उल्हास व्हॅली.. मध्यम स्वरुपाचा ट्रेक.. उन्हाळयात कडक उन्हात आस्वाद घ्यावा तर उल्हास व्हॅलीचा ! उल्हास नदीच्या सान्निध्यात लोणावळ्यात असलेल्या उल्हास व्हॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे धबधबा ! हा व्हॅली ट्रेक करायचा म्हणजे आधी उतार पार करायचा (टणाटण उड्या मारत!!) नि मग चढण पार करुन ट्रेकची सांगता करायची.. मधल्या वेळेत मस्तपैंकी पाण्यात डुंबायचे !
आठवड्याभरच्या घाईगर्दीतुन क्षणभर विश्रांती म्हणुन येत्या रविवारी ४ एप्रिलला आम्ही काही उत्साही मायबोलीकर्स उल्हास व्हॅलीला जात आहोत.. तेव्हा तुमच्यात उत्साह असेल, पाण्याच्या टंचाईने त्रस्त असाल वा धबधब्याखाली बसुन अंगाची लाही शांत करायची इच्छा असेल तर आमच्यासोबत नक्की सामिल व्हा !
खुप लवकर ही पोस्ट टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व.. पण ऐनवेळी ठरवुन जाण्याची मजा काही औरच
साधारणत: लोणावळ्यात ८ वाजता भेटणार आहोत.. संध्याकाळी अंदाजे ४-५ च्या सुमारास लोणावळा स्टेशनवरुन परतीची वाट..
तेव्हा येणार का..
मुंबईवरून
मुंबईवरून ??
योगी
विनय
पुण्यावरून -
समीर
झकास
सुन्या
मुंबईवरून अजुन एक - विशाल
मुंबईवरून अजुन एक -
विशाल कुलकर्णी
पाण्याच्या टंचाईने त्रस्त
पाण्याच्या टंचाईने त्रस्त असाल >>>
योग्या तु ह्या कारणासाठी येतोयस हे मुलुंड बीबी वर वावरणार्यांच्या लक्षात आलय बर
खादाडी साठी काय घेवुन यायच?
त्याच काय प्लॅनिन्ग??