१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
बार्बेक्यू साठी----- जळी
बार्बेक्यू साठी-----
जळी स्थळी मिळणारा.. कॉर्न पहिला मान..
सगळ्या भाज्या कापून ३ हि कलर च्या भोपळी मिरच्या कापून, लाल कांदे, मश्रूम, बटाटे चे मोठे काप
सगळ्याला तिखट मीठ पाणी पुरी किवा चाट मसाला, थोडा तेल टाकून.. मस्त मिसळायचा ..
कबाब च्या कड्या असतील तर त्याला लावायचा किवा.. अल्युमिनियम फोइल मध्ये सगळा टाकून ठेवायचा ..
पनीर असेल तर ते पण करू शकता ..
व्हेग बर्गर आणून ग्रील केली आणि फ्ल्याट ब्रेड किवा कुठलही ब्रेड पण ग्रील करून घ्यायचा .. मस्त बर्गर करता येते वरच्या सगळ्या भाज्या टाकून ..
बर्गर बनवून चीज टाकून परत एक मीन ग्रील करायचा .. मस्त लागता चीज वितळला कि पाणिनी खाल्ल्या सारखा वाटता.
धन्यवाद दिनेशदा, >>छोटे
धन्यवाद दिनेशदा,
>>छोटे बटाटे, रताळ्याचे तूकडे, कच्ची केळी, मक्याची कणसे
हे करतेच. सोबत मश्रुम आणि शिमला मिर्ची,वांगी हे पण घेइन.
पण हे सगळे आधी मॅरिनेट करावे लागेल का? कसे?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/50131.html?1155834379
ईथे बघा जुन्या मा.बो. वर बरीच चर्चा झाली आहे ह्यावर
प्रित धन्यवाद उद्या मजा
प्रित धन्यवाद
उद्या मजा येइल तुझ्या टिप्समुळे.
वृत्तांत देईनच
थोड्या ऑलिव्ह ऑईल मधे
थोड्या ऑलिव्ह ऑईल मधे मीठ,मीरपूड, ईटालीयन सीझनींग, ड्राईड पार्सले एकत्र करून त्यात भाज्या मॅरिनेट केलेल्या छान लागतात.
नक्की करेन असेच.
नक्की करेन असेच.
मातीचे मडके मिळण्यासारखे
मातीचे मडके मिळण्यासारखे असेल, तर घडाभाजी करता येईल.
सर्व कडघान्ये भिजवून मडक्यात भाजून हुरडा करता येईल.>>>>वाह दिनेशदा ..ह्याचा विचार नव्हता केला.. पुढच्या वीकांतात करायचा आहे .. तेव्हा नक्की करून बघेल.. आता घडा मिळवावा लागेल मात्र.. नाही तर फोइलआहेच ..
पनिरचे क्यूबस करून थोड्या
पनिरचे क्यूबस करून थोड्या क्यूब्ज ना मीठ लसूण अन खोबर्याचं वाटण लावायचं. थोड्याला हिरवी चटणी लावायची अन थोड्याला लसूण तिखट पाण्यात मिसळून लावायचं ( सांबल सॉस अन नारळाचं दुध पण लावता येईल ) . मस्त तिरंगी पनीर टिक्का करता येतो.
काय मस्त टिप्स आहेत!
काय मस्त टिप्स आहेत!
कपड्यांवरचे हळदी चे डाग कसे
कपड्यांवरचे हळदी चे डाग कसे काढायचे?
मला पुर्ण फुगलेली चपाती
मला पुर्ण फुगलेली चपाती आवडते, पण माझी एखादीच अशी होते, मि घडीचीच करते तरीही आणखी काय करायला हवं
मातिच्या भांड्यात पहिल्यांदा
मातिच्या भांड्यात पहिल्यांदा जेवण बनवायच्या आधि ते भांडे कसे तयार करावे?
जर असच बनवल तर पणी शोशुन घेइल ना?
हसरी सगळ्या बाजूंनी सारखा
हसरी सगळ्या बाजूंनी सारखा थिकनेस राहिला तर पोळी फुगते असं मला वाटतं.. माझ्या फुगतात सगळ्या पोळ्या... कधी कधी कणकीवर पण अवलंबून असतं..आणि भाजताना जिथून वाफ जात असेल तिथून दाबून ठेवायचं मग दुसर्या बाजूने फुगते पोळी...
एक गंमतः आज जेवायला काय
एक गंमतः
आज जेवायला काय करायचे प्रशन होता. पावभाजी उरली होती. त्यातच मैदा, रवा तिखट मीठ कोथिंबीर घातली अन धिरडी टाकली. मस्त निघाली. फार तेल पण नाही पीत. तव्यावर टाकून झाकण ठेवले होते.
मी पावभाजीत भाज्या अगदी प्युरे करून घालते त्यामुळे सोपे गेले असेल.
Not Bad at all on a wet cold night. When it is pouring rain outside. To eat these garam luslushit dhiradi with a bit of Amul Butter
good night .
रिमा, ज्या मातीच्या भांड्यात
रिमा, ज्या मातीच्या भांड्यात जेवण करायचे आहे ते अगदी पातळ नको. निदान अर्धा सेमी पेक्षा जाड हवे.
त्यात पूर्ण पाणी भरुन, २४ तास तसेच ठेवावे. या काळात फार पाणी वाहून गेले तर ते फारच सच्छीद्र असल्याने, तेही निरुपयोगी ठरते.
मग २४ तासाने ते पाणी ओतून, दुसरे पाणी भरुन ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवावे. लक्ष ठेवावे. या काळात तडा जाऊ शकतो. पाण्याला उकळी येईपर्यंत ते तापवावे. जर या वेळात ते फूटले नाही, तरच पदार्थ शिजवण्यासाठी वापरावे.
उडिदाच्यापापडाचे पिठ आहे १
उडिदाच्यापापडाचे पिठ आहे १ किलो आता पावसामुळे करता येणार नाही ते पिठ खराब नाही होणार ना ?
पापडाच्या मधे मधे लाट्या करुन
पापडाच्या मधे मधे लाट्या करुन खाल्या तर थोडं संपेल पीठ... माझ्या तोंडाला पाणी सुटलय लाट्यांचा विचार करुन
हसरी, पिठ कोरडे आहे ना ?
हसरी, पिठ कोरडे आहे ना ? ज्वारीच्या पिठात पावपट मिसळून भाकर्या करता येतील. रव्यामधे दही आणि हे पिठ मिसळून, पांढरा ढोकळा करता येईल. पिठ मंदाग्नीवर तूपात भाजून, वड्या वा लाडू करता येईल.
दिनेशदा पिठ राहणार नाही
दिनेशदा पिठ राहणार नाही पावसाळा होईपर्यत पिठ कोरड आहे आणी पापड करायचे आहेत
आता पापडाला उन ऑक्टोबर पर्यंत
आता पापडाला उन ऑक्टोबर पर्यंत मिळणार नाही. कोरडे पिठ फ्रीजमधे टिकेल, त्याचे पापडखार वगैरे टाकून भिजवलेलेही पिठ खराब होत नाही. पण इतके दिवस नाही टिकणार. पापड करुन लगेच तळले तरी चांगले लागतात.
तसे पापड घरातही पंख्याखाली सुकतात. पण एक दिवस तरी उन्हात ठेवावे लागतात.
लोणच्याचे तेल (आणि त्यात थोडा
लोणच्याचे तेल (आणि त्यात थोडा खार) शिल्लक आहे. कसे काय वापरावे? की टाकूनच द्यावे?
थालीपीठ , तिखट मिठाचे पराठे
थालीपीठ , तिखट मिठाचे पराठे यात घालु शकतेस लोणच्याचा खार! छान लागतात.:)
लोणच्याच्या तेलात डाळ
लोणच्याच्या तेलात डाळ -ढोकळीची ( वरण फळं / चकोल्या इ.) कणीक भिजवता येईल
कच्चे पातळ पोहे लावतात त्यात
कच्चे पातळ पोहे लावतात त्यात तो खार घालता येइल. मस्त चव येते. पोह्यात कांदा, स्प्रिन्ग ऑनियन असेल तर अजून छान, कच्चेच शेंगदाणे कोथिंबीर घालायची व तो खार जरुरी पुरता लावायचा. मग तिखट मीठ अॅड्जस्ट करायचे. दुपारच्या चहाबरोबर पर्फेक्ट होईल.
भेळीच्या मिश्रणात पण घालतात काही जण पण जर चव आवड्त असेल तर.
असा उरलेला खार आणि तेल
असा उरलेला खार आणि तेल पिठल्यात, पातळभाज्यांत लई भारी लागतं. पदार्थ उकळताना घालायचा.
मामी म्हणाल्या त्याप्रमाणे
मामी म्हणाल्या त्याप्रमाणे पोहे खार लावून छान लागतात. किंवा चुरमुर्यांवर हा खार लावून खूप मस्त लागतो. त्यात हवं तर कांदा-कोथीबीर चिरून घालावी. हा प्रकार बंगाल-युपी साइडला 'झाल मुडी' म्हणून प्रसिद्ध आहे. तोंपासू
हांडवा ला पण वापरतात. पिठात
हांडवा ला पण वापरतात. पिठात घालतात.
काल मे व्हाइट सॉस मध्ये
काल मे व्हाइट सॉस मध्ये स्पिनॅच प्युरी घातली होती व पास्ता बनविला होता त्यात एक चिमुट्भरच जायफळाची पूड घातलेली मस्त स्वाद येतो करून बघा.
खाराच्या सर्वच कृती लाळगाळु
खाराच्या सर्वच कृती लाळगाळु
विदर्भातील कच्चा चिवडा आणि त्याला लागणारे तेल हा सुपरडुपर यम्मी पदार्थ आहे.
यम्म्मी उपाय आहेत एकेकीकडे
यम्म्मी उपाय आहेत एकेकीकडे खाराला संपवायचे!
दही-पोह्यांमध्येही हा खार वापरता येतो. दहीपोहे, दहीभाताशिवाय पोळीची/पराठ्याची कणीक खार घालून भिजवायची! अहाहा.....
Pages