राष्ट्रीय विज्ञान- तंत्रज्ञान दिन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे जिणे सुखकर होण्यासाठी कसा होऊ शकतो? लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भारतातल्या शेतीच्या मदतीला हे विज्ञान धावून येऊ शकते? आजच्या राष्ट्रीय विज्ञान- तंत्रज्ञान दिनानिमित्त, अशाच एका प्रयोगाविषयी...

http://72.78.249.107/esakal/20100510/5002131355233730205.htm
सौजन्य: दैनिक सकाळ

प्रकार: 

सही काम करताहेत मराठे सर , त्यांचा प्रयोग जर यशस्वी झाला तर भारत परत सुजलाम सुफलाम व्हायला वेळ नाही लागणार .

आगाऊ,

सवाल रास्त आहे. माहिती घेऊन सांगतो.

पण, गेल्या १० वर्षाचा संशोधनाचा अनुभव लक्षात घेता, 'पिअर-- रिव्ह्यूड जर्नल' मधे किती खडे अन किडे निघतात ते मला बरेच माहिती आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांची टोळकी तर स्वतःच जर्नल काढत्तात अन त्यांच्या विद्यार्थ्यांचे आर्टिकल त्यात प्रकाशित करतात. अनेक अमेरिकनांनी प्रकाशित केलेले पीअर रिव्हिव्ड आर्टीकल मागे घेतले गेले अन ते ग्रूप ब्लॅकलिस्ट मध्ये गेले. असो.

प्लास्टिक पासुन पेट्रोल तयार करणारे दोन भारतीय नग सध्या कुठे हरवलेत कुणास ठावुक? पत्राला उत्तर पण देत नाहीत! Happy

प्रकाशीत झालेले संशोधन म्हणजे ब्रम्हवाक्य नसते, अन अप्रकाशीत प्रयोग हे फालतु नसतात. भारतीय आयुर्वेदीक ओषधांच्या पेटंट च्या लढाईत त्याचा प्रत्यय आला आहे, अन पुढे ही येत राहणारच आहे. डॉक्युमेंटेशन नसणे, ही कल्पनेची 'ओरिजिनलिटी' नसणे होउ शकत नाही, असे मला वाटते. फक्त 'प्रेजेंण्ट' करता आले, तरच तुम्ही ग्रेट असे नाही. अनेक कॉन्फरंस मध्ये, 'प्रेसेंटेशन वॉज गुड बट कंटेंट वॉज होपलेस' असे शेरे प्रथितयश अमेरिकन शास्त्रज्ञांनाही मारले जातातच!

अमेरिकन वि. युरोपीयन शास्त्रज्ञांच्या लॉबींग बद्द्ल नंतर कधीतरी लिहिल! Happy

***
अश्या विषयावर चर्चेसाठी 'विज्ञान-तंत्रज्ञान मंडळ' सुरु करायला हरकत नसावी! Happy

सवाल रास्त आहे म्हणल्याबद्द्ल धन्यवाद,कारण मी प्रश्न जरा बिचकतच विचारला होता आणि 'आले खुसपट काढायला' हे ऐकण्याचीच तयारी ठेवली होती.
पिअर रिव्ह्युड जर्नलबद्द्ल तुम्ही म्हणात आहात ते खरे आहे,तरीही त्यापैकी काहींमधे प्रकाशन झाल्याने जरातरी क्रेडीबिलिटी येते.
प्रकाशीत झालेले संशोधन म्हणजे ब्रम्हवाक्य नसते, अन अप्रकाशीत प्रयोग हे फालतु नसतात.>>हम्म, हे काही उदाहरणांच्या बाबतीत खरे आहे.पण असे जनरलायझेशन कितपत योग्य आहे?
मला आजकाल वर्तमानपत्रीय संशोधनांचा प्रचंड संशय येतो,विज्ञान आणि वैज्ञानिक प्रयोग यांनांही सेंसेशनल करुन विक्रीमूल्य वाढवण्याचा प्रयत्न अनेकवेळा दिसतो.
रच्याकने काही लोक असेही म्हणतील की शास्त्रिय असो वा नसो याने पाउस पडतो ना मग झाले तर!

मी प्रश्न जरा बिचकतच विचारला होता >>>>> असे लाजु नका! Happy
प्रश्नाचे योग्य उत्तर देणे नव्हे तर, योग्य प्रश्न विचारणे हाच शास्त्रज्ञाचा मुळ पिंड असावा! (स्वैर भाषांतर)

जनरलायझेशन कशाचेच करायचे नाही. पुढे आलेला प्रयोग आपल्या आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासुन पहायचा अन मत मांडायचे! बुद्धीप्रामाण्यवाद .....असे काही तरी म्हणतात त्याला???

अश्या चर्चेतुनच त्या प्रयोगाला पुढील दिशा मिळते. 'पीअर रिव्हीव' जर्नल मध्ये प्रयोग/लेखन प्रसिद्ध झाले, तरी त्यावर देखील उलट सुलट प्रतिक्रिया येतच राहतात....!

स्वतः पैसे देऊन आर्टिकल छापुण आणणारे देखील असतात! भारतात मध्यंतरी नेट/सेट ला पी एच डी हा पर्याय दिल्याने अनेक संस्था चालकांच्या 'जावयांनी' प्रचंड संशोधन केले अन शोधनिबंध स्वतःच्या पैशांनी छापुण आणले. एक दोन वर्षांचे सबस्च्रिपशन घेतले, कि काम झाले, तुमचे लेखन लगेच प्रसिद्ध! (चांगला धंदा आहे, लक्षात ठेवला पाहिजे, बाकी काहीच नाही जमले कि हेच करु! :))

२ फाटे आहेत ह्या चर्चेला
१.मुळात प्रयोग/संशोधनच खरय की खोटय?

२ अ). खरय असे धरुन चालु तर मग त्याची feasibility. म्हणजे कुठल्याही संशोधनाला रोजच्या आयुष्यात उपयोगात आणण्यासाठी लागणारी साधनसामुग्रीचा खर्च आणि मिळणारे फायदे ह्याचा ताळमेळच बसत नसेल तर मग लोक दुर्लक्ष करतात.
२ब).कुठल्याही संशोधनाला रोजच्या आयुष्यात उपयोगात आणण्यासाठी लागणारी साधनसामुग्रीचा सुरवातीचा खर्च खुप असेल पण long run मधे पैसा वसुल होणार असेल तर मग investment करायला पुढे कोण येणार?
२क)कुठल्याही संशोधनाला रोजच्या आयुष्यात उपयोगात आणण्यासाठी लागणारी साधनसामुग्रीचा सुरवातीचा खर्च खुप नसेल पण लोकांना माहितच नसेल तर काय? इथे कदाचित वर्तमानपत्रे महत्वाची भुमिका बजावतात.

arc त्या ड्रमची किमंत २२५० रु दिलीय आणि गोवर्‍या , लाकडं , मीठ ह्यासाठी येणारा जो काही खर्च असेल तो . येवढ्याशा इन्वेस्ट्मेंट्मध्ये पाऊस पाडता येत असेल तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाही .

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध

मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.

आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...

मित्र हो,
ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही. हे कॉमिक वाचणारे पोर ही सांगेल.
त्यात विशेष लेखात म्हटल्याप्रमाणे कृत्रिम पावसासाठी चीनमधील दुष्काळी भागात विमाने, दहा लाख विशिष्ठ तोफ गोळे, असंख्य रॉकेट्स, सातशे किलो सिल्हर आयोडाईडचा वापर आदी आधुनिक विज्ञानने मान्यता दिलेली घसघशीत व अति खर्चिक साधनसामुग्री कुठे आणि एका डांबराच्या पिपात गोवऱ्या, भुस्सा-विटा, लाकडे घालून, व्लोअरच्या फुंकणीने बंब पेटवल्याप्रमाणे भट्टी पेटवून त्यात फक्त सहा किलो (खडे मीठ नव्हे) मीठाची थोडी थोडी आहूती टाकून वरुण यंत्राने - किंवा यज्ञाने अति किरकोळ खर्चात पाऊस पाडला जाईल असे मानणे म्हणजे बिरबलाची खिचडी पकवण्याच्या प्रयत्नांचा प्रकार वाटतो.
कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान वारंवार तपासून व त्यांना अखिल जगातील वैज्ञानिकांची मान्यता असलेल्या 'नेचर' वा तत्सम मासिकात, जर्नल मधे त्याला जोवर दुजोरा वा वैज्ञानिक पद्धती म्हणून मान मिळत नाही तोवर हे खूळ थांबवले पाहिजे. अन्यथा विज्ञानाला या नव्या अंधश्रद्धेला तोंड देण्यासाठी वेगळे लढे द्यायला उभे रहावे लागेल असा खणखणीत इशारा देण्याची वेळ आलेली आहे.
सरकारी परवाने, सबसिडी वा खात्या-पित्या अनुदानांना मग अनन्य साधारण महत्व राहणार नाही. त्यामुळे या प्रकल्पांची दखल सरकारी दप्तरातून काढून टाकली जावी. नाहीतर अण्णा हजाऱ्यांना उपोषणाला बसायला निमित्त मिळायचे.
पुष्पक विमान होते असे रामायमात फक्त वाचायला मिळते म्हणून विमान भारतीयांनी शोधले असा स्वतःची पाठ थोपटू दावा केला जातो तसाच हा प्रकार समजून त्याच्याकडे कमितकमी १८६आधुनिक विज्ञानवाद्यांनी एक झकास परिपत्रक काढून याचा निषेध करावा असे सुचवावेसे वाटते. तोपर्यंत या मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा. निदान 'राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिनाच्या' निमित्ताने दुर्लक्ष करावे.
»

* 285 reads
* Click to bookmark
* Email this page
* Printer-friendly version

सहमत आहे.
Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 05/11/2010 - 14:02.

सहमत आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
»

* reply

ही बातमी
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 05/11/2010 - 14:03.

ही बातमी आहे कुठे?

अदिती
»

* reply

अगदी सहमत आहे, पण . .
Submitted by दत्ता काळे on Tue, 05/11/2010 - 14:07.

सकाळ सारखे वृत्तपत्र अश्या प्रकारची बातमी कशी देऊ शकते ? पुढे तर त्यांनी नांदेड मध्ये हा प्रयोग नऊ वेळा यशस्वी झाला आहे असेही म्हटले आहे.
»

* reply

अरे!!!
Submitted by अभिषेक पटवर्धन on Tue, 05/11/2010 - 14:33.

तुमचा लेख वाचुन फार हसु आले....

ज्या माणसाने हा प्र्योग केलाय, तो मणुस (सकाळ मधल्या लेखावरुन) तरी रीलायेबल वाटतो. हा प्रयोग यशस्वी होणार नाही याचा काही वैज्ञानिक दाखला आहे का तुमच्याकडे. शिवाय फक्त खर्चीक आणि अति आधुनिक साधनं वापरुनच यश मिळवता येतं असा काही नियम आहे का? सत्याची पारख करण्यासाठी प्रयोगाची कसोटी वापरावी...किती पैसे खर्च केले, कुणि केले याच्याशी प्रयोगाच्या सत्यासत्यतेचं काय देणं घेणं?

शिवाय...एका नाडी वाल्याने दुसर्‍याकडे वैज्ञानिक सत्यासत्यतेची मागणी करणे अवघड आहे...

ओक साहेब तुम्हाला काय त्रास झाला त्यांनी जर प्रयोग केला तर , तुमचं काही नुकसान होणार आहे का ? तुम्ही नाड्या बघता , त्याच्यावर लेख लिहिता ते चालतं आणि मराठेंनी केलेला प्रयोग तुम्हाला चालत नाही , वा रे न्याय .

अरे तूमच्यापैकी बरेच जण तज्ञ आहात. मग या प्रयोगातली तत्वे, खरेच काम करतील का, हे तर सांगा.
माला बापड्याला वाटते, भरपूर झाडे लावली, पाण्याचे नियोजन केले, अनावश्यक उष्णता निर्माण करणे टाळले, कि पाऊस पडेल.

मला या प्रयोगाविषयी काही शंका आहेत.

१. भट्टीत टाकलेल्या मिठाचं बाष्पीभवन होऊन ढगांमध्ये seeding होतं, असा या प्रयोगामागे दावा आहे. Sodium Chlorideचं बाष्पीभवन १४१५ अंश से.ला होतं. हे तापमान गोवर्‍या, व सहा इंच लाकडाचा थर जाळून मिळणार नाही. 'सकाळ'च्या बातमीत गोवर्‍या व लाकडाचा उल्लेख आहे, 'मिड डे'मध्ये टायर जाळण्याचा उल्लेख आहे.

२. केवळ १० प्रयोग ही संख्या कमी वाटते.

Sodium Chlorideचं बाष्पीभवन १४१५ अंश से.ला होतं.>>>> हा boiling point आहे. बाष्पीभवन ही क्रिया त्यपेक्षा खुप कमी तापमानाला देखिल होउ शकते. (कपडे वाळतात ते बाष्पीभवन मुळेच पण २० अंश से.ला वाळतातच तसे आहे हे) ८०० अंश से. ला मिठ वितळते.

Evaporation हा एक vaporization चा एक प्रकार आहे. जर vaporization उत्कलनबिंदु पेक्षा कमी तापमानाला झाले तर त्याला Evaporation म्हणतात. बहुतेक बाष्पीभवन म्हणजेच Evaporation (नक्कि करुन सांगतो.) तुम्ही बाष्पीभवन म्हणला म्हणुन लिहले हो.

डॉ. मराठे यांनी vaporization हा शब्द वापरला आहे. Evaporation नव्हे. >>> Evaporation बहुतेक फक्त लिक्विड साठी वापरला जात असल्यामुळे त्यांनी vaporization वापरला असावा. चुभुद्याघ्या.

डॉ. मराठेंना संधी द्यावी, पण बर्‍याच प्रश्नांची उत्तरे त्यांच्या कडुन मिळायला हवीत.

कृत्रिम पावसा मुळे इतरत्र नैसर्गिक रितीने पडणार्‍या पावसावर परिणाम होणार कां? पडणार्‍या पाण्याने जमीनीवर पुर यायची शक्यता (धग फोडी)? मिठाचा पुरवठा थांबवल्यावर पाऊस पडणे थांबायला किती वेळे लागेल? प्रथम तो थांबेल कां?

मागे गवता पासुन इंधन तयार करणार्‍या प्रयोगाची खुप चर्चा झाली, त्याचे पुढे काय झाले?

श्री.मराठे यांच्या हेतूविषयी आत्ता तरी शंका घ्यायला जागा नाही आणि हा प्रयोग सप्रमाण,सार्वकालिकरित्या सिद्ध आणि यशस्वी झाल्यास मोठी समस्या टळेल हे खरेच तरीही....
१] नेमकी रासायनिक प्रक्रिया काय होते याचा उल्लेख नाही
२] पाउस होण्यासाठी ढगांची आवश्यकता आहेच,हा प्रयोग फक्त प्रेसिपिटेशनचा दर वाढवतो असा एकंदरीत दावा आहे. मात्र हे सिद्ध करणे अत्यंत कठीण आहे कारण त्याचे रिझनिंग 'अ‍ॅड हॉक' या प्रकारातले आहे. ढग जमा झाल्यावर पाउस पडला,तो या प्रयोगामुळे पडला की नैसर्गिकरित्या पडला हे कसे ठरवणार? तुम्ही प्रयोगावर विश्वास ठेवणारे असाल तर तो या मिठामुळे पडला म्हणणार नाहीतर तो पडणारच होता म्हणून पडला असे म्हणणार!
३] एक्सपेरिमेंटल रिपिट्सची संख्या अत्यंत नगण्य आहे त्यामुळे शास्त्रिय प्रयोगाच्या कसोटीवर हा प्रयोग बसत नाही.
४] शास्त्रिय नियतकालीकात प्रयोग प्रकाशित करायचा असेल तर या व अशासारख्या अनेक मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतात,ते झालेले आहे की नाही ते कळले नाही.वृत्तपत्रिय प्रकाशनाला या मर्यादा पडतात.
माझ्या मते हा एक प्रामाणिक पण स्युडोसायन्स प्रकारात मोडणारा प्रयोग आहे.अत्यंत जटील समस्येला अत्यंत सोपे उत्तर हे स्युडोसायन्सचे एक लक्षण नक्कीच आहे.

http://72.78.249.107/esakal/20100513/4626595396214413523.htm
वरुणयंत्र सादरीकरणाचा कृषी मंत्रालयात प्रयोग

नवी दिल्ली - कृत्रिम पाऊस पाडण्याचे सोपे साधन म्हणून चर्चेत असलेल्या वरुणयंत्राच्या सादरीकरणाचा प्रयोग आज केंद्रीय कृषी मंत्रालयात झाला. या यंत्राचे निर्माते डॉ. राजा मराठे यांनी हे यंत्र आणि त्याबद्दलची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही या सादरीकरणाला उपस्थित होते. सुमारे दीड तास हे सादरीकरण चालले.
********
सदर बातमीदाराशी संपर्क केला आहे. श्री मराठे सर/ त्यांचे प्रतिनिधी ह्यांचेशी ह्या शनिवारी बोलेल. प्रयोगासंबंधी अजुन माहिती मिळताच इथे शेअर करेल.

मला पर्यावरणास उपयुक्त साधने, रचना आणि आराखडे याबाबत माहिती हवी आहे. कचरा व्यवस्थापन याबाबतही माहिती द्यावी. प्लीज मदत करा.....

मला पर्यावरणास उपयुक्त साधने, रचना आणि आराखडे याबाबत माहिती हवी आहे. कचरा व्यवस्थापन याबाबतही माहिती द्यावी. प्लीज मदत करा.....

चंपक,
कृत्रिम पाऊस या यंत्राचा नक्कीच उपयोग होऊ शकतो,पण याला काही मर्यादाही असणार !
जास्त पाऊस पडुन नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे

अनु,
माझ्या एका मित्राने कचर्‍यापासुन सेंद्रिय खत (गठ्ठे) बनवण्याचा प्रोजेक्ट अगदी कमी खर्चात चालवला आहे
Happy

या वर्षी झालेली अतीवृष्टी वरुणयंत्राच्या वापरामुळे झाली असा आरोप केल्यास तो जितका 'शास्त्रीय' असेल तितकेच वरुणयंत्राचे फायदेही शास्त्रीय आहेत!!!