प्रवेशिका - १० ( aaftaab - आसवांना वाहण्याचा छंद नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 23:59

आसवांना वाहण्याचा छंद नाही
दु:ख नाही वेगळे, आनंद नाही

आसवेही शेवटी वाहून गेली
पावसाला राहिला धरबंद नाही

तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
शौक माझा तेवढा बेबंद नाही

भावभक्तीची दुकाने जागजागी
थांबलेला 'आतला' आक्रंद नाही...

स्वर्ग वा नरकाविना पर्याय कुठला?
हाय! आत्माही इथे स्वच्छंद नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळ्या कोमेजलेल्या... एकदम सही!! आवडला.

कळ्या... वाह !

षौक???... शौक असं हवय का?

तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
षौक माझा तेवढा बेबंद नाही

मस्त--५ गुण

पण "षौक" म्हणजे काय?

मतला, कळ्या आणि मक्ता आवडला.. ते षौक तेवढं शौक केलं तर बरं होईल. माझे ५ गुण.

भावभक्तीची दुकाने जागजागी
थांबलेला 'आतला' आक्रंद नाही...

स्वर्ग वा नरकाविना पर्याय कुठला?
हाय! आत्माही इथे स्वच्छंद नाही

मस्त

६ गुण

मतला आवडला!
आक्रंद आणि मक्ता ही जबरी!
आसवांच्या शेरात उला आणि सानी मिसर्याचा संबंध तितका स्पष्ट होत नाही असे वाटले!

३(गालगागा) मस्तज्बसलेय.. उगीच तडजोड केल्यासरखे नाहिये!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

सही! शेवटचे तिन्ही शेर खास..
७ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

'शौक' चा बदल केला आहे.
धन्यवाद.
==
आभास कुणा दुसर्‍याचा, प्रतिबिंब होउनी भेटे
हा कोण म्हणावे माझा? तितकासा परिचय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

मस्त आहे

७ गुण
--------------
नंदिनी
--------------

जबरदस्त आहे. दुसरा कळला नाही बाकीचे सगळे षटकार आहेत. शेवटचा तर अगदी स्टेडियम बाहेर.
ते षौक मधे काय चुकीचं होतं कळलं नाही. उलट त्या अर्थासाठी तेच बरोबर वाटतंय. असो.

याला मी गुण देरान.... ७ Happy

छान आहे गझल.
शौकवरून एक किस्सा आठवला.
एक गृहस्थ म्हणाले की, 'सगळे शौक करून झाले, पुत्रशोक तेवढा राहिला'.
(त्यांना मुलगा नव्हता, व त्यांना असे म्हणायचे होते की मुलाचा शौक राहिला)

गझलेस ६ गुण.

तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
शौक माझा तेवढा बेबंद नाही

वा वा! मस्तच!!
३ गुण.
--------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !

कळ्या आवडला... ६ गूण..

छान गझल आहे!
पाऊस, कळ्या आणि दुकाने हे शेर मस्तच!!
काही मामुली मुद्दे -
१. संघमित्राशी सहमत - "षौक" च योग्य आहे. "शौक" असा शब्द मलातरी नवीन आहे.
२. मतल्यातला सानी मिसरा - "वेगळे" शब्दाचे नेमके प्रयोजन कळले नाही.
३. शेवटचा शेर - गर्भितार्थ आणि मांडण्याची शैली आवडली. पण थोडा कीस पाडण्याची परवानगी असेल (:)) तर - आत्म्याचा "स्वर्ग-नरकाशी"काय संबंध?

गझल खूप आवडली!! माझे गुण - ७.

हाय! आत्माही इथे स्वच्छंद नाही>>मस्तच, आवडलं

तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
शौक माझा तेवढा बेबंद नाही

भावभक्तीची दुकाने जागजागी
थांबलेला 'आतला' आक्रंद नाही... >>>>>>> आवडेश !

मतला मात्र झेपला नाही.

परागकण

सहजता आणि सुयोग्य रचना. प्रत्येक शेराच्या स्वतंत्र अर्थाबरोबर संपूर्ण गजलही अर्थ घेऊन पोहोचते. आशयही आहेच. ८ मार्क्स

सर्व शेरांचा आशय छान आहे. पण माझ्यामते दुसर्‍या आणि तिसर्‍या शेरांमधे 'धरबंध' आणि 'बेबंध' असे शब्द असायला हवे आहेत. (मग काफिया चे काय?) बर्‍याचदा जरी या शब्दांचा उच्चार धरबंद आणि बेबंद असा केला जातो तरी ते चुकिचे आहे (?)
-सौरभ

सौरभ, ते शब्द बेबंद आणि धरबंद असे योग्य आहेत.
तसंच शौक आणि षोक / षौक हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत.

(माहितीचा स्त्रोत : शब्दरत्नाकर -२००५ आवृत्ती)

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

वृत्त चांगले सांभाळले आहे..

भावभक्तीची दुकाने जागजागी
थांबलेला 'आतला' आक्रंद नाही...

हे आवडले.
गुण ६

प्राजु

मतल्यात उला आणि सानिचा एकमेकांशी संबंध तितका स्पष्टं होत नाहीये, मलातरी. विशेषतः 'छंद' ह्या शब्दाचा वापर झाल्याने.
बाकी सगळेच शेर छप्परतोड झालेत.... बहोत खूब! इतके की, पाच शेरांव्र थांबायला नको होतं Happy
माझे ७
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

१) गझलेचा आशय -२ गुण
२) शैली - २ गुण
३) शब्दरचना - १ गुण
४) प्रवाह - २ गुण
५) शेर - १ गुण
============
ऐकूण - ८ गुण

तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
शौक माझा तेवढा बेबंद नाही
मस्त....
एकुणात अवघड गझल आहे..
काफियाच्या निवडीला सगळे गुण...
माझे गुण ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

पुलस्तिंशी सहमत.
छान गझल आहे!
पाऊस, कळ्या आणि दुकाने हे शेर मस्तच!!
मलाही वाटतं "षौक" च योग्य आहे. "शौक" असा शब्द या अर्थानं मला नव्यानंच भेटला.
मतला - बहुतेक 'दु:ख' आणि 'आनंद' हे माझ्यासाठी वेगळं राहिलं नाही असा अर्थ असावा. पण तो स्पष्ट होत नाही तितकासा.
शेवटचा शेर आवडला. पण 'स्वच्छंद' या शब्दाच्या अर्थाला 'स्वातंत्र्य' या पेक्षा अधिक 'बेजबाबदारपणाची' छटा आहे असं वाटलं.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश.

तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
शौक माझा तेवढा बेबंद नाही

स्वर्ग वा नरकाविना पर्याय कुठला?
हाय! आत्माही इथे स्वच्छंद नाही

लाजवाब! माझ्याकडुन ८ गुण. मला लईच आवडली.

दुकाने आणि कळ्या आवडल्या!
पहिल्या आणि दुस-या शेराचे उगाच मला तरी काहीतरी नाते असल्यासारखे वाटतेय.

म्हणजे 'आसवांना वाहण्याचा छंद नाही' इथपासून सुरूवात होऊन 'आसवेही शेवटी वाहून गेली' अशी परिस्थिती आली.
दुसरा शेर आधी वाचला तर तितकासा प्रभाव जाणवत नाही. पण पहिल्यानंतर दुसरा वाचला तर दुसरा शेराला थोडेसे वजन आल्यासारखे वाटते. गझलकाराकडून हा सिक्वेन्स जाणूनबुजून केला गेला आहे की अनवधानाने?

असो.
माझे गुणः ३

मला पहीली ओळ जामच आवडली..! ( याचा अर्थ बाकीच्या नाही असं नाही..)
शौक वाला शेरही मस्त..

गुण ८

Pages