Submitted by bedekarm on 3 October, 2008 - 14:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा लिटर दूध
४ ते ५ छोटी वांगी (पाव किलो)
एक चमचा तेल
चिमूट्भर मीठ्,(चिमूटभर साखर, गरम मसाला, दोन ते तीन पाकळ्या लसूण वाटून, दाण्याचे कूट)
क्रमवार पाककृती:
वांग्याची देठे कापा. देठाच्या पाकळ्या काढू नका. वांग्याला देठाकडून दोन चिरा द्या.
फ्राय पॅन किंवा कढइत दूध ओता. त्यात ही अख्खी वांगी टाका. एक चमचा तेल घाला.
मंद आचेवर वांगी शिजवा. वांगी शिजली की पाहिजे तर थोडे दूध असताना गॅस बंद करा.
सुकी भाजी हवी असल्यास दूध आटू द्या.
गॅसवरून उतरवून भाजीत चिमूट मीठ घाला. कंसातील पदार्थ ऐच्छीक आहेत. ते तुमच्या आवडीप्रमाणे घाला.
गरम भाकरी किंवा पोळी बरोबर न्याहरी करा. दिवसभर समाधान राहील.
वाढणी/प्रमाण:
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा:
वांग्यामुळे दूध नासत नाही.
छोटी वांगी नाहीच मिळाली तर वांग्याचे दोन किंवा चार तुकडे करा.
सांगलीच्या फिक्या पोपटी वांग्याची ही भाजी मस्त होते. ती नसतील तर कुठलीही वांगी वापरा.
माहितीचा स्रोत:
गढहिंगलज्(कोल्हापूर्)जवळील एका खेड्यातल्या हॉटेलमधे ही भाजी खाल्ली.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आणि
मस्त आणि सोप्पी वाटते आहे ही भाजी. लसूण शिजल्यावर टाकायचा? कच्चा वास नाही न यायचा?
कच्चा लसूण
कच्चा लसूण घातल्यावर थोडा वास येइलच. नाहीतर गॅस बंद करायच्या अगोदर दोन मिनिटे टाक.
पण खरतर नुसते मीठ, मिरे घालून मस्त लागते भाजी.
छान वाटली
छान वाटली रेसिपी. करुन बघते. अश्याच अजुन द्या ना रेसिपीज.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश.....
मस्त आहे
मस्त आहे रेसिपी ......करून पाहीन. पण सांगलीसारखी वांगी इथे मिळत नाहीत.
अर्थातच हा आमच्या घरात फार वादाचा मुद्दा आहे.
''वांग्यासारखी वांगी ........त्यात तुमच्या सांगलीच्या वांग्यात असं काय विषेश असणार''?..असं मला ऐकायला मिळतं.........!
''वांग्यासा
''वांग्यासारखी वांगी ........त्यात तुमच्या सांगलीच्या वांग्यात असं काय विषेश असणार''>>>>>>
हे मात्र अजिब्बात खरं नाही. कृष्णेकाठच्या वांग्याची सर कशालाही नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश.....
धन्यवाद
धन्यवाद अभिप्रायांबद्दल!
आइ आजी काकवा(काकूचे अनेक वचन) यांचे पदार्थ आठवतात नेहमी. एकेक करून बघून लिहिन.
लिहिताना थोड अचूक लिहाव लागत ना. करताना काय, मूठ चिमूट पसा वगैरे माप.
आणि समोर काय उपलब्ध आहे त्याप्रमाणे बदल.
कृष्णेकाठ
कृष्णेकाठच्या वांग्याची सर कशालाही नाही.>>> याला मात्र मोदक. (माझं सासर सांगलीचं, त्यामुळे सांगलीचं मला काही पसंत पडत नाही सहसा, ही हिरवी वांगी मात्र अपवाद! )
मीनाताई, वांग्याची एकदम वेगळीच रेसिपी आहे ही! वांग्याची सहसा मसालेदार भाजीच खाल्ली आहे. नक्की करून बघेन.
तुम्ही फोटो पण टाकत जा ना, असे वेगळे पदार्थ 'बघायला'ही छान वाटतं
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
इथे
इथे आफ्रिकेत हिरवी वांगी मिळतात. स्थानिक लोक ती कच्चीच खातात. त्यांचा हा प्रकार करुन बघेन. ( पण इथे ताजे दूध मिळत नाही !!! )
प्राची व
प्राची व पूनम ..........कृष्णाकाठच्या वांग्यांचा विषय निघाल्यावर आपोआप सगळे त्या भागातले जमले......... नाहीका? माझे माहेर सांगलीचे आहे........हे न सांगताच कळले असेलच. खरंच कृष्णाकाठच्या वांग्यांची सर कशालाच नाही.
मीना एकेक
मीना
एकेक करून जरूर रेसिपीज लिहून काढ. खूप छान वाटते. (मला वाटतं हाही एक सेल्फ एक्स्प्रेशनचाच भाग आहे.) मला मध्यंतरीचा काही काळ थोडा निवांत मिळाला होता. तेव्हा सहज म्हणून खूप रेसिपीज जरा विभाग करून वेळ मिळेल तशी लिहीत गेले. कालांतराने जेव्हा माझ्या मुलीचे लग्न झाले तेव्हा ते रेसिपी बुक तिला दिले. म्हणजे तिने ते नेले. आता तिला त्याचा खूप उपयोग होतोय.
कृष्णाकाठ
कृष्णाकाठच्या वांग्यांसारखी वांगी जगात कुठेही मिळत नाही ह्याबद्दल काही शंकाच नाही.. ती छोटी हिरवी भाजीची वांगी असोत नाहितर भरताची.. आणि काहिही करा त्या वांग्याचं, भरलं वांगं, डाळ-वांग, भरीत, आमटीत घालुन.. चांगलीच लागतात..
-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी
कृष्णाकाठ
कृष्णाकाठची वांगी... आहाहा!!
माझ्या कोकणातल्या सासूला हे माहितच नाही. आणि कोकणाबाहेरही काही भलं असतं यावर तिचा विश्वास नाही. त्यामुळे मला 'कृष्णाकाठची वांगी' म्हणून अजूनच गहिवरायला होतं. या मेल्या मुंबईत भाजी पण डबडी मिळते. त्यातल्या त्यात पार्ल्यात बरी मिळते.
सांगलीचं नाव काढल्यावर मी पण पाकृ वर आले. मी सांगलीची नाही तशी कारण आजोबाच पुण्याला आले सांगलीहून पण त्यांच्या भावांच्या पिढ्या सगळ्या सांगलीतच आहेत. त्यामुळे सांगली म्हणजे थोडेसेच माहित असलेले, सारख्याच तोंडावळ्याचे, रग्गड नातेवाईक. एवढंच माहित होतं लहानपणी.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
पुनम, होतं
पुनम, होतं असं
आता बघ ना, माझं सासर्-माहेर दोन्ही कृष्णाकाठचंच. पण मला वाईची वांगी जास्त आवडतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश.....
मीनाताई
मीनाताई आणि इतर, कुठे आहे हा कृष्णकाठ?
तशी विदर्भातली वांगी पण छान लागतात. काटेरी असतात ती, तिला मसाल्याची वांगी म्हणतात.
दिनेशदा, आफ्रीकेत पोचलात का? माहिती नव्हतं हो..
बाय दी वे...
बाय दी वे... पश्चिम महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्राची व्याप्ती कोल्हापूर ते पुणे अशी दक्षिणोत्तर
आणि सह्याद्री कडा ते मराठवाड्याची हद्द अशीच आहे असे का वाटते??
जळगावची वांगी जगप्रसिद्ध असल्याचे माहीत नाही का तुम्हाला?
त.टी.: मी जळगावचा नाही तसेच विदर्भातलाही नाही!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.
भाषावार
भाषावार प्रांत रचने प्रमाणे वांगेवार जिल्हारचना करायला हरकत नाही., इतकी विविधता वांग्याच्या जातीत आहे.
दुध आणि
दुध आणि वांगं असं combination मी पहिल्यांदाच ऐकलं ..
कृष्णाकाठची काय नी जळगाव ची काय किंवा मुंबईची डबडा भाजी काय .. इथल्या अमेरिकेतल्या वांग्यांची सर कशालाच नाही .. :p बियाच बिया .. गर अगदी namesake!
नक्की
नक्की रेसीपी बाफ आहे ना हा?
असो, पण कोणी चायना वांगी खाल्ली आहेत काय? सर काय नी पाय काय ... फक्त वेगळीच वेगळी चव.
वरील पुराण वाचून शेवटी देसी दुकानात गेले तर तिथे ही वांगी मिळाली. हीच का ती फेमस हिरवी वांगी कृष्णाकाठची?
दुकानदाराने ती ईटालीयन व्हाईट वांगी सांगीतली. नी वर म्हणाला पुन्हा हीच घेशील विकत. त्याला कृष्णाकाठ बहुधा माहीत नसेल. नाहीतर त्याच्या मते नदीकाठी वांगी उगत नसतील.
विषय बदल :
विषय बदल :
मी आज केलं दूध-वांगं. छोटी जांभळी वांगी वापरली. कंसातले सगळे पदार्थ घातले आणि ओलं खोबरं, गोडा मसालाही घातला. दाण्याचे कूट विसरले. वरून लसणीची फोडणी घातली छानपैकी.. दुपारी नवर्याचा फोन आला की कळेल कशी झाली होती भाजी .... कारण मी वांगी अजिबात खात नाही.
कृपया
कृपया अवांतर गप्पा इथे नको. त्यासाठी विविध गप्पांची पाने दिली आहेत.
मस्तच आहे
मस्तच आहे रेसिपी........
फोटों दिसत नाहीत... कधी रिकामा चौकोन तर कधी काहीच नाही
साधना
कृष्णेकाठ
कृष्णेकाठच्या वांग्याची सर कशालाही नाही....
अगदी बरोबर. आमच्या कुरुन्दवाडचीही वांगी प्रसिद्ध आहेत....
मीनाताई,
मीनाताई, जबरी रेसिपी आहे. मी करून पाहिली. दूध, वांगी, गोडा मसाला, दाण्याचे कूट अन् वरून कोथिंबीर घातली. आवडली. धन्यवाद
--------------------------------
आली दिवाळी!
..... मी
..... मी रेसेपीच्या बी बी वर हल्लीच यायला लागलो आहे... कारण भाजी करायचं काम माझ्याकडे असते.. बायको भात, चपाती, वरण करते... भाजी माझ्याकडे. ( लग्न होऊन तीन महिने झालेत! ) या बी बी मुळे मला खूप मदत होते... रविवारी बघेन करून ही भाजी...
........................
मुद्दाम वांग्यासाठी बीबी उघडुन कोण चर्चा करत बसेल तिथे?
मी आजच दुध
मी आजच दुध वांग्याची भाजी केली छान झाली. मी अर्धा लि. दुधात अर्धा कि. वांगी टाकली. वरुन गरम मसाला आणि दाण्याचा कुट टाकला. छान झाली.
आमच्या
आमच्या कुरुन्दवाडचीही वांगी प्रसिद्ध आहेत
>>>
जामो, तुमचं कुरुंदवाड काय कृष्णेवर नाही काय?
अशा
अशा पद्धतीने दुधात आणखी कोणत्या भाज्या करता येतात.. फोडणी करून त्यात दूध घालून मग त्यात भाजी शिजवली तर चालते का?
मी तरी
मी तरी बर्याच भाज्यात दूध घालते कारण तो क्रीमीनेस यायला. मश्रूम मटर मध्ये पण दूध घालते. मस्त होते. कधी कधी काही भाज्यात दही सुद्धा घालून चांगले होते.
बीन्स
बीन्स वर्गातल्या भाज्यात दूध छान लागतं. वाल पापडीच्या भाजीत तर सायीसकट दूध किंवा थोडी साय टाकली तर ती भाजी छान होते.
मी आज दूध
मी आज दूध वांगे केले .. जांभळी वांगी घालून.. छान झाले आहे... फक्त एक जरा चुकले... मोठ्या गॅसवर केले, त्यामुळे दूध लवकर आटले... मंद आचेवर हा पदार्थ चांगला होइल.
Pages