डिसीत वसंत बहरला
Submitted by स्वाती_दांडेकर on 13 April, 2010 - 23:38
बाराकरांकडुन किती वेळा तोच तोच वृतांत ऐकायचा तर हा नवा वृतांत शिट्टीच्या चष्म्यातून.
ठरल्याप्रमाणे आम्ही शुक्रवारी रात्री ८ वाजता सिंडरेला कडे पोहोचलो. पन्नाच आगमन झालच होत त्यामुळे तेव्हा सुरु झालेली अखंड बडबड आणि हसणं रविवारी रात्री पन्नाला घरी सोडल तेव्हा म्हणजे ११:३० वाजता संपल. आल्यावर मोठी बस आणायला चमन, किरण नी नितेश (मि.सिण्डी उर्फ् ‘ते गृहस्थ’) गेले. नितेश सांगत होता की 'इधर दस मिनीट मे ही है'. ते गेल्यावर अर्ध्या तासाने त्याचा सिण्डीला फोन आला की ते अजून पोचले नाहेत आणि रस्ता सापडत नाहीए! मग अर्ध्या तासाच काम दिड तासात करुन मंडळी घरी आली.