बुमरँग, डिडरी डु अन इतर इंडिजिनियस आयुधे / हत्यारे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऑस्ट्रेलिया चा शोध लागणे, अन तिथल्या आदिवासी लोकांचा इतिहास, त्यांची कामाची/ शिकारीची हत्यारे, जीवन, मनोरंजन याबद्द्ल जर एखाद्या आदिवासी माणसाकडुन कळले तर कित्ती छान! तो योग आला, मागील एका शनिवारी ट्रीप ला गेलो म्हणुन. कांगारु व्हॅली परिसरातील एका रिसॉर्ट कम वाईल्ड लाईफ पार्क मध्ये, एका इंडिजिनस फॅमिली - इथे आदिवासी/ वनवासी - कुटुंबाकडुन बरीच इंटरेस्टींग Happy माहिती मिळाली. सगळी इथे लिहिणे शक्य नाही! पण थोडे फोटो सोबत देत आहे!
काही महत्वाची माहिती:

बुमरँगः- हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. एक परत येणारे अन एक परत न येणारे! (दोन उपप्रकार- उजव्या हाताचे लोकांसाठी अन डावर्‍या लोकांसाठी एक! - इंडिजिनस लोक काळाच्या किती पुढे होते- नाहीतर आजचे मॉडर्ण लोक आम्हा डावर्‍यांना गोल्फ खेळु देत नाहीत! :))
१) परत येणारे बुमरॅग ने केलेली शिकारः पक्षी पाण्यासाठी जेंव्हा एखाद्या झाडावर बसतात, त्या झाडाच्या आसपास जाळे पसरवायचे. अन ह्या प्रकारचा बुमरँग झाडाभोवती फेकुण मारायचा. बुमरँग चा आवाज हा एखादा मोठा पक्षी झाडाजवळुन जातो आहे, असा फर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाज करित बुमरॅग प्रवास करते, अन पक्षी झाडावरुन उडुन जाऊ लागतात, अन अलगद जाळ्यात अडकतात. (इंडायरेक्ट शिकार!)

२) परत न येणारे बुमरँगः- हे कांगारु अन इमु च्या शिकारी साठी वापरतात. या प्रकारचा बुमरॅम्ग ह्या प्राण्यांच्या पायावर मारतात अन त्यांना जखमी/जायबंदी करतात अन उरलेली कामे मग त्यांना पकडुन केली जाते.

*** डिडरी डु :- हे एक सरळ लाकडाला मध्ये सलग छिद्र असलेले, बासरी सदृष्य उपकरण आहे. बासरीला एका बाजुला पुन्हा काही छिद्रे असतात, ती ह्यात नसतात. हे एक मनोरंजना साठी वाद्य आहे.
हे वाद्य नाकाने हवा घेउन तोंडाने हवा ह्या उपकरणात फुंकणे ह्या तत्वावर चालते. ह्यात प्रचंड शक्ती खर्च होते. स्त्रिया हे उपकरण वापरत नाहीत. कारण त्यामुळे स्त्रि च्या मुल होण्याच्या क्षमतेला बाधा येते. म्हणुन स्त्रिया हे उपकरण अशुभ मानतात अन त्याला हातही लावत नाहीत!

इतर अनेक उपकरणांचे फोटो आहेत, वेळ मिळेल तसा अपडेट करतो! Happy

DSC00247.JPGDSC00248.JPG
खाली आहे ते, साप बिळातुन बाहेर बोलवायचे उपकरणः एका छिद्र असलेल्या बांबुसारखे हे उपकरण. त्यावर हाताच्या तळव्याने आवाज केला कि सापासारखा आवाज येतो. अन मग साप बाहेर येतो. मग त्याला पकडायचे!
DSC01246.JPGDSC01249.JPG
खाली आहे ते, न परत येणारे बुमरँगः एका बाजुने मोठे अन एका बाजुने निमुळते!
DSC01250.JPGDSC01251.JPGDSC01252.JPGDSC01253.JPG

अग्नियंत्र! ह्यात एक लाकडी दणकट काठी, एका अर्ध-पोकळ (??)वाटी सारख्या लाकडी यंत्रावर घासतात! हनुमानाने लाकडावर लाकुड घासुन अग्नी प्रज्वलीत केला होता!
DSC01254.JPGDSC01255.JPGDSC01256.JPGDSC01257.JPG
एक वनौषधी, पचन अन सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी ई ई
DSC01258.JPG

आपल्याकडे कैकाडी बनवतात, तसे झाडांच्या वेलीपासुन बनवलेल्या वस्तु...
DSC01259.JPGDSC01260.JPG

खाली असलेले हे ढालीसारखे उपकरण/हत्यार. हे खोदकामाला उपयोगी आहे. ह्याचा दुसरा उपयोग असा: जर एखाद्याने गुन्हा केला, तर त्याच्या हाती हे उपकरन देऊन त्याला एका मैदानाच्या टोकाला उभे करतात, अन दुसर्‍या बाजुने त्याच्यावर लाकडी भाल्यांचा वर्षाव करतात. ह्या उपकरणाने त्या गुन्हेगाराने तो हल्ला चुकवायचा! जान बची तो लाखो पाये! ज्याला भाल्याच्या जखमा आहेत, त्याला अनेक दिवस गुंड/गुन्हेगार म्हणुन वागणुक मिळते. जखमा भरत नाहीत तितके दिवस तो समाजातुन बहिष्कृत!
DSC01263.JPGDSC01264.JPG

'डिडरी डु' वाद्य
DSC01272.JPG

शाडु सारख्या रंगाने रंगवलेले उत्साही कार्यकर्ते! हा रंग एक प्रकारच्या खडकांपासुन बनवतात. तो शिकारीला जाताना अंगाला फासतात, कि जेणेकरुन कांगारु, इमु, ना माणसांचा वास येउ नये!
DSC01273.JPGDSC01274.JPGDSC01299.JPGDSC01303.JPGDSC01307.JPGDSC01309.JPG

पांढरा कांगारु (नावरा वाईल्ड लाईफ पार्क मध्ये असलेला!)
DSC01310.JPGDSC01311.JPG

मस्त लेख आणि फोटो .
ते गुन्हेगारांवर लाकडी भाल्यांचा वर्षाव अजुनही होतो की , पुर्वी व्हायचं ?
शेवटच्या फोटोतल्या कांगारुंची आडनावं बहुतेक काळे आणि पांढरे असावीत. Proud

श्री Happy
जो मुलगा ही माहिती देत होता, त्याला जंगलातला फारसा अनुभव नव्हता. पण वंश परंपरेने चालत आलेली हत्यारे त्याला मिळाली होती, अन वडिलधार्‍यांकडुन मिळालेल्या माहितीवर तो १ तास आम्हाला माहिती देत होता.

बहुदा आता त्या आमानुष पद्धती बंद झाल्या आहेत. इथल्या अ‍ॅबओरिगिनल लोकांना बर्‍यापैकी मॉडर्न लाईफ चे धडे दिले आहेतच...

यावर अन ऑस्ट्रेलियन इतिहासावर एक धक्कादायक माहिती साठी 'स्टोलन जनरेशन' असे सर्च करुन बघा.

'स्टोलन जनरेशन' विषयी वाचलं अ‍ॅबओरिगिनल लोकांपेक्षा गोर्‍या कातडीचे ऑस्ट्रेलियनच अमानुष / रानटी पशु म्हणावे लागतील. Sad

धन्यवाद लाजो!

ते नाव बदलले आहे Happy त्याची इंग्रजी सुपरफास्ट होती, अन आमचे ज्ञान अगाध! Happy

('डुडलु' ह्या शब्दाचा वडारी भाषेतील अर्थ 'पैसा/ पैसे' असा होतो)

Back to top