युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पनीर.

नासलेल्या दूधाचं पातेलं गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा. त्याचं पाणी वेगळं ऑलरेडी झालेलं असेल. ते पाणी उकळलं की त्यात लिंबू पिळा आणि अजून एक उकळी आली की गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या. जे उरेल वर, ते पनीर. हे पनीर नेहेमीप्रमाणे विकतचं पनीर जसं, ज्या पदार्थात वापरतो तसं वापरा.

अवांतर- (मी) घरी केलेलं पनीर विकतच्यासारखं घट्ट होत नाही, थोडं मऊ रहातं.

पनीरबद्दल मी सविस्तर लिहिलेय. पण पनीर करुन वापरण्यापूर्वी दूध कश्याने नासलेय ते अवश्य बघा. एखादा किटक वगैरे पडला नाही ना, त्याची खात्री करुन घ्या.
छाना कपड्यात बांधून, त्यावर पाण्याने भरलेले मोठे भांडे ठेवले तर सर्व पानी निघून जाऊन, घट्ट पनीर होते. बाजारी पनीर, असेच म्हणजे दाब देऊन केलेले असते.

आमच्याकडे दुधाच्या पातेल्यात हळूच कोण कोण जाऊन बसतं Proud म्हणजे दूध संपले की तळाशी उरणारा जो सायीचा साका असतो त्यात साखर घालून पातेले चाटून पुसून साफ करण्यात सर्वांचा अव्वल नंबर!
नासलेल्या दुधाच्या पाण्यात कणीक भिजवली तर पोळ्या जास्त मऊ होतात म्हणे! (बरोबरच आहे - स्निग्धांश जास्त असणार!) आणि त्या पाण्याचा उपयोग सौंदर्यवर्धक म्हणून त्वचा मऊसूत करण्यासाठीही केला जातो असे कोठेतरी वाचले आहे!

रोजच्या खाण्यात ओट्स असणे चांगले. चपातीत नक्कीच मिसळता येतील. तोफूचा मात्र स्वाद आवडला पाहिजे. काहि जणाना तो आवडत नाही. साधारणपणे तोफूच्या पनीरप्रमाणेच पाकक्रुति करता येतात. भूर्जी वगैरे चांगली होते.

धन्यवाद दिनेशदा....
तोफू मी रोज पोळ्या करताना वापरते. फक्त ओट्स बरोबर चालेल का ते माहित नव्हते.
लहान मुलांना पण चालेल ना रोज खाल्ले तर?

हो चालेल, पण लहान मुलाना शक्यतो एकच प्रकार रोज देऊ नये, त्याना कंटाळा येतो, आणि परत कधीच खात नाहीत. ओट्स च्या बर्‍याच पाककृति आहेत इथे.

मी दोन दिवसांपूर्वी डोश्याचं पीठ केलं.....आता ते खूपच आंबट झालंय...काय करता येईल? >
त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची असं घालून उत्तप्पा बनवा म्हणजे इतर पदार्थांच्या addition मुळे इतकं आंबट नाही लागणार.

आप्पे पात्र असेल तर वरील सर्व घालून आप्पे बनवा खरपूस sssssss Happy

मुग्धा, फक्त मीठ घालून जाड आणि खरपूस उत्तपे काढ. हे झणझणीत लोणच्याबरोबर मस्त लागतात. दोन्ही बाजु खरपूस व्हायला हव्या मात्र. याचे नाव दिब्बारोट्टी.

ग्रील करायची म्हणून कांदा कापून त्याला मारीनेत केला .. पावूस आला .. मग काय ३-४ दिवस झाले खपवते आहे ..बाकी भाज्या कशात कशात टाकून संपवल्या.. कांद्यचा काय करू .. लाल कांदा आहे ..

खून धन्स वरदा, अमृता, रजनी .. भजी नाही म्हणत म्हणत केलीच मी .. इतकी मस्त चव आली होती .. मुलां साठी म्हणून केली खरी . पण खेकडा भजी ती .. त्यांना म्हणजे कुठे तरी २-३ कांदे लागलेले चालतात नुसते कांदा भजी .. मग काय त्यांच्या नावाने मी आणि नवर्याने गट्टम केले Happy .. काळ नेमका राजमा टाकून ठेवला होता .. त्याला मस्त म्यारीनेत केलेले काद्न्यचा मसाला केला .. पास्ता आज केला ... पण सकाळी बेक करायला वेळ नव्हता म्हणून बारीक कापून आणि उरलेल्या भाज्या पण अगदी बारीक कापून पास्ता सौस मध्ये गुडूप होतील अशा करून टाकल्या आणि एकदाच सगळं संपलं

बार्बेक्यू स्टँड आहे पण त्यावर वेज काय काय आणि कसे करायचे? उद्या आम्ही ५-६ जण मिळून त्यावर काहीतरी करावं म्हणतोय...सगळे शाकाहारी आहेत...सुचवा ना...

छोटे बटाटे, रताळ्याचे तूकडे, कच्ची केळी, मक्याची कणसे, भाजता येतील. हौस आणि वेळ असेल, तर दालबाटी करता येईल.
काही फळे, जसे अननस, स्टारफ्रूट, प्लांटेन भाजून खाता येतात.
व्हेज कबाब, नान, कुलचे करता येतील.
हिरव्या ओल्या मिरच्या आणि लसूण भाजून, त्याची चटणी करता येईल. त्यात तेल किवा दही घालून खाता येते.
वरच्या भाज्या, अश्या मुरवणात भिजवूनही भाजता येतील, बटाटे अख्खे फॉईलमधे गुंडाळून भाजून, त्यावर चीज वगैरे टाकून खाता येईल, काहि प्रकारची चीज भाजता येतात.
काही ब्रेडही भाजता येतात.
मातीचे मडके मिळण्यासारखे असेल, तर घडाभाजी करता येईल.
सर्व कडघान्ये भिजवून मडक्यात भाजून हुरडा करता येईल.

Pages