||श्री गणेशा||

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

रंगबेरंगीची सुरुवात कशी करावी हेच कळत नव्हते.. पण गणपती उत्सव सुरु झाला आणि म्हटले ह्या कलेच्या देवतेच्या विविध रंगी विविध ढंगी प्रकाश चित्रांनी ही सुरुवात करावी...

    पुण्यात गणेशोत्सव म्हणजे लोकांचा महापूर असतो. गावोगावची मंडळी दर वर्षी हा उत्सव बघण्यासाठी येतात... गौरी विसर्जना नंतर तर संध्याकाळी ८ नंतर सगळी कडे तोबा गर्दी असते. ह्या गर्दीत गणरायाचे दर्शन फारच दुर्मिळ होते..
    गेली दोन - चार वर्षे निदान मानाचे गणपती आणि त्यांच्या आसपास बसणारे काही गणपती तरी नीट बघता यावेत म्हणून पहिल्याच दिवशी बाहेर पडून त्यांचे दर्शन घेतो आहे..
    तर यंदाच्या वर्षी ह्या काही निवडक गणपतींचे प्रकाशचित्रे

      पहिला मानाचा गणपती
      पुण्याचे ग्राम दैवत..
      कसबा गणपती गणेशोत्सव मंडळ
      .
      Copy_of_DSC02072.jpg

        दुसरा मानाचा गणपती
        पुण्याची ग्राम देवता
        तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ
        .
        Copy_of_DSC02069.jpg

          तिसरा मानचा गणपती
          गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ
          .
          Copy_of_DSC02068.jpg

            चौथा मानाचा गणपती
            तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ
            .
            Copy_of_DSC02065.jpg

              ह्या मानाच्या गणपती मंडळांचे एक वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे.. ह्या मंडळांची आरास ही अगदी साधी असते उगाच गडबड गोंधळ कधीच नसतो.. यंदा प्रथमच गुरुजी तालीम मंडळानी देखावा उभा केला आहे.. पण हा देखावा सुद्धा अगदी साधाच आहे.. तुळशीबाग मंडळाचा देखावा असतोच पण तिथे सुद्धा अगदी शांतता असते..

                आणि हा आपल्या सगळ्यांचाच आवडता
                दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ
                .
                Copy_of_DSC02059.jpg

                  Copy_of_DSC02061.jpg

                    अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ
                    शारदा-गजानन - पुण्यातली ही अशी एकमेव मूर्ति आहे..
                    .
                    Copy_of_DSC02055.jpg

                      बाबू गेनू गणेशोत्सव मंडळ
                      .
                      Copy_of_DSC02056.jpg

                        जिलब्या मारुती गणेशोत्सव मंडळ
                        .
                        Copy_of_DSC02054.jpg

                          ह्या सगळ्या मंडळांचे अजून एक खास वैशिष्ट्य असे की एका एका चौकाच्या अंतरा वर ही सगळी मंडळे आहेत.. कसबा गणपती थोडासा लांब आहे पण बाकीचे सगळे अक्षरशः एका चौकाच्या अंतरावर आहेत..
                          कसबा गणपती पासून सुरुवात करुन तांबडी जोगेश्वरीला जाताना थोडासा रस्ता वाकडा तिकडा करावा लागतो.. पण तांबडी जोगेश्वरी उजवीकडे ठेवून निघाल्यावर सरळ गेलात की उजवीकडे दिसतो तो गुरुजी तालीम.. तिथून तसेच सरळ गेलात आणि डावीकडे बघितलेत की तुळशीबाग.. तुळशीबागेच्या शेजारून गेलात की जिथे बाहेर पडता तिथेच थोडासा डावीकडे दगडूशेठ.. दगडूशेठच्या बरोबर मागे बाबू गेनू... तिथुन सरळ तसेच गेल्यावर मंडईच्या भाजी वाल्यांचे गाळे ओलांडून गेल्यावर मंडईचा गणपती.. आणि तिथून परत बाहेर आल्यावर बाजीराव रोड किंवा चितळे बंधूंच्या दुकानाकडे चालायला सुरुवात केलीत की डावीकडे जिलब्या मारुती..
                          पण ह्या सगळ्या एवढ्या जवळ जवळच्या गणपतींमुळे मानाचा पाचवा गणपती तेवढा दर वर्षी राहूनच जातो.. त्याच्यासाठी वाट फारच वाकडी करावी लागते...
                          ||ॐ गं गणपतये नमः||

                          विषय: 

                          आहा! काय सुस्पष्ट फोटो आलेत हिम्या! धन्यवाद..

                          पण आजकाल भल्या पहाटेही चेंगराचेंगरी असते Sad
                          -----------------------------------------------
                          शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
                          Happy

                          बंगलोरमधे बसल्या बसल्या पुण्यातल्या गणपतींचे दर्शन घ्यायची संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
                          जमलं तर मंडईत बसतो त्या गणेश सरस्वतीचा फोटो टाकणार का?
                          Happy

                          मस्त फोटोज आहेत हिम्स... Happy झक्कास काम केलेस..:)

                          खरच... गं .. इथे बसून पुण्या मुंबईचे गणपती मिस.. करतोय असं आता वाटणार नाही.

                          अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा फोटो टाकल्यबद्दल धन्यवाद.

                          हिम्सकुल,
                          इथे फोट टाकुन पुण्यातल्या गणपतीच्या काळातल्या खूप आठवणी जागा केल्या. हे सगळे गणपती पहात रात्र भर केलेली तंगडतोड आठवली.
                          मानाचे झाले आता दुसरे पण टाकणार का?
                          हिराबागचा, अल्काच्या चौकातला, विजय टॉकीज समोरचा, डेक्कनचा, रमणबागेतुन बालगंधर्वकडे यायच्या रत्यावर पण एक असायचा, असे सगळे बघत बघत पहाटेचे ५ कसे वाजायचे कळायचे नाही.

                          मस्तच रे.. झालच तर हत्ती गणपतीचाही फोटो टाकशील का, पाहिलास की.. छान आलेत फोटो..

                          छान आलेत सगळे फोटो. खूप खूप धन्यवाद..

                          मला ह्या वर्षी घर बसल्या पुण्याचे गणपती बघायला मिळाले, किती छान...धन्यवाद हिम्सकुल!!

                          काय सुंदर गणपती आहेत एकेक. रूप एकदम देखण ह्या मुर्तीचे.

                          वाह हिम्या.. खूप धन्यवाद.. !!!
                          इथे बसून सगळया गणपतींचं दर्शन झालं.. Happy