बाराकरांकडुन किती वेळा तोच तोच वृतांत ऐकायचा तर हा नवा वृतांत शिट्टीच्या चष्म्यातून.
ठरल्याप्रमाणे आम्ही शुक्रवारी रात्री ८ वाजता सिंडरेला कडे पोहोचलो. पन्नाच आगमन झालच होत त्यामुळे तेव्हा सुरु झालेली अखंड बडबड आणि हसणं रविवारी रात्री पन्नाला घरी सोडल तेव्हा म्हणजे ११:३० वाजता संपल. आल्यावर मोठी बस आणायला चमन, किरण नी नितेश (मि.सिण्डी उर्फ् ‘ते गृहस्थ’) गेले. नितेश सांगत होता की 'इधर दस मिनीट मे ही है'. ते गेल्यावर अर्ध्या तासाने त्याचा सिण्डीला फोन आला की ते अजून पोचले नाहेत आणि रस्ता सापडत नाहीए! मग अर्ध्या तासाच काम दिड तासात करुन मंडळी घरी आली.
सिंडीने सुरेख पैकी पाणीपुरी, सायो फेम दिपसे समोसे आणि पिझ्झ्याची व्यवस्था केली होती. पाणीपुरीच्या पुर्या भाईंच्या सल्यानुसार तांदळाच पोत ठेउन आणल्या गेल्या नव्हत्या पण मग त्या उडाल्या का नाहीत? हे विचारायचच राहिल. अखंड बडबड आणि हास्यात खाण्याचा फडशा पडला.. मधे पग्या आणि आरजेला फोन करुन झाले.
गप्पा काही संपत नव्हत्या. त्यात पन्नाला चमनच्या बातमीचा सुगावा लागल्या कारणाने तिने त्याचा पिच्छा पुरवला होता आणि तो पण अगदी नव्या नवरीसारखा लाजत बिजत होता. गप्पांमधे रात्रीचे २ वाजले. पन्नाचं बर्याचदा सगळ्यांना 'चला आंघोळीला लाईन लावा' सांगुन सुद्धा कुणी ऐकत नव्हत. फचिन आणि चमन 'किती गॉसिप करता' अस म्हणत म्हणत अगदी सगळं ऐकत बसलेले. शेवटी झोपायच ठरल.
आम्ही तिघी आतल्या खोलीत आलो तरी गप्पा संपत नव्हत्या. मधेच 'हेच, हेच मला पटत नाही' अस काहीस बडबडत पन्ना पुन्हा उठुन बसली. ती काहीतरी बोलत होती आणि सिंडीकडे नीट पाहिल तेव्हा ती झोपुन गेल्याच कळल तेव्हा कुठे पन्ना शांत झाली.
शेवटी एकदाचे पहाटे ३ वाजता झोपलो. पहाटे ५ ला उठुन पटापटा आंघोळी करुन आम्ही बायका तयार. पण ही पोरं आवरायला किती वेळ घेतात हे त्या दिवशी कळल. शेवटी इशान, जुई, चमन, फचिन अश्या ४ लहान पोरांना तयार करुन आम्ही निघालो.
पन्नाने चिवडा आणि नारळीपाकाचे लाडू आणलेले. बाकी चरबट खाणं होतच. मधे मधे बाराकरांना फोन झाले. ते उगिच आपलं 'हे पोचलोच आम्ही लालूकडे असं सकाळी ८ लाच बोलत होते. जाताना नितेश आणि किरण ह्यांनी आलटुन पालटुन डायवर आणि किन्नरच काम पार पाडल. गाडी आधीच रंपा घेतल्यासारखी इथुन तिथे वाहात होती. गाणि म्हणत, गेम्स खेळत आम्ही लालूकडे पोचलो.
दारातच शोनू आणि लालूने स्वागत केल.
लालू आणि धनंजय ह्यांच खरच कौतुक. अतिशय सुरेख व्यवस्था होती.
मधला लालूकडचा वृतांत इथे , इथे आणि इथे वाचा.
शेवटी एकदा(चे) बाराकर गेले. मग जेवायला कुठे जायचे ह्यावर विचारमंथन चालू झाले. काहीतरी जागा ठरली. मि. मिनी म्हणे २ जणांना पत्ता देउन गेले. त्यातले १ म्हणजे अटलांटाकर, ते कधी गुल झाले कळलच नाही आणि दुसरे म्हणजे स्वाती, तीने पण हातात हात( तोच तो पपेट शो) घालुन कधी कल्टी मारली कळल नाही. शेवटी आरजेला फोन करुन पत्ता घेतला आणि इच्छीत स्थळी पोचलो.
मेडीटरेनियन रेस्टॉरंटमधे पुन्हा गप्पांत खाण झाल. (लालूकडे माझे एवढे गोड पदार्थ हुकलेत हे माहित असत तर मी तेच नसते का खाल्ले?)
हॉटेलात चेकइन करुन पुन्हा गप्पांचा फड जमला.. जोग काकांनी मुलांना आधीच झोपवुन घेतल्याने तो एक आयटम बघायचा राहुनच गेला.
मग अॅडमिन नी वेबमास्तर जॉइन झाले नी दरबार भरला. जनता आपापली गर्हाणी सांगू लागली. आमच्याकडे अर्धा र दिसत नाही(मग बर्याच जणांनी त्याची री ओढली), आमच्याकडे मायबोलीवर वायरस वाल्या अॅड्स येतात इथपासुन मायबोली हाच वायरस आहे इथपर्यंत लोकं बोलली. ..मधेच कोणीतरी वास्तुशास्त्राचा विषय काढला. त्यात म्हणे प्रवेशद्वारासमोर संडासाचे दार असणे अशुभ असते (साहजिक आहे! रोजचाच डायेरिया झालेला माणूसच घराची अशी रचना करुन घेइल ना?) मग त्रिकोणी दरवाजे शुभ असतात पण ते उघडायचे कसे ह्यावर विवेचन सुरु झाले. नितीनने तेव्हा बरीच फटकेबाजी केली. हॉबीट्स काय, रम पोटाला लावणे काय?? चायनिज बुद्धाचा किस्सा पण छान होता.
मधेच प्रचंड झोप येत असल्याने थुत्तरफोड ऐवजी मी रॉबीनफोड म्हणुन गेले आणि माझी झोप मी स्वतःच उडवली.
अधिक माहिती साठी वाचा लाफींग बेडुक आणि ब्रँडी
लोकांचा उत्साह काही संपत नव्हता. शेवटी जेव्हा बेवमास्तर निघाले तेव्हा मग हळुहळू सभा बरखास्त होउ लागली. सगळे झोपायला पांगले.
रविवारी सकाळी पुन्हा अगदी लालूसकट सभा भरली नी ब्रेकफास्ट झाला. मग मात्र सगळे आपापल्या दिशेला पांगले. दुरच्या किनार्यावरचे रॉनी कडे गेले. ती गाईडची भुमिका करणार होती. अटलांटाकर डिसी डाउन्टाउनात गेले आणि आम्ही शिट्टीकर ट्युलिप फेस्टीवर पहायला लाँगवुड बागेत गेलो. काय सुरेख बाग आहे ती. तिथे ट्युलिप्स, डॅफोडिल्स आणि असंख्य फुललेली फुलझाड पाहुन मन तृप्त झाल. तिथल्या कंझरवेटरीत अगदी आपला अनंत, जाई, जुई पण होते. बागेत छान छान आकार दिलेली झाडं होती. त्यातच सिंडीच मांजर होत पण ते मला कोल्ह्या सारख दिसल. उशिरा पोहोचल्यामुळे जास्त वेळ तिथे थांबता आल नाही..
पुढच बाराच गटग त्या बागेत करायच आम्ही शिट्टीकरांनी ठरवल.
गप्पा नॉनस्टॉप होत्याच. येताना नितेश आणि चमनने गाडीचा कार्यभार उचलला. मजलदरमजल करीत आणि घासघासभर लालूने सायोसाठी दिलेला चिवडा खात शिट्टीत पोहोचलो. (सायो, चिवडा तुझ्यापर्यंत पोचला नाही, तर कुठे गहाळ झाला ते समजुन जा. आम्ही घासभरच खाल्लाय ;)) आम्ही घरी पोचलो तेव्हा ह्या ३ दिवसाच्या ट्रिपची सांगता झाली.
एका मस्त, जोशभर्या, शाळेची आठवण करुन देणार्या विकांतासाठी लालू, सिंडी आणि सगळ्याच मायबोलीकरांचे खूप खूप आभार.
छान वृत्तांत अमृता!!
छान वृत्तांत अमृता!!
छान लिहीलस. बाराकरांना काहीच
छान लिहीलस. बाराकरांना काहीच टोमणे नाही मारलेस? येवढी काय ती गांधीगिरी?
सिंडीने सुरेख पैकी पाणीपुरी,
सिंडीने सुरेख पैकी पाणीपुरी, सायो फेम दिपसे समोसे आणि पिझ्झ्याची व्यवस्था केली होती.
पन्नाने चिवडा आणि नारळीपाकाचे लाडू आणलेले.
लालूने सायोसाठी दिलेला चिवडा खात शिट्टीत पोहोचलो
>>>>>>>>> तू काही नेलस की नाही ???? अश्यानेच गोरी लोकं बदनाम होतात...
छान लिहिलाय वृ... रात्रीच्या गप्पांमधले किस्से लिही की अजून.. नितीनची फटकेबाजी ?
बुवा, मी आहेच सभ्य पग्या, मी
बुवा, मी आहेच सभ्य
पग्या, मी आपल कपकेक्स, चॉकलेट, बिस्किट्स असलं नेलेलं. सिंडीने 'काही करु नको' हे बजावल्याने मी ते तंतोतंत पाळल.
नितीनची फटकेबाजी लिहिते अजुन आठवेल तशी.
मस्त अमृता!! लाँगवूड ला गेलात
मस्त अमृता!!
लाँगवूड ला गेलात ना, मस्त. मी आपली (रिक्षा फिरवल्यासारखी) शिटीकर, बाराकर, अ,कर, चुकीच्या किनार्यावरचे लोक, सगळ्यांना तिथे जाण्याबद्दल सुचवत होते. चला कुणीतरी तिथे जाउन राखला.
>>> मधेच प्रचंड झोप येत
>>> मधेच प्रचंड झोप येत असल्याने थुत्तरफोड ऐवजी मी रॉबीनफोड म्हणुन गेले
अग तु रॉबीनफोड नाही... थुत्तरहुड म्हणाली होतीस. अजुन झोप पुरी झाली नाही का?
बाकी वृत्तांत खूपच छान.
काल रॉनीला थुत्तरहुड सांगितल
काल रॉनीला थुत्तरहुड सांगितल तर किरण म्हणाला तारेत आहेस का? आता त्यालाच सांगते तुच तारेत आहेस अजुन म्हणुन.
फायनली !!! आला वाट्टं
फायनली !!! आला वाट्टं शिट्टीचा वृत्तांत . चला 'बेटर लेट दॅन नेव्हर' म्हणायचं न काय
सायो, किती खडुस आहेस ग
सायो, किती खडुस आहेस ग
हे बरंय. तुम्ही लोकांनी
हे बरंय. तुम्ही लोकांनी माझ्या वाटचा चिवडा हाणलात. तरीही मी न चिडता प्रतिक्रिया दिली. आणि वर खडुस पण म्हणतेस होय. कुफेहेपा.
चिवडा फकस्त एक घास
चिवडा फकस्त एक घास प्रत्येकाने खाल्लाय.. केवळ चव घेण्यासाठी.
हो,हो, आधी चव घ्यायला म्हणून,
हो,हो, आधी चव घ्यायला म्हणून, मग आवडला म्हणून आणि मग आता थोडाच आहे तर संपवूच म्हणून.
मस्ता वृत्तांत अमृता
मस्ता वृत्तांत अमृता
अमॄता मस्त लिहलस! रच्याकने,
अमॄता मस्त लिहलस!
रच्याकने, त्या चिवड्याची काय भानगड आहे? लालुने आम्हाला नाही दिला चिवडा
सहीच गं अमृता... मस्त लिहीलाय
सहीच गं अमृता... मस्त लिहीलाय वृत्तांत.. तूच खरी शिट्टीकर!
अग तु रॉबीनफोड नाही... थुत्तरहुड म्हणाली होतीस.
>>
नाही रे, ती रॉबीनफोडच म्हणाली...
अरे काय हे?? कितींदा बदलू
अरे काय हे?? कितींदा बदलू आता??
हो लालूने फक्त तुम्हालाच का
हो लालूने फक्त तुम्हालाच का चिवडा दिला म्हणे.
बाकी वृतांत भारी जमलेत सगळ्यांचे.
सही वृत्तांत , अरे का हुडाला
सही वृत्तांत ,
अरे का हुडाला फोडताय , तरीच हुडाने हल्ली आयडी "टोणगा" घेतलाय , बहोत दुर की सोचता है भिडु
आम्ही शिट्टीकर ट्युलिप
आम्ही शिट्टीकर ट्युलिप फेस्टीवर पहायला लाँगवुड बागेत गेलो. काय सुरेख बाग आहे ती. तिथे ट्युलिप्स, डॅफोडिल्स आणि असंख्य फुललेली फुलझाड पाहुन मन तृप्त झाल.
<<, एवढे ट्युलिप च्या बागेत गेलात आणि सिलसिला स्टाइल पोझ मारून एकाही कपल चा फोटो नाही.. How unromantic !!
सही वृत्तांत..फोटो कुठे आहेत?
सही वृत्तांत..फोटो कुठे आहेत?
लय भारी अमृता!! बोलो जय माता
लय भारी अमृता!!
बोलो जय माता दी!!!
नितीनची फटकेबाजी अफलातून होती! पोटाला ब्रँडी काय अन लाफिंग बुध्दा काय!!! त्याच्या प्रत्येक वाक्यालाच
बाराकरांच्या नाकावर टिच्चून
बाराकरांच्या नाकावर टिच्चून लिहीलेला वृत्तांत छान.
पन्नाचं बर्याचदा सगळ्यांना 'चला आंघोळीला लाईन लावा' सांगुन सुद्धा कुणी ऐकत नव्हत. >>>पन्ना, हे दृश्य डोळ्यासमोर आणून व तुझी लगबग मी नुसती इमॅजिन करुनच हसतेय.
मधेच 'हेच, हेच मला पटत नाही' अस काहीस बडबडत पन्ना पुन्हा उठुन बसली. ती काहीतरी बोलत होती आणि सिंडीकडे नीट पाहिल तेव्हा ती झोपुन गेल्याच कळल तेव्हा कुठे पन्ना शांत झाली. >>>>:खोखो:
सही लिहिला आहेस वृ
सही लिहिला आहेस वृ अमृता!!
वेबमास्तरांना गार्हाण्यांनी परेशान केलं जनतेनी, तरी ते बिचारे, न वैतागता, सगळी गार्हाणी शांतपणाने ऐकून घेत होते :).
आडो
आडो
<<(साहजिक आहे! रोजचाच
<<(साहजिक आहे! रोजचाच डायेरिया झालेला माणूसच घराची अशी रचना करुन घेइल ना?)>>
जोरदार एकदम...
काय चिवडा,चिवडा करताय. तो
काय चिवडा,चिवडा करताय. तो फक्त माझ्याकरता माझ्या डब्यात घालून दिलेला. पण तिला काय माहित ह्या शिट्टीकर पोरी गाडीतच डबा साफ करतील
मस्त.
मस्त.
छान आहे हा
छान आहे हा प्रयत्न...
बाराकरांच्या नाकावर टिच्चून लिहीलेला वृत्तांत छान <<< म्हणजे कळले नाही.. वृत्तांत त्यानीच लिहावे असा काही नियम होता का?
वृत्तांत त्यानीच लिहावे असा
वृत्तांत त्यानीच लिहावे असा काही नियम होता का?
नाही, वृत्तान्त फक्त आम्हालाच लिहिता येतो असा त्यांना अहंगंड आहे. इतरानी लिहिलेल्या वृत्तांताला ते 'वर्णन' असे हिणवून मोकळे होतात.
__(काडीबाज ) टोणगा.(इंग्रजी)
त्यांचा अहंगंड की कोणाचा
त्यांचा अहंगंड की कोणाचा न्युनगंड? एकंदरित सगळच गंडलेलं आहे ती बाब वेगळी.
Pages