ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे
अ
द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स
ब
(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस
क
(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया
ड
(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना
इ
(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून
फ
इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया
ग
(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)
ह
(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली
उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने
उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)
उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)
उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)
तिसर्या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)
अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)
ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/
तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...
ब्राझील बाहेर!!!! मी पूर्ण
ब्राझील बाहेर!!!!
मी पूर्ण मॅच नाही पाहिली, पण ब्राझीलचे खेळाडू नेहमीच्या जोषात दिसले नाहीत...
फ्रान्स-इटलीच्या final ची आठवण झाली...
अरेरे, ब्राझिल हरल्याचे बघून
अरेरे, ब्राझिल हरल्याचे बघून वाईट वाटले. ब्रझिल - जर्मनी असा अंतिम सामना होईल असे वाटत होते. निदान आता जर्मनीने तरी विश्वचषक जिंकावा.
ब्राझील बाहेर ! बरे
ब्राझील बाहेर ! बरे झाले...
सेकन्ड हाल्फ मधे डच शो होता.....
मंटारीचा ऑसम गोल. Slight
मंटारीचा ऑसम गोल. Slight deflection but well enough to fool Uruguay's goalie.
आईशप्पथ घरी असल्याचं समाधान
आईशप्पथ घरी असल्याचं समाधान वाटतंय!
किती नाट्यमय मॅच होती उरुग्वे
किती नाट्यमय मॅच होती उरुग्वे वि घाना..
अर्थात घानाला इतक्या संधी मिळून त्यांनी वाया घालवल्या त्या !
अभुतपूर्व निराशा; घानाची.
अभुतपूर्व निराशा; घानाची. ओवरटाइममध्ये जियानने वाया घालवलेली पेनल्टी किक जी निर्णायक ठरु शकली असती. उरुग्वायने संधीचा फायदा उठवला.
अगदी अगदी! त्या जियानला तर
अगदी अगदी! त्या जियानला तर काय मस्त चांस होता, तो जर वाया नसता घालवला तर किका मारायची वेळच आली नसती.
मस्तं झाली मॅच.. घाना अंडर
मस्तं झाली मॅच.. घाना अंडर प्रेशर खेळले शेवटी !
काल ब्राझीलच्या मॅचचा पहिला
काल ब्राझीलच्या मॅचचा पहिला हाफ बघितला... बर्यापैकी धसमुसळा खेळ चालू होता... आणि साधारण पेनल्टी क्षेत्राच्या जवळ पडापडी करून फ्री किक मिळवण्यावरच भर दिसत होता... एकूणच फुटबॉल कमी आणि नाटक जास्त चालू होते.. नंतर काही बघायला मिळाले नाही. पण काल अजून एक धक्कादायक निकाल लागला..
बोली लावा आता यंदा.. आधी एकही वर्ल्डकप न जिंकलेली टीम जिंकणार की वर्ल्डकप जिंकलेली टीम जिंकणार... आधी जिंकलेली टीम असेल तर त्यांना जिंकायचे म्हणून प्रचंड प्रेशर असणार आणि कधीच न जिंकलेली टीम असेल तर त्यांना मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायचे प्रेशर असणार...
>>बोली लावा आता यंदा स्पेन...
>>बोली लावा आता यंदा
स्पेन...
>>> बोली लावा आता यंदा जर्मनी
>>> बोली लावा आता यंदा
जर्मनी झिंदाबाद!
बोली लावा आता यंदा <<< जर्मनी
बोली लावा आता यंदा
<<< जर्मनी !
पण दुसरं मन सांगतय कि अंडरडॉग्स नेणार कप:).
मी यावेळेस जेवढं फिफा बघितलं
मी यावेळेस जेवढं फिफा बघितलं तेवढं कधीच बघितलं नव्हतं. काल ब्राझील हरल्यावर मात्र खूप बरं वाटलं कारण एकच, मुजोर वाटत होते फारच.
ब्राझील-१, नेदरलँड- २
ब्राझील-१, नेदरलँड- २
<<एकूणच फुटबॉल कमी आणि नाटक जास्त चालू होते.. >> हे बरचसं खरं असलं तरी मेलोचा अप्रतिम "थ्रू पास" व त्यावर रोबिन्होने केलेला ब्राझीलचा गोल व नेदरलँडचे गोल सुरेखच होते. त्याहीपेक्षा, मला वाटतं डचांचे डावपेच सरस ठरले हे या सामन्याचं वैशिष्ठ्य ठरावं. ब्राझीलचे आघाडीचे खेळाडू बॉल ज्या गोलजवळ असेल तिथे तिथे हजर असायचे तेंव्हा डच मात्र आक्रमण फक्त दोन-तीन खेळाडूंवर सोपवून बचावावरच लक्ष केंद्रीत करत होते; स्नेजर व रॉबेन सुरवातीला ब्राझीलच्या हद्दीत मुसंड्या मारायचे ते जणूं गोल करण्यापेक्षा ब्राझीलच्या आघाडीला धावपळ करायला लावायलाच ! बरोबरीचा गोल झाल्यावर मात्र डचानी हळुहळू आक्रमक पवित्रा घेत उत्तरार्धात ब्राझीलवरचं दडपण प्रभावी केलं. फॅबिआनो काल फारसा प्रभावी नव्हता व ककाने शेवटी शेवटी शर्थीचे प्रयत्न केले तरी तोपर्यंत डच झपाटल्यासारखे बचाव करत होते. एकंदरीत, <<जोसे मोरिन्ह्यो तुम्ही म्हणता तस खेळून बार्का सारख्या टीम ला पद्धतशीर पणे हरवतात.>> या विक्रमजींच्या कॉमेंटची प्रचिती यावी असा हा सामना झाला; अर्थात, डचानी वापरलेली पद्धत या डावपेचाची खूपच सुधारीत आवॄत्ति होती !
अपेक्षेप्रमाणे, उरूग्वे वि घाना सामना खूपच वेगवान व रंगतदार झाला. घानाबद्दल खूपच वाईट वाटलं जरी
उरूग्वेनीही छान वेगवान खेळी केल्या.
ब्राझीलचा अंतिम फेरीचा मार्ग तुलनेने खूपच सोपा असं मानणार्या सार्यानाच धक्का. आता जात्यातल्या ब्राझीलला हंसण्याऐवजी सुपातल्या अर्जेंटीनाने [व मॅराडोनाने ] बोलण्यापेक्षा खेळावर लक्ष देणं त्यांच्याच हिताचं ठरेल !
यंदाचा आठवडा सुतकातच गेलाय.
यंदाचा आठवडा सुतकातच गेलाय. फेडी बाहेर आणि आत्ता ब्राझील पण.
डच डिजर्विंग आहेत. त्यादिवशीची बेटर टीम जिंकली. ब्राझील मुजोर कधीच वाटली नाही पण हॉलंडने दुसर्या हाप मध्ये कात टाकून जे प्रतिआक्रमण केले ते मस्त होते. राइट विंग कडून जबरदस्त दबाव बनवत होते आणि अचानक लेफ्ट विंगला पास देऊन चकवत होते. स्नाइडर तर जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. इंटर कडून पूर्ण सिझन मध्ये आणि आत्ता विश्वचषकात 'ऑरेंज आर्मी'तर्फे जबरा खेळ खेळतोय.
घाना आणि उरुग्वे मॅच पण मस्त झाली. पहिली ३० मिनिटे उरुग्वेने थोडे हल्ले केले, पण ३०व्या मिनिटापासून घानाने प्रतिआक्रमण सुरू केले व ३-४ शॉट्स तरी जवळपास गोलच होते. शेवटी १ गोल केलाच. तरी घानाला बॉलवर नियंत्रण फार कमकुवत वाटले, बॉल जास्त वेळ आपल्याकडे ठेवता आलाच नाही.
दुसर्या हाप मध्ये फोर्लॉनचा गोलतर जबरदस्तच. फोर्लॉन-स्युआरेझ जोडगोळी अचाट आहे. ग्यानने हुकलेली पेनल्टी त्याला कायम लक्षात राहील. इतिहास घडायचा राहिला काल.
आज क्लॅश ऑफ टायटन्स, अर्जेंटिना वि. जर्मनी. कोण विजयी होईल हे अशक्य आहे सांगणे.
रात्री तर स्पेनने गाफील न राहता पॅराग्वे विरुध्द दमदार खेळ करावा नायतर माझा दुसरा फेवरिट संघ पण बाहेर जायचा.
मध्यंतर : अर्जेंटीना -०
मध्यंतर : अर्जेंटीना -० जर्मनी -१
हा सामना अविस्मरणीय होण्याच्या मार्गावर !
<<स्पेनने गाफील न राहता पॅराग्वे विरुध्द दमदार खेळ करावा >> रंगासेठ, गट सामन्यातला स्वित्झरलंडने दिलेला पहिला झटका विसरून, किंबहुना सतत डोळ्यासमोर ठेवून, स्पेन आता खरंच छान खेळतय. तुम्ही त्यांचं नका टेंशन घेऊ !
गोल !! गोल !! गोल !!!!!!!!
गोल !! गोल !! गोल !!!!!!!!
सही.. गो जर्मनी !!
सही.. गो जर्मनी !!
गोल !! गोल !! गोल !!!!!!!!
गोल !! गोल !! गोल !!!!!!!!
गोल !! गोल !! गोल
गोल !! गोल !! गोल !!!!!!!!
जर्मनी.... जर्मनी... जर्मनी..
मी सांगितलेलं क्लोज आणि कंपनी अशी खेळणार ते..
अजून एक. पार उतरवली.
अजून एक. पार उतरवली.
जर्मनी ऑन द रोल! ४-०
जर्मनी ऑन द रोल! ४-०
अर्जेंटिनाचे पुचाट पास अन
अर्जेंटिनाचे पुचाट पास अन भलतेच नेम ह्यामुळे त्यांनी मॅच घातली.
जर्मनी विरुद्ध कोण खेळणार आता?
अशक्य सही मॅच !!! जर्मनीचा
अशक्य सही मॅच !!! जर्मनीचा परत एकदा भक्कम बचाव आणि चान्स मिळेल तेव्हा जोरदार आक्रमणं.. !!
फार्फार मजा आली..
सहीsssssss. जर्मन्स जिंकले,
सहीsssssss. जर्मन्स जिंकले, अर्जेन्टिना बाहेर. मॅराडोनाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता.
>>जर्मनी विरुद्ध कोण खेळणार
>>जर्मनी विरुद्ध कोण खेळणार आता?<<
स्पेन?
>>जर्मनी विरुद्ध कोण खेळणार
>>जर्मनी विरुद्ध कोण खेळणार आता?<<
स्पेन आणि जिन्कणार पण..
अर्जेंटिना
अर्जेंटिना
Inspired ! हा एकच शब्द सुचतोय
Inspired ! हा एकच शब्द सुचतोय जर्मनीच्या आजच्या खेळाबाबत. सतत आघाडीवर असूनही त्यानी आक्रमक पवित्रा कायम ठेवून अर्जेंटीनावर असह्य दडपण कायम ठेवलं. मध्यंतरानंतरची १५-२० मिनीटं सोडली तर अर्जेंटीनाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणं अशक्य करून ठेवलं जर्मनीने. म्युलर, क्लोस, श्वाईनस्टीजर, पोडोल्स्की, लाम तर अफलातून खेळले. जर्मन असाच फॉर्म ठेवून खेळले तर त्याना हरवणं अशक्यप्रायच वाटतंय. पण... या विश्वचषकाचा प्रत्येक दिवस व प्रत्येक सामना सरड्यासारखे रंग बदलतोय ! भल्या भल्यांसाठी तर तो "विषचषक"च बनलाय!!
अर्जेंटीना व ब्राझील यांच्या खेळातील "कीक्स"पेक्षा पेले वि. मॅराडोना ह्या लाथाळ्याच अधिक रंगल्या म्हणायच्या !
Pages