दूध-वांग

Submitted by bedekarm on 3 October, 2008 - 14:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा लिटर दूध
४ ते ५ छोटी वांगी (पाव किलो)
एक चमचा तेल
चिमूट्भर मीठ्,(चिमूटभर साखर, गरम मसाला, दोन ते तीन पाकळ्या लसूण वाटून, दाण्याचे कूट)

क्रमवार पाककृती: 

वांग्याची देठे कापा. देठाच्या पाकळ्या काढू नका. वांग्याला देठाकडून दोन चिरा द्या.
फ्राय पॅन किंवा कढइत दूध ओता. त्यात ही अख्खी वांगी टाका. एक चमचा तेल घाला.
मंद आचेवर वांगी शिजवा. वांगी शिजली की पाहिजे तर थोडे दूध असताना गॅस बंद करा.
सुकी भाजी हवी असल्यास दूध आटू द्या.
गॅसवरून उतरवून भाजीत चिमूट मीठ घाला. कंसातील पदार्थ ऐच्छीक आहेत. ते तुमच्या आवडीप्रमाणे घाला.
गरम भाकरी किंवा पोळी बरोबर न्याहरी करा. दिवसभर समाधान राहील.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा: 

वांग्यामुळे दूध नासत नाही.
छोटी वांगी नाहीच मिळाली तर वांग्याचे दोन किंवा चार तुकडे करा.
सांगलीच्या फिक्या पोपटी वांग्याची ही भाजी मस्त होते. ती नसतील तर कुठलीही वांगी वापरा.

माहितीचा स्रोत: 
गढहिंगलज्(कोल्हापूर्)जवळील एका खेड्यातल्या हॉटेलमधे ही भाजी खाल्ली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माठाच्या, पालकच्या भाजीत दही घालते छान होतात दही घालुन भाज्या.

मला एक प्रश्न पडलाय. फोडणी न करता direct दुधात शिजवायची का वांगी? आणि मग तेल कधी घालायचं?

डायरेक्ट दुधातच शिजवायची वांगी. शिजताना वरून एखादा चमचा तेल टाकायचे. नाही टाकले तरीही चालते.
ज्यांना सौम्य चव आवडते त्यांनी पावभाजीतही दूध व साय वरून टाकले तर छान लागते.
मेथीची भाजीही दुधात छान होते. त्यात थोडी हिरवी मिरची व थोडे काजूचे कूट घालावे.

फ्लॉवर, गवार वगैरे शिजतानाही दूध घातल्याचं पाहिलंय.

मी करुन पाहिली ही भाजी. छान होते.
मी दुधी भोपळ्याची दुधातली भाजी करते.

मीपण केली ही भाजी.खुप मस्त झाली.

.

आणि दूधाएवजी शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालून चहा चांगला लागतो असे एकलेय Proud

हो हो मनू, चहाची ग्रेव्ही चांगली दाट होते त्याने.

ए पोरींनो, परत मॉड्स येतील हां इथे.... Lol
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

मॉड्सना पण चहा देऊ की.. मग नाही बोलणार ते काही ... बी ची पोस्ट कुठे गेली.. ?

ए बी, का रे पोस्ट डिलीट केलीस? अरे जरा गंमत केली रे तुझी. राग आला असेल तर सॉरी. तुझं ते जोधा-अकबर बिबि वरचं आईने अकबरी बद्दल "संतूच्या आई लिहितात का?" असं इनोसंटली विचारलेले आठवले की सुद्धा मजा वाटते.

अश्विनी, मुद्दाम काढले कारण मग प्रशासक वर्गास त्रास होतो ना. शिवाय अजून चार सभासदांना विनोद करावासा वाटतो. म्हणून काढून टाकले पोष्ट. इतका छान विनोद करणार्‍या व्यक्तीला तुझ्यासारख्या विनोदी व्यक्तीचा राग कसा काय येईल Happy

जाता जाता.. चहात साखरे ऐवजी मीठ घालणे आणि पत्ती ऐवजी मसाला घालणे ह्या चुका माझ्या हातून झालेल्या आहेत. पण दाण्याचे कुट ते काम मनुच करू जाणे Happy

मी एकलेय असे लिहिलेय जसे लोक चहात मसाले टाकतात एकलेय तसेच कूट टाकतात एकलेय. Happy

कंसातले सगळे पदार्थ घातले आणि ओलं खोबरं, गोडा मसालाही घातला. दाण्याचे कूट विसरले. वरून लसणीची फोडणी घातली छानपैकी..<<

दूध, वांगी, गोडा मसाला, दाण्याचे कूट अन् वरून कोथिंबीर घातली. <<<

अजून थोडा वेळ चर्चा झाली असती तर सरळ भरली वांगी करुन ती दुधात टाकली अशीही प्रतिक्रिया आली असती असं वाटतंय Happy

यावरुन आठवण झाली, लंडन च्या एक काकू baked beans ची साग्रसंगीत फोडणी घालून उसळ करायच्या, म्हणायच्या की त्याशिवाय आवडतच नाही Happy

बेक्ड बीन्सला फोडणी Happy करुन पहायला हवा हा पदार्थ Happy

एकदा आमच्याकडे माझ्या मित्राची आई आली. पहिलाच दिवस. आम्ही पित्झा आणि पिटा ब्रेड आणला होता. दोन्हीमधे थोडेफार उरले. दुसर्‍या दिवशी काकूंनी चार पाच कांदे चिरून, उरलेला पित्झा आणि पिटा ब्रेडचा चुरा करून त्याचा पोळ्यांचा चिवडा असतो तसा चिवडा केला. आम्हाला कळले देखील नाही. मग काकूंनीच सांगितले की त्यांनी चीझचा थर फेकून दिला आणि उरलेला पित्झा वापरला.

मेथीची भाजीही दुधात छान होते >>>>
मेथीची भाजी आणि दुध हे विरुद्ध अन्न प्रकारात मोडते असे ऐकुन आहे म्हणून सोबत खाऊ नये म्हणतात.

तसेच वांग्यात लोह असते का? जर असेल आणि तेच हवे म्हणून जर वांग्यांचा वापर आहारात होत असेन तर ते दुधासोबत खाणे योग्य नाही कारण दुधातल्या कॅल्शिअममुळे लोह शरीरात शोषले जात नाही .

पालकच्या भाजीत दही घालते छान होतात दही घालुन भाज्या.>>>
पालकाच्या भाजीचेही तसेच. त्यातल्या लोहाचा दुधाने, दह्याने मिळायला हवा तो फायदा मिळत नाही. मला एक ओळखीच्या काकू नेहमी म्हणत असतात पालक पनीर चवीला बरे लागते म्हणून खायचे त्यातल्या लोहाचा फायदा काही शरीराला मिळत नाही.
जसे की कॅल्शिअममुळे लोह शरीरात शोषले जात नाही तसेच लोह शरीराकडून शोषले जावे म्हणून लोहासोबत क जीवनसत्वयुक्त पदार्थ घ्यायला हवे असतात .

ref:
< . Milk can also interfere with iron absorption, so don't pair milk with iron-rich foods if you are concerned about getting enough iron.
http://kidshealth.org/teen/diseases_conditions/blood/anemia.html

. Most of us know that the form of iron found in plants (called non-heme iron) is not absorbed as well as heme iron, found in animal products. Vegetarians are often taught that vitamin C improves the absorption of non-heme iron so that to maximize iron absorption from vegetarian meals, meals should include orange juice, tomato products, or other good sources of vitamin C
http://findarticles.com/p/articles/mi_m0FDE/is_3_20/ai_74510761 >

हि पोस्ट जर अस्थानी वाटत असेल तर योग्य ठीकाणी हलवता येईल.

अस्थानी नाही, चांगली माहिती आहे. या विषयावर आणखी सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती लिहू शकत असाल तर पाककृती विभागात वेगळ्या पानावर लिहा ना.

अरे पण ह्या आपल्या पुर्वजांच्या पारंपारीक कृती आहेत आणि आंध्रात देखील दूध वांग केलं जातं. आजवर अशी एकही कृती आढळली जी पारंपारीक आहे आणि अपायकारक आहे.

यावरुन आठवण झाली, लंडन च्या एक काकू baked beans ची साग्रसंगीत फोडणी घालून उसळ करायच्या, म्हणायच्या की त्याशिवाय आवडतच नाही

>>> मिलिंदा, u too??? विषय भरकटतोय हं .. दुध वांग्याचा आणि baked beans चा काय संबंध?? Happy

संबंध नाही, पण असंच लिहायचं असतं असं बरीच पोस्ट्स पाहून वाटलं म्हणून म्हटलं आपण पण हात धुवून घ्यावा .. oops.. फोडणी देऊन घ्यावी Happy

नीधप, वड्याचे तेल वान्ग्यावर काधले आहे....वान्ग्याच्या नीमीत्ताने सासू अन मुम्बई दोन्हीचा काटा काढला Uhoh

आज करणार आहे

युट्युबवर असे दुधवांगे मिळाले नाही. वांग्याची रेग्युलर भाजी करून त्यात शेवटी दूध ओतले आहे. मीपण आज तसेच करीन.

Pages