शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
बर्याच ठिकाणी, लग्न मुन्ज इत्यादी कार्यक्रम, देवळात भटजीसमोर, घरच्याघरी वडीलधारे पाहुणे आले असता, हल्ली हल्ली तर टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधे देखिल, अनेक "ज्युनिअर" त्यान्च्या सिनियर्सना वाकून नमस्कार करताना दिसतात.
ते तसे वाकून नमस्कार करत अस्ताना, ज्यान्ना ते तो नमस्कार करतात, त्या व्यक्तिन्चे वागणे व्यक्तिनुरुप इतके तर्हेवाईक असते की माझ्या सारख्याला वाटेल "XX मारली अन यान्ना नमस्कार केला". काय कारण असे वाटण्याचे?
तर एखाद्याने वाकून नमस्कार केल्यानन्तर, त्याचे दुनियेला ऐकु जाईल इतक्या खणखणीत आवाजात अगदी जरी नसले, तरी नमस्कार करणार्या व्यक्तिला ऐकु जाईल इतपत मोठ्याने "अभिष्टचिन्तनात्मक आशिर्वचन" उच्चारण्याची अक्कल्/कुवत ज्यान्ची नाही, त्यान्नी दुसर्यास वाकवुन नमस्कार तरी का करवुन घ्यावा? नै का?
यावर अधिक विचार करता माझ्या असेही लक्षात आले की, दुसर्यास नमस्कार करावा, उभारुन वा वाकून वगैरे शिकवले जाते, पण दुसर्याच्या नमस्काराप्रित्यर्थ, त्या बदल्यात त्या व्यक्तिचे वयानुरुप ज्येष्ठतेस धरुन कसे अभिष्टचिन्तन करावे हेच शिकवले जात नाही. येऊन जाऊन गेल्या शतकभरात लोक "थ्यान्क्यु" येवढेच शिकलेत असे केवळ वाटत नाही तर अनुभवलय!
साला मी नमस्कार केला वाकून, तर समोरील व्यक्ती म्हणते "थ्यान्क्यू"
अन मी आशिर्वाद दिला तरी तेच... थ्यान्क्यू!
आता या तर्हेला काय म्हणाव?
वाकुन नमस्कार घेताना, कुणी नुस्त कैतरी पुटपुटतं, कुणी हात उन्चावल्यासारख करत पण हात कोपरातुन मोडल्याप्रमाणे हालचाल होते, कुणाचे तिकडे लक्षच नस्ते, एकतर दुसर्याकुणाशी बोलत असतात किन्वा फोटोग्राफरकडे बघताना काही बोलायचे विसरुनच जातात, कुणी अहन्कार सुखावल्याप्रमाणे महा आढ्यतेखोरीने वाकलेल्या बकर्यान्कडे अन जमलेल्या गर्दीकडे बघत असतात.
काही निवडक सोवळे, स्वतःचेच पाय मागे ओढत नको नको करत नमस्कार घेण्याचे टाळतात.
याला अपवाद भटजी देखिल नस्तात (हे दुर्दैव).
लिम्बीचे बाबा वगळता, खणखणीत आवाजात सु:स्पष्टपणे आशिर्वाद देणारी व्यक्ती अजुनही माझ्या पहाण्यात आलेली नाही!
हे कशाचे द्योतक?
खिशातली फुटकी कवडी देखिल दुसर्यांस न देण्याची व्रुत्ती आशिर्वाद देण्यापासून परावृत्त करते?
की आशिर्वचने व ती यथायोग्य पणे देण्याची पद्धतच शिकवली जात नाही?
अर्थात मुद्दामहून शिकवणी लावुन शिकण्यासारखी ही गोष्त नाहीच, पण एखाद्या व्यक्तीला केलेल्या नमस्काराबद्दल उत्कृष्ट आशिर्वादाचा कधी अनुभवच आलेला नसेल तर ती व्यक्ती अनुभवातुन तरी शिकणार काय? अन काहीच शिकायला, निदान आशिर्वचन ऐकायला मिळणार नसेल, तर नमस्कार करणार्यास तो "जाचच" वाटला तर विशेष ते काय?
आपल्याला काय वाटते?
(क्रुपया थोताण्डपन्थियान्नी इकडे लिहीण्याची तसदी घेऊ नये ही णम्र विणन्ती)
[आज हा विषय डोक्यात आला, कारण काल अन आज tonaga मला नमो नमः म्हणतोय, तर तत्काल मी आशिर्वचने टाईप केली, अन त्यावरुन वरील रामायण लक्षात आले]
मॄदुला, LOL.. असं कसं चालेल?
मॄदुला,
LOL..
असं कसं चालेल? स्त्रीयांना "सौभाग्यवती भव" असाच आशिर्वाद द्यावा.. नाहीतर तिच्या नवर्याच्या(असलेल्या/होणार्या) आयुष्याचे काय? त्याची काळजी नको करायला? (आणि चुकून विवाहितेला "सौभाग्यवती भव" म्हणायच्या ऐवजी "आयुष्यमान भव" म्हटल्या जाऊ नये म्हणून त्यांनी कुंकू व मंगळसुत्र घालावं, कळलं?)
पुरुषांना मात्र "यशवंत्/आयुष्यमान भव" असा द्यावा.. स्त्रियांना काय गरज "यशवंत्/आयुष्यमान" व्हायची?
बाकी आमच्या घरात सर्वांनाच "सुखी राहा", "यशस्वी व्हा", "उत्तरोत्तर तुमची प्रगती होवो", "आनंदात राहा", "all the best" असे आशिर्वाद मिळतात मोठयांकडून..पण आमच्या घरचे पडले पुढारलेले, त्यामुळे त्यांचे आशिर्वाद ही तसेच!
दोन्ही बाजुंना
दोन्ही बाजुंना व्यवहारिक/प्रॅक्टीकल अडचणी असतात, असे दिसतेय.
असो..... मला ते राज ठाक्रे नी केलेले (त्यांच्या पक्षाच्या उद्घाटनाचे) भाषण आठवले.
लिंबू, आपल्याकडे अगदी पूर्ण
लिंबू,
आपल्याकडे अगदी पूर्ण वाकून, पायाना ओझरता का होईना हात लावत नमस्कार करायची
पद्धत आहे. आणि मला तरी त्यात काहीच वावगे वाटत नाही. आमच्या घरात अजून हिच
रित वापरात आहे. आता वडीलधारी माणसे, समोरचा पूर्ण वाकायच्या आतच त्याच्या खांद्याला
धरुन, मधेच थांबवतात.
आशिर्वाद मात्र, मोठा हो, लवकर परत ये, यशस्वी हो, असे असतात.
आमच्याकडे कधी कधी भाउ वयाने मोठा आणि वहीनी लहान, असे असते. त्यावेळी मोठ्या
भावाचा मान, वहिनीला पण दिला जातो.
मी घरात लहान असल्याने, आजवर सगळ्यांना वाकून नमस्कारच करत आलोय.
तू वारकरी संप्रदायाचे उदाहरण दिलेय, ती तर त्यांची रितच आहे, त्यामागची भावनाही सुंदर
आहे
वर्ण अभिमान विसरली सारी, एकमेका लोटांगणी जाती
बंगाली लोकात पायला हात लावून तोच हात आपल्या डोक्यावरुन फ़िरवायची रित आहे तर
पंजाब्य़ात केवळ एकच हात आणि तोही समोरच्याच्या गुडघ्यापर्यंतच न्यायची रित आहे.
माझ्या जैन मित्रांकडे अगदी लग्नातही, न वाकता, केवळ उभ्याने हात जोडून नमस्कार करायची
रित बघितली.
या सगळ्या रितींपुढे आपली रित कमीपणाची वाटायला लागलीय का ?
वाढत्या वयात दू:ख हे आहे कि वाकून नमस्कार करण्यासाठी, जॆष्ठ माणसेच आता उरली नाहीत.
मला स्वतःला नमस्कार करायला
मला स्वतःला नमस्कार करायला आणि घ्यायला आवडतो. आशीर्वाद देताना आपोआप तोंडातून ''कल्याणमस्तु|'', ''शुभं भवतु|'', ''सुखी भव|'', ''आयुष्मान भव|'', ''मोठा/मोठी हो'', ''शहाणा/शहाणी हो'' असे आशीर्वाद येतात. कोणी जर मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि चुटपुटत आशीर्वाद दिला की आधी मी खट्टू व्हायचे. आता त्यात काही गैर वाटून घेत नाही. आपण ज्याला नमस्कार करतो त्याने तोंडभरून आशीर्वाद देवोत अगर न देवोत, आपला नमस्कार परमेश्वरापर्यंत पोचला आणि त्याने आपल्याला आशीर्वाद दिला असे मानले की झाले! मग त्यात विशेष वाटत नाही.
आणि अगदी वाकून नमस्कार नाही केला, दोन्ही हात जोडून नमस्कार केला तरी तो जर मनोभावे असेल तर पोचतो.
हां, आजकाल लोक नमस्कार करण्यात कमीपणा का मानतात तर माझ्या मते, बर्याचदा, ढेरी मधे येते म्हणून!
अर्थात अश्या नमस्काराला कोणी वाकून नमस्कार केल्यावर त्याच्या पाठीवर थाप देऊन आशीर्वाद देण्यात जी मजा येते ती येत नाही. विशेषतः धाकटे भाऊ, बहिणी, भाचे मंडळी वगैरे असतील तर जोरात थाप देताना भर्पूर हसाहशीही होते.
कोणी मनाविरुध्द केवळ एक औपचारिकता म्हणून जर नमस्कार करत असेल तर मात्र थोडे अवघडल्यासारखे होते. उगाच नाहीए मनात तर नका करू नमस्कार देखाव्यासाठी, असे वाटून जाते!
आपण महाराष्ट्रात वाकून नमस्कार करतो. दक्षिण भारतात नमस्कार करायच्या बर्याच वेगवेगळ्या तर्हा आहेत. कर्नाटकात बसून, गुडघे जमीनीला टेकून (वज्रासनात), डोके भुईला टेकवून, नाक घासून, तळहात आवाहनमुद्रेत आकाशाच्या दिशेने खुले ठेवून नमस्कार करतात.
मल्याळी लोकांमध्ये मंदिरात गेल्यावर देवाला नमस्कार करायची अजबच तर्हा पाहिली. दोन्ही हातांनी विरुध्द बाजूचा कान पकडतात, पाय क्रॉस करतात, एक छोटीशी टुण्णकन उडी मारतात, मग दोन्ही हातांनी विरुध्द बाजूचा गाल शिवतात...पुन्हा त्या हाताने त्या त्या बाजूचा गाल शिवतात, डोळे मिटून डोके लवून नमस्कार करतात.
उत्तरप्रदेशी स्टाईलचा मुजरा केल्यासारखा किंवा एका हाताने समोरच्या व्यक्तीला ''चरणस्पर्श'' करण्याचा प्रकार मला तितकासा रुचत नाही. पण त्या लोकांकडे आता तशीच प्रथा आहे, म्हटल्यावर ते तरी काय करणार? अश्या कोणी नमस्कार केला की मग घशातून धड आशीर्वाद फुटतच नाही! तरी पण मी शिकले आहे आता.... असे कोणी नमस्कार करत असेल तरी भरघोस आशीर्वाद द्यायला.... अगदी खणखणीतपणे!!
आमच्याकडे माझे वडील, काका वगैरे (त्यांच्या मते) मोठ्या, वडीलधार्या लोकांच्या पाया पडतातच, आणि कोण्या व्यक्तीला विशेष आदर दाखवायचा असेल किंवा चुकून माकून जर देवळात गेले तर थेट साष्टांग नमस्कारच घालतात. मला साष्टांग नमस्कार घालायला खूप आवडतो (फरशी स्वच्छ असेल तर, हाहाहा).... पण तसा रिवाज नसल्यामुळे ती आवड योगासनापुरतीच मर्यादित ठेवावी लागते!
साष्टांग नमस्कार... ..
साष्टांग नमस्कार...
.. चांगला विषय मांडलात...
मस्त विषय आहे! हे वाचल्यावर
मस्त विषय आहे!
हे वाचल्यावर जाणवलं मला की लग्नाच्या दिवशी व नंतर २-३ दिवसांत आम्ही जोडीने ५०० जणांना तरी नमस्कार केला असेल पण कोणीच खण़खणीत आशिर्वाद दिल्याचं नाही आठवत..
मी घरात लहान असल्याने भाचेकंपनीच पाया पडते फक्त.. आपसुकच "आयुष्यमान भव" येतं तोंडातुन.
आशीर्वाद जेव्हा स्पष्टपणे
आशीर्वाद जेव्हा स्पष्टपणे देतात ते मला खरच खूप आवडतं.. अगदी जवळीक वाटायला लागते.. किवा कोणी तरी हसून डोक्यावर हात ठेवतात ते हि छानच वाटत
नमस्कार करायला मला तरी आवडतं.. लहान असताना दसर्याला मात्र मजा यायची.. आजू बाजूला जावून सगळ्यांच्या पाया पडून खरच त्रास व्हायचा पण खाऊ हि मिळायचा..त्याच्यासारखी मजा नाही ..
आई वडिलांना .. स्पेशली माझ्या वडिलांना मी नमस्कार केला नाही तर बाप रे काही तरी अनर्थच केल्यासारखं वाटेल मला.. इतक्या प्रेमानी तोंड भरून आशिर्वाद देतात.. मलाच नाही सगळ्यांना .. असे बरेच काका आजोबा जे खूप जीव्हाल्यानि आशिर्वाद देतात तेवढ्या साठी मी किती हि वेळा लहान व्हायला तयार आहे
घरात सगळ्यात लहान असून मी जेव्हा मोठी सून म्हणून सासरी आली तेव्हा मला ही नमस्कार केला कि प्रश्न पडायचा.. मी काय आशिर्वाद देणार .. थोडे दिवसांनी मात्र सवय झाली..
आता मुलं झाल्यावर तर अगदी हमखास वाटतं.. प्रत्येक सणाला, वाढदिवसाला ते चिमुकले पाया पडतात (आम्ही पडवून घेतो ती गोष्ट वेगळी पण इथे म्हणतात तसे शिकवणार कोण .) तेव्हा काय उर भरून येतो .. त्यांचे आजी आजोबा लगेच उचलून भर भरून आशिर्वाद देतात..
नमस्कार गुलामगिरी चं लक्षण वाटणे ..हा विचार पहिल्यांदाच ऐकला.. समोरची व्यक्ती आवडत नसताना शिव्या घालत केलेला नमस्कार एकदा बंद झालेले ठीक आह पण जे लोक उगाच आपल हा हा ठीक आहे पुरे झाल त्यांच्या पाया पण मी अर्धवट च पडते.. अगदी त्या नॉर्थ इंडियन पोरांसारख पैरी पौना .. गुध्घ्याजवळ हात लावून.. भाव कुठेच नाही त्यांच्याही आणि माझ्याही मनात.. बाकी आज काल तर अशी पंचाईत होतच नाही .. तेच म्हणतात नको पाया बिया अस म्हणून त्यांना आपण खूपच मोडर्ण आहेत दाखवायचं असता का ते कळत नाही..
साष्टांग नमस्कार .. मला ही आवडतो पण तो मुलांसाठी मर्यादित आहे अस बरेच दिवस वाटायचं.. मुलीनी कधी घातलेला बघण्यात नव्हता.. माझी बहिण मात्र वडिलांना साष्टांग नमस्कार घालयाची .. मुद्दामून आमच्या घरात मुलगा नाही .. मीच घालते मग.. मी कशी शहाणी वगैरे गम्मत म्हणून ..
रिवाज नसल्यामुळे ती आवड योगासनापुरतीच मर्यादित ठेवावी लागते>>
'पाया पडणे' हा नमस्कारासाठी
'पाया पडणे' हा नमस्कारासाठी वाक्यात उपयोग बरोबर आहे का?
'नमस्कार करते' असचं म्हणावं हे मला त्या दिवशी कळलं.
माझ्या माहेरी 'पाया पडते ' 'पाया पडं' हे सर्रास वापरतात. पण सासरी जेव्हा एकदा आत्तेसासुबाईंना नमस्कार करायला गेले तेव्हा 'पाया पडते' असं म्हणुन खाली वाकले तर त्या नको नको करत मागे सरल्या.
मला अकु नी सांगितलेला मल्याळि
मला अकु नी सांगितलेला मल्याळि पध्धतिचा नमस्कार फारच आवडला, लग्नात साखरपुड्यात जेन्व्हा अनेकांना नमस्कार करण्याचि वेळ येते तेन्व्हा ह्याच पध्धतिचा वपर करावा म्हणजे नमस्कार आणि व्यायम (टुणकन उडि मारल्यामुळे) एकदमच होइल. नमस्कारामुळे वजन कमि होत हा संदेश पोहोचला कि तरुण मुलिंना नमस्कार जाचक वाटणार नाहित उलट त्या आवर्जुन नमस्कार करतिल, वजन कमि होतय म्हणुन तरुण पिढि खुश त्यांच वळण सरळ झाल म्हणुन त्यांचे ज्येष्ठ खुश एकंदर सगळिकडे आनंदिआनंद!
अमृता, आमच्याकडेही 'पाया पडते
अमृता, आमच्याकडेही 'पाया पडते हं' असंच म्हणतात.

एक गम्मत आठवली. लेकीला 'नमनम करा' असं म्हणून म्हणून सवयीने एकदा मी साबुंच्या पाया पडताना 'नमनम करते' म्हणून गेले
आमच्याकडे माझी थोरली जाऊ माझी कॉलेजमधली सख्खी मैत्रीण. लग्नानंतर सुरुवातीला मी तिच्या पाया पडायला जायचे, पण आम्हां दोघींनाही ते फारच ऑकवर्ड व्हायचं. मग हळूहळू मी तिला नमस्कार करणं बंद केलं.
ही वाकून नमस्कार करण्याची
ही वाकून नमस्कार करण्याची पद्धत मानसिक गुलामगिरीची द्योतक आहे. आपल्यापुढे दुसर्याला झुकवण्याच्या श्रेष्ठतेच्या अहंगडातून निर्माण झाललेला हा सरंजामी प्रकार आहे. 'तुझी जागा माझ्या पायाजवळ आहे' हे दर्शविण्याची वृत्ती यातून स्पष्ट होत नाही काय. ? शतकानुशतकांच्या या कंडीशंड 'संस्कारा' मुळे झुकणारानाही त्यात पोकळ नम्रता वाटू लागली आहे. हात जोडणे हे देखील शरण आलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
>>>>
ज्यांना अहं ब्रह्मास्मि एवढेच माहिती आहे ते हा विचार करतात, पण त्यापुढे तत्वमसि हे सुद्धा आहे. हे विसरले तर असा विचार येणे साहजिक आहे. त्यामुळे ज्यांना पूर्ण अहं ब्रह्मास्मि, तत्वमसि माहिती आहे ति लोक असा विचार कधिही करत नाहीत.
नमस्कार हे गुलामगिरीचे वा शरण आलेल्या मानसिकतेचे द्योतक नसुन तुझ्यामधिल देवाला ( नम ईश) मी प्रणाम करतो हा चांगला विचार त्या पाठी मागे आहे म्हणून नमस्काराचे प्रत्युत्तर पण तत्वमसि म्हणजे मी ही तुझ्यात वसलेल्या त्या देवाला प्रणाम करतो. (देणारा व घेणारा दोघेही! मग गुलामी किंवा शरण आलेली मानसिकता कुठे आहे हे कळले नाही)
वाकून नमस्कार करने म्हणजे लिनता. मोठ्यांचरणी लहानांनी लिन होने. रुढार्थाने लिनतेचे पर्यावसन गुलामगीरी मध्ये होऊ शकते, (नमस्कार करण्यात नाही तर इतर अर्थाने) पण इथे तसे नाही हे लक्षात घ्यावे लागते. साष्टांग नमस्कार फक्त देवापुढे करतात, माणसांपुढे नाही. गुरुला देवाचे रुप मानले तर तिथेही करतात.
सर्वच गोष्टिंप्रती विरोधीमत असेल तर त्यामागचे खरे कारण पुढे येत नाही, व सर्वांचा नमस्कारा पाठीमागे भावना काय आहे हे माहित नसते. वाचकांवर हे वरिल मत हावि होऊ नये म्हणून पोस्टप्रपंच.
मला समोरच्या व्यक्तीची
मला समोरच्या व्यक्तीची योग्यता माहीत नसताना, उगाचच वय मोठ्ठं आहे म्हणून पाया पडायला आवडत नाही.
तसेच मला कुणी वाकून नमस्कार केलेलाही आवडत नाही...
व्यक्तीबद्दल मनापासून आदर असेल तर मात्र बिनधास्त पाया पडेन..
(म्हणून कधी सचिन तेंडूलकर/सुनिल गावस्कर भेटला तर पाया पडेन.. )
थोरां मोठ्यांच्या पायाची धुळ
थोरां मोठ्यांच्या पायाची धुळ आपल्या कपाळाला लावण्यासाठी हा वाकुन केलेला (किंवा शिरसाष्टांग) नमस्कार असतो कां?
समज येण्या अगोदर मी वयाने थोर असलेल्यांना नमस्कार करायचो (आमच्या कडे कल्याणकारी लष्करी शासन होते... ब्र काढायची बिशाद नव्हती). आता मी कुणालाही वाकुन नमस्कार करत नाही, तसेच मला कुणी केलेला आवडतही नाही. आपली अशी काय पात्रता आहे म्हणुन समोरच्या चिमुकल्यांनी पायाला हात लावाला? असा विचार डोकावतो.
नमस्कार करायचाच असेल तर मी स्वत: चे दोन्ही हात जोडतो. मग ते ८५ वर्षांचे आजोबा असतील वा १० वर्षांची मुलगी असेल. सर्वां बद्दल एक माणुस म्हणुन सारखाच आदर असावा असे वाटते, वय कमी (जास्त) म्हणुन आदर कमी (जास्त) असे नको.
रमा, प्राची
रमा, प्राची
प्राची मस्त पोस्ट केदार.
प्राची
मस्त पोस्ट केदार.
अकुने सांगितलेले साउथिंडीयन लोकांचे नमस्काराचे प्रकार देंवांपुढचे आहेत. माणसांना तसला नमस्कार घातलेला कधी पाहिला नाहिये. त्यामुळे रमा, लग्नात नाही चालणार तसला नमस्कार.

कानाला हात लाउन उठा बशा पण काढतात हे लोक. देवाकडे माफी मागत असतात.
आपली अशी काय पात्रता आहे
आपली अशी काय पात्रता आहे म्हणुन समोरच्या चिमुकल्यांनी पायाला हात लावाला? असा विचार डोकावतो. >>> अगदी अगदी. सासरी गेले होते तेव्हा मला अर्ध्या लोकांच्या पाया पडायला लावलं आणि उरलेले माझ्या पाया पडलेले. त्यात एक मोठा बिझिनेसमन दीर पण होता. कर्तुत्वाने, वयाने माझ्यापेक्षा मोठा पण मानाने लहान (म्हणे). शेवटी मी चप्पल घातली आणि पळ काढला.
(आमच्या कडे कल्याणकारी लष्करी
(आमच्या कडे कल्याणकारी लष्करी शासन होते...
>> म्हणजे बेनोवॅलन्ट डिक्टेटरशिप का?
म्हणजे प्रत्येक प्रकरणात
म्हणजे प्रत्येक प्रकरणात बायकानाच वाकायला लावण्याचे आवर्जून पाहिले जाते.पुरुषाना ते ओप्शनल आहे.
उत्तम.. संस्कृतीरक्षकांची वर्दळ वाढू लागलेली दिसते.
.
.
मी संस्कृतीरक्षक आहे हे तुझे
पाया पडल्या नाहीतर संस्कृती लयाला जाते असा संस्कृतीचा संबंध निदान मी तरी लावत नाही.
संस्कृती जतन करण्याचे काम सर्वतोपरी श्रीराम सेना, छावा, संभाजी ब्रिगेड अश्या संस्थांनी घाउक स्वरुपात स्वतः कडे घेतले आहे.
कुळकर्णी खोडलं का?
नमस्कार करायचाच असेल तर मी स्वत: चे दोन्ही हात जोडतो. मग ते ८५ वर्षांचे आजोबा असतील वा १० वर्षांची मुलगी असेल. सर्वां बद्दल एक माणुस म्हणुन सारखाच आदर असावा असे वाटते, वय कमी (जास्त) म्हणुन आदर कमी (जास्त) असे नको.
>>
उदय तुझ्याशी सहमत.
""""मला समोरच्या व्यक्तीची
""""मला समोरच्या व्यक्तीची योग्यता माहीत नसताना, उगाचच वय मोठ्ठं आहे म्हणून पाया पडायला आवडत नाही.
तसेच मला कुणी वाकून नमस्कार केलेलाही आवडत नाही...
व्यक्तीबद्दल मनापासून आदर असेल तर मात्र बिनधास्त पाया पडेन..""""
मी परदेसाईंशी सहमत आहे. नमस्कार कर्तृत्वाला...वय जात नाते यांनी येणार्या मोठेपणाला नाही. सचिनने २०० धावा केल्या एक दिवसीय सामन्यात तेव्हा गावसकरने त्याला चरणस्पर्श केला. (सचिनने करू दिला नाही बहुधा).
जयललितासमोर पक्ष कार्यकर्ते लोटांगण घालतात्..कसेसेच वाटते बघून.
पण माणसांना नमस्कार करणे यात
पण माणसांना नमस्कार करणे यात धार्मिक काय आहे? हा धागा धार्मिकमधे कसा काय?
>>हा धागा धार्मिकमधे कसा
>>हा धागा धार्मिकमधे कसा काय?
सांस्कृतिक मध्ये पाहिजे ना?
बरे, आत्तापर्यंत समजलेले व्यक्तिनिरपेक्ष आशीर्वाद -
''कल्याणमस्तु|'',
''शुभं भवतु|'',
''सुखी भव|'',
''आयुष्मान भव|'',
''मोठा/मोठी हो'',
''शहाणा/शहाणी हो''
''लवकर परत ये''
आशीर्वाद काय द्यावा याचे प्रशिक्षण नसल्याने तो दिला जात नसावा. चर्चेचे सार म्हणून (शेवटी, सगळ्यांचे बोलून झाल्यावर) आशीर्वादांची यादी प्रकाशित करावी. ज्यांना नमस्कार केलेला चालतो त्यांना उपयोगी पडेल. फुकटची चर्चा काय कामाची!
मला नमस्कार करायला खूप
मला नमस्कार करायला खूप आवडतं!! मोठ्या माणसांना म्हणजे आजी आजोबा जनरेशनला नमस्कार केला की मस्त खुलतात ते.. आणि तोंडभर हसू पसरते.. आवडते मला..
पण हा संस्कार कधी जाचक वाटला नाही, त्याचे कारण शोधले पाहिजे. 
माझे आई बाबा सासरी माहेरी दोन्हीकडचे लहान. त्यामुळे कायमच आईबाबांना नमस्कार करताना पाहात आले. मला व दादाला ती सवय लागलीच मग. तसंही खूप सोवळं वगैरे पाळणारी आजी आमच्याकडे असल्याने एखाद वेळेस नाही केला तर ती यायची दटावत..
मात्र मला कोणी नमस्कार केला मी तेव्हढीच ऑकवर्ड होते.. मला आशिर्वाद देणं जमतच नाही फारसे.. अरे/अगं कशाला असेच म्हटले जाते.
वयाने मोठ्या दिसणार्या व्यक्तिला नमस्कार करण्याच्या सवयीच्या नादात मी सासर्यांच्या ओळखीच्या एका (तरूण पण टक्कल पडलेल्या) डॉक्टरला भक्तिभावाने नमस्कार केला होता. तो बिचारा इतका ऑकवर्ड झाला. आणि मी
पण माणसांना नमस्कार करणे यात
पण माणसांना नमस्कार करणे यात धार्मिक काय आहे? हा धागा धार्मिकमधे कसा काय?
>>
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बेसिक मध्येच वान्दा (बी एम डब्ल्यू)झाला की
<<जयललितासमोर पक्ष कार्यकर्ते
<<जयललितासमोर पक्ष कार्यकर्ते लोटांगण घालतात्..कसेसेच वाटते बघून.>> मला वाटतं हा मुद्दाच
आपल्याला विषयाच्या मुळाशीच नेतो. पूर्वी मोठ्यांना वांकून नमस्कार करणं व त्यानी तोंडभरून आशिर्वाद देण हे, केवळ औपचारीक असो वा खरंखूरं, सहजगत्या व्हायचं. पण आता विशेषतः राजकारणी, सिनेमावाले, मिडीयावाले, भोंदूबाबा व खानदानीपणाचा आव आणणार्या मंडळीनी अशा नमस्काराला इतकं नाटकी स्वरूप दिलंय कीं कुणीही वाकून नमस्कार केला कीं खरंच "कसेसेच वाटते " अशी परिस्थिती आहे. साधा नमस्कार करण्यार्याच्या डोळ्यातून व्यक्त होणारा भावही पुरेसा असतो व त्याला नुसतं हंसून दिलेला प्रतिसादही खूप बोलका व आशिर्वादात्मक असूं शकतो.
व्यक्तीशः, मी परदेसाईंशी व भरत मयेकरांशी सहमत आहे. मलाही त्यांच्यासारखंच कुणालातरी [कुणालाही नव्हे] मनापासून वाकून नमस्कार करावासा वाटतो, पण अशिर्वादासाठी नाही !
आकाशत्पतितं तोयं यथा गच्छति
आकाशत्पतितं तोयं यथा गच्छति सागरमं |
सर्व देव (मनुष्य) नमस्कारः केशवं प्रतिगच्छति ||
>>पण माणसांना नमस्कार करणे
>>पण माणसांना नमस्कार करणे यात धार्मिक काय आहे? हा धागा धार्मिकमधे कसा काय?
अहो, असते एकेकाची श्रद्धा! अनेक सरकारी अधिकारी नाही का स्वत्व विसरून मंत्री लोकांचे चरणसपर्श 'अत्यंत धार्मिकतेने/भक्तीभावाने' करीत असतात? तसेच हो

गाडगेबाबा त्यांच्या पाया
गाडगेबाबा त्यांच्या पाया पडणार्यांच्या (वाकून नमस्कार करणार्याच्या) पाठीत काठी मारीत... !
इथे आशिर्वाद द्यायची घाई झाली आहे.
उदय आणि बस्के , चांगली
उदय आणि बस्के , चांगली पोस्ट.. (जरी थोडी मत भिन्नता असली तरिही).
दिनेश च्या पोस्ट मधील शेवटल्या ओळीला अनुमोदन..
माझी आजी नेहेमी एक वाक्य सांगायची ते आठवलं... 'नमस्कार फुकाचा आशिर्वाद लाखाचा'..
Pages