Submitted by bedekarm on 3 October, 2008 - 14:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा लिटर दूध
४ ते ५ छोटी वांगी (पाव किलो)
एक चमचा तेल
चिमूट्भर मीठ्,(चिमूटभर साखर, गरम मसाला, दोन ते तीन पाकळ्या लसूण वाटून, दाण्याचे कूट)
क्रमवार पाककृती:
वांग्याची देठे कापा. देठाच्या पाकळ्या काढू नका. वांग्याला देठाकडून दोन चिरा द्या.
फ्राय पॅन किंवा कढइत दूध ओता. त्यात ही अख्खी वांगी टाका. एक चमचा तेल घाला.
मंद आचेवर वांगी शिजवा. वांगी शिजली की पाहिजे तर थोडे दूध असताना गॅस बंद करा.
सुकी भाजी हवी असल्यास दूध आटू द्या.
गॅसवरून उतरवून भाजीत चिमूट मीठ घाला. कंसातील पदार्थ ऐच्छीक आहेत. ते तुमच्या आवडीप्रमाणे घाला.
गरम भाकरी किंवा पोळी बरोबर न्याहरी करा. दिवसभर समाधान राहील.
वाढणी/प्रमाण:
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा:
वांग्यामुळे दूध नासत नाही.
छोटी वांगी नाहीच मिळाली तर वांग्याचे दोन किंवा चार तुकडे करा.
सांगलीच्या फिक्या पोपटी वांग्याची ही भाजी मस्त होते. ती नसतील तर कुठलीही वांगी वापरा.
माहितीचा स्रोत:
गढहिंगलज्(कोल्हापूर्)जवळील एका खेड्यातल्या हॉटेलमधे ही भाजी खाल्ली.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाजी अर्धी करून मग त्यात दूध
भाजी अर्धी करून मग त्यात दूध ओतले
"
दूध आणि वांगे..कल्पनाही करवत
दूध आणि वांगे..कल्पनाही करवत नाही...
छान लागते
छान लागते
छान लागेल असं दिसतंय फोटो
छान लागेल असं दिसतंय फोटो वरून...मस्त फोटो.
Pages