* * * केत्याची पैज : शेवटचा भाग * * *

Submitted by ऋयाम on 2 April, 2010 - 10:41

१: रेइको लॉज - १
२: "मानसी!!" (रेईको लॉजः भाग २)
३: * * * केत्याची लॉटरी * * *
४: * * * केत्याची पैज * * *

ही कथा, भाग ४ मधल्या घटनांनंतर घडणारा पुढचा भाग आहे. त्यामुळे, आधी भाग ४ अवश्य वाचा! Happy

-------------------------------------------

----------------------------------------------------------------------

"अमित.. "
"बोल.. काय झालं?" , अमित फोन घेत म्हणाला... "अरे काय गिर्‍या?? बोल..."
" अरे.. केत्या आला नाहीये. "
गिर्‍याला काही सुचत नव्हतं..
"एकतर रात्रभर केत्याचा पत्ता नाही.
रात्री कुठेतरी लांब गेला असेल आणि ट्रेन मिळाली नसेल.
सकाळी पहिल्या ट्रेननं येईल वाटलं होतं.. अजुन नाही आला पण..." , गिर्‍या.
"तु थांब.. मी आलोच... " अमित.
"बर..." म्हणत त्यानं फोन ठेवला.

...........................................
..........................................

आता तिथं तिसरं कोणीही नव्हतं.
फक्त तो आणि साकुरा!

sakura_2_1_0.jpg

केत्याकडे पाहुन, "ओइदे" ती म्हणाली.
आणि पुढे चालु लागली....
केत्याला काही समजलं तर नाही, पण बहुदा "इकडं ये" म्हटली असावी वाटुन तो तिच्या मागे जाऊ लागला.

आता काय जिथं पहावं तिथं साकुरा दिसत होता.
झाडावर बहरलेला, जमिनीवर पसरलेला.
सुगंधी नाजुक-सौम्य रंगात न्हालेला......
केत्या हरखुन झाडांकडे पहात पुढे चालत जात होता.
बॅगेतला कॅमेरा बाहेर काढुन फोटो काढु लागला...
किती काढु पण??? सारंच सुंदर आहे!

केत्याला हळुहळु समजलं, की आपण टेकडीच्या दुसर्‍या बाजुकडे चाललो आहे.
हळुहळु आत उतरतो आहोत.
मधेच एके ठिकाणी "साकुरा" नं एक वळण घेतलं.
तिथं मोठा उतार होता...
ते आणखी खाली उतरू लागले..
तिथं जाऊ लागल्यावर पाण्याचा आवाज येऊ लागला होता...
हळुहळु खुप मोठा होऊ लागला आणि शेवटी एकदाची ती थांबली.

तिथं केत्याला जे दिसलं ते पाहुन तो थक्क झाला...
एका बाजुला गर्द झाडी, ज्यावर बहरलेली साकुराची फुलं...
आणि साकुराच्या झाडांमागे असलेल्या एका उतारावरुन तो सुंदर झरा....
तिथे त्या टेकडीचा शेवट होता. पुढे दरी.
शेजारीच अजुन एक-दोन टेकड्या होत्या, पण त्यांवर साकुरा फुलला नव्हता...
" असं कसं ?" त्याला वाटलं. पण तिला विचारणार तरी कसं?

केत्याला परत फोटोचं आठवलं....
केत्यानं तिला त्याच्या मोबाईल मधुन फोटो काढुन देण्याची विनंती केली.
ती "हो" म्हटली.
त्यानं मग वेगवेगळ्या स्टाइलमधे फोटो काढुन घ्यायची हौस पुर्ण करुन घेतली.

इतकी साकुराची झाडं होती, पण तिथेच शेजारी काही वेगळ्या जातीची झाडं होती,
ज्याना आत्ता पानं-फुलं नव्हती...
अचानक केत्याच्या डोक्यात 'क्लिक' झालं....
तिला त्यानं "तुझा फोटो काढु का" म्हटलं..
दोघांचा फोटोही काढुया का विचारलं...
परत एकट्याचाही फोटो काढ म्हटला.
त्याच्या स्टायली पाहुन साकुरा जाम हसत होती..
केत्या एक मिनीट थांबला आणि त्यानं गिर्‍या आणि अमितला फोटो इमेल केले..

---------------------
--------------------

बीप-बीप.............
........................
गिर्‍याचा फोन वाजला....
इमेल होतं.... केत्याचंच.
"किती फोटो अ‍ॅटॅच केलेत..." गिर्‍या मेल उघडत म्हणाला..
एकेक फोटोज डाउन्लोड होऊ लागले..

तेवढ्यात बेल वाजली...
"अमित..... ये.."
"हे बघ केत्याचं इमेल आलंय. ", गिर्‍या फोन दाखवत म्हणाला.
"माहितीये. मलाही आलंय... " अमित गिर्‍याकडं रोखुन पाहत म्हणाला.
त्याचं तसं बघणं गिर्‍याच्या नजरेतुन सुटलं नाही.
"काय? काय झालं? " गिर्‍या म्हटला. "असा का बघतोय्स?"
"तु.. सगळे फोटो पाहिलेस??" अमित म्हटला.
"नाही. आत्ताच आलं ना. डाउनलोड होतायत अजुन.. माझा मोबाईल स्लो आहे जरा.." गिर्‍या.
"बर.. हे बघ.. मी पाहिलेत... काहीतरी गडबड दिसतीये..." अमित सिरीयसली बोलत होता.
आपला फोन बाजुला ठेवुन गिर्‍या फोटो बघु लागला.

..........................................

बरेच फोटो काढुन झाल्यावर केत्या आणि 'साकुरा' अजुन थोडंसंच पुढे गेले, जिथं एक घर दिसत होतं..
"साकुरा" त्या घरात शिरली..
घरात कोणी होतं का नाही समजलं नाही..
केत्या बाहेरच थांबला...
गिर्‍याला फोन लावला...

गिर्‍याचा फोन वाजला.
"गिर्‍या... मिळालं का इमेल? आणि फोटो?" Wink
"केत्या... कुठायस??" गिर्‍या बोलला आणि त्यानं फोन "स्पिकर-फोन" मोडवर टाकला...
केत्या म्हणाला, "फोटो बघ आणि सांग कसे वाटले?
आलो की नाही तुमच्या शिवाय इतक्या लांब.?
आणि ती माझ्या बरोबर आहे, ती सुंदरी कशी वाटली?"..........
केत्या हसत म्हणाला, "काय? कशी वाटली वहिनी?? जोडीचे फोटो छान आहेत ना??? " Happy

"केत्या.. " अमितनं मधेच बोलायला चालु केलं..
"ऐक... तु कुठे आहेस सांग. आणि ठिक आहेस ना?
ती तुझ्या बरोबर तर नाहीये ना??"
"काय? " केत्यानं कान टवकारले... "असं का म्हणातोय्स?"
"लवकरात लवकर तिथुन निघ..." अमित म्हटला.
"मी तुझे फोटो पाहिले केत्या.."
तुमचे दोघांचे म्हणुन जे फोटो तु पाठवले आहेस, त्या फोटोमधे तु एकटाच आहेस.
ती कुठेही नाहीये.....
"हॅलो.... हॅलो केत्या......"
फोन कट झाला होता............

फोनच्या स्क्रीनकडे पाहुन, "कट झाला वाटतं... " म्हणुन केत्या त्या घरात आत गेला...
उपयोग नाही म्हणुन फोन "स्वीच ऑफ" केला.

........................................

गिर्‍यानं अमितच्या हातुन फोन हिसकावुन घेतला.
कॉलबॅक केला..
"लागत नाहीये... "
"अरे.. लागत नाहीये.... रींग होत नाहीये." गिर्‍या अमितला म्हटला..
दोघेही काळजीत पडले...

गिर्‍यानं अमितचा फोन घेतला.
त्यातले 'केत्यानं पाठवलेले' फोटो पाहु लागला.
खरंच.. साकुरा नाही आणि काही नाही.
कुठल्या मुलीबद्दल बोलतोय हा?
भर दुपारी असा एकटाच टेकडीवर काय करतोय??

अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला...
अमित असं का म्हणतोय समजलं..
केत्या नेमका जाऊन जाळात अडकला होता....
"असल्या उजाड टेकड्यांवर भर दुपारी उन्हात भुतं नाही फिरणार तर काय फिरणार? " अमित म्हटला..
गिर्‍याच्या अंगावर सरसरुन काटा आला.
" हट.." असं काही नसतं... असं म्हटला मात्र, त्याला "मानसी" आणि रेइको प्रकरणाची आठवण झाली.
गिर्‍यानं स्वतः मानसीच्या अंगात आलेली ती अमानवी शक्ती पाहिली होती..
गिर्‍या घाबरला. पण पुढच्याच क्षणाला त्याला केत्याची काळजी वाटली..
तेव्हा आपण सारे होतो मानसी बरोबर.. आज केत्या एकटाच!
आणि बरोबर ती.............

"मानसीला सांगायचं का?" अमित गिर्‍याला म्हटला..
"नाही... "
"काय करायचं मग??" अमितला काही समजत नव्हतं..
"पोलिसात जायचं का?" गिर्‍या.
"तिथे जाऊन सांगणार काय? मित्र कुठे गेला??? आपल्याला तरी कुठे माहिती आहे?"
" वाट बघणे आणि प्रार्थना करणे.." इतकंच आहे हातात.. कुठे असेल केत्या.???
" त्याला समजत कसं नाहीये???" अमित म्हटला आणि गप्प झाला..
"पण अशा गोष्टी वेळ येईपर्यंत आपलं खरं रुप दाखवत नसतात.....
आणि वेळ आली की बरोबर....... 'घोट घेतात' मात्र तो बोलु शकला नाही. " गिर्‍याचा थरकाप उडाला होता...

---------------------------------

...............................

"साकुरा" त्या झर्‍याजवळ उभी राहिली..
त्या किमोनो मधे किती सुंदर दिसत होती.
केत्यानं परत तिचा फोटो काढला...
या वेळी तिने स्वतःच छान हसुन पोज दिली.
केत्याही खुष झाला.
त्यानं तिचा आणि त्याचे असे अजुन काही फोटो काढले.
त्या स्पॉटला स्वतःचेही छान फोटो काढले.

हेही पाठवुया.. म्हणुन त्याने ते गिर्‍याला इमेल केले.
इमेल गेलं मात्र, केत्याचा फोन वाजला.
"केत्या.. कुठाय्स सांग..."
केत्या म्हटला,"...................."
"काय? काय बोलतोय्स केत्या?" गिर्‍याला समजत नव्हतं केत्याचं बोलणं.
"तु बघ.. " अमितला फोन देत गिर्‍या म्हटला.
"केत्या.. मी अमित.."
"....................................." केत्या.
फोन बंद झाला.....
अमितनं फोन खाली ठेवला.
परत रिंग वाजली.
"अरे... मगाशी परत कट झाला वाटतं फोन... बोल.. " केत्याच होता.
"अरे.. तु ठिक आहेस ना? कुठे आहेस सांग.." अमित घाईघाईत बोलला..
"मी ठिक आहे................................" फोन बंद झाला.....
अमितनं कॉलबॅक केला...
फोन लागला नाही ... परत.. परत फोन लागला नाहीच..

वेळ चालला होता... केत्याचा फोन काही लागत नव्हता..
"रात्रीपर्यंत वाट बघुया.. रात्री शेवटी पोलिसात जाऊया. " अमित गिर्‍याला धीर देत म्हणाला.
मानसी चहा घेऊन आली पण कोणालाच रस नव्हता...

...............................................

रात्रीचे दहा वाजत आले होते...
तिघेही अजुन अमित-मानसीच्या घरी होते..
तेवढयात मानसीचा फोन वाजला.
केत्याचा एस एम एस होता. "help!"
मानसी घाबरली.
तिनं अमितला हाक मारली...

पण तेवढ्यात अमितलाच इमेल आलं........
त्यानं इमेल उघडलं..

तेवढ्यात दारावर थाप पडली....
गिर्‍यानं दार उघडलं....

अमितच्या मोबाईलवर फोटो डाउनलोड झाले...

दार उघडतो तर समोर केत्या! एकदम धडधाकट!
"केत्या तु?! तुला काही झालं नाही ना? तु तर एकदम ठिक आहेस! कुठे होतास? " गिर्‍या आणि अमित ओरडले!
"इमेल बघ..." केत्या त्याना म्हणाला..
"काय?"
इमेल मधे "केत्या" आणि "साकुराचे" त्या "झर्‍याजवळचा, आणि त्या घराबाहेर उभा असलेला" असे बरेच फोटो होते.. तसेच आधी केत्याने पाठवलेले 'एकट्याचे', 'ओसाड रानातले' फोटोही होते....

केत्यानं एक कागदही दिला मानसीला.. त्यावर लिहीलं होतं.... 「エイプリルフール」

"फोटोमधली ही "साकुरा! " तिथेच "क्योतो"ला राहते. " केत्या.
" काय?" गिर्‍या.
"हो." मी "क्योतो" ला जाउन आलोय.. "तिथं साकुराची फुलं पाहुन आलोय... एकटा! " केत्या बोलत होता..
"आणि हीपण "साकुरा"! ही आपली चांगली मैत्रीण झालीये.. जपानी न येता! " एवढं सांगुन तो जोरजोरात हसायला लागला.. हे फोटो पुरावा! पटत नसेल तर काही दिवस थांबा. "साकुरा" टोक्यो ला येणार आहे, तेव्हा तरी बसेल ना विश्वास?? "चला...... काढा पैसे!!! " Happy

अमित-मानसी आणि गिर्‍या खुप चिडले होते..
काय बोलावं समजेना..
ओरडायचं तर होतं केत्यावर..
पण.... "'केत्यानं' आपल्याला गंडवलं!!!" अशक्य!

आपल्याच मुर्खपणावर त्यांचा विश्वास बसत नव्हता..
गिर्‍याबरोबर राहुन शेवटी केत्यालाही गुण लागला होता तर....

तिघेही आ वासुन केत्याकडं बघत राहिले...

sakura_3.jpg

"अरे. पण या कागदावर काय लिहीलंय?? " कागद पुढे करत मानसीनं विचारलं.
"ते तुझ्या नवर्‍यालाच विचार!! ऐक नाहीतर.." केत्या म्हणाला.
"त्यांच्या जपानीमधेच लिहीलंय "एप्रिल फुल: साकुरा!! ":)

सौजन्यः- कु. दिप्ती आणि कु. इंटरनेट, कु. साकुरा(エプリルフールलिहुन दिल्याबद्दल).

(क्रमशः) ... ह्याला पर्याय नाही....... Happy

गुलमोहर: 

फुसुक Sad हे एप्रिल फुल होते ??? फारच छान वेड्यात काढलेस न आम्हाला ??? मस्त जमले आहे. सगळ्यात जास्त लोकांना एप्रील फुल बनवण्याचा विक्रम केला असशील

धन्यवाद सर्वांना वाचल्याबद्दल Happy

<विक्रम केला असशील>
मी नाही काही. केत्यानं Wink

पण "खरं" काय घडलं ते त्यानं अजुन सांगितलंच नाहीये... ते क्रमशः Proud

Happy Happy एवढं वाचून एप्रिल फूल? हात्तीच्या !! Happy

बरं तो पर्याय पक्षि पुढचा भाग येउदे लवकर !! वाट बघतोय. नक्की काय गेम केलाय केत्याने देव जाणे.