लग्नाला यायचं हं!!!!!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

खाली लिहिलेला मजकूर कुठल्या कॅटॅगरीत घालावा हा प्रश्ण मला आधी पडला होता. (जुन्या मायबोलीत हे पत्रिका प्रकरण मी आधीच लिहून चुकलेय. तीथे हा ताप नव्हता!) पण नव्या मायबोलीनं खास सोय केलीय. ह्या खर्‍याखुर्‍या लग्नपत्रिकांनी आमची बरीच 'करमणुक' केली म्हणून विषय : करमणुक! Happy ह्या आमंत्रणपत्रिकांचा आम्ही घेतला तसाच आपण देखिल 'आस्वाद' घ्यावा ही विनंती!!

नमुनेदार पत्रिका.. (अर्थात "लग्नाला याय्चं हं!!)-भाग १

'हिरवाकंच शालु लेवून...
गंधधुंद करणार्‍या निशिगंधाचा हार घेऊन...
अंतरपाटापलीकडे असेल 'ती' उभी! !
तीचे थरथरणारे ओठ.. अबोल!
फडफडणार्‍या पापण्या...

वरच्या ओळींत 'अंतरपाट' हा शब्द आल्यामुळे ही थरथर-फरफर लग्नाच्या वेळाची असावी हा अंदाज बरोबर!
नवरदेव हौशी कवी असल्यानं लग्नात सगळं कसं काव्यात्मक, तरीही शब्दांपलीकडलं हवं (म्हणजे नेमकं काय?) असा त्याचा आग्रह होता.
"पत्रिका मीच लिहिलिय वहिनी! वाचून बघा!"
"छानच हं!" (जास्त बोलले तर मला खीक करून हसु येईल याची भिती वाटली.)
बरं आता प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची मजा! शालुचा हिरवा रंग हा सासुचा चॉइस असल्यामुळे नवरीनी (अर्थातच) लाल शालु निवडला होता! अंतरपाटापलीकडे उभी राहून ती नको तीतकी बडबडंत होती!
"ताई, माझा शालु मागुन जरा नीट कर! परकर नाही नं दिसंत?" वगैरे वगैरे...! कसली अबोल डोंबलाची!
पत्रिकेतल्या प्रमाणे फक्त अंतरपाट आणि निशिगंधाचा हार येव्हड्या दोनच गोष्टी बरोबर होत्या.
निशिगंध अज्जीबात 'गंध धुंद' वगैरे करणारा नसला तरी स्वयंपाकघराच्या दिशेनी येणारा सकाळच्या न्याहारीच्या इडल्यांच्या मिश्रणाचा अंबुस वास मात्र आम्हाला सुसह्य झाला होता!

***
लग्नाला याय्चं हं-भाग २

आता हा पत्रिकेचा दुसरा नमुना!

"बारा वर्षांपूर्वीचा १ फेब्रुवारीचा दिवस! शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, दप्तरातून निसटलेली होम इकॉनॉमिक्सची माझी वही कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!" हे लाल शाईत छपलेलं होतं! (शंतनु हे नवरदेव).
"तीथेच माझी आणि 'उत्तरेची' पहिली नजरानजर झाली!" हे निळ्यात!
असली सटरफटर १०-१२ वाक्य आलटून पालटून लाल निळ्या शाईत लिहिली होती १२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता.
'लग्नाजोगं वय झालंय! इतकी वर्ष भटकलेत! नशीब धरसोड केली नाही!एकदाच्या ह्या दोन कार्ट्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुटलो!' असा विचार दोन्ही घरच्या शहाण्यासुरत्या मंडळींनी केला असावा. म्हणून लग्नाची तारीख, वेळ, स्थळ नीट लिहिलं होतं!
लग्नाच्या हॉलमधे, "आत्ता कळालं उतू, तुला बारावीला इतके प्रयत्न का लागले!" हे शेजारच्या काकुंनी तीच्या कानात कुजबुजायची काही गरज होती का?

***
लग्नाला याय्चं हं-भाग ३
ह्या पुढल्या पत्रिकेत वरमाय कवयित्री! पत्रिकेतला काही भाग येणेप्रमाणे..

सप्तपदीची सात पावलं
साताजन्मांच्या गाठी..
यायलाच हवं तुम्हाला
मंदार-अपर्णा साठी...
अपर्णा कन्या दातारांची
तीन भावंडात मोठी...
मंदारही घरात मोठा
आमची म्हातारपणची काठी...

असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी'
मंदारच्या बिचार्‍या वडलांना पत्रिका देताना संकोच होत असावा. आम्हाला हळूच म्हणाले,
"आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!"
लग्नात मंगलाष्टकं पण वरमायच्याच कृपेनी! त्यातही 'मंदार अमेरिकेत, न्यु यॉर्कला स्थाईक झालाय, अपर्णानी 'इंटिरिअर डिझाईनिंग'चा कोर्स केलाय हे सगळं कोंबलं होतं! पत्रिका आणि मंगलाष्टका हे काहीही म्हणा पण लग्नातले हायलाइट होते!

***
लग्नाला याय्चं हं-भाग ४
दूधवाल्या भय्याच्या लग्नाची पत्रिका आली. ..

"भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको..
हे मानसके राजहंस
तुम भूल न जाना आनेको!"

नो कमेंट्स!

विषय: 
प्रकार: 

थरथर-फरफर, मंगलाष्टकांत 'इंटिरिअर डिझाईनिंग' वगैरे महान आहे Happy आणि लग्नात नवर्‍याला आमंत्रणपत्रिका व बाकी सर्वांना प्रेमपत्रिका असा प्रकार दिसतोय.

दूधवाल्या भैय्याने राजहंसाला बोलवायचं म्हणजे आ बैल मुझे मार झालं ना? Proud

आयला सहीच.... तुम भुल न जाना आनेको.. हे जाम आवड्ल.:) अजुन पत्रिका येउद्यात...

-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे

Lol

बारावीला लागलेला वेळ ...............

हे वाचलं होतं जुन्या माबोवर... आणि तरीही Lol
>>> "आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!"
हे तर कहर Lol
>>> दूधवाल्या भैय्याने राजहंसाला बोलवायचं म्हणजे आ बैल मुझे मार झालं ना?
फारेंडा, उच्च होता ! क्लासिक Happy

    ***
    Has the LHC destroyed the world yet?
    (If you are not satisfied, please check out the source code.)

    खिक

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    मला वाटलं ते फडफड्णार आता उडेल की काय?
    Rofl

    १०-१२ वाक्य आलटून पालटून लाल निळ्या शाईत लिहिली होती १२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता.

    मृण्मयी, Rofl

    मी पण वाचलं होतं जुन्या मायबोलीत... आत्ता परत वाचूनही जाम हसायला आलं..

    अच्छा...जुन्या मायबोलीवर होत का हे लिखाण
    मला आपल उगीचच 'देजा वु' झाल्यासारख वाटल.
    बाकी दुसर्यांदा वाचतानाही हसु काही कमी झाल नाही!

    सीरीयसली! महान आहेत एकएक नमुने! Lol
    पुन्हा वाचायलाही मजा आली..
    धन्स मृण, इकडे टाकल्याबद्दल..
    -----------------------------------------------
    आली दिवाळी! Happy

    व्वा मस्तच, मजा आली वाचताना

    अस्साच एक पुलंनी लिहीलेला लेख आठवला
    "रसिकतेचा महपुर आणि मी एक पुरग्रस्त" नावाचा.

    सुधीर

    दूधवाल्या भैय्याने राजहंसाला बोलवायचं म्हणजे आ बैल मुझे मार झालं ना?<< क्या मारा बॉस!!! सॉल्लीड !!!!:)

    खरंच हौस माणसाला काय काय करायला लावते! असल्या अचरट पत्रिका जपून ठेवायला हव्या!

    ..............
    बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

    Lol पुन्हा एकदा हसुन लोटपोट Lol

    सही लिहीलयं.
    आधी जुन्या मायबोली वर वाचलेलं, आत्ता परत वाचताना पण छानं वाटलं.

    मृ.. सह्ही.. Happy
    -----
    शिरीष कणेकर सांगतात तो किस्सा ऐकलायस का?
    'विजयला पद्मश्री मिळाली...
    पद्मश्रीचा विजय झाला..' इ. मजकूराची पत्रिका Happy
    ------
    बाय दि वे... माझ्या लग्नात मी ही पत्रिकेवर कविता लिहिली होती Wink

    संदीप, टाकंच बघू ती स्पेशल कविता इथे. (मी संग्रही ठेवीन!) Happy
    ..............
    बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

    >>शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, दप्तरातून निसटलेली होम इकॉनॉमिक्सची माझी वही कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!"

    नशीब "शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, तोल सुटुन पडलेल्या मला कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!" असा काही लव्ह स्टोरीचा सीन झाला नाही...नाहीतर पत्रीकेला चार चांद लागले असते. आणि नवरीची देहयष्टी जाडजुड असेल तर १-२ डॉक्टरांची, हॉस्पीटलची नावसुद्धा आली असती पत्रीकेत. Rofl

    मला आता एक लहान मुलाच्या वाढदिवसाची पत्रिका आठवली. बोबड्या भाषेतला निबंधच होता तो. अन ती पत्रिका बहूतेक मम्मीने तयार केली असल्यामुळे पप्पांवर टोमणेच टोमणे होते- अर्थात बोबड्या भाषेत.
    पत्रिका वाचताना ३ वर्षांच्या मुलाला एवढा कसा बुवा सेंस ऑफ ह्युमर म्हणून मी नवल करीत होतो, तेवढ्यात त्या पप्पांनी अगदी वरचाच डॉयलॉग टाकला-आम्ही गेल्यावर वाचा, अशा अर्थाचा..!
    कधी एकदाचा वाढदिवस होऊन जातो असे झाले असेल त्या पप्पाला.. Proud
    काय काय पण हौस!!

    साजीर्‍या, Lol
    वाढदिवसाच्या आमंत्रणांच्या पण मज्जेच्या पत्रिका असतात. आम्ही न्यु यॉर्कला असताना एक वाढदिवसाचं कार्ड आलं. मुलं जुळी, एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणून थीम होती 'प्रिंसेस अँड पायरेट'!! अम्हा 'डचेस अँड ड्यूक्स' ना मांत्रण होतं. त्यात शेवटी लिहिलं होतं, "RSVP माझ्या क्वीन मदरला करा. पायरेट डॅड सेल फोन विसरून भटकतो!"
    ..............
    बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

    मृ Lol
    आजकाल सन्मान मुर्तीची, लहान मुलांची (वाढदिवस) अन बंगल्यांची (वास्तूशांती) छायाचित्रेही पत्रिकांवर असतात. फोटोखाली ज्या ओळी असतात त्या अचाट अन अगाध असतात. त्यात चंदनासारखी झीज, केवड्याचा सुगंध, पारिजातकाचा दरवळ, बार्बीची विनंती, बॅटमॅनची धमकी काय वाटेल ते असतं.
    वरून विचारतात, 'कशी झाली आहे पत्रिका?' म्हणून!!!!

    "RSVP माझ्या क्वीन मदरला करा. पायरेट डॅड सेल फोन विसरून भटकतो!" >>>> Lol

    बार्बीची विनंती, बॅटमॅनची धमकी काय वाटेल ते असतं >>>> Lol

    केवड्याचा सुगंध, पारिजातकाचा दरवळ, <<< हो हो, हे असलं मुख्यतः पंच्यात्तरीच्या आमंत्रणात असतं. भलेही म्हातारा (री) जन्मभर अत्यंत छळकुटा(टी) का असेना!

    बार्बीची विनंती, बॅटमॅनची धमकी एकवेळ परवडली. पण 'याय्च हं' चा लडीवाळ हट्ट डोक्यात जातो!
    ..............
    बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

    यायचंच हं- हे डोक्यात जातं खरं.
    एका वाढदिवसाच्या पत्रिकेत- 'तुम्हाला संडेला सुट्टी अन माझाही बड्डे तेव्हाच. कित्ती मज्जा ना?' असं लिहिलं होतं. तुझ्या नानाची टांग तुझ्या- वगैरे मनात शिव्या देऊन झाल्यावर एकच दिवस मिळणारी संडेची सुखाची झोप दवडून कसाबसा तयार झालो..

    मृण् मस्तच. आधी वाचलं होतंच. पण नवीन ऍडिशन्स पण भारी आहेत.
    >>भलेही म्हातारा (री) जन्मभर अत्यंत छळकुटा(टी) का असेना! Happy
    साजिरा
    >> 'तुम्हाला संडेला सुट्टी अन माझाही बड्डे तेव्हाच.
    >> बार्बीची विनंती, बॅटमॅनची धमकी
    अरे काय चाल्लंय काय Happy
    >>भैय्याने राज
    फारेंड Happy
    और ये लगा सिक्सर!!

    "आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं - पिंकी आणि विकी"

    हे अजुन एक चिड आणणारं वाक्यं..

    ज-ब-री!!
    मृण्मयी, ऑफिसात असताना वाचून खरंच वाssssट लागली गं हसू दाबताना.. तरीही
    असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी' >> ला खीक झालंच !! Lol

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
    Happy

    Pages