मॅक्रो टू मायक्रो ईकॉनॉमी व परत
मुख्य घटनाक्रम व त्यांचे परिनाम.
१ हाऊसिंग मार्केट बबल तयार झाले (केले!)
परिनाम
१. लोकांनी जास्त्तीस जास्त लोन घ्यावे ह्यासाठी ईंटरेस्ट रेट्स खुप कमी केले गेले.
२. घराच्या किमती आणखी वाढल्या. त्यामुळे परत लोक गडबड करुन लगेच घर विकत घेऊ लागले.
वरिल दोन्ही गोष्टी ह्या ऐकमेकांस पुरक असतात. सध्या भारतात हिच स्तिथी आहे. पण त्यावर वेळेवर रोक कसा लावला गेला हे सुध्दा पुढे लिहीन.
३. कर्ज फेडीचे तारण म्हणून कर्जघेनार्याला घर बँकेकडे गहान ठेवावे लागते.
२. बँकाना जास्तीत जास्त कर्ज देता यावे व लगेच ते वितरीत (डिस्बर्स) करता यावे, या साठी ते अनेक नियम अशा काळात शिथील करतात.
परिनाम :
१. ज्या लोकांची परतफेड करन्याची क्षमता नाही अशांना कर्ज दिले जाते.
२. ज्या देशात प्रत्येक व्यक्तीसाठी ईंट्रेस्ट रेट वेगळा असतो ( जसे अमेरिका) तिथे ज्यांची क्रेडीट हिस्ट्री चांगली नाही त्यांना महागाचे लोन मिळते
३. ह्या बँकांकडे अमर्यादित पैसा नसतो. त्यांना देखील कुठून तरी कर्ज काढावे लागते. मग ते मोठ्या वा परकिय वित्तसंस्था कडे कर्ज मागायला जातात. कर्जाचे तारण (सेक्युअर्ड लोन) म्हणून कर्जदात्याची मालमत्ता ह्या बँका गहान ठेवतात.
आता ह्या घटनाक्रमात तसे गैर काहीही नाही. तुम्ही कर्ज घेणार, बँक कर्जे घेणार, तुम्ही परत करणार, बँक दुसर्या बँकेला परत देणार म्हणजे ही सायकल पुर्ण. ह्या सायकलला आणखी एक उपचक्र आहे ते म्हणजे ठेवी. सगळ्याच लोकांना कर्ज नको असते, काही जनांकडे सरप्लस म्हणजे ठेवी असतात त्या ते बँकाना देतात व हे चक्र अव्याहतपणे चालु राहाते.
असेच दोन चार वर्ष जातात व अचानक प्रॉपट्री मार्केट पडु लागते. ( म्हणजे बघा तुम्हाला डेक्कन ला घर घ्यायचे आहे, तुम्ही पहिल्यावर्षी ३० लाख, दुसर्या वर्षी ४० नंतर ५०, ६०, ८० लाखापर्यंत घर घ्यायला तयार होता पण आता घराची किंमत २ करोड झाली तर तुम्ही घेनार का? नाही. म्हणजे डिमांड कमी. असे दोन पाच वर्षे जातात. ईकॉनॉमी थोडी शांत व्हायला लागते. सरकार देखील ईकॉनॉमी कुल डाऊन करन्याकरता व्याजदर वाढविते, परिनामी बँका देखील व्याजदर वाढवतात, तुमचे कर्ज फ्लेक्झी दराने असेल तर महाग होते सर्व बाबतीत तुम्हीही खर्च करायला मागे पुढे पाहाता, असे होत होत हाऊसिंग बबल फुटत जाते.
त्याचे परिनाम व कारण पाहुयात.
४ व्याजदरात वाढ
परिनाम
१. कर्जदार कर्जाची परतफेड वेळेवर करु शकत नाही.
२. घराची डिमांड कमी होते व किंमत हळु हळु कमी व्हायला सुरुवात होते.
३. परिनामी क्रेडीट क्रंच निर्मान होतो. म्हणजे होत काय की तुम्ही बँकेला पैसे देत नाही, तुमची बँक वित्तसंस्थेला (स्वकीय वा परकिय) पैसे वापस देऊ शकत नाही, त्या संस्था आणखी पैसे तुमच्या बॅंकेला देऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळत नाही. कर्ज खुप महाग होऊन फक्त जे खरच परतफेड करु शकतात त्यांनाच मिळते.
२००७ च्या जूलै महिन्यात बेअर स्टर्ण्स नावाच्या वित्तीय कंपनीचे दिवाळे निघाले कारण त्यांना वर दिलेल्या कारणांमुळे पैसे मिळाले नाहीत, शिवाय ते स्टुंडन्टना देखील लोन देत त्यामुळे त्यांचा कर्ज वापस मिळन्याचा लिड टाईम हा खुप होता. ऐवढी झळ ते सोसु शकले नसावेत म्हणुन त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली.
ह्या सायकल मध्ये आपण स्वत बद्दल व आपल्या बँकेबद्दल पाहीले आता थोडे मोठ्या वित्तीय संस्थे बद्दल पाहुयात.
मोठ्या वित्तीय संस्थेचा कारभार हा खुप मोठा असतो. त्यांचा भात्यात अर्थ कमविन्याचे अनेक मार्ग असतात. त्यातील काही
१. दुसर्या बँकाना दिर्घ लोन देने.
२. लघु लोन देने
३. हेज फंडस
४. रिटाअरमेंट प्लान्स
५. सिड मनी ( कॅपीटल पुरविने)
६. ईन्व्हेस्टमेंट बँकींग.
जुन्या मोठ्या बँकाच ह्या अशा वित्तीय संस्था होतात. जसे गोल्डमन सॅक्स, लिहमन ब्रदर्स, जे पी मॉर्गन, भारतातील आय सी आय सी आय. अशा सर्व कंपन्याचे शेअर्स हे मार्केट मध्ये ट्रेड करत असतात. त्यांचा स्वतच्या ट्रेड पण रोजचा शेकडो मिलीयन्स चा असतो.
वर पाहीलेल्या सायकल मुळे ह्या संस्था ईतर बँकांना पैसे वापस देन्याविषयी लकडा लावतात, बाजारात हया विषयी कळते. गुंतवनुकदार मग अशा दोन्ही बँकांचे ( म्हणजे पहिली बँक जीने आपल्या कर्ज दिले, व दुसरी जिने पहिलीला कर्ज दिले) शेअर्स विकायला सुरुवात करतात. दुसर्या वित्तीयसंस्था मग त्यांचे शेअर्स हे शॉर्ट सेल करुन बाजारात पॅनीक निर्मान करतात कारण त्यामुळे त्या दुसर्या वित्तीय संस्थेला फायदा होऊ शकतो. (फ्युचर्स व ट्रेडींग मध्ये कोणीही शॉर्ट व लाँग जाऊ शकते). गुंतवनुकदार पटापट त्या संबधित बँकांचे शेअर्स विकतात, व सटोडिये ते कव्हर करुन स्वताचा फायदा करुन घेतात.
वर आपण लिक्वीडीटी क्रंच कसा आला ते पाहीले. पण दुसर्या संस्था ज्यांनी ह्या वित्तीय संस्थेला देखील पैस दिलेले असतात. ( ईथेच फ्रेडी मॅक, व फॅनी मे) येतात ते त्या वित्तीय संस्थाचा पाठीमागे लागुन परत ऐकदा क्रेडीट क्रंच करतात. लोन महाग होते. दुसर्या वित्तीय संस्था हे पहिल्या व दुसर्या बँकेकडुन आपल्या ठेवी, गुंतवनुक काढुन घ्यायला लागतात व गुंतवनुक की लोन मध्ये न करता ट्रेझरी (म्हणजे सरकारी बॉन्डस) व सोने ह्यात केली जाते. परिनामी पहील्या दोन्ही बँकेकडे पैसा न राहुन त्या दिवाळखोर बनतात.
वर मी हे चक्र फक्त ऐक बँक, ऐक वित्तीय संस्था व दुसरी आणखी मोठी संस्था ह्यांना घरुन लिहीलेय. प्रत्यक्ष बाजारा मध्ये कित्येक बँकांचे पाय ऐकेमेकांमध्ये अडकलेले असतात. तुम्ही हे उदा कितीही लाबंबू शकता. व परदेशी बँकांना गुंतवु शकता.
जो पर्यंत सायकल ब्रेक होत नाही ( पण कर्जे वाप्स करने थांबत नाही) तो पर्यंत हे काहीही कळत नाही. फ्रांन्स चा जुन्या बिऐनपी पारीबा बँकेला सबप्राईम रेटस मुळे मागच्या वर्षी २ बिलीयनचा हिशोब लागला नाही. कारण त्यांनी ज्या बँकानां कर्ज दिले, ते त्या बँकानी वापस केले नाही. परिनामी बिऐनपी ला ते २ बिलीयन राईट ऑफ करावे लागले.
फ्रेडी व फॅनी ह्या देखील अशाच वित्तीय संस्था आहेत त्यांनी ५ ट्रीलीयन डॉलर्सचे कर्ज वितरन केले आहे, त्या होम सिक्युरिटीस आधी साध्या बँक्स, नंतर लिहमन, नंतर फ्रेंडी , नंतर आणखी कुठली बँक अशा प्रवास करत आलेल्या आहेत. म्हणजे मुळ कर्जदाराने जर कर्ज वापस केले तर हा प्रश्न ऊठलाच नसता पण कोणाला कर्ज द्यायचे व कसे द्यायचे ह्या घरबंध न पाळल्यामुळे हा प्रॉब्लेम आणखी मोठा झाला.
आता गमंत अशी आहे झाली ही ह्या संस्था अनेक दुसर्या देशात पण गुंतवनुक करतात जसे भारत, ब्राझील, जपान, वैगरे. आणि त्यांना त्यांचा स्वतचा देशात केडीट क्रंच आल्यामुळे अनेक वित्तीयसंस्थांनी त्या दुसर्या देशातील गुंतवनुक अचानक गेल्या महीन्यात काढुन घ्यायला सुरुवात केली कारण त्यांना ईकडे पैसा हवा होता. त्यामुळे ह्या सर्व देशात पण क्रेडीट क्रंच निर्मान झाला. तेथील मार्केट कोसळले. डॉलरचा रेट परत ऐकदा ४७ पर्यंत जाऊन आला.
ह्या सर्व घोळात मोठ्या बँका प्रथम बळी ठरतात कारण त्यांचे व्यवहार हे अनेक छोट्या बॅकासोबत असतात. ह्या सर्व बँकाना व वित्तीय संस्थांना पैसे देता यावे म्हणून ७४० बिलीयन डॉलर्सचा प्लान तयार केल्या जात आहे. पुढील काही महीने / वर्षे ह्याचा परिनाम राहनार आहे. अमेरिकन सरकार अशा सर्व बँकाना पैसे देऊन विकत घेनार आहे.
भारतातही २००३ च्या सुमारास प्रॉपर्टी बबल सुरु झाले आहे. २००४ मध्ये मी घर घेताना ७ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते, तेव्हा ते अजुन कमी होईल असे बोलले जात होते. २००५ पर्यंत जी घर साधारण २५ लाखाला मिळायची ती ४० च्या पुढे गेली व २००८ मध्ये हीच घर ८० लाखाला मिळतात. (माझ्या घराची आजची किंमत)
पण भारतात सरकारने उपाय योजना आखुन २००५ नंतर लगेच व्याजदर वाढवुन ९ टक्के केला होता. शिवाय कर्ज देताना देखील बँका घेनार्याची परत करन्याची ताकद आहे का नाही हे पाहुन देत होत्या. त्यामुळे आपल्या कडे हा प्रॉब्लेम झाला नाही.
कर्ज देताना सर्व बँका ह्या बॅड डेट्स ( बुडीत खाते) ह्याची तरतुद करतात पण ह्या अमेरिकेत ती प्रोव्हीजन हवी तेवढी केली गेली नाही. शिवाय लिहमन ब्रदर्स, ऐ आय जी सारख्यांनी तारण नसताना देखील दुसर्या बँकांना पैसे पुरविले त्यामुळे जेव्हा खरच क्रंच निर्मान झाला तेव्हा त्यांचाकडे विकायला देखील काही उरले नाही व दिवाळखोरी जाहीर करन्यावाचुन पर्याय उरला नाही. ह्या मोठ्या संस्थानी दिवाळखोरी जाहीर केली की छोट्या गुंतवनुकदारांचा विश्वास कमी होतो व ते बाजारातुन भांडवल काढुन घेउन सोने वा बॉन्डस मध्ये ठेवतो त्यामुळे हा प्रॉब्लेम द्विगुणीत (डबल फोल्ड) होतो व मार्केट आणखी पडते.
हे कोणामुळे झाले, का झाले. तर ह्या वर उत्तर हे सर्वामुळे झाले, कोणा ऐकामूळे हे होऊ शकत नाही. कारण ह्या मॅक्रो लेव्हल पासुन मायक्रो लेव्हल पर्यंत सर्वजन तेवढेच गुंतलेले असतात. अमेरिकेकडे जगातील वित्तीयसंस्थाचे लक्ष, त्यामुळे हा प्रॉब्लेम जागतीक होऊ घातलाय. पण युरोपीयन बँका ह्या सक्षम असल्यामुळे त्यांना तेवढा फरक पडनार नाही, दोन पाच बिलीयन राईट ऑफ करावे लागतील. ईतकेच.
(हा लेख मी निवडनुकीची चर्चा करताना मध्येच ऐका तासाचा अवधीत लिहीला आहे त्यामूळे व्याकरनाचा भरपुर चुका असन्याची शक्यता जास्त आहे. पण ह्यातुन ईकॉनॉमी कशी चालते, बँक रेट का वाढतात, कमी होतात, बँका का बंद पडतात. हे कळु शकेल अशी आशा.)
चांगली
चांगली सुरूवात आहे आणि सोप्या शब्दात माहिती!
यूरोप मधे ३-४ वर्षांपूर्वी ते बाझेल-२ (Basel-II) चे नियंत्रण आले ते अशाच हाय रिस्क लोन्स पासून वाचवण्यासाठी होते ना? ते अमेरिकेत लागू नाही झाले बहुतेक.
अमेरिकेती
अमेरिकेतील वित्तीय संस्थांना बाझेल २ आवडले न्हवते. फक्त १५ की १६ मोठ्या संस्था त्या नियमांना पाळनार होत्या.
अमेरिकेच्
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेने दोन तीन वेळा व्याजाचे दर कमी केले.... ते कोणते दर आहेत आणि कोणासाठी आहेत?
छान
छान माहितीपुर्ण लेख आहे.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
अमेरिकेच्
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेने दोन तीन वेळा व्याजाचे दर कमी केले.... ते कोणते दर आहेत आणि कोणासाठी आहेत>>>
जेव्हा जेव्हा मार्केट खुप मोठ्या प्रमानावर कोसळते तेव्हा बाजारात लोक गुंतवनुक करायला घाबरतात. मोठ्या संस्थांनी जर वेळीच गुंतवनुक केली नाही तर त्याचे परिनाम आणखी जास्त होऊ शकतात. बाजारात पैसे आणन्यासाठी (लिव्कीडीटी) तेव्हा फेड बँकां त्याचा लेंडींग रेट १/२ किंवा ३/४ ने कमी करतात. त्यामुळे अनेक संस्था कर्ज घेऊन बाजारात ( शेअर) गुंतवनुक करतात व भांडवलदारांचा विश्वास त्यामुळे परत येऊन, सायकल सुरु राहाते. म्हणून वेळोवेळी लिव्कीडीटी वाढविन्यासाठी फेड्स रेट कमी करतात. आणी खुप लिक्वीडीटी झाली की तो वाढवतात सुध्दा. हे ऐक ईनबिल्ट मॅकॅनीझम आहे शेअर मार्केट चालन्याचे.
छान आणि
छान आणि समजेल अशा शब्दात उपयुक्त माहिती मांडली आहे, धन्यवाद.
धन्यवाद
धन्यवाद केदार.. सोपं करून सांगितलंस.
छान माहिती
छान माहिती केदार, एकदम सोप्या भाषेत सांगितलीस.
काय मस्त
काय मस्त लिहिले आहेस! तुझी समज या विषयात निर्विवाद आहे, आणि सांगण्याची पद्धत अगदी सोपी!
लिहित जा रे..
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!
युरोपमध्य
युरोपमध्ये देखील बँकांना व वित्तिय संस्थांना झळ बसण्याची शक्यता आहे.. एक तर इथल्या वित्तीय संस्थांच्या (विशेषतः पेन्शन फंड वगैरे) अमेरिकेत असलेल्या ठेवी, त्यांनी अंडरराइट केलेल्या बॅड डेट्स वगैरे वगैरे.. आणि गेल्या काही वर्षात झालेली ऍक्वीझीशन्स.. अर्थात इथल्या बँकाचा लोन देण्याचा क्रायटेरिया अमेरीकेतील बँकांपेक्षा खूप स्ट्रिक्ट आहे..
केदार, तुझ्या लेखातील ह्या वाक्याशी माझा गोंधळ झाला >>दुसर्या वित्तीयसंस्था मग त्यांचे शेअर्स हे शॉर्ट सेल करुन बाजारात पॅनीक निर्मान करतात कारण त्यामुळे त्या दुसर्या वित्तीय संस्थेला फायदा होऊ शकतो. >>>>>
ह्या दुसर्या वित्तीय संस्था म्हणजे लेहमन सारख्या बँका का ज्या रिटेल बँकांना कर्ज देतात? त्यांना बाजारात शॉर्ट सेल करुन कसा फायदा होतो नक्की?
-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी
केदार, छान
केदार, छान माहिती.
इथल्या शेअर बाजारात असा बबल येऊन गेला, शिवाय इथल्या आपल्या घरांच्या किमती देखील २-३ वर्षांत दुप्पट झाल्या, तेव्हाही ही भीती वाटून गेली होती.
आपल्या बँका अन सरकारनं वेळीच आर्थिक उपाययोजना करायला सुरूवात केली आहे, तेव्हा बघायचे- कितपत तरतो ते.
३ वर्षांपुर्वीचे माझे गृहकर्ज अन व्यावसायिक कर्ज (अनूक्रमे एसबीआआय अन सिटीबँक) यांचे व्याजदर ७ अन १०.५ वरून अनूक्रमे १०.७५ अन १५ टक्क्यांवर गेले आहेत..!
केदार खुपच
केदार खुपच माहितीपुर्ण लेख अगदि साध्या शब्दात.
गुर्जी,
गुर्जी, आता थोडे आकळू आले. धन्यवाद.
टण्याची शंका मलाही.
गृहतारण (मॉर्गेज) या क्षेत्रात परदेशी वित्तीय संस्थांचा सहभाग/गुंतवणूक असते, त्याला काही मर्यादा ठेवली जात नाही का ? कुठल्याही परदेशी संस्थेने आपल्या देशातील गृहकर्ज/गृहतारण यात किती गुंतवणूक करावी याला मर्यादा असायला पाहिजेत ना ? की अशी काही गरजच नसते ?
दुसरे म्हणजे बेल आऊट पॅकेजला लाल्यांचा विरोध आहे तो कोणत्या कारणाने ? तात्विक की दुसरे काही ?
अमेरिकेसारख्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या देशात सरकारला कंपन्या विकत घ्याव्या लागणे हेच मला मोठे रोचक वाटते. सामान्य गुंतवणूकदारांना सरकार वार्यावर सोडू शकत नाही हे बरोबर, पण तरीसुद्धा....
“You were being asked to choose between financial meltdown on the one hand and taxpayer bankruptcy and the road to socialism on the other and you were told do it in 24 hours,” Representative Jeb Hensarling of Texas, head of the conservative group, said. “It was just never going to happen.”
यावर तुझे मत जाणून घ्यायला आवडेल.
***
Life : The most virulent STD
अमेरिकेसा
अमेरिकेसारख्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या देशात सरकारला कंपन्या विकत घ्याव्या लागणे हेच मला मोठे रोचक वाटते. सामान्य गुंतवणूकदारांना सरकार वार्यावर सोडू शकत नाही हे बरोबर, पण तरीसुद्धा..>>>
कर्जदार>छोट्या बँका>मोठ्या बँका>जगभर जाळे असलेल्या वित्तीय संस्था..
असे हे चक्र. यातच गुंतवणूकदारांची पॅरॅलल चेन..
केदार म्हणतो, त्या प्रमाणे या सर्वांचे पाय एकमेकांत अडकलेले आहेत. अमेरिकन सरकारला फक्त गुंतवणूकदारांचीच काळजी नसावी. जगभर पसरलेल्या या कंपन्यांचे जाळे अन आर्थिक सम्राज्य- यांच्या काळजीचा जास्त भाग असावा. ज्या आर्थिक सुबत्तेच्या जोरावर अमेरिका दादा झालीय, ती सुबत्ता अन दरारा प्रस्थापित करण्यात या महाधेंड कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांची प्रतिमा जपण्यात आपसूकच, पाणी वाढल्यावर पिलाला डोक्यावर घेणार्या माकडीणीचे मानसशास्त्र आहे.
माकडीणीचे उदाहरण यासाठी, की पाणी आणखी वाढल्यावर पिलाला पायाखाली तुडवून त्यावर ती उभी राहते की नाही हे अजून ठरायचे आहे..
>>दुसर्या
>>दुसर्या वित्तीयसंस्था मग त्यांचे शेअर्स हे शॉर्ट सेल करुन बाजारात पॅनीक निर्मान करतात कारण त्यामुळे त्या दुसर्या वित्तीय संस्थेला फायदा होऊ शकतो.
ईथे मी दुसर्या वित्तीयसंस्था हा शब्द ईतर कुठल्याही वित्तीय संस्थांसाठी वापरला. म्हणजे लिहमन चे शेअर्स गोल्डमन सॅक्स विकनार, गोल्डमन चे मॉर्गन, लिहमन चे मॉर्गन असे.
ह्या दुसर्या वित्तीय संस्था म्हणजे लेहमन सारख्या बँका का ज्या रिटेल बँकांना कर्ज देतात? >>
हो ह्या मात्र चेन मधल्या दुसर्या बँका, ज्या ईतर बँकांना पैसे देतात.
त्यांना बाजारात शॉर्ट सेल करुन कसा फायदा होतो नक्की?>>
आता ऐक उदा घेऊयात.
लेहमन, ऐआयजी आणि मॉर्गन ह्या मोठ्या वित्तीयसंस्था आहेत. त्या जश्या ईंन्वेसेंटमेंट बँक्स आहेत तसेच त्यांचे स्वतःचे हेज फंडस आणि शेअर ट्रेंडींग कंपन्या आहेत.
मनी मार्केट मध्ये ( हा संपुर्ण खुला बाजार नसतो, म्हणजे सामान्य लोकांचा नाही) अशी अफवा / बातमी पसरली की लेहमन आणी ऐआयजी या संस्थानां खेळत्या भांडवलासाठी पैसे उभे करायचे आहेत. पण त्यांना ते मिळत नाहीत. ( ही ह्या दोन्ही संस्थांसाठी गेल्या २ महीन्यांपासुन सत्य परिस्तिथी होती, ऐआयजी ला १४ बिलीयन लगेच हवे होते) मग ह्या स्तिथीचा ईतर संस्था जसे मॉर्गन, सॅक्स, वा ईतर कुठलाही फंड फायदा घेतात. शेअर्स हे स्वतः कडे नसतानाही विकता येतात व परत विकत घेतले ही ते ट्रॅन्झॅक्शन क्लीअर होते. मग हा फायदा कसा घ्यायचा तर लगेच ऐआयजी व लेहमनचे शॉर्टींग (नसताना विकने) व नेकेड फ्यूचर्स विकायला सुरु करायचे, ते ऐवढ्या मोठ्या प्रमानावर ट्रॅन्झॅक्शन करत असतात की सामान्य गुंतवनूकदार जे चार्ट्स फॉलो करतात त्यांना लगेच ऐक दोन दिवसात कळायला सुरु होते की काही तरी सुरु झाले, मग ते लगेच थोडे भावनेत येऊन लेहमन व ऐआयजीचे शेअर्स विकायला सुरु करतात, ह्या ऐकत्रीत विक्रीमूळे (ऐक्सेस सप्लाय) शेअरचा भाव कमी होतो, तो कमी झाला की आपला शॉर्ट व नेकेड फ्यूचर्स कव्हर करायचा म्हणजे बघ अफवेच्या आधी जर भाव १४ रु असेल तर तु विक्री केली १४ ला, ऐक्सेस सप्लाय मूळे भाव समजा १२ वर आला तर लगेच तु विकत घेतले म्हणजे २ रु चा तुझा फायदा.
सामान्य गुंतवनूकदारांचे हयामूळे नुकसानच होते कारण ते पॅनीक ने लगेच शेअर्स विकून टाकतात. जेव्हा आपण विकतो तेव्हा तोच शेअर कुणीतरी घेत असतो हेच तेव्हा विसरल्या जाते.
मार्केट जेव्हा ४ ते ५ टक्यांनी पडते, त्याचा दुसर्या दिवशी लगेच २-३ टक्यांनी रिकव्हर होत असते, कारण हे शॉर्ट्स कव्हर केले जातात. ऐक्सेसिव्ह अनलोडींगमुळेच मार्केट पडते.
गृहतारण (मॉर्गेज) या क्षेत्रात परदेशी वित्तीय संस्थांचा सहभाग/गुंतवणूक असते, त्याला काही मर्यादा ठेवली जात नाही का ?
कुठल्याही परदेशी संस्थेने आपल्या देशातील गृहकर्ज/गृहतारण यात किती गुंतवणूक करावी याला मर्यादा असायला पाहिजेत ना ? की अशी काही गरजच नसते ?
>>>
ऐकदाका तुला ऐखाद्या देशात आपली शाखा उघडायची संधी मिळाली की तुला त्या देशाचे असनारे सर्व नियम ( देशी बँकांना) लागु होतात व तुझी शाखा ही रोजच्या व्यवहारासाठी देशीच धरली जाते. पण प्रत्येक बँक की सर्व व्यवहार म्हणजे, घरकर्ज, वाहनकर्ज, ठेवी, मुदत ठेवी, ईन्शूरंस, ई ई करत नसते तर त्यांना जे व्यवहार करन्यासाठी परवानगी दिली गेली तेच करु शकते. मग सर्व देशी नियम आपोआप लागु होतात. भारता पुरते बोलायचे तर भारतात मुक्त अर्थव्यवस्था येन्या आधी परदेशी बँका फक्त विनीमयासाठी ( फॉरेन ऐक्स्चेंज) आपली शाखा उघडु शकत होत्या. आता मात्र मुक्तव्यवस्थेचा स्विकार केला गेला आहे. त्यामूळे सर्व परदेशी बँका (परमिशन असेल तर) कितीही कर्ज देऊ शकतात. शिवाय ऐखादी बँक किती कर्ज देऊ शकते हे ठरवायला पण ऐक गणित असते. हे गणित तिच्याकडे असलेल्या ठेवींवर अवलंबुन असते.
दुसरे म्हणजे बेल आऊट पॅकेजला लाल्यांचा विरोध आहे तो कोणत्या कारणाने ? तात्विक की दुसरे काही ? >> अरे लाल्यांनीच तर ते पॅकेज आणले आहे. सर्व लाले नाही पण काही लाल्यांचा वा अस म्हणूयात का की जे लोक भांडवलशाही आहेत त्यांचा ह्या पॅकेजला विरोध आहे, मग ते लाल असो वा निळे वा माझ्यासारखे परदेशी माझा देखील ह्या पॅकेजला विरोध आहे.
You were being asked to choose between financial meltdown on the one hand and taxpayer bankruptcy and the road to socialism on the other and you were told do it in 24 hours,” Representative Jeb Hensarling of Texas, head of the conservative group, said. “It was just never going to happen >>>
खरतर हा लेखच मूळी अमेरिकन निवडनुकीच्या बाफवरच्य माझ्या त्या पॅकेज विरोधी पोस्ट मूळे लिहीला गेला. तिकडे उदय, रश्मी आणि लालू ने लिहायला सांगीतले.
मी तिकडे अशा परिस्तिथीत भारत आणि जपान ह्या दोन देशांचे उदा दिले होते.
" ३० वर्षांपुर्वी जपानमध्ये असेच झाले होते जे त्यांनी मार्केट प्रमाने होउ दिले व भांडवलशाही च्या मुख्य मुल्यांना जपले.
भारतातही असेच झालेले आहे हर्शद मेहताच्या वेळेस. भारताच्या त्या वेळच्या ईकॉनॉमीच्या परसेंटमध्ये तो घोटाळा खरच खुप मोठा होता. ऐसीसीचा ऐक शेअर २०० रु ९९०० रुना गेला होता तेव्हा. जस्ट ईमॅजीन ज्यांनी ऐसीसी घेतला त्यांचे काय झाले असेल. हा फक्त ऐक उदा दाखल शेअर दिला. असे शेकड्यांनी होते. तेव्हा लगेच भारतीय ईकॉनॉमीस्ट नी सर्व बँका ताब्यात घेतल्या नाहीत, काही बँका बुडाल्या, तर काही कायमच्या तोट्यात गेल्या, जनरल पब्लीकची नुकसान भरपाई व्हाव्ही म्हणुन सरकार ने ऐसीसीच्या शेअर्सना परत ९९०० वर नेले नाही, जो पडला तो पडलाच. कारण तेव्हा आपन ऐक मुख्य तत्व फॉलो केले जे म्हणजे बिझनेस मध्ये नफा जसा तसाच तोटा"
हा माझे तेथील पोस्ट मधला भाग.
अमेरिकन लोक भांडवलशाहीला विसरत आहेत असे मला वाटते. हा ऐक चुकीचा पायंडा पडल्या जातोय.
ह्यावर डिटेल उत्तर लिहीतो अजुन.
केदार,
केदार, मस्त लिहितो आहेस. लिही अजून..
त्या Bailout deal
त्या Bailout deal आणि मीटिन्ग बद्दल पोस्ट मधले हे एक आर्टिकल-
How McCain Stirred a Simmering Pot
केदार, मग आता भांडवलशाहीचा अंत होणार का, सोशॅलिस्ट देश असल्यासारखं चाललंय..
फॅनी फ्रेडी असल्या लोन्स मार्केट मध्ये सुरुवातीला नव्हते. नंतर आले. आणि कॉन्ग्रेसनेच(हे डेमॉक्रॅट्स :फिदी:) दबाव आणला त्यांच्यावर त्यासाठी.
हे एक २००७ चे WSJ मधले आर्टिकल पहा.
Fannie Fredie
जान-फेब
जान-फेब मध्येच बर्याच मोठ्या युरोपियन बँकानी आपापल्या जहाजांचे सुकाणू पूर्ण ताकदीनिशी या भोवर्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि यामध्ये Basel II फॉलो करणार्यांना बर्यापैकी यश आले.
मला वाटते क्रेडीट बेस्ड लोन हा कन्सेप्टच या सगळ्या महापूराला बर्याच अंशी कारणीभूत ठरला आहे, कारण जेवढे तुमचे एक्स्पेंडिचर्स जास्ती (वाढत्या इन्कमच्या मागोमाग येणारे) तेवढा क्रेडीट स्कोर जास्ती, पण यात वाढती लायबिलीटी ही रिस्क नजरेआड होते आणि तीच रिस्क नेमकी या सगळ्या हाऊसिंग मार्केटच्या मुळावर ऊठली.
भारतात हाच प्रॉब्लेम तयार होण्याची शक्यता असली तरी त्याच्या विपरित परिणामांची भयावहता इतकी नसावी, कारण आपली अर्थव्यवस्था कितीही खुली असली तरी RBI ची त्यावर खूप करडी नजर असते विशेषत: परकीय गुंतवणुकीवर. परकीय गुंतवणुक यात भारतात आलेली गुंतवणुक आणि भारतातल्या कंपन्यांनी परदेशात केलेली गुंतवणुक या दोन्हींवर. लेहमन, बेअर सारखी मोठी जहाजं जेव्हा बुडतात तेव्हा त्यांच्यामुळे ICICI सारख्या हातपाय पसरु पहाणार्या बँकाही सैरभैर होण्याचा धोका असतो(त्यांच्या कुठल्यातरी मार्केट मधल्या लागेबांध्यांमुळे). खोलात पाय अडकलेले असतांनाही अशा 'BRICs' इकॉनॉमी मधुन कॅपिटल उभे करण्याचा प्रयत्न ही बुडती जहाज करतात.
पण इंडिमॅक सारख्या बँक्स जेव्हा बुडतात त्यावेळी ईमानेईतबारे लोन फेडणार्यांवर खूपच अन्याय होतो असे असले तरी पुढे त्यांचे नक्की काय होते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
बेलआऊट पॅकेजचा निर्णय खरं उगीचच घेतला गेलाय अस वाटायला भरपूर कारण आहे, त्यापैकी एक म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन्सना मिळालेलं हे आयतं चराऊ कुरण (we saved the day म्हणायचा चान्स, जरी ही वेळ त्यांच्या अति शिथिल आर्थिक धोरणांमुळे आली असली तरी), आणि डेमोक्रॅट्सच्या डोळ्यात हे नक्कीच सलणार. पण बुडत्या कंपन्यांच(पर्यायान गुंतवणुकदारांच) हित यात असल्या कारणान तोंड उघडून त्यांचा रोष ओढवुन घेण त्यांना खचितच नाही परवडणार.
मला ही खरं तर हे पॅकेज नाहीच पटलंय, हे पॅकेज इकॉनॉमीमध्ये एक मोठी पोकळी तयार करणार, तोट्यातल्या कंपन्यांनी पडझड थांबवण्यासाठे स्वतःच प्रयत्न करायला हवेत. निदान भांडवलशाही जपण्यासाठी तरी. नफ्यापासून सुरू झालेलं हे वर्तुळ पूर्ण होऊ द्यायला हवंय खरं पण यावेळी त्याला राजकीय रंग आहे.
या सगळ्या समरात छोट्या गुंतवणूकदारांच भवितव्य मात्र पुढचा बराच काळ अनिश्चित रहाणार हे खरं.
केदार, मला
केदार, मला एक प्रश्ण आहे. ह्या बँकाच्या CDs असतात त्या insured असल्या तरी आणि ह्या बँकांनी बँक्रप्सी डिक्लेअर केली की परत problem येऊ शकेलच न? कारण ह्या CDs पण multi million dollars च्या असतात. मग ते सगळ कस handle केलं जात?
Washington Mutual नी bankrupcy declare केली पण त्यांच्या CEOs ची रेन्युमरेशन पॅकेजेस मात्र alter होत नाहीत.
छानच लिहितो आहेस.
केदार, खूप
केदार, खूप छान लिहिलेस. मला हेच सर्व समजून घ्यायचे होते.
आता प्लीज एका प्रश्नाचे उत्तर दे.
भारतात कधी राहायचा बेत नसल्याने तिथे घर घेतले नाही आणि आता किमती बघितल्या तर घ्यावेसे वाटत नाही. कारण मला असे वाटते, की दोन बेडरूम ला इतके पैसे द्यायचे आणि भाडे तितके मिळणार नाही - त्यापेक्षा तेवढ्याच रकमेच्या एफडी ला जास्त व्याज मिळेल.
दुसरे असे, की पुन्हा काही किमती इतक्या वाढणार नाहीत. त्यांमुळे तोही फायदा नाही.
भारतात घरांच्या किमती कमी होतील असे वाटते का? शेअर बाजाराचा सध्याचा ट्रेंड बघितला तर तिथेही गुंतवणूक करण्याबद्दल साशंकता आहे.
सध्याच्या परिस्थीतीत कुठे गुंतवणूक करावी?
in case if anyone is
in case if anyone is interested in bailout bill text
http://banking.senate.gov/public/_files/LegislativeTextofChairmansDoddsp...
लालू पुर्ण
लालू पुर्ण समाजवादी तर नाही पण अमेरिका आता मिश्र अर्थव्यसस्था म्हणून ओळखला जाणार. जगात मिश्र वाला आधी ऐकच देश होता, भारत आता अमेरिकाही लायनीत येनार.
आर्च चांगला आणी महत्वाचा प्रश्न
आपली प्रत्येक बेंक अकाऊंट मधील $१००,००० पर्यंतची ठेव FDIC अंतर्गत आपोआपच ईन्सुअर्ड असते. सेव्हींग, करंट व सिडी तसेच वेगवेगळ्या बँक, किती बँक ह्याला लिमीट नाही आणि प्रत्येक अकाउंटचे वेगळे. बँक बुडाली तर $१००,००० मिळतील. FDIC ही बँकाकडुन त्यासाठी प्रिमीयम घेते. सेफ बेट अशी की जर १००,००० पेक्षा जास्त पैसे असतील तर दोन, तिन बँकेत (FDIC अंतर्गत येनार्या) ठेवावे म्हणजे रिस्क कमी होते. रिटायरमेंट अकाऊंट साठी हिच लिमीट २५०,००० ची आहे. सध्या ही १००,००० लिमीट १ मिलीयन करा म्हणून जिम क्रेमर सांगत होता. बघु काय होते ते.
मल्टी मिलीयन डॉलर्स साठी थोडा वेगळा रूट असतो. प्रत्येक बँक ह्यासाठी मोठ्या ईन्सुरंश कंपनी कडे वेगळा प्रिमीयम भरते. शिवाय त्या इंन्सुरंस कंपन्या परत तो आणखी दुसर्या ईन्शूरंस कंपनीकडे सब ईन्शुअर करतात. त्यामुळे रिस्क अगदी कमी वा नाहीशी होते. पण हे सर्व करन्यात अनेक कंपन्या आपोआप गुंतल्या जातात.
अगदी अशाच कारणामूळे ऐ आय जी ला वाचवले गेले. काय झाले की ऐ आय जी CDOs - collateralized debt obligations securities विकते. नाव जरी मोठे असले तरी थोडक्यात काय तर समजा तु GM, GE अशा मोठ्या कंपनींचे मल्टी मिलीयन बॉन्ड घेतलेस. पण तुला अशी भिती वाटतीये की ह्या कंपन्या बुडाल्या तर तुझे मल्टी मिलीयन डॉलर्स पाण्यात जातील मग तु ह्यासाठी ईन्शूरंस मध्ये हे CDOs विकत घ्यायचे. तुझ्या मल्टी मिलीयनला त्या कंपन्या वापस देऊ शकल्या नाही तर ऐ आय जी तुला पैसे वापस देनार. आता लोकांनी लेहमनचे CDOs विकत घेतले होते पण लेहमन तर बुडाली मग ईन्शुअर्ड लोक ऐ आय जी कडे जानार पैसे मागायला, आणि ती ही हे मल्टी बिलीयन देऊ शकनार नाही म्हणून ती ही पडनार आणि ऐ आय जी ची कोलॅट्रल अनामत रक्कम रोज बदलते त्यांना मंगळवारी (लेहमन नंतरच्या) १४ बिलीयनची गरज होती. त्यांनी ती दोन दिवसात उभी नाही केली तर ती लिमीट २५२ बिलीयन झाली असती आणि तेवढी रक्कम ऐ आय जी कडे न्हवती म्हणून तिने दिवाळखोरी जाहीर केली. तर अशी ही चेन. मग लोकांचे मल्टी मिलीयन वाया जाऊ नयेत म्हणून अमेरिकन सरकारने ऐ आय जी ला विकत घेतले.
भारतात घरांच्या किमती कमी होतील असे वाटते का? शेअर बाजाराचा सध्याचा ट्रेंड बघितला तर तिथेही गुंतवणूक करण्याबद्दल साशंकता आहे.
सध्याच्या परिस्थीतीत कुठे गुंतवणूक करावी?
>>>>>>>
भाग्या भारतातील किमती ईतक्या लवकर कमी होनार नाहीत. पुणे सोडुन तु औरंगाबाद सारख्या शहरात गुंतवनु़क केलीस तर अजुनही फायदाच होईल कारण तिथे किमती आता वाढत आहेत. शेअर बाजार सध्या जरी मंदीत असला तरी तिथेच गुंतवनूक कर. अगदी लाखोत नाही पण हजारोत तर नक्कीच कर. ह्या पडक्या मार्केट मध्ये पण वर जाणार्या अनेक कंपन्या आहेत, तिथे फायदाच होईल. फक्त २-३ वर्षे थांबावे लागेल.
केदार एकदम
केदार एकदम माहितीपूर्ण लेख...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
छान लेख....
छान लेख....
सर्वांना
सर्वांना धन्यवाद. प्रश्न असतील तर विचारा मी उत्तर देन्याचा प्रयत्न करेन.
केदार,
केदार, सुरेख माहिती दिलीत.
एक प्रश्न : सध्याच वाचनात आलय, alt A ह्या नावाची /प्रकारची काही नविन लोन्स आहेत का? अस वाचलय, की हा sub primes चाच एक प्रकार आहे.
मस्त लेख
मस्त लेख लिहीला आहेस.. सोप्या शब्दात बरीच माहिती कळली.
बेलाऊट प्लॅनला तुझा विरोध का आहे? भांडवलशाही निकालात मिळेल म्हणुन?
भारतातील व्याजदर अजुन वाढतील का कमी होतील?? कारण भारतीय रिअल इस्टेट मार्केट मध्ये जरा मंदी जाणवत आहे आता.
केदार
केदार मस्तच रे!
बिल पास झाले नाही तर त्याच लघु आणि दूरगामी काय परिणाम होतील ह्याचा तुझा अंदाज ऐकायला आवडेल.
पुण्यात लोक आता घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेऊ म्हणू लागलेयत विशेषत: बाहेरून येणारी.. मग तिथे देखिल इथल्या प्रमाणे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स होण्याची शक्यता दिसते का? २००१ मधे पुण्यात मंदी होता तेव्हा बिल्डरनी फ्लॅट बरोबर गाडी फुकट वगैरे क्लृप्त्या लढवल्या होत्या असं नुकतच वाचलं.. तेव्हा ११ लाखात २ BHK सहज मिळायचा बाणेर सारख्या ठिकाणी..
आणि भारतातल्या व्याजदरांचे सेव्हिंग्ज तसेच मॉर्टगेज तुझा अंदाज समजून घ्यायला मिळाला तरी मस्तच..
धन्यवाद वेळ काढून तू सगळ्म समजवून सांगतोयस.. खरच खूप छान..
महेश alt A
महेश alt A लोन सबप्राईमचा ऐक भाग. अश्या टाईपच्या लोन मुळेच अमेरिका गाळात गेली.
बिल पास झाले नाही तर त्याच लघु आणि दूरगामी काय परिणाम होतील ह्याचा तुझा अंदाज ऐकायला आवडेल>> उपासा आज बिल पास झाले नाही आणी डो ७०० ने पडला आहे.
येत्या काही दिवसात अजुन १००० ने पडनार हे नक्की. yes i am lokking at DOW at 9500 allready.
नात्या, बेलाऊट प्लॅनला माझा विरोध नाही पण ७०० बिलीयन डॉलर्सला च्या पॅकेजला आहे. सध्या तिन गोष्टींची जास्त जरुरत आहे आणि त्याच गोष्टींकडे सर्व लोक दुर्लक्ष करत आहेत असे वाटते.
हा ईश्यु सिरीअस आहे यात वादच नाही पण काँग्रेस सध्या लोकात भिती उत्पन करतेय हे चुकीचे आहे. त्यामूळे आत्ता डेमस नी ते पॅकेज पास नाही केले. नॅन्सी पलोसीने ऐक फालतु भाषन केले जे हास्यास्पद वाटले. सिनेटर्स ना भिती वाटतेय की त्यांनी फेवर मध्ये व्होट केले तर लोक परत त्यांना निवडुन देनार नाहीत.
बेलाआउट हे वेगळ्या रितीने करता येईल जी भांडवलशाही आहे, जी ईकॉनॉमी सायकल व्यवस्तिथ ठेवनारी, चालवनारी, सुरु करनारी आहे.
१. ईव्हेस्टर कॉन्फीडंस, मार्केट फिअर - बुश सारखा माणूस टिव्ही वर येऊन उलट सुलट बोलतो त्यामूळे मार्केट पडतच राहते. ह्या बेलआउट च्या बोलन्याला ८ दिवसांपेक्षा जास्त झाले आणि त्यावर काहीही झाले नाही पण मार्केट पडतच राहीले. आज तर ते बिल प्लोअरवर पडले. त्यामुळे मार्केट परत ५००+ ने पडले. तो विश्वास लगेच वापस आणायला पाहीजे. चांगले शेअर्सही पडत आहेत, हे लगेच टाळायला पाहीजे. फेड रिझर्व्ह ने मध्ये स्टेपईन करुन काहीतरी करायला पाहीजे असे वाटते. (मुद्दा नं दोन) हा बेलआउट शब्द देखील बदलला पाहीजे. आधी लिहील्या प्रमाने मोठ्या कंपन्या मध्ये येऊन शेअर्स विकत घेतात, तर ती मोठी कंपनीच वाईप आउट झाली (लेहमन), अश्यावेळी ईतर कंपन्यांनी मध्ये यायला पाहीजे पण त्या भितीमुळे येत नाहीत. ऐका तासात -५०० ते -७०० फक्त भितीने जाऊ शकते. सरकारला मध्ये येऊन शेअर्समध्ये गुंतवनुक करायची गरज नाही. बेल आउट हा शब्दच चुकीचा आहे.
२. लिक्वीडीटी क्रंच कमी करन्यासाठी लगेच २०० ते २५० बिलीयन हवे आहेत. ते अशाच्य बँकांना व लेन्डर्सना द्यायला पाहीजेत की जिथे गरज आहे. म्हणजे व्यवस्तिथ फोकस ठेवुन. ऐकदम ७०० बिलीयन चे पॅकेज करायची गरज नाही कारण तेवढे पैसे लगेच लागनारच नाहीत. काँग्रेस ऐकाच वेळेस अनेक उदिष्ट्य साध्य करन्याच्या प्रयत्नात असल्यामुळे गडबड होतीये. लिक्वीडीटी साठी सध्या ९० ते ११० बिलीयन आणि पुढच्या ऐका महीन्यात डुबनार्या बँकासाठी १२५ ते १५० बिलीयन्स अशी व्यवस्था हवी. आणि ते पण ह्य बँका विकत घ्यायची गरज नाही तर त्यांना कमी दरात लोन वा सबसिडाईज लोन द्यायचे. विकत घेने हा सर्व गोश्टींवर उपाय नाही. मोठ्या चार बँका ह्या कंपन्याना विकत घेऊ शकतात, त्यांनाच फक्त बॅड डेट्स साठी टॅक्स हॉलीडे वा टॅक्स पॅकेज देता येइल. (वरील १५० बि. मधुन). ह्यामुळे सरकारी हस्तक्षेप राहनार नाही व टॅक्स पेअर्सना खुप मोठी झ्ळ बसनार नाही. FDIC ची सामान्य गुंतवनुकदारांची लिमीट १ मिलीयन करावी, मोठ्या ठेवींसाठी ( ५० मिलीयन पैक्षा जास्त) .१० ते ,१५ फिस fdic ने आकारुन गुंतवनुकदारांचा विश्वास परत आनावा म्हणजे लोक सोन्यात गुंतवन्यापेक्षा परत ठेवी ठेवतील. गेल्या १० दिवसांतील सोन्याचा भाव खुप काही सांगुन जाईल. याने लिक्वीडीटी वापस येईल जो आत्ताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.
३.ऐकदाका अनलिमीटेड पॉवर बिल मुळे दिली की उद्या ह्या उरलेल्या चार मोठ्या बँकावर दडपन येऊ शकते व रेग्युलर ईकॉनॉमी सायकल फेड ने सांगीतल्यामुळे ते ब्रेक करु शकतात. ( जे असेही होतच आहे) लाँग टर्म साठी हे चुकीच ठरु शकते. कदाचीत उद्या ह्या उर्वरीत चार मोठ्या बँकांपैकी ऐखादी गाळात गेली तर काय होईल? हे सर्व टाळन्यासाठी चांगले रुलस, रेग्युलेशनस, तयार करुन ते पाळले गेले पाहीजेत ह्यावर भर दिला पाहीजे.
भारतातील व्याजदर अजुन वाढतील का कमी होतील?? कारण भारतीय रिअल इस्टेट मार्केट मध्ये जरा मंदी जाणवत आहे आता. >>> काल भारतीय मार्केट पडले. ईथे आज जोरात पडझड झालीये त्यामुळे आज उद्या तिकडेही पडनार. मला वाटतेय आपले बिऐसई ११००० वर जाईल. त्यामुळे पॅनीक निर्मान होऊन लोक गुंतवनुक करनार नाही परिनामी लिक्वीडीटी आंनन्यासाठी आर बि आय रेट .५० किंवा .७५ बेस ने कमी करेल असे वाटते. ( येत्या ३ आठवड्यात).
रिअल ईस्टेट मध्ये मंदी आहेच कारण वर लिहील्याप्रमाने हे सर्व ऐकमेकां संबधीत आहे.
केदार, हे
केदार, हे बघ-
रोल कॉल.
तुला बिल नको होते तर मॅकेनला का नावे ठेवतो आहेस?
Pages