Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 23:59
आसवांना वाहण्याचा छंद नाही
दु:ख नाही वेगळे, आनंद नाही
आसवेही शेवटी वाहून गेली
पावसाला राहिला धरबंद नाही
तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
शौक माझा तेवढा बेबंद नाही
भावभक्तीची दुकाने जागजागी
थांबलेला 'आतला' आक्रंद नाही...
स्वर्ग वा नरकाविना पर्याय कुठला?
हाय! आत्माही इथे स्वच्छंद नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
३,४,५
३,४,५ आवडले
६/१०
~~~~~~~~~
~~~~~~~~~
शेवटच्या २
शेवटच्या २ शेरांनी वजन आणलं. गुण ५
एकुणातच
एकुणातच गझल एकदम जमलीये...सगळेच शेर मस्त आहेत. ३रा आणि ४था तर बहोत खुब !! ६ गुण...
सॉलिड.
सॉलिड. एकदम सुंदर !
सुंदरच ६
सुंदरच
६ गुण
Pages