अजून एक निसर्गचित्र
२००९च्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने नचिकेताने पहिल्यांदा हातात सीरीयसली रंगपेटी घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या साथीमुळे पुणं गप्पगार पडलं होतं, तेव्हा घरात नुसतंच खेळताना हा चाळा लागला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे पहिलं सीरीयस चित्र त्याने काढलं-
http://www.maayboli.com/node/10456
माझ्या दृष्टीने अगदीच फसलेलं हे चित्र (प्रपोर्शनच्या मानाने) मायबोलीच्या अनेकांनी उचलून घेतलं. मग सुरू केली चित्रकलेची शिकवणी. शिकवणीतही ताईने काढून दिलेली चित्रंच मुलं थोडी डार्क करून रंगवत आहेत. म्हणून त्याला स्वतंत्रपणे चित्र काढूनच मग रंगवायला प्रोत्साहन देत राहिलो. सुरूवातीला अर्थातच जमलं नाही. मग तो हौसेनी स्वतःच काढायला लागला. खूप भारी चित्र नाही जमलं तरी चालेल, पण मनात जे आहे, ते समजलंय त्याला आणि म्हणूनच उतरवायला येतंय आता. तो अजूनही 'डोंगर, नदी, सूर्य' यातच आहे पण कल्पना अजून स्पष्ट होत आहेत.
त्याला काही चित्रकार वगैरे बनवायचं ध्येय वगैरे नाहीये एका जागी बसावा, थोडं कल्पनेत रमावं, रंगात बुडावं इतपतच विचार होता चित्रकलेच्या शिकवणीचा. त्याला आवड लागली आपोआपच ते बघून छान वाटतं, म्हणून हा सगळा प्रपंच. ज्यांनी ज्यांनी त्याला नकळत का होईना, प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांना एक झलक दाखवायची होती, म्हणून हे चित्र-
सध्या सुट्टी सुरू झाल्यामुळे क्रिकेट जोरात चालू आहे. आमचा हा क्रिकेटपटू टोपी, बॅट, बॉल घेऊन सदैव तयार असा असतो
हेहेहे.. मस्त आहे.. मला सगळी
हेहेहे.. मस्त आहे..
मला सगळी लहान मुलं सुर्याला मानवी चेहरा का देतात हा प्रश्न पडतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास अगदी.. मला चित्र पाहून
झक्कास अगदी.. मला चित्र पाहून ती जाहिरात आठवली:
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एनर्जीने भरलेली मुलं मारतात सिक्स
उन्हाची होते टांय टांय फिस्स्स
भारी आहे चित्र.. वर
भारी आहे चित्र..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर कोपर्यात सहीसुद्धा केली आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच गं.. झाडे आवडली
मस्तच गं.. झाडे आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या लेकीलाही नर्सरीत जायच्या आधीपासुन चित्रकलेचा क्लास लावला होता, ओळखीतल्या एकाने सुरू केलेला म्हणुन.. तिची चित्रकला तर ब-यापैकी झाली पण इंग्रजी व देवनागरी अक्षरही खुप सुधारले त्यामुळे.
मस्तय आहे नचिकेत
मस्तय आहे नचिकेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान छान!!
छान छान!!
किती छान वाटलं .. ही
किती छान वाटलं .. ही प्रस्तावना वाचून मग चित्र पाहताना.. थेट चित्र बघण्यापेक्षा, चित्र काढणारी मुलं बघणं हे नेहमीच मनोहारी चित्र असतं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नचिकेतला सांग, मस्त चित्र!
पूनम मस्त आहे चित्र. अगं मला
पूनम मस्त आहे चित्र. अगं मला ते पहिलं चित्र नाही पाहता येत. कुठला ग्रुप आहे तो?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/9991
अनिशा, गणेशोत्सव २००९ ह्या ग्रूपमध्ये सामिल हो. वर लिंक दिली आहे, त्यावर सगळी चित्र आहेत.
हो आशू
इतका तल्लीन होऊन रंगवत असतो, की मलाच बघवत नाही. मी जाऊन जाऊन त्रास देते त्याला मुद्दाम
आता रंगवतानाच्या पसार्याचा फोटो काढून टाकेन इथे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त सानुने असच एक निसर्ग
मस्त
एक्स्प्लेनेशन काय तर प्रत्येकाला आई ही असतेच ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सानुने असच एक निसर्ग चित्र काढल गेल्या आठवड्यात्.डोंगर दोन डोंगरांमधे मानवी चेहरा असलेला सुर्य वगैरे. पण एकाखाली एक दोन सुर्य काढले. काय तर म्हणे एक आई नी एक बाळ सुर्य
सुरेख! अगदी पूर्ण रंगविलेलं
सुरेख! अगदी पूर्ण रंगविलेलं चित्र. अस्सा खट्याळ गोड हसणारा सूर्य आवडला बॉ.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कविता
नचिकेत मस्त रे. Keep it up !
नचिकेत मस्त रे. Keep it up !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> मला सगळी लहान मुलं
>>>> मला सगळी लहान मुलं सुर्याला मानवी चेहरा का देतात हा प्रश्न पडतो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
टण्या, मग तुझा लगेच "अन्धश्रद्धानिर्मुलनाचा" विचार असेलच, नाही?
सहिये , सूर्य कसला क्युट
सहिये , सूर्य कसला क्युट आलाय...मला तर नचिकेतचा चेहरा दिसतोय त्या सूर्यात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलय चित्र. आम्ही सध्या
छान काढलय चित्र. आम्ही सध्या हॅप्पी फेसवर मुक्कामी आहोत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वा ! वा ! सहिये. गो नचिकेत !
वा ! वा ! सहिये. गो नचिकेत !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुर्याला काढलेला टिळा सगळ्यात
सुर्याला काढलेला टिळा सगळ्यात बेश्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूनम, नचिकेत ला सांग जुईला पण आवडल चित्र.
पूनम, किती नेटकं काढलंय गं
पूनम, किती नेटकं काढलंय गं चित्र. गणेशोत्सवातलं तुझ्या ब्लॉगवर पाहिलं होतं. ते प्रपोर्शन वगैरे सगळ्या आपल्या कल्पना बरं का. त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी विचार असणार तसं काढताना. मला तेही फार आवडलं होतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप शुभेच्छा छोट्या चित्रकाराला
कविता, तुझ्या मुलीचे एक्सप्लनेशन पण भारी एकदम
क्युट आहे चित्र
क्युट आहे चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त टकटकीत आहे चित्र! अगदी
मस्त टकटकीत आहे चित्र! अगदी सुट्टीचा मूड बरोब्बर पकडलाय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही आहे..
सही आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे.
मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय चित्र!
मस्तय चित्र!
मस्त काढले आहे ... अगदी
मस्त काढले आहे ...
अगदी सुट्टीचा मूड बरोब्बर पकडलाय! >> अगदी.
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नारळाच्या झावळ्या जरा वाळक्या आल्यात असं म्हटलं त्याला, तर 'आता ऊन आहे ना, झाडं वाळतात अगं' असं बोलून झक्क सारवासारव केली!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काल त्याला अपलोड केलेलं चित्र आणि तुमचे अभिप्राय दाखवले. एकदम खुश झाला
पुन्हा धन्यवाद.
कविता
अगदी पर्फेक्ट लॉजिक आहे की गं, आपली तर बोलतीच बंद! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास चित्र काढलंय. मला
झक्कास चित्र काढलंय. मला शेडींग आवडलंच !
[माझं आधी बघायचं राहिल चित्र ]
मस्त काढलय चित्र... सूर्य तर
मस्त काढलय चित्र... सूर्य तर मस्ट आहे प्रत्येक चित्रामध्ये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या लेकाच्या कोणत्याही चित्रात हसणारा सूर्य तर हवाच हवा, अगदी चंद्राशेजारीपण
>>>>>काय तर म्हणे एक आई नी एक
>>>>>काय तर म्हणे एक आई नी एक बाळ सुर्य एक्स्प्लेनेशन काय तर प्रत्येकाला आई ही असतेच <<<<<![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कित्ती निष्पाप असतात नै मुलं......
मला आठवतंय मी लहान असताना आईने मला चित्रकलेच्या class ला घातलं होतं पण माझा आणि चित्रकलेचा ३६ चा आकडा. त्यामुळे तो उपक्रम ४-५ दिवसांपेक्षा जास्त चालला नाही. अगदी प्रयोगवहीतल्या म्युकर आणि स्पायरोगायरा वगैरे वगैरे भयानक आकृत्या सुद्धा मी स्वतः नाही काढल्या कध्धी! सगळ्या आकृत्या माझ्या बाबांनी complete काढून दिल्या.
छान आहे. आवड निर्माण झाली हे
छान आहे. आवड निर्माण झाली हे तर आणखीनच सही.
पूनम चित्रकलेची आवड निर्माण
पूनम
चित्रकलेची आवड निर्माण होतेय नचिकेतला हे छानच आहे. हे चित्रपण मस्त आलय.
बाकी माझ्यामते मुलांकडून अगदी प्रमाणबद्ध, सुसंगत रंगसंगती इ. असलेल्या चित्राची अपेक्षा करू नये असे मला वाटते. त्यांना त्यांचे विचार हवे तसे चित्रात मांडता येणे हे जास्त महत्वाचे. (जसे झाड वाळली आहेत ना उन्हात म्हणून अशी वाळकी काढली).
अश्या कितीतरी गोष्टींचा मुले विचार करत असतात जे आपल्या गावीही नसते. त्यामुळे आपल्याला ते सुसंगत वाटत नाही.
त्यांना विचारले की मग ते सांगतात हे असे का काढलय ते. अश्याच विषयावर लोकसत्तामध्ये काही दिवसांपूर्वी शनिवारच्या चतुरंग मध्ये राजीव तांबे यांचा लेख आला होता.
Pages