इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सदर घटना मला भारतीय लोकशाही च्या पुढील प्रवासात अत्यंत महत्वाची वाटते. म्हणुनच कानोकानी मध्ये दुवा देऊन सुद्धा मला ही बातमी माझ्या पानावर असायलाच हवे असे वाटले Happy

_____________________
इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी

सोर्सः http://www.esakal.com/esakal/20100609/5385281238549006040.htm

अहमदाबाद - राज्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकांत इंटरनेटद्वारे मतदान करण्यास परवानगी देणारी अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी काढली. राज्य निवडणूक आयोगाने हा "ई-वोटिंग'चा प्रस्ताव मांडला होता.

अहमदाबाद महापालिकेसाठी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार असून, बडोदा, सुरत, राजकोट, भावनगर व जामनगर या पाच महापालिकांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होईल.
राज्याच्या विधी विभागाने अनुमती दिल्यानंतर नगरविकास खात्याने आज ही अधिसूचना काढली. कॉम्प्युटर आणि मोबाईलसह अन्य सर्व उपकरणांच्या सहाय्याने इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करण्याची परवानगी या अधिसूचनेत देण्यात आली आहे. "ई-वोटिंग'करता "सर्व्हिस प्रोव्हायडर' नेमण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने याआधीच निविदा काढल्या आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करणाऱ्यांची ओळख बायोमेट्रिक कार्ड किंवा "रेटिनल स्कॅन'द्वारे करण्यात येईल. अशा प्रकारच्या मतदानासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना एक विशिष्ट क्रमांक व पासवर्ड देण्यात येईल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.

प्रकार: 

जय हो !!
एकदम क्रांतीकारी पाउल. बहुदा जगात पहिलेंदाच असे काही होत असेल. आता आपल्यासारख्या लोकांनाही पुढे मागे महाराष्ट्रात मतदान करण्याची सोय येईल.

टोणगा, सुकी,

तुम्ही अस नकारात्मक का बर पाहता या घटनेकडे ? आपल्यासारखे इंटरनेट प्रेमी बहुदा मतदानाबाबतीत जागरुक नसतात त्यामुळे पैसे वाटुन निवडणुका जिंकणार्‍यांच फावत. याला तरी आळा बसावा अशी अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे ?

चंपक,
चांगला विषय घेतला ...
धन्यवाद !
मोदींबाबत बोलायच म्हणाल तर एवढचं म्हणेन.....
वो एक है ..लेकिन पांच के बराबर है !
और क्या ..?
Lol

नितीन वोटिंग मशीन ने करा किंवा internetवरून , कितीसा फरक पडणार आहे राजकारणावर. इंटरनेटचा उपयोग हे राजकारणी कसा करत आहेत पाहीलं ना आपण ? अन इंटरनेट वरून कोण कोण अन कुठे कुठे मतदान होणार आहे हे सुद्धा पहायला पाहिजे ना ? आधी इंटरेनेटला अगदी झोपडीपर्यंत पोहचवा मग तुमचं मत मागा.

सुकि... इंटरनेट द्वारे मतदान ही एक पर्यायी व्यवस्था असावी... नेहमीच्या पद्धतीचे मतदान चालू असेलच.. आणि ते झोपडी पर्यंत पोहोचलेले आहेच...

जे बरेच लोक कामा निमित्त बाहेरच्या गावात आहेत त्यांना इंटरनेट वर मत देण्याची सोय नक्कीच फायदेशीर राहिल... मतदानाची टक्केवारी जर वाढली तर ह्याचा काहीतरी अनुकूल परिणाम झाला असे म्हणण्यास नक्कीच वाव राहिल..

सध्या पोस्टल बॅलेट पेपरची कर्मचार्‍याना सोय तशी ही असावी असे वाटते. त्यातले धोके सांगावेत काय?

आता इथे मोदींचे काय आले? आगदी तांत्रिक विषय चालू असला तरी तुमच्या राजकीय मतांचे प्रत्येक वेळी प्रदर्शन केलेच पाहिजे का/

खरच क्रांतीकारी पाउल....
योजना तर चांगलीच आहे आता अमंलबजावणी महत्वाची!

ही योजना यशस्वी झाली तर यंत्रणेवरचा ताणही अश्याने बराच कमी होईल.

जे बरेच लोक कामा निमित्त बाहेरच्या गावात आहेत त्यांना इंटरनेट वर मत देण्याची सोय नक्कीच फायदेशीर राहिल - अनुमोदन

पण डबल वोटिन्ग होनार नाहि याची काळजी कशी घेणार कळले नाहि. एक माणुस दोन्हिकडे बूथ मधे आणी इंटरनेट वरुन वोटिन्ग करु शकेल. इंटरनेट वरुन वोटिन्ग करनार्याची नावे बूथ मधिल लिस्ट मधुन कशी काधनार ? आणि गुप्त मतदान कसे राहिल यात (इंटरनेट वरुन )?

गुप्त मतदान राहात नाही त्यात. धोकादायक आहे ते. कर्मचार्‍यांचे मतदान देखील आता लोक कार्यकर्त्याना दाखवून करतात....:(

साहित्य सम्मेलनाच्या निवडणुकीत मतपत्रिका घरी पाठवली जाते आणि ती मत देऊन पोस्तात टाकावी लागते. बरेचसे साहित्यिक उमेदवार आणि त्यांचे चमचे स्वतःच्या डोळ्यादेखत मतदान करून घेतात आणि पोस्टात टाकतात. ही पडद्याआडची वस्तुस्थिती आहे. इन्टर्नेट्वरही तुमच्या मानेवर सुरी ठेवून मतदान करून घेतले जाणार नाही कशावरून? ती सुरी नोटेची असेल नाही तर खरी असेल ....

>>इन्टर्नेट्वरही तुमच्या मानेवर सुरी ठेवून मतदान करून घेतले जाणार नाही कशावरून? ती सुरी नोटेची असेल नाही तर खरी असेल ....

मित्रा, नोटेच आमिष म्हणशील तर तो धोका सगळीकडेच असणार... पण घराघरात जाउन लोकांच्या मानेवर खरी सुरी ठेवणे इतके सोपे नाहिये.... निदान महाराष्ट्रात तरी!

गुप्त मतदान मात्र फार आवश्यक!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6061326.cms

अर्ध्याहून अधिक तरुण लोकसंख्या असणाऱ्या या देशाचे धोरण ठरवणाऱ्यांमध्ये मात्र तरुणांचा चेहरा अभावानेच दिसतो. तरुणाईने या 'द मोस्ट हेटेड' गोष्टीची अॅलर्जी झटकली तरच पुढचं चित्र वेगळं असेल...