ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे
अ
द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स
ब
(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस
क
(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया
ड
(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना
इ
(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून
फ
इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया
ग
(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)
ह
(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली
उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने
उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)
उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)
उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)
तिसर्या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)
अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)
ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/
तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...
ब्राझिलला उत्तर कोरियानी
ब्राझिलला उत्तर कोरियानी चा.न्गलीच लढत दिली. साम्बाचे सुर जूळले होते पण ताल बिघडला होता. आता डु.न्गावर ब्राझिल मधे सडकून टिका होणा़र. ज्या तर्हेने कोरियाचा गोल झाला ते चा.न्गले लक्षण नाही. अशाने मोठ्या टीम विरुद्ध अडचणीत सापडतील.
रॉबिन्ह्योकडून खूप अपेक्षा आहेत. तो वर्ल्ड कप च्या तयारी साठी म्हणून सॅ.न्तोस ला आला होता आणि त्याने सॅन्तोसला नुकतेच दोन कप मिळवूनही दिले आहेत.
ब्राझिलने शेवटच्या काही मिनिटा मधे निल्मारला खेळवले. (कका ऐवजी) हा एक अतिशय उत्क्रुष्ट असा ब्राझिल खाणीतला हिरा आहे. त्याने थोडी झलक दाखवली.
मॅरडोना आणि पेलेची आताच जुम्पली आहे. दोन्ही देश फायनलला आले तर काय जबरी मजा येइल.
<<मॅरडोना आणि पेलेची आताच
<<मॅरडोना आणि पेलेची आताच जुम्पली आहे. दोन्ही देश फायनलला आले तर काय जबरी मजा येइल.>> तसं झालं तर एक कॅमेरा सततचा मॅरॅडोनावरच खिळवून ठेवावा लागेल !
अजून घवघवीत यश मिळालं नसलं तरी आतापर्यंतच्या सामन्यांत पेले व मॅरॅडोनाची आठवण व्हावी अशी
विरोधी गोलकडे मुसंडी मारायची धमक व कुवत मॅस्सीनेच दाखवली आहे [निदान मी पाहिलेल्या सामन्यां वरून तरी] !
<< हा एक अतिशय उत्क्रुष्ट असा ब्राझिल खाणीतला हिरा आहे. त्याने थोडी झलक दाखवली.>> खरंय. असेच खेळाडू हेरून त्यांची पुढील कामगिरी पहाणं हाही विश्वचषकातला खास आनंद असतो. मेक्सिकोचा सँटोस, द.आफ्रिकेचा गोली व माफला इ. अनेक नावं घेता येतील.
>>अजून घवघवीत यश मिळालं नसलं
>>अजून घवघवीत यश मिळालं नसलं तरी आतापर्यंतच्या सामन्यांत पेले व मॅरॅडोनाची आठवण व्हावी अशी विरोधी गोलकडे मुसंडी मारायची धमक व कुवत मॅस्सीनेच दाखवली आहे [निदान मी पाहिलेल्या सामन्यां वरून तरी] !<< खरयं, मेस्सी जैसा कोई नही. रोनाल्डोला प्रभाव पाडता आला नाही पहिल्या सामन्यात, त्यामानाने मेस्सीने पहिल्याच सामन्यात धडाका केला होता. काल 'काका'साहेब शांतच होते.
आज युरोविजेत्या स्पेनची मॅच आहे. टॉरेस, फॅब्रेगास, शावी, इनिएस्ता, रामोस, कॅसिलास यासारख्या गुणी खेळाडूंचा संघ म्हणून सध्या यांची पण दावेदारी जोरदार आहे.
स्पॅनिआर्ड्स हारले की . जास्त
स्पॅनिआर्ड्स हारले की :-(. जास्त वेळ पझेशन ठेवून आणि सातत्याने आक्रमण करून पण १-० ने पराभव पत्कारायला लागला. स्विस संघाचा डिफेन्स मस्त होता. अलोन्सोने मारलेला शॉट क्रॉसबारला लागला पण स्विस खेळाडूचा एक शॉट ही क्रॉसबारला लागून गोल झाला नाही नाहीतर स्पेनवर २-० ने पराभवाची नामुष्की ओढवली असती.
असो माझे फेवरीट्स तर अडखळले.
<<असो माझे फेवरीट्स तर
<<असो माझे फेवरीट्स तर अडखळले.>> रंगासेठजी, दोन शक्यता - १] स्विस संघाला द. आफ्रिकेतल्या सध्याच्या थंड हवामानाचा कांहीसा लाभ झाला असावा [ आयव्हरी कोस्टचा संघ याच हवामानाचा सराव व्हावा म्हणून स्वित्झरलंडमध्ये जावून सराव सामने खेळला होता ] व २] टोरेस ७०व्या मिनीटादरम्यान मैदानात उतरल्यावर स्पेनचं आक्रमण सतत फक्त उजव्या बगलेवरूनच होत होतं. टोरेसला लय सापडत नव्हती हे दिसतच होतं व उजव्या बगलेवरुनचं आक्रमण इतकं "प्रेडिक्टेबल" होत होतं कीं स्विस बचावफळीचं काम अगदीच सोपं झालं होतं, असं आपलं मला वाटलं; फक्त एकदा चुकून डाव्या बगलेवरून स्पेनला चाल करावी लागली तेंव्हा स्विस बचावफळीची तारांबळ उडून स्पेनचा गोल जवळ जवळ होतच होता.
"फर्नांडीस योग्य वेळी नेमका हव्या त्या ठीकाणीच होता" ही स्विस गोलनंतरची कॉमेंटेटरची कॉमेंट आवडली. पण ,स्पेनचे दिग्गज खेळाडू योग्य वेळी नेमक्या हव्या त्या ठीकाणी असूनही ...... !! पण मोठ्या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात असं होतंही कधी कधी.
भाऊ, एकदम पटलं. >>"फर्नांडीस
भाऊ, एकदम पटलं.
>>"फर्नांडीस योग्य वेळी नेमका हव्या त्या ठीकाणीच होता" ही स्विस गोलनंतरची कॉमेंटेटरची कॉमेंट आवडली.<< अगदी अगदी. डाव्या बगलेवर शावी होता, त्याने थोडेफार प्रयत्न केले. स्पेनचे दरवेळेस असेच होते काय, फेवरिट्स म्हणून येतात आणि पचका करतात.
आफ्रिके विरुद्ध खराब
आफ्रिके विरुद्ध खराब पंचगिरीचा फायदा उरुग्वेला मिळाला. ऑफ साईड दिली नाही आणि त्याच वेळी चुकिचे रेड कार्ड आणि पेनल्टी. पण तरी उरुग्वे जिंकलीच असती.
फोरलॉन चा पहिला गोल मात्र केवळ अप्रतीम.
अजून घवघवीत यश मिळालं नसलं
अजून घवघवीत यश मिळालं नसलं तरी आतापर्यंतच्या सामन्यांत पेले व मॅरॅडोनाची आठवण व्हावी अशी
विरोधी गोलकडे मुसंडी मारायची धमक व कुवत मॅस्सीनेच दाखवली आहे [निदान मी पाहिलेल्या सामन्यां वरून तरी] !>> यस सर, एकदम करेक्ट. फूट्बॉल ज्याच्यासाठी बघावा असा खेळाडू.
अर्जेंटीनानी कोरिया
अर्जेंटीनानी कोरिया रिपब्लिकचा धुव्वा उडवला... पहिला गोल तर स्वयंगोलच झाला.. आणि नंतर हिगुयेनने ३ गोल मारत पार वाटच लावली.. अर्जेंटीना कडून वर्ल्डकप मधली चवथी हॅटट्रीक.. लय भारी...
छ्या, तो मॅराडोना माझ्या पार
छ्या, तो मॅराडोना माझ्या पार डोक्यात गेला. एकतर कॅमेरा त्याच्यावरच होता सारखा आणि तो ही शायनिंगची एकही संधी सोडत नव्हता.
काल फारच स्फोटक विधान
काल फारच स्फोटक विधान केल्यामुळे असेल त्याच्यावर कॅमेरा..
जबरदस्त मॅच हिगुयेनने कचरच
जबरदस्त मॅच हिगुयेनने कचरच केला की, मेस्सी पुन्हा एकदा फॉर्मात. जर्मनी, अर्जेंटिना यांनी धडाका लावलाय. असाच धडाका शेवटपर्यंत राहिला तर अर्जेंटिनाइन जनतेला अभूतपूर्व द्रुष्य पाहायला मिळेल. कुणी मॅच लाइव पाहिली काय? मी आत्ता फक्त नेटवर स्कोर व व्रूतांत पाहिला.
मी हाफटाईमपर्यंत लाइव्ह
मी हाफटाईमपर्यंत लाइव्ह पाहिली. २-१ झाले होते तेव्हा.
मी बघितली मॅच लाईव्ह,
मी बघितली मॅच लाईव्ह, सा.कोरियामध्ये बसून. पार नाचवलं अर्जेंटिनाने कोरियाला.
अडो.. अगदीच वाईट की...
अडो.. अगदीच वाईट की... तुमच्या टीमला फारच मोठा धक्का बसलाय.. अर्थात जर त्यांनी पुढची मॅच जिंकली तर ते पुढच्या फेरीत नक्की जातील..
हो रे, आज इथल्या रस्त्यांवर
हो रे, आज इथल्या रस्त्यांवर संध्याकाळी ट्रॅफीक जाम होतं आणि मॅच सुरु झाल्यावर रस्ते अक्षरशः ओसाड पडले होते.
मी पण पाहिली... अर्जेंटिनाने
मी पण पाहिली... अर्जेंटिनाने तुफानी खेळ केला. असे वाटले ८-१० गोल मारतील. फारच मस्त...मजा आली पहायला...कोरीयाचा डिफेन्स अगदीच नवशिक्या संघासारखा वाटला.
जर्मनी, अर्जेंटिना यांनी धडाका लावलाय.........
या दोघांच्यात नेमकी फायनल होण्याची शक्यता नाही. हे बहुदा क्वार्टरफायनलाच येतील एकमेकांसमोर...
फायनलला आले असते तर धमाल आली असती...
माझा सर्वोत्तम विश्वचषक....फेविरीट आणि सेकंड फेविरीट
काल मेक्सिकोने फ्रान्सला २-०
काल मेक्सिकोने फ्रान्सला २-० असे नमवले. पूर्ण मॅचमध्ये मेक्सिकोचे वर्चस्व होते, फ्रान्सचे आक्रमण विस्कळीत वाटले. रिबेरी, अनेल्का थोडेफार प्रयत्न कर होते. त्यामानाने मेक्सिको उत्तम खेळली. फ्रान्सच्या गोलपोस्टवर मस्त चाली रचत आक्रमण केले. मॅन यु चा नवीन स्ट्राइकर हर्नांडेझ व ब्लान्को यांनी गोल केले. मेक्सिकोचा गोलरक्षक पेरेझने पण मह्त्वाची भूमिका पार पाडली.
फ्रान्स पुन्हा एकदा पहिल्याच फेरीत गारद होण्याची चिन्हे दिसतायत. उरुग्वेने आधीच पहिले स्थान पक्के केलेय या गटात.
फ्रान्सनी पहिल्याच गेम मध्ये
फ्रान्सनी पहिल्याच गेम मध्ये पायावर धोंडा पाडून घेतला होता.. आणि काल तर दुसर्या पायावर पण धोंडा पाडून घेतला... तेव्हा आता गच्छंती दिसती आहे त्यांची यंदा.. अर्थात काही जर- तर आहेतच... पण शक्यता तशी कमीच.. द.आफ्रिका तर जोरात प्रयत्न करणार मॅच जिंकण्याचा तेव्हा फ्रान्सला अवघडच जाणार पुढच्या फेरीत जाणे..
फ्रान्सचा कालचा खेळ
फ्रान्सचा कालचा खेळ अविश्वसनिय प्रकारात मोडणारा होता. मला खरेच वाटू शकत नाही की माजी विजेता संघ असा खेळू शकतो. मेक्सिकोचे तीन तीन स्ट्रायकर आत घुसतायत आणि त्यांना अडवायला कोणीच नाही....अरे विश्वचषकाचा सामना खेळता का चेष्टा..
मेक्सिकोचे स्ट्रायकर फिनिश करण्यात कमी पडले नाहीतर अजून गोल नक्की खाल्ले असते फ्रान्सने. ही जर टीम लीगमध्येच बाहेर पडत असेल तर उत्तम आहे..दे डीझर्व इट...
जर्मनी मागे पडलं की हाफ
जर्मनी मागे पडलं की हाफ टाईमला..
काय करतायत जर्मन्स.. चांगली
काय करतायत जर्मन्स.. चांगली संधी घालवली..
आज रेफरीला चांगलाच त्रास दिला
आज रेफरीला चांगलाच त्रास दिला अस दिसतय. ८ पिवळे कार्ड आणि १ रेड कार्ड (क्लोसेला)
जर्मनीचा पण पराभव.. सलग तिसरी
जर्मनीचा पण पराभव.. सलग तिसरी वर्ल्डकप विजेती टीम पराभूत... फुल टू कल्ला होणार आता... जर्मनीचा ग्रुप तर एकदमच इन्टरेस्टिंग.. आज जर ऑस्ट्रेलियानी घानाला हरवले तर मग शेवटच्या मॅच मध्ये निर्णय होणार.. जबरीच..
>>आज जर ऑस्ट्रेलियानी घानाला
>>आज जर ऑस्ट्रेलियानी घानाला हरवले
मला हे अवघड वाटते. घानाची टीम चांगली आहे. सर्बिया पण. सर्बियाशी त्यांची मॅच चांगली झाली होती असं मी लिहिलेलं मागे.
पेनल्टी किक मिळून गोल नाही.. सर्बियाला अजून एक दोन चांगले चान्सेस आले होते.
जर्मनीसाठी आणि त्यांच्या
जर्मनीसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस फारच वाईट...क्लोसला रेडकार्ड दिल्यानंतरही अशी आशा होती की किमान १-० ने तरी जर्मनी जिंकतील. पण सर्बियाचा गोल आणि त्यानंतर पोडलस्कीने दवडलेली सुवर्णसंधी पाहून आशा धूसर झाल्या.
नंतर मला वाटते की त्यांनीही पराभूत मानसिकता दाखवली..
ओझनिल आणि म्युलर या दोघांना बाहेर काढण्यामागचे लॉजिक तेच असावे..कि दोघे इंज्युअर होऊ नयेत किंवा रेड अथवा यलो कार्ड लागू नये...कारण घानाविरुद्दच्या महत्वाच्या मॅचमध्ये क्लोसपाठोपाठ हे दोघे नसणे जर्मनीला परवडणार नाही...
आज जर ऑस्ट्रेलियानी घानाला हरवले तर मग शेवटच्या मॅच मध्ये निर्णय होणार>>>>>>
गारेगार, ती शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळेच आजचा सामना महत्वाचा होता. जर जर्मनी दुसऱया स्थानावर आले ग्रुपमध्ये तर त्यांची बी१ म्हणजे इंग्लंडशी मॅच होण्याची शक्यता आहे...
स्लोवानियाचा खेळ बघता ग्रुप
स्लोवानियाचा खेळ बघता ग्रुप बी मध्ये ते १ नंबरला येण्याची शक्यता सध्या तरी जास्त दिसते आहे.. जर इंग्लंड दोन्ही मॅचेस जिंकले तरच ते १ नंबरला येतील.. पण त्यात त्यांची एक मॅच स्लोवानिया बरोबर आहे.. म्हणजे परत जर तर आलाच..
स्लोवानियाचा खेळ बघता ग्रुप
स्लोवानियाचा खेळ बघता ग्रुप बी मध्ये ते १ नंबरला येण्याची शक्यता सध्या तरी जास्त दिसते आहे>>>>
अनुमोदन. आत्तातरी २-०
(No subject)
आजपण बरोबरी ?? मघाशी दोन
आजपण बरोबरी ?? मघाशी दोन गोलने मागे होते !
Pages