Submitted by sas on 12 September, 2008 - 22:04
मदत हवी आहे:
मला CA to NY move करायच आहे, सामान move कस करायच हा प्रश्न आहे, कुणी मदत करेल काय please?
Rent ची गाडी करुन त्यात सामन नेण, याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का सामान move करण्याचा?
कार 'टो' चा खर्च, सामान move करण्या साठी Rent Truck चा खर्च आणी इतक लांब Truck Driving करण्यापेक्षा, कार मध्ये थोड फार सामान टाकुन कार Drive करायची आणी मोठ-जड सामान (Bed, Dinning Table, Futon, Microwave, Bike (Cycle), TV etc दुसर्या एखाद्या मार्गे move करायच हे शक्य आहे का?
माझ जड सामान तस मोजकच आहे (वरची यादि) around $1300 किमतिच, हे सामान garbage मध्ये टाकुन इतर सामान कार मध्ये घेवुन Drive करण योग्य की सामान move करण? pls. suggest
मायबोलि वर हे लिखाण कुठे post कराव हे न सुचल्याने इथे post केल...Sorry
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रोफेशनल
प्रोफेशनल मूव्हर्सना टाळायचं आहे कां?
CA to NY drive
CA to NY drive करणार???? (दचकलेली बाहूली)
कार ट्रक मधून मुव्हकरून त्यात थोडं फार सामान टाकता येईल.. ते खूप सोईचं पडतं..
फर्निचर वगैरे (बेड, सोफा, डाइनिंग टेबल) जर फार महागाचं नसेल आणि त्यात जिव गुंतलेला नसेल तर माझ्यामते CA त विकून NY मधे दुसरं घ्यावं फक्त ह्या मधे सुरुवातिच्या दिवसांमधे गैरसोय होते..
बाकीचं सामान खोक्यांमधे पॅक करून UPS किंवा USPS ने पण मुव्ह करता येतं..
पण बेस्ट उपाय म्हणजे प्रोफेशनल मूव्हर्स... काहीही बघावं लागतं नाही आपल्याला.. फक्त थोडे पैसे जातात..
ऍडमला
ऍडमला अनुमोदन. माझ्या एका मैत्रिणीने असेच स्थलांतर () केले होते. सर्व शक्यता पडताळुन पहिल्यावर हा सगळ्यात सोपा, त्यातल्या त्यात कमी खर्चाचा मार्ग आहे असे अनुमान काढले होते. कार move करणार्या कंपनीने काही wt limit दिले होते. त्याप्रमाणे TV, DVD player etc. कारमधुन. पुस्तके इ सामान पोस्टाने. आणि कपडे, काही नाजुक सामान बरोबर बॅगमधे असे नेता येईल.
एडीएम चे
एडीएम चे पटले.
मात्र मूव्हर्स करून त्यांना स्वत:चे पैसे देणार असाल तर १३०० च्या सामानासाठी कदाचीत ३००० (हा फक्त अंदाज) पण मागतील, जे फार महाग आहे. कार चे अजून वेगळेच मागतात. स्वानुभव. म्हणून जड सामान इथे विकावे आणि तिथे नवीन जड सामान घेणे उत्तम.
तो मोठा ट्रक भाड्याने घेऊन जायचे असेल तर गॅलन ला १० पेक्षा कमी माईल्स देतो असे ऐकले आहे मी, तेव्हा त्यावर जरा माहिती काढा (म्हणजे कार त्याला मागे बांधून, तसेच एका वेळी इतके २-३ हजार माईल्स लांब जाता येणार नाही म्हणुन २-४ रात्री कुठे कुठे थांबावे लागेल असा खर्च, शिवाय गॅस.. अबबब.. ). हे सर्व पुन्हा सामानाच्या किमतीपेक्षा जास्त होऊ शकते. म्हणून कार (थोडे सामान त्यात टाकून) पाठवणे आणि जरूर तितके सामान घेऊन, हवे तर जास्त बॅग चे पैसे भरून विमानाने जाणे असा पण विचार करु शकता.
आमच्या CA to NY
आमच्या CA to NY moving ची 1st Phase
काल रात्री नवरा at 9:45 PST, NY च्या Flight ने निघाला, आज at 6:00 AM EST ला JFK ला पोहचला. इथे 6 तास थांबुन पुढची Albany ची Flight घेतली. at 1:30 PM EST, Albany ला पोहचल्या वर Baggage Missing.
Delta Airline च्या Employees ला SFO वर विचारल, JFK वर (३ जणांना) Baggage बाबत विचारल तर एकच उत्तर "you dont need to claim for Baggage here at JFK u will get it at Albany".... Albany चे Employee, "U should hv claim your bagage at JFK"
नवरा दुसर्या 4:30 PM Flight सोबत bag येईल ह्या आशेने Airport वर थांबला तर Flight LATE
उद्या Interview and 1st Day of Job आणी घालायला कपडे नाहीत!!!! सार सार सामान ह्या bag मधे.
नविन कपडे घ्यायचे तर नविन जागी कुठे काय माहित नाही आणी आताच्या Flight ने bag नाही आली तर...???
आज रवीवार Malls ६ ला बंद होतात. ................................:(
वाईट वाटले
वाईट वाटले वाचून. एकदम भारतात गेल्यासारखे वाटले असेल!
बॅगेज जर डायरेक्ट अल्बानिपर्यंत चेक इन केले असेल तर तक्रार अल्बानिलाच करायची असते. ते लोक बनवतात, देशी म्हणून. एअरलाईन वर फिर्याद करा!
बाकी इन्टर्व्ह्यू कसा झाला?
तुम्ही मिळाला तर जॅक लेमन चा एक सिनेमा पहा (नाव आठवले की सांगेन) तो न्यू यॉर्कला जाताना त्याचे असेच हाल होतात. पण तो तसाच, मळके कपडे, दाढी वाढलेली अश्या अवस्थेत मुलाखतीला जातो नि सांगतो, की तुमचे गाव बेक्कार आहे, खड्ड्यात गेली तुमची नोकरी! माझ्या परतीच्या प्रवासाचे पैसे द्या, कारण काल रात्री माझे पाकिट मारले!
सिनेमा असल्याने शेवट गोड झाला. शिवाय तो जॅक लेमन असल्याने त्याला नोकरी पण दिली, नि भरपाई पण केली.
तसे मुलाखतीला ठरल्या वेळी जाता आले नाही, तरी आधी फोन करून सांगितले, खरी कारणे सांगितली तर ते दुसरी संधी नक्की देतात! (जातील कुठे? अमेरिकनांना थोडीच तुमच्या पतिदेवांइतकी अक्कल आहे?)
Good Luck.
sas, सामान
sas, सामान मिळाले का ?
ह्या वेळेस हे होउन गेले पण सहसा एक लहान बॅग आपल्या बरोबर ठेवायची ज्यात १ दिवसाच्या वास्तव्यात जरुरी पडतील अशा काही वस्तु ठेवाव्यात जसे की एक कपड्यांचा सेट. भारतात जाताना मी बहिणीला आधीच माझ्या मापाचा ड्रेस वगैरे वर काढुन ठेवायला सांगते शिवाय माझ्याकडे एक सेट असतोच, न जाणो कुठे emergency landing करावे लागले तर असावा. मी जरा अतीच करते असे म्हणून मला नवर्यासह सर्वजण हसतात पण तरीसुद्धा प्रत्येक भारतवारीत माझी ही तयारी असतेच
झक्की, भारतात प्रत्येकवेळी असा अनुभव येतोच असे नाही. माझ्या मागच्या ट्रिपमधे दुसर्याच कोणाची बॅग माझ्या सामानात आली. विमान कंपनीच्या विमानतळावरील ऑफिसमधे फोन केल्यावर त्यांनी लगेच हवी ती माहिती दिली. तिथे गेल्यावर lost baggage जिथे असते तिथपर्यंत कंपनीचा माणूस आवश्यक कागदपत्र घेऊन माझ्याबरोबर आला. अर्ध्या तासात बॅग ताब्यात मिळवुन दिली.
सास,
सास, माझ्या नवर्याचे देखिल असेच झाले होते. सामान एअरपोर्ट वरच राहिले. तो पण ईंटरव्ह्युला जात होता. पण त्याने कंपनिच्या लोकांना खर कारण सांगितल आणि जीन्स आणि टि शर्ट वर ईंटरव्ह्यु दिला. तसे हे लोक कन्सिडर करतात.
अखेर परवा
अखेर परवा रात्री सामान मिळाले , नवरा रविवारी ४-६ तास Airport वर होता पण सामान आही आले नाही...मग
तिथे विचारपुस करुन नवरोबा Wal-Mart ला गेला व कपडे घेतले. Interview झाला Join हि केल आता जर नवर्याचा Performance आवडला त्याच्या साहेबांना आवडला तर एक एक महिना Project Extension .
पण Delta Airline चा अनुभव फारच त्रासदायक, Customer Care ला जेव्हा जेव्हा phone केला प्रत्येक वेळी १५min वर Hold यावर "I am Sorry", "I have send your details to Albany Airport", Sorry I cant help you more than this" याशिवाय काहीच उत्तर नाही.
रविवार सोमवार मंगळवार ३ दिवस फोन करुन करुन खुप वैताग सोसल्यावर अखेर Bag आली. नेमकी ह्याच वेळि Cabin Bag मध्ये extra कपड्यांची जोडी व दुसर सामान ठेवल नव्ह्त.
खरच मलाही वाटत "देशी" लोकांना इथे बरेच लोक फसवतात तेही त्रास देऊन फसवतात.
तुमच्या प्रतिक्रियां बद्द्ल आभार.
नवर्याला
नवर्याला Bag मिळाली त्याच routine तिथे थोडफार सुरळीत होतय पण इथे माझी वाट लागली आहे. २.५ वर्षात काय (काय काय) सामान जमा झालय?????!!!!...सामान Bags मध्ये, कार मध्ये ठेवता ठेवता मी तर जाम वैतागले आहे.
पुढच्या १० ला Apt खाली करायचिय, अजुन वेळ असला तरी सामान , कपडे ई. चा गराडा बघुन मला तर धास्तिच भरलीय माझ्याने एकटिने हे सार कस व्हणार.!!!!! :अओ:...नवरा घ्यायला आला की काही तासात आम्हाला निघाव लागणार जवळ जवळ ४ दिवसांच Driving आहे about 3000 Miles आता आम्ही Drive करुन का जाणार ही कथा मी पुढ्च्या Post मध्ये टाकणारच आहे. गेल्या २ वर्षांपासुन मला जे काही इथे लिहायचय आज ते मी लिहणार
(Mod, Admin Thanks 'अमेरीकेतील आयुष्य' हे खुप छान नाव ह्या विषयाला (Group) ला दिल्या बद्द्ल...मला कधिपासुन माझ अमेरिकेतल आयुष्य इथे लिहायच होत.) असो ..
त्या आधी मी FedEX Grd Shipping ची माहिती काढ्ली पण काही निटसे Detail समजले नाहीत. कुणाला माहिती असेल तर Please सांगा 50-100 Pounds Grd Shipping चा खर्च साधारण/कमितकमी कीती येईल? CA to NY, near about 3300 Miles. कोणत सामान Shipping ने पाठवाव? कपडे की ईतर काही?
Is USPS or UPS better than FedEX?
सास, मागच्य
सास,
मागच्या वर्षी जेव्हा मी डीसीला शिफ्ट झाले तेव्हा मी चौकशी केली होती, मला UPS ground हा त्यातल्या त्यात स्वस्त पर्याय सापडला होता. माझ्याकडे फर्निचर वगैरे प्रकार नव्हता पाठवायचा. फक्त घरातली भांडी-कुंडी, कपडे, उशा/चादरी/रजया, पुस्तकं, शोभेच्या वस्तू अस सगळं पाठवायच होत.
सामान व्यवस्थित आले, काहीही तोडफोड झाली नाही.
त्यांच्या साइट वर जावुन दर बघ किंवा त्यांच्या ऑफीस मधे गेले तरी ते नीट माहिती सांगतात. मला आठवतय मी त्यांचे दर बघुन, साधारण २२-२५ किलोच्या आसपास एक बॉक्स असे सगळे बॉक्सेस तयार केले होते.
Thanks Runi Boxes UPS/FedEx
Thanks Runi
Boxes UPS/FedEx मधुनच घ्यावे की दुसरी कडुन? माझ्या कडे १-२ खोके आहेत ते वापरले तर? की Shipping वाल्यांचे Box च दनकट असतात.? मला काही जण FedEX स्वस्त आहे अस म्हणाले.
सास मी तर
सास मी तर साधेच बॉक्सेस वापरले होते, घरी असतात ना पॅकींगचे आलेले ते, फक्त काचेच्या काही वस्तुंसाठी १-२ दणकट बॉक्स आणि बबल रॅप आणले होते विकत. कुठल्याही स्टोअर मध्ये (वॉलमार्ट, जायंट, टार्गेट, होल फुड्स) विचारले तरी ते बॉक्स देतात त्यांच्याकडे असलेले असा माझा अनुभव आहे. FedEx बद्दल मला आताचे rates माहीत नाही.
आत्तापसुनच बॉक्सेस गोळा करायला सुरुवात कर.
Good luck for packing.
Thanks Runi कालच
Thanks Runi
कालच एक box ship केला, FedEX and UPS दोन्ही दुकाणात Box नेला व किति rate होईल विचारल. UPS, FedEX पेक्शा महाग आहे. जवळ जवळ $8 चा फरक पडला rate मध्ये. जर बरच सामान Ship करायच असेल तर FedEx is Cheaper than UPS
Moving करतांना सामान Pack करण हे खरच महा भयंकर काम आहे. मला जाम वैताग आलाय आणी त्रागा होतोय. अश्या कामात एकट असल की जास्तच वैताग येतो. कुठे काय ठेवु आणी काय कस Pack करु सुचतच नाही. २ तासां पासुन सामानावर नुसते डोळे भिर भिरवतेय पण काहीच सुचत नाही आहे. पाठ-हात-पाय सगळ कामातुन गेलय सामानाची उठा-पठक करुन.
सास,
सास, ग्रोसरी स्टोअर्सना सांगितल तर ते बॉक्सेस तुमच्यासाठी ठेवतात जे तुला पाठवता येतील. पैसे द्यावे लागत नाहीत त्या बॉक्सेसंना
असंग्रह हा
असंग्रह हा उत्तम उपाय सांगितलाय गांधीजींनी सास ह्यावर आपण बरेचदा आपल्या गरजा वाढवून बसतो हे खरच आहे. इतके वेळा मूव्ह केलय इथे, बॅचलर असताना, फॅमिली च सामान हलवताना किती त्रास होत असेल कल्पना आली. बेस्ट ऑफ लक..
असंग्रह हा
असंग्रह हा उत्तम उपाय सांगितलाय गांधीजींनी एकदम बरोबर पण "मोह आवरत नाही ना"
Moving, Packing ची धावपळ त्यात craigslist.org वर Bike for Sale Ad दिली आणी मी Fraud च्या जाळ्यात फसता फसता वाचले. सकाळ पासुन हे प्रकरण निस्तरण्यात वेळ गेला.
***Friends Be Very Very Careful While Posting Buy/Sell Ads on craigslist.org even Jobs are Fraud on craigslist.org many times***
सास, ऑनलाइन
सास,
ऑनलाइन असे काही करायचे म्हणजे त्यात घोटाळे करणारे आलेच कुठलीही साईट असली तरी. आपण त्यात फसत नाहीत ना ही काळजी सदैव घेतलेली बरी. मी माझे सगळे फर्निचर विकले होते क्रेगलिस्ट वर. मला काही अनुभव नाही आला. मी सुदैवी ठरले त्या बाबतीत.
व्यवहार करतांना पैसे देणे-घेणे फक्त रोख करायचे, चेक, क्रेडीट कार्ड असे प्रकार अजिबात नाही करायचे. तसेच पोस्टाने कुठली वस्तु पाठवायला नकार दे. विकत घेणार्यांना ती वस्तु येवुन घेउन जायला सांग.
वस्तु
वस्तु घ्यायला घरी आले तरी शक्यतो leasing office/reception area मधे बोलवावे. तु एकटी आहेस म्हणून सांगते.
गूगलवर 'freight
गूगलवर 'freight shipping' सर्च करा. आम्ही देखिल आमचे सामान fright shipping through आनलेले. सगल्यात स्वस्त आणी ४-५ दिवसत घरपोच!
runi, cindrella तुमच
runi, cindrella तुमच बरोबर आहे. मी एकटी रहाते आहे हे लक्षात ठेवुनच मी फक्त 'सुलेखावर' Moving Sale ची Ad दिली. आपले देसी बांधव शक्यतो सहकुटुंब येतात तेव्हा काही भीती नसते. सायकल ची Ad तेवढी मी craigslist वर दिली. खुप reply आले पण सारे फेक... असो. माझ बरच सामान विकल गेलय. उरलेल नाही गेल तरी हरकत नाही अस वाटतय. ४ Shipmets ही झाल्या (२ Boxes व 2 Bags). :)........पण पसारा काही कमी होत नाही
काल 46 lb ची
काल 46 lb ची एक Bag, FedEx पर्यंत ओढत नेली, परवा 60 lb ची Bag ओढत नेलेली (ह्या Bag चा तुटलेला दांडा जमीनीवर घासला जात होता आणी Bag ला चाक असुन Bag पुढे ओढण खुपच कठीण होत होत पण कशि बशि एकदाची (२ वेळा रस्ता Cross करुन) Bag FedEx पर्यंत नेली.
ह्या आधी एक Box, Ship केला (45 lb) चा. Box ला धरणार कस?? मग......जवळच्या एका दुकाणाची Shopping Cart Apartment च्या बाहेर पडली होती, ती Cart आत आणली त्यात 45 lb चा Box ठेवला (कसा बसा...१/२ तास प्रयत्न करुन मग, बाजुच्या एका Apt. मध्ये काम करणार्या service man ची मदत घेवुन) आणी cart, FedEx पर्यंत ढकलत नेली. ...काश मुझे Driving आती ...पण Driving येत नसली तरी काही नडल नाही जरा (जरा नाही तसा बराच) त्रास झाला इतकच.
पहीला Box, Ship केला तेव्हा शेजारच्या काकुंनी स्व:ताहुन मदत केली. पण सारख कुणाला त्रास कशाला म्हणुन शक्यतो कुणाची मदत न घेता काम करायची अस ठरवलय. एक बरय FedEx 1 mile वर आहे. तरिही ओझ वाहुन नेल्याने हात पाय पाठ दुखतात.
Oct 2007 पासुन
Oct 2007 पासुन म्हणजे जवळ जवळ १ वर्षा पासुन Job साठी प्रतत्न करतेय पण यश नाही. हजारो ठिकाणी really हजारो ठिकाणी Application दिली, Resume पाठवले, 4-5 ठिकाणी Written Exams दिल्या...पासही झाले पण गाडी बस इथ पर्यंतच. एक interview तो मिळाला ज्यात last च्या ३ sorted candidates मध्ये होते पण select नाही झाले. आता move होतोय म्हणुन इथला job Search बंद केला तर...
तिन महिन्यांन पुर्वी Accounting Clerk साठी एके ठिकाणी Written Exam दिली होती, त्यात पास ही झाले पण काही कारणास्त्व
Company interview Shedule करु शकत नव्हती.... बुधवारी 24 September 08 ला Call आला Can you come for interview??
दुसर्या एका job साठी जवळ जवळ ५ महिन्यांपुर्वी Apply केलेल आज सकाळी तिथल्या HR चा Call, we have sheduled an interview for u on 2nd Oct at 3 PM!!!!!!!!!!!!!!!
संध्याकाळी आणखी एक Call जिथे ही काही महिन्यां पुर्वी Apply केलेल.
Life is sooooo unfair, माझ्या job च अगदी लहानश्या job च ही एथे काही जमल असत तर नवर्याने आणखी काही दिवस इथेच project शोधण्याचा प्रयत्न केला असता. वा मला तरी निदान ३-४ महिन्यांचा Job Experience मिळाला असता जो NY मध्ये कामी आला असता...:(
अग सास
अग सास इतकं निराश होऊन कसं चालेल?
इतकं लक्षात ठेव....
चेंज इज द ओन्ली थिंग परमनंट इन लाइफ.
चेंज इज ऑल्वेज फॉर गुड.
मी गेल्या दहा वर्षात फ्लोरीडा-कूपरटीनो-फ्लोरीडा-सनीव्हेल्-सॅक्रामेंटो-सीऍटल्-ऑस्ट्रेलिया-इंडिया-ऑस्ट्रेलिया अशी मुव्हिन्ग्स केलीत. त्यात मागच्या वर्षी परत नवीन घरात मुव्ह झालो.
त्यात दोन पाठोपाठच्या मुलांची पण भर पडली.
प्रत्ये़क ठीकाणी खूप चांगल्या गोष्टी बघायला आणि शिकायला मिळतात, नवीन मैत्रिणी मिळतात, वेगळा निसर्ग असतो. कुणास ठाऊक, तुला नवीन जागी तुझ्या मनासारखा जॉब मिळेल. छान मैत्रीणी पण मिळतील. बी पॉझिटिव्ह.
बी
बी पॉझिटिव्ह, हे मात्र खरय!
तरीही झालेला, होत असलेला त्रास कुणाला तरी सान्गावा अस वाटतच!
तशी सास खरच धीराची हो! एकट्याने हॅन्डल करत्ये!
आयला, येवढे प्रॉब्लेम्स असतात "तिकडे" पण? (हे अस वाचल्यावर कधी कधी वाटत बराय मी इथेच देशात हे ते! आपल्याला नस्त बुवा जमल! अन या वयात तर आता शक्यच नाही!)
बायदिवे, सास तुझ्या मोठ्ठ्या रोडवरील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा!
पोचल्यावर त्याचे डिटेल्स पण जरुर लिही इथे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मी एकटीने
मी एकटीने करतेय सार, हे खरय पण, आज ह्या क्षणात मात्र जाम थकल्या सारख होतय, गेल्या २-३ आठवड्यां पासुन Packing, Shipping, आवरा सावर सुरु आहे पण संपतच नाही. आता ३ दिवसांनी निघायचय. शेवटच्या टप्प्याची आवरा सावर उरली आहे पण आज माझा धिर गेलाय, आता नाही होणार आपल्याने अस वाटतय.
3000-4000 miles drive करुन जायचय, नवरा drive करेल पण चार दिवस..तस ह्या आधी FL-KS, KS-AR, AR-CT, CT-NJ, NJ-IA (6 states in only 4 months) and then again after 4 months IA to CA हि आम्ही drive करुनच आलेलो, पण जरा tension आहे.
As a Adventure Trip असा हा प्रवास करायचा ठरवलय म्हणजे stres कमी वाटेल. हसत आणी drive enjoy करत NY गाठायचा plan आहे. मला कधी हा पसारा निस्तरेल, कधी नवरा येईल आणी कधी निघुन कधी एकदा पोहचु अस झालय.
NY का पोहचलो की काही दिवस Hotel/Motel वर मग Apt मग पुन्हा सार सामान लावा.....
Change is the only thing which is constatnt हे खरय and I really hope this change will be for REAL good for us
आपल्यापैक
आपल्यापैकी कुणी जे अलेक्झान्ड्रिया, वर्जीनिया , वाशिंग्टन डी सी येथे राहणारे, येत्या आठवड्यात भारतात येत आहेत काय ?
मा़झा भाऊ अलेक्झान्ड्रिया येथे राहतो. त्याच्याजवळ एक छोटं पुस्तक आहे ते मला भारतात , नागपुरला हवं आहे. . तेही लवकरात लवकर. कृपया आपण मला ह्यात मदत करू शकता का?
प्रसन्न शेंबेकर
नागपूर
प्रसन्न तु
प्रसन्न
तुम्हाला पुस्तक 'शिप' करुन हि मागवता येईल, जास्त खर्च येणार नाहि. 'ऊ. एस. पि. एस. ' ह्या अमेरिकन पोस्ट सर्व्हिस ने स्वस्त पडेल. 'फेडेक्स' ने हि मागवु शकता. वजन जास्त नसेल तर कमि खर्च येतो.
CA to NY Drive: CA to NY:
CA to NY Drive:
CA to NY: 2952.63 Miles, 44 Hours 19 Minutes चा Drive, CA हुन 10/10/2008 Friday around 11:30 AM (PST) सुरु केला आणी 10/13/2008 Monday around 4:00 PM (EST) ला NY ला Safely पोहचलो.
शुक्रवारी रात्री ४-५ तासांचा आणी शनीवारी रात्री ३ तासांचा झोपण्यासाठी break घेतला पण रवीवारी Non-stop धाव घेतली. रविवारी सकाळी ७:०० च्या सुमारास drive सुरु केली ती रात्री ८:३० पर्यंत सुरु ठेवली मध्ये Gas Fill करण्यासाठी ३ break घेतले ५-१० मिनटाचे. रवीवारी काहीही न खाता आम्ही पुढे गेलो. संपुर्ण दिवस उपास. पाणी सुद्धा नाही. रविवारी रात्री म्हणजे सोमवारी सकाळी एक च्या सुमारास थोड खाल्ल.
शुक्रावारी निघण्यास उशिर झाला (ending formalities: returning Apartment key, bye to neighbours and last moment tasks) . ११:३० ला निघालो पहिला stop for Car Oil Change and Servicing ह्या मध्ये १-१.३० तास गेला व १ च्या सुमारास मार्गी लागलो. Weather चांगला असल्याने त्रास नाही झाला. रात्री १ पर्यंत drive केल. (गाडितच दोन्ही वेळच जेवण केल. छोले आणी भटुरे, homemade)
दुसर्या दिवशी (शनीवारी) सकाळी निघालो. सकाळी Coffee चा break घेतला मग ११ च्या सुमारास पुन्हा homemade उसळ आणी पुरी च जेवण केल (गाडितच). आज निदान 1000 miles मारायचे हा बेत होता पण....थंडी, Snow Fall, Fog वाढतच होत आणि काही वेळात traffic जाम. 11:30 AM to 1:30 PM जवळ जवळ २-२.३० तास अडकलो. जेवणाने मिळालेली सारी energy कंटाळण्यात गेली. पुढे गेलो तेव्हा समजल Snow Fall and Fog मुळे एक अपघात झालेला. एक कार दोन मोठाल्या Trucks मध्ये पिचकली गेली होती.
दुसर्या बाजुला ३ अपघात झालेले due to Snow and Bad weather एक मोठी Truck स्लीप होवुन उलटी कलंडली होती. त्या बाजुचे लोक तर जवळ जवळ दिवस भर अडकले असतिल.
स्लिपरी रस्ते, पाउस, Snow Fall आणी हवा पुढे जाण्यास अतिशय प्रतिकुल वाटा. सामानाने खच खचुन भरलेली आमची ग़ाडी हवेने गदागदा हलत होती. इतका सुसाट वारा. रात्र झाली पण Weather मध्ये ,no change. इतक करुनही जास्त अंतर गाठल गेल नव्हत. रात्री Subway त Sandwitch खाउ म्हटल तर ३-४ Subway ला गेलो, सारे बंद. जाम भुक लागलेली. घरच खाण्यास बरच काही होत (चिवडा, थेपले) पण काही तरी गरम खायच होत. तसच उपाशी झोपलो.
तिसर्या दिवशी म्हणजे रविवारी non-stop drive करण भाग होत. अर्ध्याच्या वर अंतर पुर्ण करायच बाकी होत.
रवीवारी ही सुरवातिला वारा, Snow Fall, Fog ह्यात सकाळ ची Driving करावी लागली मग थोडा फार चांगला रुट लागला.
नवर्याने रवीवारी (१०/१२/२००८) जवळ जवळ 1200 Miles Driving केली. वेळ आणी energy जावु नये म्हणुन आम्ही दोघेही बोलत नव्ह्तो; बस पुढे जात होतो. मी मध्ये मध्ये बर्याच वेळा डुलक्या मारल्या पण नवरा मात्र break न घेता गाडी चालवत होता. रात्री 8:30 च्या सुमारास मला गाडित बसण अशक्य झाल . Gas station वर गाडी थांबवुन १-१.३० तास रस्त्यावर उभ राहिलो. पाय मोकळे केले. सुरु झालो, मग Coffee चा break घेतला १-१.३० तास बसलो , निघालो.
सोमवारी सकाळि 5:43 AM to 6:20 AM नवरा झोपला गाडितच. मग पुन्हा निघालो आणी उरलेले 500-550 Miles
गाठले. शेवटच्या दिवशी Weather छान होत. चटकदार, मोहक, वेधक रंग-बेरंगी-तिरंगी-चौरंगी...झाडांनी भरलेलेया रंगीत रस्त्यावर Drive करण हा खुपच Pleasures Experience होता. पण रस्ता संपता संपत नव्हाता. खुप थकलो होतो आम्ही. कधी एकदा पोहचतो अस झालेल पण अंतर काही संपत नव्हत. अखेर ४:३० च्या सुमारास Motel वर पोहचलो.
***(नवर्याने धिर-गंभीर-खंबीर पणे 3000 Miles Drive केल (४ दिवस, पुरेशि झोप न घेता) आणी Safely आम्ही पोहचलो. My Husband is Real HERO खरच! Hats off to Him)***
अभिनंदन...
अभिनंदन... यू डिड इट !!!
Pages