Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 July, 2010 - 01:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
सुरणाचे देठ
सुरणाचे देढ हिरव्या देढावर पांढरे कोड आल्यासारखे असते दिसायला. वरचे साल काढून घ्यायचे.
क्रमवार पाककृती:
सुरणाचे देठ हे आमटीत, कोलंबीच्या कालवणात, वाटाणा, बिरड्यात घालतात. हे सुरणाप्रमाणे खाजणारे असते. त्यामुळे ज्या पदार्थात टाकायचे त्यात आंबट घालावे लागते. ऋषीपंचमीच्या दिवशी जी भाजी केली जाते त्या भाजीतही ह्याचा देठ वापरतात.
ह्याच सुरणाला खाली कंद लागतो. त्याचा उपयोग भाजी, उपवासाचे पदार्थ करण्यासाठी होतो.
वाढणी/प्रमाण:
अंदाजे
अधिक टिपा:
सुरणाच्या पाल्याचीही भाजी करतात अस ऐकलय पण मी कधी पाहीली किंवा खाल्लेली नाही.
माहितीचा स्रोत:
आई.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे सुरणाचे झाड आहे.
हे सुरणाचे झाड आहे.
सुरणाचा मटणासारखा रस्सा !
सुरणाचा मटणासारखा रस्सा ! परवाच करून खालाय. त्यामुळे आज नाही बाई मी जळणार तुझ्यावर
आमच्याकडे तुप जिर्याची फोडनी
आमच्याकडे तुप जिर्याची फोडनी करुन त्यात चिंच घालुन उकडुन घेतलेल्या फोडी घालुन, दाण्याच कुट +ताक आणि खोबर घालुन करतात ही भाजी . उपासालाही चालते.
सुरणाबरोबर वडीच अळुही दिसतय फोटोत
जागू, तिथे बाजूला अळू पण
जागू, तिथे बाजूला अळू पण उगवलेलं दिस्तंय.
आम्ही सुरणाची भाजी
आम्ही सुरणाची भाजी पहिल्यांदाच केली आणि खूप खाजली
मला अळूची वडी खाल्ली की घसा खाजतो, फतफतं खाल्लं की नाही खाजत.
मनिषा, जागूने सुरणाच्या
मनिषा, जागूने सुरणाच्या देठाविषयी लिहीलंय, ते वर फोटोत दिसतंय ते....जमिनीच्या वर असतं ते. आपण खातो ते जमिनीच्या खाली असतं...
हम्म्म, सुरण खाजरं असल्यामुळे
हम्म्म, सुरण खाजरं असल्यामुळे मी जरा दूरच असते ह्या भाजीपासून! पण उपासाला करतात आमच्याकडे ह्या सुरणाची भाजी!
जागू, विषारी सुरण काय प्रकार
जागू, विषारी सुरण काय प्रकार असतो माहिती आहे का कारण दुर्गा भागवतांना सुरणाचे विष लागले होते.
सुरेख - जे लिहितेस ते ते.
आरती, मी पण काल कोलंबीत टाकला
आरती, मी पण काल कोलंबीत टाकला होता सुरण
मनिषा, मी सुरणांच्या देठाबद्दल लिहलेय. तु त्याच्या भाजीबद्दलच लिहीलयस की कंदाबद्दल ?
हो अश्विनी, तो वडीचा अळू आहे.
दक्षीणा, अरुंधती, अग सुरणाच्या भाजीत आंबट टाकाव लागत मग नाही खाजवत. किंवा सुरणाच्या फोडी करुन त्याला चिंचेचा कोळ लावुन ठेवायचा. मग १५-२० मिनीटांनी धुवुन त्याची भाजी करायची. किंवा चिंच टाकून उकडून घ्यायचा मग फोडणी टाकायची. अळूवडीलाही चिंच लावावी लागते. त्यासोबत थोडा गुळ घेतला की चविष्ट होतात वड्या.
मंजूडी, तु बरोबर ओळखलस.
बी, मलाही नाही माहित विषारी सुरणाबद्दल. कारण आमच्याकडे आम्ही ह्या सुरणाच्या मुळ्या लावतो.
हा एक माहीत आहे की लाल सुरण खाजरा असतो आणि पांढरा सुरण कमी खाजरा असतो.