फूटबॉल वर्ल्डकप २०१० - द. आफ्रिका

Submitted by हिम्सकूल on 13 May, 2010 - 06:45

ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे


द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स


(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस


(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया


(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना


(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून


इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया


(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)


(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली

उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने

उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)

उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)

उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)

तिसर्‍या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)

अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)

ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/

तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा गोल जबरी होता.. स्लोवानियानी चांगली संधी घालवली....

आणि इंग्लंडचा पण पोपट झाला आहे... त्यांना ग्रुपमधली शेवटची मॅच जिंकावीच लागेल नाहीतर टाटा बाय बाय...

इंग्लंड ची अवस्था अवघड आलीये, त्यात इंग्लिश प्रेक्षकांनी हुर्यो उडवल्याने रुनी आदी खेळाडू भडकलेत. आत्त्ता स्लोवाकिया बरोबरच्या सामन्यात काय करतात बघू. अमेरिकेचा तिसरा गोल नाकारणे थोडे अन्यायकारक वाटतय. तो ऑफसाइड नव्हता, असो पण ग्रेट कमबॅक केला अमेरिकेने.

आत्ताच हॉलंडने १-० ने विजय मिळवत आगेकूच केलय पण त्यांना त्यासाठी झगडावं लागलं.

मला चुकलेल्या सामन्यांवरचे वरील अभिप्राय वाचून अधिकच चुकचूकलो !
स्लोवानिया वि.अमेरिका सामना पूर्ण पाहिला. स्लोवानियाचं शॉर्ट पासिंग सरस होतं, बचाव अधिक मजबूत होता, बॉलचा ताबा घेण्यासाठी दोन खेळाडूत होणार्‍या द्वंद्वात बहुधा स्लोवानियाच्या खेळाडूंचाच वरचष्मा होता. बर्सचा पहिला गोल अफलातून व त्यांचा दुसरा गोलही ऑफ्-साईडचं सावट असूनही अप्रतिम. पण ०-२ पिछाडीवरून अमेरिकेने सामना वाचवणं कौतुकास्पदच. त्याचं मुख्य श्रेय मला तरी डोनॉवानला द्यावसं वाटतं. त्याने अमेरिकेसाठी केलेला पहिला गोल लाजवाब होताच पण संपूर्ण वेळ त्याच्या देहबोलीतून व्यक्त होणारा आत्मविश्वास, तन्मयता व जिद्द त्याच्या संघासाठी प्रेरणादायक ठरली असावी.
ब्रॅडलेचा "संधिसाधू " गोलही छानच.
नायजेरियाचं वाईट वाटलं. आतापर्यंत चांगली कामगिरी करूनही त्यांच्या गोलीला रडायची पाळी आलीच!
बहुतेक ग्रूपमध्ये आता शेवटच्या सामन्यावरच कोण तळ्यात, कोण मळ्यात, हे ठरणार आहे. त्यामुळे,
रडारड आलीच. पण तसं पाहिलं तर असे अश्रू गोळा करूनच त्यांची फक्त एका विजेत्यासाठी "शँपेन" तयार करणं, हीच तर विश्वचषकाची खासियत आहे !

असे अश्रू गोळा करूनच त्यांची फक्त एका विजेत्यासाठी "शँपेन" तयार करणं, हीच तर विश्वचषकाची खासियत आहे !

>>>>>>>

फारच मस्त...

इटली वि. न्यूझीलंड -१-१.
आणखी एक अनपेक्षित निकाल. विश्वचषक विजेत्या इटलीला आता दूसर्‍या फेरीत जाण्यासाठी झगडावं लागणार ! पहिला गोल नोंदवून न्यूझीलंडने इटलीला धक्का दिला व इटलीने मग सामन्याची सूत्र बव्हंशी स्वतःकडे ठेवली तरी कांहीशा अन्यायकारक वाटलेल्या "स्पॉट किक"मुळेच बरोबरी साधण्यापलीकडे न्यूझीलंडने जिद्दीने त्याना नाही जावू दिलं. विश्वचषकात खास अशी काहीच कामगिरी नसलेल्या न्यूझीलंडसाठी हा ऐतिहासीक निकाल व त्यांची दूसर्‍या फेरीत जाण्याची शक्यताही शाबूत. [ह्या ग्रूपमधील चारपैकी कोणतेही दोन संघ अजूनही पुढे जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे. पॅराग्वेने स्लोव्हाकियाला सहजपणे २-० हरवून कालच ह्या ग्रूपमध्ये आघाडी घेतलीय] सामना रंगतदार झाला व न्यूझीलंडच्या चाहत्यांचा जल्लोश तर पहाण्याजोगा!
ब्राझील वि. आयव्हरी कोस्ट ३-१.
कालच्या खेळात काहीसा आडदांडपणा झाला तरीही सामना खूपच रंगला. फॅबिअ‍ॅनोचा पहिला गोल अप्रतिम पण दूसरा गोल नि:संशय हाताचा उपयोग होवून [करून नव्हे] झाला. आश्चर्य वाटलं ते असं की रेफेरी फॅबिअ‍ॅनोला हाताला बॉल लागल्याचं प्रश्नात्मक खुणावत होता तरी पण त्याने गोल मात्र नाकारला नाही ! ब्राझीलसारख्या संघाविरुद्ध ०-२ पिछाडीवर गेल्यावर, तेही अशा रितीने, आयव्हरीयनना एकीकडे जीवाच्या आकांताने बचाव संभाळता संभाळता आक्रमणही करून गोल मारणं कठीणच होतं. त्यातच, ककाच्या एका गोललाईनवरून दिलेल्या अप्रतिम पासवर एलानोने सुंदर गोल करून स्कोअर ३-० केला. दुखापतीतून बाहेर आलेल्या ड्रोग्बाने मग एक छान गोल करून सामना ३-१ वर संपला.
ब्राझीलच्या दॄष्टीने फॅबिअ‍ॅनोचा गोलचा दुष्काळ संपणे व ककाच्या खेळात लय व चमक येणे या दोन गोष्टी या मॅचमध्ये साध्य झाल्याच समाधान. दूसर्‍या व तिसर्‍या गोलच श्रेय ककाच्या अप्रतिम पासेसनाही होतच.
दोन कार्ड पाहिल्यामुळे कका पुढच्या पोर्टुगालच्या विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही पण ब्राझीलचा
दुसर्‍या फेरीतला प्रवेश निश्चित असल्याने ब्राझीलला काळजी नसावी.
मिळालेल्या व मिळवलेल्या संधींच किती प्रमाणात गोलमध्ये रुपांतर होतं, हीच शेवटी विजयी संघ ठरण्याची खरी कसोटी आहे. ब्राझीलसारख्या संघांची हीच तर खासियत असते !

कालच काकाला मिळालेलं रेड कार्ड थोडंसं चुकीच वाटलं... पण त्याच वेळेस दुसरीकडे थोडीशी बाचाबाची झाल्याने रेफ्रीला नीट न कळल्यामुळे त्याला रेड कार्ड मिळालं.. कारण वास्तविक पहाता आयव्हरी कोस्ट च्या खेळाडूला येवढं गडाबडा लोळण्यासारखं काहीच झालं नव्हतं.. पण फुटबॉल खेळताना खेळाबरोबरच अभिनय पण तितकाच ताकदीचा यावा लागतो हे काल परत एकदा सिद्ध झालं... Happy

>>पण फुटबॉल खेळताना खेळाबरोबरच अभिनय पण तितकाच ताकदीचा यावा लागतो हे काल परत एकदा सिद्ध झालं... << Lol , तरी काकाचा खेळ बहारला हे चांगले झाले.

बाकी इटलीला मागच्या विश्वचषकाचे यश पुरेसे झालय अस वाटतय. यावर्षी काय पुढच्या फेरीत जायच्या मूड मध्ये दिसत नाहियेत. न्यूझीलंड ही या विश्वचषकातील एक उल्लेखनीय टीम वाटतीय. चांगला खेळ आहे, आणि दडपण न घेता खेळतायत.

<<पण फुटबॉल खेळताना खेळाबरोबरच अभिनय पण तितकाच ताकदीचा यावा लागतो हे काल परत एकदा सिद्ध झालं...>> फॅबिअ‍ॅनोला त्याच्या दुसर्‍या गोलबाबत रेफेरीने हाताला बॉल लागल्याच खुणेने दर्शवलं तेंव्हा फॅबिअ‍ॅनोच्या चेहर्‍यावरची निरागसताही हेच दाखवून गेली ! अभिनयाच्या बाबतीत तसे सगळेच संघ कसलेले असतात; ब्राझीलसारख्या संघांकडे त्याशिवाय वरच्या दर्जाचं खेळाचंही कसब असतं ,एव्हढच !!

>>पण फुटबॉल खेळताना खेळाबरोबरच अभिनय पण तितकाच ताकदीचा यावा लागतो हे काल परत एकदा सिद्ध झालं..>> इटली ने सुद्धा डायव्हिंगची कला दाखवून पेनल्टी मिळवली.

ककाला दुसरे येलो कार्ड द्यायची काहीच गरज नव्हती, पण तीन गोल झाल्यावर त्याला मैदानात ठेवायची सुद्धा गरज नव्हती. डुंगाचे चुकलेच. आता निल्मार ला संधी मिळेल. काल मात्र साम्बाचे सुर आणि ताल चांगलेच जूळले होते.

त्या नविन बॉल मुळे कूठलाच गोली क्लिन अडवत नाहीये.
आणि फ्री किक पण बाहेर जात आहेत.
शिवाय वुवुझेला चा भुंगा.

<<शिवाय वुवुझेला चा भुंगा.>> खरंच एकाग्रतेसाठी भयानक अडथळा असावा हा ! कुठेतरी वाचलं कीं
आफ्रिकेत भाषा, संस्कॄति, भौगोलिक व राजकीय स्थिती इ.बाबतीत कमालीची विविधता आहे पण वुवुझेला [प्लास्टीकची लांबट पिपाणी] मात्र संपूर्ण आफ्रिकेचं प्रतिनिधीत्व करणारं वाद्य आहे !!
<<काल मात्र साम्बाचे सुर आणि ताल चांगलेच जूळले होते.>> अगदी खरंय. कदाचित, चांगल्या संघातल्या दिग्गज खेळाडूचा अपेक्षित खेळ न होण्याचं कारण राष्ट्रीय संघातून सामने खेळण्याचा अभाव हेच असावं. त्यांच्या क्लबमधील सहकार्‍यां‍याबरोबर खूप सामने खेळल्याने एकमेकांत जी अबोल पण सखोल अशी समज निर्माण होते त्यामुळेच त्यांचा खेळ बहरत असावा. ब्राझीलसारखे जे बलाढ्य संघ,कसे बसे कां होईना,दूसर्‍या फेरीत पोचतील, त्यांच्या दिग्गज खेळाडूंचा खेळ प्रत्येक सामन्यागणिक बहरण्याची म्हणूनच शक्यता वाटते !
पूर्वीच्या एका दिग्गज खेळाडूने [कार्लोस व्हाल्दरमा, कोलंबिया] विश्वचषकातील रटाळ खेळाचं खापर प्रशिक्षकांच्या डोक्यावर फोडलंय. त्याना म्हणे फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेचीच चिंता असते व म्हणूनच फूट्बॉल खेळाच्या दर्जापेक्षा आपल्या प्रशिक्षणाखालील संघ शक्यतो हरणार नाही यासाठीच ते धडपडत असतात. म्हणूनच फूटबॉल आता बचावात्मकच होतोय व गोल होण्याचं प्रमाण सतत घटतच चाललंय ! पटतंय का ?

>>त्याना म्हणे फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेचीच चिंता असते व म्हणूनच फूट्बॉल खेळाच्या दर्जापेक्षा आपल्या प्रशिक्षणाखालील संघ शक्यतो हरणार नाही यासाठीच ते धडपडत असतात. म्हणूनच फूटबॉल आता बचावात्मकच होतोय व गोल होण्याचं प्रमाण सतत घटतच चाललंय ! पटतंय का ? << ह्म्म्म, कदाचित असेल, पण काही काही प्रशिक्षकांबद्दल हे असू शकतय.

पोर्तुगालने कोरियाची कत्तल चालवलीय, ४-० ने पुढे आहेत.

पोर्तुगालने कोरियाची कत्तल चालवलीय, ७-० ने पुढे आहेत.
भाऊ, तुमचे मत पोर्तुगाली खेळाडूंनी वाचलं वाटतं Happy धुव्वा उडवलाय कोरियाचा.

पार धुतला की कोरियाला पोर्तुगालनी.. ७-०... फारच मोठा गोल फरक.. म्हणजे आता पोर्तुगाल जरी ब्राझीलकडून हरले तरी आयव्हरी कोस्टाला कोरियाला असे तुफान फरकानी हरवावे लागेल तरच त्यांना काहीतरी आशा राहिल... अन्यथा ह्या ग्रुप मधून ब्राझील आणि पोर्तुगाल पुढच्या फेरीत नक्की....

७-० स्कोअरपेक्षाही ज्या तर्‍हेने पोर्तुगाल खेळली त्याने आता या स्पर्धेला खरी रंगत येणार हे नक्की झालं. डाव्या बगलेवरून सेंटर केलेल्या चेंडूवर तिसर्‍या व चौथ्या गोलसाठी खेळाडूनी दाखवलेला समन्वय व "टायमिंग"आदर्शवत होते. रोनाल्डोने शेवटचा गोलच केला पण बहुतेक गोलसाठी त्याचा बहुमोल सहभाग होता, ही देखील खास बाब. सांघिक लय आता पोर्तुगालला गवसली हे निश्चित.
<<भाऊ, तुमचे मत पोर्तुगाली खेळाडूंनी वाचलं वाटतं>> रंगासेठजी, या तंगडी घालण्याबद्दल तुम्हाला
पहिलं पिवळं कार्ड ! सावधान !!:हहगलो:

चिली वि.स्वित्झरलंड १-०
चिलीचे आता दोन सामन्यातून ६ पाँईट ! म्हणजे, पुढच्या फेरीत जाणं जवळ जवळ [?]निश्चित. ७५व्या मिनीटाला गोंझालवेसने गोल करूनही चिलीने वेळकाढू किंवा बचावात्मक पवित्रा न घेता अधिकच आक्रमक खेळ केला, हे कौतुकास्पद. [कदाचित, अनपेक्षित निकालामुळे ग्रूपमध्ये गोल सरासरीचा मुद्दा आलाच, तर त्याचीही तयारी चिली करत होती असावी !]. ८९व्या मिनीटाला स्विसने बरोबरी करण्याची सुवर्ण संधि दवडली !! स्पेनचं काय, हा आता या ग्रूपमधला मुख्य सस्पेन्स ! त्यांच्या उरलेल्या दोन सामन्यापैकी [सध्या एक सामना व शून्य पाँइट] एक आहे चिलीबरोबरच .
पोर्तुगालप्रमाणे स्पेनला लय गवसली, तरच त्यांची धडगत.

<<पोर्तुगालप्रमाणे स्पेनला लय गवसली, तरच त्यांची धडगत.>> आणि, नेमकं हेच झालं! होंडुरासला
२-० ने हरवताना स्पेनला फॉर्मही गवसला ! डेव्हिड व्हिलाने दोन अप्रतिम गोल केले, पण एक पेनल्टी किक
चुकवली. फर्नांडो टोरेस मात्र अजून अडखळतोय [वर्षापूर्वीच्या त्याच्या ढोपरावरील शस्त्रक्रियेनंतर त्याला म्हणे अजून लय सापडणं कठीण होतंय]. स्पेन पुढच्या फेरीत जायची दाट शक्यता असली तरी
निश्चिती मात्र नाही; स्विसदेखील दोन सामन्यात ३ गुण मिळवून त्या ग्रूपमध्ये स्पर्धेत आहेतच ! आणि , कुणी सांगावं, होंडुरासने स्वित्झर्लंडला हरवलं व चिलीने स्पेनला, तर चिली सोडून सगळेच ३ गुणावरच
ठाण मांडून बसायचे !!

आज पासून खरी मजा येणार... दुसर्‍या फेरीत कोण कोण ते देश जाणार ते कळणार...
अर्जेंटीना, नेदरलँड, ब्राझील आणि चिली आपापल्या गटात पहिल्या स्थानावर ६ गुणांसाठी आहेत आणि ते नक्कीच पुढच्या फेरीत जाणार...
आज एकूण चार मॅचेस होणार... ग्रुप अ आणि ग्रुप ब मधल्या.. आणि ग्रुपमधल्या मॅचेस एकाच वेळेस सुरु होऊन एकाच वेळेस संपणार..

ग्रुप अ मध्ये आज मेक्सिको - उरुग्वे आणि फ्रान्स - द.आफ्रिका अश्या मॅचेस आहेत.. आत्ताची गुण परिस्थिती बघता मेक्सिको आणि उरुग्वेची मॅच बरोबरीत सुटली तर हेच दोन्ही संघ पुढे जातील... नाहीतर जो संघ जिंकेल तो नक्कीच पुढे जाईल पण हरणारा संघ सुद्धा पुढे जाऊ शकतो... जर फ्रान्स - द. आफ्रिका मध्ये बरोबरी झाली तर वरच्या मॅच मध्ये हरलेला संघच पुढे जाईल पण जर ह्या दोघांपैकी कोणी जिंकले तर मात्र गोल फरकावरुन कोणता संघ पुढे जाईल ते ठरेल.. थोडक्यात फ्रान्सला पुढच्या फेरीत जायचे असेल तर मोठ्या फरकानी विजया बरोबरच मेक्सिको किंवा उरुग्वे जिंकेल अशी अपेक्षा ठेवावी लागेल..

ग्रुप ब मधून अर्जेंटीना आधीच पुढच्या फेरीत पोहोचली आहे आणि उरलेल्या तीन संघातील कोणताही संघ पुढे जाऊ शकेल.. नायजेरिया आणि कोरीया मध्ये जर नायजेरिया जिंकली आणि अर्जेंटीना - ग्रीस मध्ये अर्जेंटीना जिंकली तर गोल फरकावर कोणताही संघ पुढे जाईल.. पण जर बरोबर उलटं झालं तर मात्र जिंकलेले दोन संघ सुद्धा पुढे जाऊ शकतात.. अर्थात अर्जेंटीनाचा गोल फरक जास्त असलामुळे त्यांना फार फरक पडणार नाही... आणि जर दोन्ही मॅचेस बरोबरीत सुटल्या तर अर्जेंटीना नक्की आणि सध्या जास्त गोल केलेले असल्यामुळे कोरिया पुढच्या फेरीत जाऊ शकतील..

दक्षिण आफ्रिकेनी धमाल केली पण दुर्दैव त्यांचे की पुढच्या फेरीत जाऊ शकणार नाही. एखाद दुसरा गोल अजून मारला असता तर कदाचित गोलफरकाच्या जोरावर बाजी मारू शकले असते. पण उरूग्वेकडून पत्करावा लागलेला ०-३ असा पराभव निर्णायक ठरला.
फ्रान्सकडून फारशा अपेक्षा नव्हत्याच, पण किमान एकतरी मॅच जिंकतील असे वाटत होते. बचावफळीतल्या त्रुटी आजही दिसून आल्या. अनेल्का नाही आणि बाकी खेळाडूंनी डॉमनिकच्या विरोधात केलेले बंड यामुळे फ्रान्सचा खेळ फारच विस्कळीत वाटत होता.

<<यामुळे फ्रान्सचा खेळ फारच विस्कळीत वाटत होता.>> आणि द आफ्रिकेचा खेळ नेमका उलटा ! आपल्याला मोठ्या फरकाने जिंकण अत्यावश्यक आहे हे लक्ष्य क्षणभरही न विसरता द.आफ्रिकेने आत्मविश्वासाने अप्रतिम खेळ केला. शाबालाला तर झपाटलेला झंझावातच वाटला. द. आफ्रिकेला सलाम !
मलौडाच्या गोलनंतर फ्रान्सच्या खेळात थोडीशी जान आल्यासारखी वाटली पण तेवढ्यापुरतंच. हेन्री तर हजेरी लावण्यापुरताच आल्यासारखा वाटला. एकटा रेबेरी व नंतर मलौडा जीव ओतून खेळले. आणि हो, गोली . द.आफ्रिकेच्या सततच्या मार्‍यापुढे गोलीची कामगिरी खरंच कौतुकास्पद.
एकंदरीत, द.आफ्रिका जगाचं कौतुक व सहानुभूती मिळवून गेली आणि फ्रान्सवर स्वकीयांकडूनपण हेटाळणीच मिळण्याची नामुष्की आली !

आजचे घोडे,
इंग्लंड, अमेरिका
जर्मनी, सर्बीया,

सगळ्यांनी लावा बरे आपापल्या बेटा.

आज इंग्लंड आणि स्लोवेनिया :-).
आणि जर्मनी, सर्बिया.

ऑस्ट्रेलिया जरी जिंकली तरी पण गोलफरक महत्वाचा ठरेल.

१९३० नंतर पहिल्यांदा अमेरिका गृपमध्ये जिंकलेय. हो ना?>> माझ्याही माहितीनुसार १९३० नंतर ग्रूपमध्ये पहिल्या क्रमांकावर पहिल्यांदा.
एकमेव गोल नोंदवणारा डॉनोव्हान खरंच ह्या अमेरिकेच्या संघाचं प्रेरणास्थानच आहे !
इंग्लंडही डीफोचा एकुलता एक गोल शेवटपर्यंत गोंजारत ग्रूपमध्ये दुसरा क्रमांक मिळवून पुढच्या फेरीत. एकाच गोलवर सर्वस्व पणाला लागलं असताना रूनीला शेवटची २० मिनीटं न खेळवणं जरा धोक्याचंच होतं, असं वाटलं.
असो, अशुचँपचं "क" गटाबाबतचं भाकीत १००% खरं ठरलं !

ईकडे चांगली चर्चा चालु आहे..
आता जर्मनी पण पक्के झाले नेक्स्ट राउंड साठी...
उद्याचा मॅच नंतर हॉलंड ,जपान, ईटली, पॅराग्वे पुढे जातिल असे वाटते.
अवांतर :-फिफा वर्ल्ड कप वरचे मराठीतुन एक पान जरुर भेट द्या

काल शेवटच्या मिनिटात ऑस्ट्रेलिया चा हँड बॉल डी मधे झाला होता. अंपायर ला दिसला नाही, नो पेनल्टी व सर्बिया बाहेर. बॅड लक.

अमेरिक्का (लाल्वाक्का ची टीम) कारण नसताना ग्रुप लीडर. :). या योगे इकॉनामी सुधारली तर बरे होईल.

आज चे घोडे
नेदरलँड, डेन्मार्क
इटली, पॅराग्वे

Pages