पुस्तक परिचय : उदगीरचा इतिहास
माझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.
महाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.
पहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)
दुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.
मागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.
कालच त्यांचे नविन पुस्तक प्रसिद्ध झाले - उदगीरचा इतिहास.
उदगीर म्हटले की फक्त उदगीरची लढाई आठवते. पण अनेक वर्षे राहुन पण बहुसंख्य उदगीरकरांना उदगीरच्या इतिहासाबद्दल फारशी माहीती नाही. गेली काही वर्षे माझे वडिल ह्या विषयावर वाचन करत होते. त्यांना मिळालेल्या माहीतीचे रुपांतर त्यांनी पुस्तकात केले. तुम्ही उदगीरशी संबंधित असाल अथवा उदगीर/ इतिहास ह्या विषयाबद्दल जिज्ञासा असेल तर तुम्हाला हे पुस्तक नक्कीच आवडेल.
नक्की वाचावे लागेल हे पुस्तक
नक्की वाचावे लागेल हे पुस्तक
काकांचे आभिनंदन
अभिनंदन! कुठे मिळेल? या
अभिनंदन!
कुठे मिळेल? या आधीचे पुरस्कार मिळालेलेही उपलब्ध झाले तर बरे होईल.
सही ! एक प्रत माझ्यासाठी हवी
सही ! एक प्रत माझ्यासाठी हवी आहे.
अभिनंदन .. पुरस्कार आणि
अभिनंदन .. पुरस्कार आणि पुस्तक दोन्ही साठी.
अभिनंदन महागुरू. पुस्तक कुठे
अभिनंदन महागुरू. पुस्तक कुठे मिळेल?
महागुरु, फारच चांगली
महागुरु, फारच चांगली बातमी..
सही ! एक प्रत माझ्यासाठी हवी आहे.
विकत मिळेल. माला पन पायजे लाडू असे नाही चालणार
अभिनंदन!
अभिनंदन!
सर्वांना शुभेच्छा बद्दल अनेक
सर्वांना शुभेच्छा बद्दल अनेक धन्यवाद.
दोन्ही पुस्तकाच्या माझ्याकडे सध्या extra copies नाहीत. मायबोलीशी संपर्क साधला आहे. त्यांचा आणि प्रकाशकाचा करार व्हावा लागेल. पण कोणी मायबोली खरेदी विभागाला मागणी केली तर ते उपलब्ध करुन देवु शकतील. भारतात प्रमुख वितरकांकडे मिळायला हरकत नाही. पुण्यात रसिक मधे मिळते इतके माहिती आहे.
प्रकाशकांचे नाव/ पत्त देत आहे. त्यांच्याशी संपर्क केल्यास ते मदत करु शकतील. अमेरीकेत मायबोली व्यतिरीक्त रसिक डॉट कॉम वर पुरस्कार मिळालेले राष्ट्र आणि राष्ट्रवाद हे पुस्तक उपलब्ध आहे. उदगीरचा इतिहास हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाल्यामुळे काही दिवस लागतील.
'राष्ट्र आणि राष्ट्रवाद’ - पद्मगंधा प्रकाशन,
36/11, Dhanwantari Co-op Hog. Soc., Pandurang Colony, Erandawane, Pune-411038
Phone No-+91-20-25442455 Email-feedback at padmagandha dot com
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b9992&lang=marathi
'उदगीरचा इतिहास' - जनशक्ती वाचक चळवळ
'पिनाक', २४४- समर्थनगर, औरंगाबाद - ४३१ ००१
दुरध्वनी: +91-२४०-२३४१००४
इमेलः janshakti dot wachak at gmail dot com
'सामना' रविवार( ९-मे) च्या
'सामना' रविवार( ९-मे) च्या उत्सव पुरवणीत ह्या पुस्तकाचे परिक्षंण आले आहे.
http://65.175.77.34/dainiksaamana/Details.aspx?id=5306&boxid=1355315
धन्यवाद! आजच माझ्या उदगीरच्या
धन्यवाद! आजच माझ्या उदगीरच्या स्नेह्यांना व नातेवाईकांना ही खबर पाठवते!
लगेचच घेऊन वाचले जाईल आणि
लगेचच घेऊन वाचले जाईल आणि अभिप्राय कळवला जाईल...