल्स वर पण माहिती मिळू शकेल थोडीफार.
ESPN वर the contenderस म्हणून
ESPN वर the contenderस म्हणून कार्यक्रम आहे... त्यात दाखवतील सगळे.. सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० ला..
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत झेक गणराज्यचा संघ पात्र झाला नाही. झेक संघ अतिशय वेगवान खेळ करण्यासाठी प्रसिदध आहे. झेकने कधी कुठलीही स्पर्धा जिंकली नाही इतकच काय विश्वचषकात पण उल्लेखनीय कामगिरी नाही, पण युरो १९९६ व २००४ मधे अंतिम फेरी पर्यंत मजल मारली. युरो २००४ मध्ये तर तुलनेने दुबळ्या ग्रीस कडून पराभव झाला.
रशिया , क्रोएशिया, पोलंड, स्वीडन सारखे संघही यंदा पात्र झाले नाहीत. रशियाला स्लोवाकियाने शेवटच्या पात्रता सामन्यात १-० ने हरवून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवला.
हिम्सकुल, बलॅक खेळणार नाहीये
हिम्सकुल, बलॅक खेळणार नाहीये ही एक अत्यंत वाईट गोष्ट आहे जर्मनीसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी. त्याच्या तोडीचा कर्णधार आणि समर्थ खेळाडू ऐनवेळी उभा करणे अवघड आहे.
त्या बोटँगला जाऊन मारावेसे वाटत आहे. एवढे करून त्याला रेड कार्डपण नाही मिळाले.
श्या.
झेकचा संघ पात्र नाही का झाला
झेकचा संघ पात्र नाही का झाला यावेळी? अरेरे.. झेकचा खेळाडू पॅवेल नेडवेड हा माझा आवडता खेळाडू आहे..
आजच्या पुणे मिरर मधील ही
आजच्या पुणे मिरर मधील ही न्यूज पहा, विश्वचषकाच्या काळात वीज पुरवठा नियमित राहीलच याची खात्री तिकडचे वीजमंडळ देत नाहीये.
SOUTH AFRICANS WARNED OF POSSIBLE LIMITS ON ELECTRICITY
South Africa's electricity company expects to be under pressure during the World Cup. The state-owned Eskom says it will regularly update South Africans on supply during the tournament, which starts 11 June, and ask them to turn off some appliances if power runs low. Under the worst circumstances, South Africans will be asked to turn off everything but one TV so they can continue to get updates and one light. The utility says "although electricity supply is expected to be sufficient over this period, cold winter temperatures combined with high electricity demand is likely to place Eskom under additional pressure".
आणखीण काही मजेदार गोष्टी:
DID YOU KNOW?
24 — The biggest age gap between two team-mates, Cameroon, in 1994. Rigobert Song was 17 and 358 days; Roger Milla was 42 and 35 days 4 Minutes of the quickest substitution, a record held jointly by Italy's Giuseppe Bergomi in 1998 and England's Peter Crouch in 2006
6 — The number of times that a host country has lifted the World Cup, the most recent being France in 1998
0 — Number of European teams who have won a World Cup outside Europe. Italy came closest at USA 94, when they lost on penalties to Brazil
तिकडे बलॅकला जखमी करणार्या
तिकडे बलॅकला जखमी करणार्या बोटांगला जर्मनीच्या जनतेने "Enemy Number 1" घोषित केलेय आणि बोटांगचा द्वेष करणार्या कम्युनिटीज स्थापन होतायत.
रंगासेठ, हीम्सकूल,
रंगासेठ, हीम्सकूल, माहितीबद्दल धन्यवाद.
'टाईम्स ऑफ इंडीया'ने आजपासून आजच्या व कालच्या दिग्गज खेळाडूंच्या मुलाखतींच्या सदराची सुरवात जेरार्डच्या मुलाखतीने केली आहे.
धन्यवाद भाऊ, हल्ल्ली टाइम्स
धन्यवाद भाऊ, हल्ल्ली टाइम्स वाचायला जमत नाहिये, आत्ता रोज वाचेन :-).
फिफा २०१० विश्वचषकाचे मॅस्कोट (शुभंकर??)
हा झकूमी लीपर्ड आहे, हिरवे केस व शरीराचा रंग यजमान देशाचा पोषाखाशी साधर्म्य असणारा आहे. याचे नाव Zakumi ठेवलेय, यात ZA हे दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय लघुनाम (abbreviation ???) आहे तर kumi याचा स्थानिक दक्षिण अफ्रिकन भाषेत अर्थ 'दहा' (१०) असा होतो.
वरील माहिती व छायाचित्र फिफा च्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतलीय.
"झकुमी" एकदम झकास ! [मॅस्कॉट
"झकुमी" एकदम झकास ! [मॅस्कॉट - शुभचिन्ह ? शुभप्रतिक ? ]
ESPN वर दाखवल्या जाणार्या
ESPN वर दाखवल्या जाणार्या 'कंटेंडर' चे रिपीट टेलीकास्ट असते काय? ८:३० -९:३० ची वेळ काही जमत नाहीये हा कार्यक्रम बघायला.
ग्रीन पॉइंट स्टेडीअम - केपटाऊन
हे स्टेडीअम नुकतेच बांधलेले असून इथे वर्ल्डकपची एक सेमीफायनल होणार आहे. समुद्र किनार्याच्या लगतच वसलेल्या या स्टेडीअमला 'सिग्नल हिल्स्'च्या पर्वतरांगांची आकर्षक पार्श्वभूमी आहे. या स्टेडीअमची क्षमता ७०००० आहे.
नेल्सन मंडेला बे
नेल्सन मंडेला बे स्टेडीअम
पोर्टएलिझाबेथ येथील 'नॉर्थ्-एंड' सरोवराच्या काठावर हे स्टेडीअम बांधले व याचा वापार ह फक्त फुटबॉलकरिताच केला जाणार आहे. या स्टेडीअम वर उप्-उपांत्य सामन्यासह एकूण ८ सामने खेळवले जाणार आहेत.
फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच
फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय संगीतद्वयीला, सलीम-सुलेमान, फिफा २०१० चे अधिकृत अँथम तयार करायला आमंत्रित केलय. सलीम्-सुलेमाननी भारताला 'चकदे इंडिया' हे अँथम दिलेय आत्ता जागतिक स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी लाभलीय. याबरोबरच फिफा २०१० विष्वचषकाच्या प्रारंभीच्या व अंतिम दिवशीच्या सोहळ्यात हे दोघे गाणार आहेत.
मध्यंतरी, ब्राझीलच्या
मध्यंतरी, ब्राझीलच्या प्रशिक्षकाची मुलाखत वाचनात आली. यापुढे प्रेक्षणीय खेळापेक्षा ब्राझील जिंकण्याचाच खेळ करण्यावर भर देईल, असं त्याने जाहीर केलंय [ रोनाल्डिन्होची गच्छंति याचाच परिपाक असावी !]. जे भारताच्या हॉकीचं झालं, तेच ब्राझीलच्या फुटबॉलचं न होवो हीच प्रार्थना ! प्रत्येक देशाची एक उपजत शैली असते व इतर स्पर्धकांवर मात करण्यासाठी त्या शैलीनुसारच खेळात बदल व सुधारणा करणं लाभदायी ठरतं, असं आपलं माझं भाबडं मत.
भाऊ, अगदी सहमत. ब्राझीलने
भाऊ, अगदी सहमत. ब्राझीलने जिंकण्यासाठीच खेळावे पण शैलीत बदल शक्यतो नको. (पण आम्ही केवळ पंखे आहोत, खेळणार तर तेच आहेत)
काल ESPN वर कंटेंडर शो मधे ब्राझीलवर फोकस होता. मजा आली बघताना, डुंगांवर फार मोठी जबाबदारी आहे.
सराव सामन्यांमध्ये फ्रान्स, पोर्तुगाल, इंग्लंड हे सध्या तरी चाचपडत आहेत. कोरीया, दक्षिण आफ्रिका तसेच न्युझीलंड यांनी चांगला खेळ करत चुरस वाढवलीय, अर्थात प्रत्यक्ष विश्वचषकात खेळणे महत्वाचे.
ESPN ने First XI या नावाने रंजक मालिका सुरू केलीय. त्यातील एक म्हणजे
First XI World Cup celebrations:
http://soccernet.espn.go.com/world-cup/columns/story?id=790168&cc=4716&v...
आणि
First XI: World Cup attackers
http://soccernet.espn.go.com/world-cup/columns/story?id=784634&cc=4716&v...
लिंकसबद्दल
लिंकसबद्दल धन्यवाद.
कॅमरूनच्या रॉजर मिलाचा खेळ व नाच हे त्या विश्वचषकाचं मोठं आकर्षणच होतं. फ्रान्सचा प्लातिनी, इटलीचा रॉस्सी यांचाही खेळ मला खूप आवडायचा. [कांही अपवादात्मक अत्यंत चुरशीचे सामने सोडले,
तर कोणत्याही मैदानी खेळात शेवटी चिरंतर लक्षांत रहातात व आनंद देतात त्या मुख्यतः शैलीदार व्यक्तिगत खेळी, अप्रतिम चाली व मॅरादोनासारख्या प्रतिभावान वल्लीच !अर्थात , हा माझा अनुभव झाला.]
आता विश्व चषकासाठी वापरावयाच्या अदिदासच्या बॉलवरून ["जाबुलानी"= आनंदोत्सव] धुसपूस सुरू झालीय; मागेही एक्-दोनदा असाच मुद्दा निघाल्याचं आठवतं.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखती
नुकत्याच झालेल्या एका मुलाखती मधे, फुटबॉल मधे देव मानल्या जाणार्या पेले नी यंदाच्या वर्ल्डकप बद्दल भाकितं नोंदवली आहेत. अर्थातच फुटबॉलच्या देवाचीच भाकीतं आहेत म्हणजे खरी ठरणारचं.
१.यंदा फायनल मधे साऊथ आफ्रिका मधला एखादा संघ निश्चितचं फायनल मधे असेल.
२. ब्राझील बरोबर कुठल्याही टिमला फायनल मधे खेळताना बघायला आवडेल म्हणजे पुन्हा एकदा ब्राझीलंच वर्चस्व राहीलं.
३. झिदान, काका, रोनाल्डिन्हो , मेसी या सारख्या खेळाडूंवर कमालीचा विश्वास.
म्हणजे यावेळेस पण हिरवे पिवळे बाजी मारणारं तरं.. मी सुद्धा या देवाचा भक्त तेव्हा मी सुद्धा ब्राझिलवरचं कौल लावणार.
Pages