अबोल नाते

Submitted by निंबुडा on 18 May, 2010 - 04:05

आकाशीच्या रंगपटावर
चमचम करिती असंख्य तारे
सतत त्यांकडे बघता वाटे
क्षणात हाती येतील सारे

तसेच तारे तुझ्या लोचनी
गालांवरती तेज मनोहर
मूक अशा या अधरां वरती
अनामिक हे शब्द निरंतर

या तेजाचे या शब्दांचे
आहे कसले अजोड नाते
तुझ्या नि माझ्या प्रीतीचे ही
तेच अनोखे अबोल नाते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच तारे तुझ्या लोचनी
गालांवरती तेज मनोहर
मूक अशा या अधरां वरती
अनामिक हे शब्द निरंतर

सुंदर लिहिलं आहेस हे कडवं निंबुडे...

चांगलाच सपाटा मारलायस आज Wink

>चांगलाच सपाटा मारलायस आज>
खूप आधी केलेली कविता आहे रे! मनोगतावर टाकली होती ३ वर्षांपूर्वी... आता माबोवर टाकतेय इतकंच......

माझ्या कवितासंग्रहातली माझी सर्वात favourite कविता आहे ही ! silent love Happy

असं आहे तर...:डोमा:

खरचं सायलेंट लव्ह. माझ्याकडे पण अशीच एक कविता आहे पण ते लव्ह जरा त्रिकोणातलं आहे.

प्रेयसीने प्रियकराला काय आणले म्हणून विचारायचे, तेव्हा प्रियकराने तळहातावरचा मधाचा थेंब तिच्यासमोर करायचा बस आणखी काही नाही अशीच त्या मधाच्या थेंबासारखी कविता अन प्रियकराच्या अन प्रेयसीच्या चेहर्‍यावरचा आनंद अगदी याच सारखी कविता आहे गं.

पण ते लव्ह जरा त्रिकोणातलं आहे. >>>>>

सुक्या, तरीच म्हणलं असा सुकल्यासारखा का असतोस Wink

निंबुडे, कविता मस्तच गं !

छान कविता
शेवटचे कडवे तितकेसे भावले नाही ... पण आवडले

________________________________
अवान्तर :silent love आहे हे सान्गीतलेस अन मलाही माझी silent love कविता आठवली ..त्याबद्दल धन्यवाद !!
http://www.maayboli.com/node/31117

धन्स !!