उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय.अंगाची लाही-लाही होतेय.म्हणुन हा पाण्याचा शिडकावा...मागच्या वर्षी पावसाळ्यात केलेल्या ट्रेकची सफर......कोहोज गड........
तो दिवस रविवार होता.सकाळी साडेसहावाजता ठाणे स्टेशनवर एकटाच वाट बघत उभा होतो.तेवढ्यात आमच्या म्होरक्याचा गोपीचा संदेश(मेसेज) मोबाईलवर आला.त्याची तब्येत ठिक नसल्याकारणाने तो येऊ शकणार नव्हता.तो येणार नाही म्हणुन आणखी दोघा जणांनी येण्यास नकार दर्शविला.एवढ्या सकाळी झोपेच खोबर करुन ट्रेकसाठी सज्ज झालो आणि या लोकांनी वेळेवर टांग दिली.असा राग येत होता कि काय सांगु तुम्हाला...तेवढ्यात भावीन डोंबिवीलीहुन ठाण्याला पोहोचला होता.थोडे हायसे वाटले.
दहा मिनिटाने रोहनसुद्धा आला.अजुन कोणीही आले नाही.मग आम्ही तिघांनी मोहिमेवर जायचे ठरवीले.
किल्ले कोहोजबद्दल आम्हाला गोपीनेच सुचवीले होते.मिलींद गुणाजीच्या "ऑफबिट ट्रॅक्स इन महाराष्ट्रा" तुन पावसाळ्यात गवसणी घालण्याचे उत्तम ठिकाण(डेस्टीनेशन) म्हणजे किल्ले कोहोज असे त्याने वाचले होते.कोहोज किल्ला हा मुख्यत्वे ठाणे जिल्ह्यात पालघर विभागात येतो.त्याची उंची सरासरी १९१८ फुट आहे.ह्या किल्ल्यावर माणसाचे आकार भासवणारे दगडाचे उंच सुळके दिसतात.
तस या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही.१६ व्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडुन हा देश जिंकुन घेतला.या गडावर तट बुरुज चढविले.पुढे पेशव्यांनी १८ व्या(१७३७) शतकात काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकुन घेतला.शेवटी तो इंग्रजांकडे गेला.
ठाणे एस.टी स्टँड वरुन आम्ही सफाले ला जाणारी बस पकडली.अपेक्षेप्रमाणे बस पुर्ण खाली होती.आम्ही वाड्याची तिकिटे काढली.बसने काँक्रिटचे जंगल(शहरी भाग) सोडल्यानंतर आजुबाजुला हिरवळीचे(वाढलेल्या गवताचे) दर्शन झाले.पावसाळी वातावरण तर होते.पण मध्येमध्ये सुर्यनारायणही ढगांच्या आडुन डोकावुन पाहत होते.त्यामुळे पाऊस पडेल की नाही याबाबत थोडे साशंक होतो.जवळजवळ दोन तासानंतर आम्ही वाड्याला पोहोचलो.येथुन पुढे पालघरला जाणारी बस पकडायची होती.आम्हाला वाघोटे गावात उतरायचे होते.अनवधानाने आम्ही ज्या बसमधुन (सफाळेच्या)आलो.तीच बस आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवणार असे बसवाहका (कंडक्टर्)कडुन समजले.पुढे काही खायला मिळणार नाही.म्हणुन येथेच नाश्ता केला.वाडा सोडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजुचा खुललेला हिरवा निसर्ग पाहुन डोळे आणि मन भरुन आले.जाताना भातशेतीची लावणी करताना बरेच शेतकरी दिसले.नुकतीच पाऊसाची एक सर येऊन गेल्यामुळे रस्ता भिजला होता.डोंगररांगा काय दुरदुरवर दिसत नव्हत्या.साधारणत: पंचवीस मिनीटांचा प्रवास झाल्यानंतर अचानक ढगात हरवलेल्या कोहोजचे लटके दर्शन बसमधुन झाले.
आम्ही गडाच्या पायथ्याच्या गावी वाघोटे गावात उतरलो तेव्हा साडे-नऊ वाजले होते.नुकतीच पाऊसाची सर येऊन गेल्याने खुप प्रसन्न वाटत होते.
ढगात हरविलेला कोहोज गड आणि त्याच्या आजुबाजुचा परिसर हिरव्या रंगाने नटला होता.जणु काय आम्ही येणार म्हणुन......
तेथुन पुढे मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजुने जाणार्या वाटेने कुच केले.
जेमतेम पाच मिनिट चालल्यानंतर आम्हाला एक तळे लागले.त्याचा आकार ह्रदयासारखा(heart-shape) आहे असे वाचले होते आणि खरच ते तसच भासल..
पुढे थोड चालल्यानंतर सगळीकडे भातशेती दिसत होती.रस्ता कुठे असेल याची कल्पना नव्हती.तेव्हढ्यात एक चिमुरडी पोरगी दिसली.आम्ही तिला डोंगरावर जायचा रस्ता कुठे असेल म्हणुन विचारले.तिने शेताच्या कडेने बांधाने जायला सांगितले.आम्ही बांधाने पुढे निघालो.बांधाला मध्ये एका ठिकाणी मोठी गॅप होती .(पाणी जाण्यासाठी बांध फोडला होता.) भावीन आणी मी उडी मारून पुढे गेलो.पण रोहन उडी मारायला तयार नव्हता.तो शेवटी खाली उतरुन आला.मी मागे वळुन बघितले तर ती चिमुरडी हसत होती.आपण चुकीच्या रस्त्याने तर नाहि ना चाललो असे क्षणभर मनाला वाटले.पण नाही आम्ही बरोबर चाललो होतो.पुढे दोन शेतं ओलांडल्यानंतर आम्हाला शेताच्या मधोमध हे छोटस खोपट दिसल.
पुढे पायवाटेने जाताना हे शेतकरीदादा पेरणी करताना दिसले.त्यांनी आम्हाला सरऴ वाटेने जायला सांगितले.
सगळीकडे हिरवळ पसरली होती.पण हे झाड कुठल्या दु:खात होते कुणास ठाऊक...
पुढे जाताना अजुन एक खोपट दिसल.त्यामध्ये बाळ झोपाळ्यामध्ये मस्त खेळत होत.
थोडी चढण पार केल्यावर गडाच्या पायथ्याशी अजुन एक तळे लागले.
तळ्याच्या कडेने पुढे निघालो.येथुन पुढे आम्हि ज्या वाटेने जाणार होतो ती वाट तिथल्या शेतकरीभाउंनी काटे लावुन बंद केली होती.त्यामुळे आम्हाला नाइलाजाने दुसर्या वाटेने म्हणजे त्याच्या शेताला पुर्ण वळसा घालुन जावे लागले.दोन्ही बाजुला झाडी असलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर पाण्याचा झरा लागला.
हा तो नाही.पुढे आहे अजुन....थोड चालावे लागेल..
हाच तो...
झर्यापाशी वेगवेगळ्या कोनात काढलेले फोटो...
येथुन पुढे एकच लक्ष्य गड सर करण्याचे...
आता खरी सुरुवात झाली...सुरवातीला झाडीझुडपातुन जाताना काही वाटले नाही..
पण जसजसा चढ लागला.तस दमायला झाल आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे जरा जास्तच...
आता तर प्रत्येक दहा-दहा मिनिटानंतर मध्येमध्ये थांबत होतो.
गडाचा पायथ्याशी असलेले तळे आता बरेच मागे पडले होते.
खिंडीकडे जाणारी वाट....
जवळ-जवळ अडीज तासाच्या खडतर चढणीनंतर गडाच्या खिंडित येऊन पोहोचलो.येथे आल्या-आल्या वरुणराजाने सलामी दिली.वारा सुध्दा सुसाट होता.
येथे थोडा वेळ थांबुन आजुबाजुचा निसर्ग डोळ्यात आणि कॅमेरात बंदीस्त केला.
खिंडीतुन पुढे या उतारावर जरा पळतच पुढे गेलो.
पण आता चांगलाच कस लागला.कारण पुढची वाट दगडधोंड्यातुन जाणारी होती.एक-एक पाऊल टाकताना पाय म्हणत होते..अजुन किती लांब आहे..
पोहोचलो एकदाचे बुवा....थोडे बिस्किट आणि पाणी पिऊन पोटाला शांत केले.
पण डोळ्याची भुक वाढली होती.त्यामुळे जवळजवळ तीन तासाच्या चढणीनंतर आलेला थकवा इथल्या निसर्गाला पाहुन कुठल्याकुठे पळुन गेला.
गडाला ढगांनी घेरलेले होते.आम्ही त्याला आव्हान देण्यासाठी पुढे सरसावलो.आमचा जोश पाहुन शेवटी ढगांनी शरणागती पत्कारली आणि आमच्यावर खुप बरसला.
येथे मोठे-मोठे दगड एकमेकावर रचलेले होते आम्ही त्याच्यावर चढाई करुन एकच जल्लोश केला.
बाजुला दरीमध्ये ढगांचा गालीचा पसरलेला होता.
स्वर्ग म्हणतात तो हाच का असे क्षणाक्षणाला वाटत होते.
एक कॉलेजचा ग्रुपसुद्धा आला होता.(अप्सरा......)
तर असो ...येथे या अरूंद पायवाटेच्या प्रत्येक वळणावर कॅमेरा क्लिक करण्याचा मोह आवरत नव्हता.
पुढे गडाच्या माथ्यावर आम्ही कुच केले.
गडाचे अस्तित्व जाणावणारे इतिहासाचे मुक साक्षिदार म्हणजे हे ढासलेले बुरुज..
पाण्याची टाके...
माणसाचे आकार भासवणारे हे सुळके म्हणजे गडाचे खास आकर्षण...
आता तर चांगलेच दाटुन आले.पुन्हा एकदा पावसाचा वर्षाव झाला.दुपारचे दिड वाजले होते.पण वातावरण एकदम झकास होते.सडकुन भुक लागली होती.येथेच या सुळक्याखाली आडोशाला बसुन आणलेली शिदोरी उघडली आणि पोटातल्या आगीला शमविले.
उन्हाळ्यात बोडके दिसणार्या या टेकड्यांनी हिरवा शालु पांघरला होता.
गडाच्या माथ्यावर हे एक छोट मंदिर दिसले.पण त्यातील मुर्ती तुटलेल्या अवस्थेत होती.देवाला नमस्कार करुन आम्ही परतीची वाट धरली.
गडाच्या खाली आम्ही या पठारावर आलो.येथे अजुन एक छोटे मंदिर दिसले.येथे आल्यानंतर पावसाने तुफान बॅटिंग चालु केली.जवळ-जवळ पंधरा मिनिट धो-धो बरसला.गडावर येण्याचे ध्येय सार्थक झाल्याचे वाटले.ट्रेकिंगला जे आले नाही ते या आनंदाला मुकले होते.
खरच या पावसात अनोखी झिंग असते नाही.आता गड उतरायला सुरुवात केली.पण पावसामुळे थोडे घसरायला होत होते.
उतरताना पाऊसाची सर मध्ये-मध्ये येत होतीच.त्यामुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता.दोन तासानंतर आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो.तेव्हा हे महाशय वाटेत भेटले.फोटो काढताना तो थोडा नाराज दिसला.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या तळ्याकाठी वेगवेगळ्या कोनात फोटो काढले.
भाताचे भारे लावणीसाठी घेऊन चाललेली हि बाई...
येताना तेथे एक ट्रॅक्टर दिसला.मग काय....त्याच्यावर आरुढ होऊन तीही होस भागवुन घेतली.
गावातील हि छोटी चिमुरडी पाणी घेऊन जाताना रोहनने कॅमेरामध्ये छान टिपली.
आता संध्याकाळचे साडे-पाच वाजले होते.पाचची एस.टी निघुन गेली होती.बराच वेळ गाडीसाठी थांबावे लागले.शेवटी सुदेवाने एक टेम्पो थांबला.टेम्पोत मागे बसलो आणि गाणी गुणगुणत वाड्याला पोहोचलो.मग तेथुन एस.टी ने ठाणे गाठले.
असा हा रोमांचकारी अनुभव....
पावसाळ्यात गड सर केल्याचा आनंद कायम स्मरणात राहील.
तस पावसाळ्यात भटकंती करायला सगळ्यांनाच आवडते.
भेटु या पुन्हा अशाच एका सफरीवर तोपर्यंत.......
उन्हाचा पारा चांगलाच
उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय.अंगाची लाही-लाही होतेय.म्हणुन हा पाण्याचा शिडकावा...मागच्या वर्षी पावसाळ्यात केलेल्या ट्रेकची सफर......कोहोज गड........
मस्त पावसाळी वातावरण नेहमी
मस्त पावसाळी वातावरण
नेहमी प्रमाणेच छान वर्णन.
धन्यवाद...अ के...
धन्यवाद...अ के...
सही रे... मस्त धम्माल केली
सही रे... मस्त धम्माल केली तुम्ही...
मस्त च रे ...धमाल...
मस्त च रे ...धमाल...
हि कोहोज गडाची
हि कोहोज गडाची विडिओ....
http://www.youtube.com/watch?v=rxI-X6lfLj8
अरे वा! हा नवीन गड कळाला.
अरे वा! हा नवीन गड कळाला. फोटो मस्त आलेत सगळे
मस्तच रे !!!
मस्तच रे !!!
मस्त गार गार वाटलं.
मस्त गार गार वाटलं.
जबरी ! फोटोही मस्त !
जबरी ! फोटोही मस्त !
धन्यवाद...आरती२१,धनुडी,शालिवा
धन्यवाद...आरती२१,धनुडी,शालिवाहन्,रंगासेठ.इंद्र.....
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.....पावसाळ्यात ट्रेकिंगचे उत्तम ठिकाण आहे.......कोहोज
सुन्दर ............फोटू बि
सुन्दर ............फोटू बि झाक.........
सुन्दर ............फोटू बि
सुन्दर ............फोटू बि झाक................
एकदम छान आणि झक्कास फोटो!!!
एकदम छान आणि झक्कास फोटो!!!
झक्क फोटोज.... हिरवेगार,
झक्क फोटोज.... हिरवेगार, धुकाळलेले, नटलेले डोंगर, जमीन....पाणी, पाऊस.... मस्त!
हिरवाइतले फोटो ... खरच
हिरवाइतले फोटो ... खरच मस्त....
धन्यवाद...दादाश्री,गणेश,अरुंध
धन्यवाद...दादाश्री,गणेश,अरुंधती,हरिश....
खुप खुप धन्यवाद.....