मी गाठलेली २१ किलोमीटरची अर्ध-मॅरेथॉन
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिनींनो, मी २१ किलोमीटरची अर्ध-मॅरेथॉन पुर्ण केली. मला माझा अनुभव.... माझ्या भावना इथे शब्दबद्ध करायची ईच्छा होत आहे अगदी स्वच्छंदीपणे...
---------------------------------------------------------------------------------
दोन महिन्यांपुर्वी आपले M.Tech. संपल्यानंतर काहीतरी वेगळे करु असा विचार करत असताना ऑफीसमधे Adidas Sundwon Marathon मधे भाग घेण्यासंबंधी एक मेल आली. मी लगेच माझे नाव दिले. त्यावेळी मी अगदी अभ्यास आणि काम आणि उपासमार यामधे झुंजत होतो. कुठलीच तयारी नसताना मी मॅरेथॉन मधे सामिल झालो. आदल्या दिवशी मी माझ्या सहकार्याला विचारले उद्याला सकाळी ९ वाजता आहे ना मॅरेथॉन तर तो म्हणाला नाही ही तर सनडाऊन आहे. मग नावावरुन मला बोध झाला. सुर्यास्तापासून सुर्योदयापर्यंत अनेक किलोमीटरच्या मॅरेथॉन होणार होत्या. मी काल सकाळी लवकर उठून योगा करुन आणि दोन्ही वेळेसच्या स्वैपाक बनवून आणि नंतर एक निवांत झोप काढून संध्याकाळी पाच वाजता पासिर रिस ला पोचलो. जिथे मॅरेथॉन होणार होती ती जागा खूप खूप लांब होती. तिथे जायला यायला बसेसची व्यवस्था केली होती. सगळे मार्ग इतर वाहनांसाठी बंद केले होते. ती रांग इतकी मोठी होती की माझा क्रमांक यायला १ तास लागला. पण लोकांची तयारी त्यांचा उत्साह पाहण्यात माझा वेळ भरकन गेला. मी तिथेच Adidas चे टी-शर्ट घातले. पायात नाईकीचे शूज चढविले. एक फोटो पण काढला. मैंदानावर पोचल्यानंतर तिथे लोकांची अगदी झुंबड होती. १० किलोमीटर मॅरेथॉन जी फक्त स्त्रियांसाठी होती ती संपायला देखील आली होती. पहिली येणारी मुलगी तिच्यासाठी लोकांचा जल्लोष सुरु होता. तो पाहून मनाची तयारी वाढली. तिथले वातावरण असे होते की एखाद्या व्यक्तीला पळायची सवय देखील नसेल ती व्यक्तीही पळायसाठी तयार होईल.
समोर विस्तीर्ण आकाश होते. पौर्णिमेचा केशरी चंद्र सरसर वर येत होता. चांगी विमानतळावरुन अनेक विमाने धावत होती. त्यांच्या पंखाचा आवाज पदोपदी येत होता. समोर शांत सागर. तिथे शर्यतीसाठी मुलेमुली सराव करत होती. मीही तिथे अश्विनी मुद्रा केली. असे म्हणतात ही मुद्रा केल्यानी आपण घोड्यासारखे वेगवान धावू शकतो. मी शक्य तेवढ्या वेळ ही मुद्रा करत राहिलो. इतक्यात ९ वाजायची वेळ झाली. मी आतमधे पहातो तो लोकांची रांगेत लागायची तयार होती. मी मधेच शिरून ६ वी रांग धरली. माझ्यामागे पळणार्यांची खच्चून गर्दी होती. १० मग ९ मग ८ मग ७ मग ६ मग ५ मग ४ मग ३ मग २ मग १ आणि मग नगारे सुरु झाले. आम्ही सर्व जलद गतीने पुढे पळण्यास तयार झालो. त्या नगार्यांचा आवाज इतका सुंदर होता की आपल्या आतमधील सर्व शक्ती तो आवाज ऐकून आपल्यात गोळा होते. मी कुठलाच सराव न करता थेट मॅरेथॉन मधे धावायला आलो होतो. मला खात्री देखील नव्हती की मी ५ किलोमीटर अंतर देखील पुर्ण करु शकेल. माझी मला कमालीची लाज वाटत होती.
मी जसे धावायला लागलो तसे कळायला लागले बरेच जण अगदी हळूहळूचं धावत आहेत. अगदी वेगानी असे कुणीच धावत नाही आहे. कारण पुढे २१ किलोमीटरचा रस्ता आहे. जर आत्ताचं सर्व शक्ती पणाला लावली तर लगेच दम येईल. अगदी तसेच झाले. मी सुरवतीला अगदी हरिणाच्या वेगानी धावत होतो. मग दम भरुन आला. चालण्याखेरीज गत्यंतर नव्हते. माझ्या मागचे माझ्या समोर धावत होते. मी दम खावून परत धावत होतो परत दमत होतो परत दम खात होतो परत धावत होतो. हेच कित्येक वेळी सुरु होते.
माझ्या सोबतीला कोरियन, चिनी, जर्मन, ब्रिटिश, मोरोक्को, बहुतेक सर्वचं देशातील मुलेमुली होती. सुरवातीला वाटले युरपकडची लोक एकदम पटपट धावतील. पण तसे झाले नाही. कित्येक युरपीअन अगदी माझ्याच वेगानी धावत होते. ५ किलोमीटर संपल्यानंतर यू-टर्न आला. असे वाटले अर्धे अंतर कापून झाले. पण समोर पहातो तर फक्त ५ किलोमीटर अंतर पुर्ण केले असे लिहिले होते. तिथे पाणी आणि १००-प्लस प्यायला देत होते. मी पहिल्यांदाच १०० प्लस पिऊन पाहिले. मला ते खूप आवडले. असे वाटले आपण लिंबू शरबत पित आहोत. मग जिथे जिथे १०० प्लस दिले जात होते तिथे तिथे मी ते प्यायलो. त्यानी माझ्यात बळ आले. मी आणखी आणाखी पळत सुटलो. मधेच कुठेतरी थांबून मी पश्चिमोत्तानासन आणि हलासन ही दोन आसने पण करत होतो. ती केलीत की पायात लगेच बळ येते. पायाचे दुखणे थांबते. तिथे कुणीच कुणाकडे बघत नव्हते. कुणीच कुणाला ठोसा देत नव्हते. मुलींच्या वेण्या इतक्या सुंदरपणे पेंडूलम क्लॉकसारख्या हलत होत्या की त्या बघताना गोड वाटत होते. माझा टी-शर्ट अगदी ओलाचिंब झाला होता. एक स्त्री उलटी पळत होती. मीही उलटे पळून पाहिले. छान वाटले. दमलो तरी पळता आले. मग मी एकदा सरळ रस्त्याच्या दिशेने पळायचो.. दम आला की रस्त्याकडे पाठ करुन पायानी उलट पळायचो. मजा वाटत होती. धावत पण होतो. अंतर पण कापत होते. काहीवेळानी लक्षात आले धावताना इकडे तिकडे पाहिले की आपली शक्ती जाते. फक्त खाली जोड्यांकडे पाहायचे किंवा समोर .... अगदी समोर. असे केले की बर्यापैकी वेग कायम राहतो.
१० किलोमीटर अंतर कापल्यांनंतर मला फक्त चालता येत होते इतकेच त्राण माझ्याकडे शिल्लक होते. स्वयंसेवक मुलेमुली you can do it sir.. go please .. run.. claps.. असे म्हणत आमचा जोष वाढवत होती आणि खरचं त्यांच्या चीअर्सचा तिथे खूप उपयोग होत होता. आणखी ११ किलोमीटर अंतर कापायचे आहे हे आठवूनचं पाय थांबायचे. जेंव्हा जेंव्हा यू-टर्न यायचा तेंव्हा आपल्या मागे किती जण आहेत याचा अंदाज यायचा. कारण यू-टर्न आला की तुम्ही तुमच्या मागे असलेल्या लोकांकडे सहज नजर फिरवू शकतात. अनेक वयाची मुलेमुली कासवाच्या गतीने धावत होती. जी कुणी जिंकणारी होती ती केंव्हाच पुढे गेली होती. पण इतक्या मोठ्य शर्यतीत एकही जण आढळला नाही जो झपझप धावत होता. उलट ज्यांनी आपली गती सारखी ठेवली होती पळायची आणि तीच पुढे जात होती.
अखेर २१ किलोमीटर अंतर जवळ आले. मैदान दिसायला लागले. कॉमेट्रीचा आवाज ऐकू यायला लागला. आपण जेथून सुरवात केली तेथे परत आलो ही भावना मन उचंबळवणारी होती. मी जसे आत मधे शिरलो तसे माझ्या ग़ळ्यात एक मेडल घालण्यात आले आणि hey you did it!!! म्हणून माझे अभिनंदन पण करण्यात आले. मला असे होणार होते याची कल्पना नव्हती. त्यामुळे अनपेक्षित आनंद प्राप्त झाला.
पहाटे ३ वाजता घरी पोचलो. घराचे कुलुप कसेबसे उघडले. दोन पायर्या चढून आतमधे यायला मला पाच मिनिटे लागली. मग खूप वेळ स्नान केले. पाटावर बसून मगनी पाणी डोक्यावर घेताना दंड दुखायचे. पाय आवळून देखील घेता येत नव्हते. आंघोळ करुन तरतरी आली. सकाळी बनवलेले जेवण नासले तर नाही ना पण नव्हते नासले. चांगलेच होते. आज पहाटे योगा करुन थोडे बरे वाटले. मग पॅनॅडॉलच्या दोन गोळ्या घेतल्या. आता चालता फिरता येते आहे. आजची सकाळ माझ्यासाठी अगदी वृद्ध सकाळ होती. मी भिंतीचा आधार घेऊन, घरातील टेबल खुर्च्यांना धरुनचं घरातील सर्व कामे पार पाडली.
इथे या http://results.hivelocity.com.sg/index.php संकेतस्थळावर तुम्ही ६९२० हा नंबर शोधून पाहिला तर माझे नाव आणि माझा क्रमांक दिसेल. मी 3935 पैकी 2119 आलो. २१ किलोमीटरची शर्यत मी २ तास ५७ मिनिटे आणि ११ सेकंदांमधे पुर्ण केली. आपण पहिले येणार ही अपेक्षा तर बाळगलीच नव्हती फक्त हीच एक भिती होती की मधेचं यू-टर्न घेऊन आपण मागे परत येऊ. पण तसे झाले नाही. कित्येक स्पर्धकांना मागे ठेवून मी पुढे आलो. मला फार फार आनंद होतो आहे की मी मॅरेथॉनमधे धावून माझ्या अनुभवाची श्रीमंती वाढवली. धन्यवाद!!!!!
मी प्राप्त केलेले पदक--
ही पदकाची मागची बाजू --
हा तुमच्या नावाचा कागद समोर टी-शर्टवर लावावा लागतो --
याला डी-टॅग म्हणतात. हा भाग तुमच्या जोड्याच्या लेसला लावावा लागतो. या टॅगच्या पाठिमागे एक चिप बसवलेली असते. ती चिप तुम्ही कुठून कुठे पळता? किती वाजता पळायला सुरवात करता? कुठला मार्ग अवलंबता सर्व सर्व काही साठवून ठेवले. वर मी जी लिंक दिली आहे. ती माहिती याच चिपमुळे मिळाली आहे.
ही पहा ती चिप -- चंदेरी रंगाची..
किती पुढे गेले आहे ना विज्ञान? या चिपमुळे कोण कुठे धावतो आहे.. किती जण अजून परत आलेले नाही.. कोण येत आहे .. कोण कुठे थांबला आहे.. कुणाला मदतीची गरज आहे.. सर्व सर्व काही कळते.
अभिनंदन बी, सराव नसताना इतके
अभिनंदन बी, सराव नसताना इतके चालणे धावणे खरेच कठिण होते.
सहीच रे बी.. फारशी तयारी
सहीच रे बी.. फारशी तयारी नसताना २१ किमी तेसुद्धा ३ तासाच्या आत पूर्ण केलेस.. हॅट्स ऑफ..
लै भारी
लै भारी
भारीच की!
भारीच की!
बी अभिनंदन तुझं. भाग घेतलास
बी अभिनंदन तुझं. भाग घेतलास आणि मॅरेथॉन पूर्ण केलीस हेच महत्त्वाचं.
बी, मस्तच. अभिनंदन. काहीही
बी, मस्तच. अभिनंदन. काहीही तयारी नसताना एकदम धावलास हेच महत्वाचं.
claps with loud victory
claps with loud victory whistels for B .... खरचं सुंदर वर्णन...
केल्याने होत आहे रे... तेव्हा केलेची पाहीजे अगदी मनापासून...
बापरे! तयारी नसताना इतका
बापरे! तयारी नसताना इतका पळालास!! कमाल आहे तुझी. आता नियमित सराव करत जा.
बी, मनःपूर्वक अभिनंदन!!
बी, मनःपूर्वक अभिनंदन!!
अभिनंदन बी वर्णनही मस्त.
अभिनंदन बी वर्णनही मस्त.
अभिनंदन यशवन्तच्या यशाबद्दल
अभिनंदन यशवन्तच्या यशाबद्दल अन इतक्या निगर्वीपणे एवढ्या मोठ्या यशाच्या वर्णनाबद्दल
तुझ्या योगाच्या सरावाचा फायदा
तुझ्या योगाच्या सरावाचा फायदा दिसतोय हा!
खूप अभिनंदन.. २१ किमी म्हणजे काय थोडे नाहीत!
भारीच...
भारीच...
अभिनंदन!
अभिनंदन!
एकदमच भारी... हार्दिक
एकदमच भारी... हार्दिक अभिनंदन..
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार.
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार.
अरे वा! अभिनंदन बी. खरच
अरे वा! अभिनंदन बी. खरच सराव न करता कसं काय पार पाडलस २१ किलोमिटर हे समजत नाही.
( रस्त्यात हलासन कसं काय केलस बुवा?)
अभिनंदन बी..
अभिनंदन बी..
आर्च रस्त्याच्या कडेकडेला
आर्च रस्त्याच्या कडेकडेला बरीच छान स्वच्छ जागा होती. सिंगापूर Green & Clean साठी प्रसिद्धचं आहे मग रस्त्याच्या कडेलाच आसने केलीत.
मनःपुर्वक अभिनंदन बी
मनःपुर्वक अभिनंदन बी
ग्रेट! अन मनःपुर्वक अभिनन्दन
ग्रेट! अन मनःपुर्वक अभिनन्दन छान लिहीलय!
[हा झब्बू नव्हे]
>>>>काहीवेळानी लक्षात आले धावताना इकडे तिकडे पाहिले की आपली शक्ती जाते. फक्त खाली जोड्यांकडे पाहायचे किंवा समोर .... अगदी समोर. <<<<
हे सगळ्यात महत्वाचे असते, अन तू ते नेमक्या शब्दात मान्डले आहेस, याचा मला अनुभव आहे
झाले असे की मी तेव्हा सातार्यात होतो साल असेल १९७८
पालिकेच्या स्टेडियमवर ब्याडमिन्टनचे शिबिर होते पन्धरा दिवसान्चे, कोच होते ठाण्याचे
आम्हा मुलामुलिन्चा सकाळी व्यायाम वगैरे करुन घेतला जायचा, पण व्हायचे काय? की मोकळे वारे मिळाल्यामुळे आम्ही दोनचारजण थोडा आगाऊपणाही करायचो, नेमके काय झाले ते आठवत नाही पण मला अन अजुन दोघान्ना शिक्षा मिळाली की ग्राऊण्डला दहा फेर्या मारायच्या, त्या देखिल कशा? तर पुर्ण कम्पाऊण्डला चिकटून! ट्रॅक ८०० मीटरचा तर कम्पाऊण्डकडेने एक किलोमीटर भरत होते अन्तर
शिक्षा ऐकल्यावरच बाकी दोघे हबकले अन गयावया करु लागले, मी ताठच होतो, मी काही विशेष गुन्हा केला नाहीये त्यामुळे शिक्षेबद्दल अपमान्/राग वगैरे काहीही जाणवत नव्हते, अर्थात मानसिक स्थिती सुस्थिर होती.
मी एरवीही भावाबरोबर याच मैदानावर पहाटे पळायला यायचो, भाउ सहज दहाबारा फेर्या मारायचा अन सातारच्या त्या नोव्हेम्बर डिसेम्बरच्या पहाटेच्या जीवघेण्या थन्डीतही त्यास घाम फुटुन सर्वान्गातुन वाफा निघताना दिसायच्या तेव्हाच दम्याने बेजार मी, ल्याम्ब्रेटा स्कुटरच्या पायट्यावर अन्गाची मुरगुशी करुन बसलेलो असायचो! असो.
तर मी स्वतःला बजावित होतो, उगाच वेग वाढवायचा नाही, मनात भलते सलते विचार येऊ द्यायचे नाहीत, किम्बहुना विचारान्वर ताबा मिळवायचा, दीर्घ श्वसन शक्य तेवढे करत दम खात पळायचे, विचार थाम्बवायचे, तर अर्थातच इकडे तिकडे न बघता केवळ स्वतःच्या पावलान्वर नजर केन्द्रीत करुन शरिराला आदेश देऊन यन्त्रवत पावले टाकू लागायचे, शरिराचा भार "मनोमन" पावलान्वरुन उचलुन धरायचा जसे काही देह हवेतुन अलगत तरन्गत जातोय असे वाटावे!
मधेच पहिल्या राऊण्डलाच कोच ओरडला की वेगात धाव, मी तत्काळ सान्गितले, दहा राऊण्डस ना हा आहे तोच वेग जास्त होतोय, मला दहा राऊण्ड पूर्ण करायच्यात
बाकी दोघे तिन चार राऊण्डनन्तरच गठाळले अन थाम्बले
पाचव्या सहाव्या राऊण्डला बाकी मुलेमुली मला आता थाम्ब पुरे कर म्हणू लागले
एक माणूस पळतोय अन बाकीजण नुस्ते बघत उभे (भले कोचने काही करायला सान्गितले तरी लक्ष कुठे होते कुणाचे? दोनतिन राऊण्ड पर्यन्त कोच त्यान्ना गुन्तवु शकला होता, पण बाकी दोघे थाम्बल्यावर माझे पुढे काय होते याची उत्सुकते पुढे कोचचे गुन्तवणे हतबल ठरले, अन सर्वजण कोन्डाळे करुन बघत राहिले.
आता वैतागायची पाळी कोचची होती, कुठून १० राऊण्ड्स ची शिक्षा सान्गितली असे झाले होते त्याला
कारण वेळ वाया जात होता, अन शिक्षेचा मुख्य उद्देश बाकीच्यान्ना जरब बसावी हा केव्हाच नष्ट होऊन प्रसन्गाच्या केन्द्रस्थानी ज्याला शिक्षा दिली तोच आकर्षणाचा केन्द्रबिन्दू ठरत होता.
मिथुन राशीमुळे व अन्य ग्रहयोगान्मुळे ज्योतिष न शिकताही मला ही गणिते तेव्हा झपझप उमजली होती व मी चेवाने पळतच राहिलो.
सात, आठ नऊ, आता जीव अगदी कण्ठाशी आलेला, घसा कोरडा पडलेला, श्वासावरील नियन्त्रण सुटत चाललेले, पायात, पोटर्यामान्ड्यात गोळे येऊ लागलेले, शरीर पाणी पाणी करीत आहे, घामाच्या धारा भुवईचा अडसर न जुमानता डोळ्यात शिरुन डोळे चुरचुरू लागले आहेत, ते मनगटाने पुसावे तर हातही घामाने ओलेचिम्ब.... अन शेवटी दहा राऊण्स पूर्ण झाल्या.
मी कोसळायच्या बेतात होतो, पण कोचने तत्काळ नजरेनेच खुण केली व मी तसाच काहीवेळ सन्थपणे जागेवरच जॉगिन्ग करत राहिलो.
बाकी सर्व मुलामुलीन्नी आरडाओरडाकरुन जल्लोष केला, कोचने देखिल मोठ्यामनाने अभिनन्दन केले.
शिक्षा का दिली, ते योग्य की अयोग्य, मी खरोखरच गुन्हा केला होता की नाही वगैरे बाबी बाजुलाच पडल्या.
माझ्यातिल एकचालकानुवर्तित्व मानण्याचा उपजत गुण चक्क शिक्षा भोगताना असा दृगोच्चर झाला होता, जो कोचच्या देखिल लक्षात आला होता, त्यानन्तर मात्र त्या ज्येष्ठ (वय ४५ वर्षे) कोचने मला अत्यन्त आदरानेच वागवले
वरील वाक्य वाचल्यावर मला हा जवळपास बत्तीस वर्षान्पुर्वीचा प्रसन्ग आठवला
हा कोच इतका भारि होता की ४५ वर्षाच्या या कोचने तेव्हान्च्या ३० वर्षिय डिस्ट्रिक्ट च्याम्पिअनला हरवले होते (पुणे मुम्बै वगळता अन्य जिल्ह्यात हा चमकला होता).
असो
तात्पर्य काय? तर एखादी कृती करायचे नक्की झाले, सक्तिने वा स्वइच्छेने, तरी मनाची एकाग्रता अत्यावश्यक. अनावश्यक विचार थाम्बवुनच मनाची एकाग्रता शक्य, अनावश्यक विचार थाम्बविण्यास इकडेतिकडे न बघणे, शक्यतो पन्चेद्रियान्चे काम थाम्बविणे वा त्यान्ना अन्य कामात गुन्तविणे गरजेचे.
बीच्या लेखामुळे मला वरील प्रसन्ग आठवला
हे असे म्यारेथॉन वगैरेचे लेख वाचले की अन्गात सुरसुरी दाटून येते, लहानपणापासूनची मॅरेथॉन मधे धावण्याची (नि जमल्यास शर्यत जिन्कण्याचिही ) इच्छा अजुनही अपुर्णच आहे! पण कधी ना कधी तरी ती पुरी करू असा विश्वास या लेखान्मुळे येतो हे नक्की! त्याबद्दल धन्यवाद
बी मन:पुर्वक अभिनंदन! २१ किमी
बी मन:पुर्वक अभिनंदन!
२१ किमी चालायचं/धावायचं असं फक्त म्हटल्यावरंच मला फेफरं आलं असतं.
गुड जॉब बी
गुड जॉब बी
अरे वा, Congratulations , बी
अरे वा,
Congratulations , बी !
हार्दिक अभिनंदन! मॅरॅथॉनच्या
हार्दिक अभिनंदन! मॅरॅथॉनच्या अनुभवाचं वर्णनही मस्त.
मस्त रे बी..
मस्त रे बी..
अभिनंदन बी. वे टु गो.
अभिनंदन बी. वे टु गो.
बी, लय भारी... अभिनंदन... आता
बी, लय भारी... अभिनंदन...
आता रोज पळायला जात जा... पुढच्या वेळी न थांबता पुर्ण करा... running सारखं दुसरं सुख नाही ह्या जगात... just keep running...
Games require skill. Running requires endurance, character, pride, physical strength, and mental toughness. Running is a test, not a game. A test of faith, belief, will, and trust in ones self. So hardcore that it needs a category all to itself to define the pain. When game players criticize, it’s because they aren’t willing to understand, not because they’re stronger. Running is more than a sport; it’s a lifestyle. If you have to ask us why we run, you’ll never understand, so just accept. – Jessica Propst
मस्तच ! हार्दिक अभिनंदन बी!
मस्तच ! हार्दिक अभिनंदन बी!
अभिनंदन बी! २१ किमी धावलास...
अभिनंदन बी! २१ किमी धावलास... सहिच
Pages