Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके. आता करुन बघेन मी.
ओके. आता करुन बघेन मी.
गुजराथी लोक आपल्यासारख्या
गुजराथी लोक आपल्यासारख्या अळुवड्या खमंग तळत नाहीत. हिंग, मोहरी, तीळाच्या फोडणीवर परततात. वरून लाल तिखट व खोबरे घालतात. (आणि जरा गोडसर असतात. गूळ घालतात )
सालीच्या मूगाच्या डाळीचे
सालीच्या मूगाच्या डाळीचे दहीवडे करायचे असतील तर ते कसे करायचे त्यात जोडीला उडीद डाळ घालावी लागते का?कोणी केले आहेत का असे दहीवडे? अदल्या रात्री वडे करून फ्रिझ मधे राहातील का?त्या साठे ते पाण्यातून काढून फ्रीझ मधे ठेवायचे की तळलेले तसेच ठेवायचे?
mala black forest cake
mala black forest cake karayacha aahe tya sathi icing kase karayche, alikade sam tv marathi var cake chya recipe dakhavlya hotya pan nit pahata alya nahit cake var whipp cream vaprayche ka , tyat sakhar ghalaychi aste ka confusion aahe
2 kilio mutton malvani paddhatine karayche aahe krupya savistar recipe milel ka
तोषवी, दहीवडे आदल्या दिवशी
तोषवी, दहीवडे आदल्या दिवशी करुन पाण्यातून पिळुन काढले आणि दह्यात टाकून ठेवले तर असे मुरलेले वडे जास्त छान लागतात असे माझे बाबा आणि नवरा दोघे म्हणतात. सालीच्या मूग डाळीचे केले नाहीत कधी.
मनुरुची,
मनुरुची, http://www.mypopkorn.com/tv/aamhi-saare-khavayye-december-25-episode-vid... ही साईट बघ ब्लॅक फॉरेस्ट केक साठी.
सिन्डी ह्म्म मग असच करेन!
सिन्डी
ह्म्म मग असच करेन!
मी एकदा अळुवड्या खाल्लेल्या
मी एकदा अळुवड्या खाल्लेल्या त्या उकडल्यावर चक्क खोब-याच्या चटणीत टाकुन दिलेल्या अशा होत्या.. मला जिवावर आलेला तो पदार्थ खायचे. पण माझ्या साबा त्यांच्या काकुकडुन घेऊन आलेल्या, त्यामुळे मला चव घेऊन वा वा... असे उद्गार काढणे भाग पडले.
माझ्या साबा त्यांच्या
माझ्या साबा त्यांच्या काकुकडुन घेऊन आलेल्या, त्यामुळे मला चव घेऊन वा वा... असे उद्गार काढणे भाग पडले.<<<<
साधना
साधना
'वन डिश मिल' कॅटगरीत बसणारे
'वन डिश मिल' कॅटगरीत बसणारे काही पदार्थ कोणी सुचवाल का मला? माझी पोळ्यांची बाई सुट्टीवर आहे. इतक्यात यायची शक्यता नाही. मला उन्हाळ्याच्या दोन्ही वेळा पोळ्या लाटायलाही कंटाळा येतो. नशिबाने नवरा परदेशात गेलाय तेव्हा रात्रीच्या जेवणात एक्सपरिमेन्ट्स करायला स्कोप आहे. पण सॅन्डविचेसचे प्रकार, थालीपिठ, डोसे-इडल्या, काही ठरावीक भात-पुलाव प्रकार सोडून फारस काही सुचतही नाहीये. भाकर्या निटशा जमत नाहीत. पदार्थ कमीतकमी पूर्वतयारी, बनवताना कमीतकमी कटकट आणि कलाकौशल्य पण पोटभरीचे, मुलींना आवडतील असे असावेत.
शर्मिला याविषयी जुन्या माबोवर
शर्मिला याविषयी जुन्या माबोवर चर्चा होती. शोधून बघ.
जुन्या मायबोलीवर असा वन डिश
जुन्या मायबोलीवर असा वन डिश मिल फोल्डर नाही दिसतय गं. थर्टी मिनिट्स मिल किंवा झटपट न्याहारीचे पदार्थ मिळताहेत. सर्च मारल्यावर दलिया खिचडी, तवा राईस, मसाला दालबाटी असे नव्या मायबोलीवरचे पदार्थ मिळताहेत. सगळे पदार्थ वेगवेगळे शोधायचे म्हणजे खूपच मोठं काम दिसतय. बघते.
शर्मिला, तुला डाळढोकली, सखीचा
शर्मिला, तुला डाळढोकली, सखीचा वरणातला पास्ता, दिनेशदांची व्हेज बिर्याणी, शेवयांचा भरपुर भाज्या घालुन केलेला उपमा, सेव्हरी ब्रेड बटर पुडिंग भाज्या घालुन, लझानिया हे पदार्थ करता येतिल. सोबत एखादी कोशिंबीर, सॅलॅड किंवा गार्लिक ब्रेड अस काहीतरी ठेवता येइल.
तुझ्याकडे स्लो कुकर असेल तर स्लोकुकर च्या बाफ मधे पण काही रेसिपीज सापडतिल. सकाळी कुकरमधे करायला टाकल की संध्याकाळी घरी आल्यावर एक तरी पदार्थ तयार मिळेल.
अजुन आठवेल तस लिहीते.
शर्मिला हे ऑप्शन
शर्मिला हे ऑप्शन बघा...पुलियोगिरे भात्, दाल्-चिकोल्या,पास्ता(भाज्या घालुन),पफ्-पेस्ट्रि समोसे आणी दही-भात, पिझ्झा,आप्पे-चटणी,धिरडी.
डा़ळढोकळी सुचलेच नव्हते.
डा़ळढोकळी सुचलेच नव्हते. वरणातला पास्ताही ग्रेट प्रकार वाटतोय. वाचला आत्त्ता. मला वाटतं स्वतंत्र बीबी उघडूयात का वन डिश मिल नावाने? एकत्र राहतील पुढे इतरांनाही.
तोषवी, सालीच्या मूगडाळीचे
तोषवी, सालीच्या मूगडाळीचे दहिवडे दिसायला चांगले नाही दिसणार. खुपदा हि डाळ भिजवून मग हाताने चोळून, साली काढायला सांगितलेल्या असतात. जोडिला उदीद डाळ घालावीच लागेल. नुसत्या मूगडाळीचे वडे, दह्यात भिजवले कि फूटतील.
भारतात नाही पण इथे कुठेही
भारतात नाही पण इथे कुठेही बाहेर गेलं तरी मला इच्छा असूनही कडूशार कॉफी घशाखाली ढकलवत नाही. मध्ये मॅकमध्ये मिळणार्या हॉट चोकोचा शोध लागला, आणि आता मी त्याची सॉलिड फॅन झालेय. हे हॉट चॉकलेट घरी करायचं असेल तर ते कसं करायचं? कोणती कॉफी/कोको पावडर वापरायची याबद्दल कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा.
ड्रिंकिंग चॉकलेट मिळते. तेच
ड्रिंकिंग चॉकलेट मिळते. तेच वापरायचे किंवा प्लेन कोको पावडर मिळते (त्यात चवीप्र्माणे साखर घालायची ) मला वाटतं, बरिस्ता मधे त्यांची खास पावडर मिळते. दूध मात्र फेसाळ हवे ( त्यासाठी ते वरून कपमधे ओतायचे किंवा मिक्सरमधून घुसळून घ्यायचे )
दिनेशदा, तुमच्याच प्रतिसादाची
दिनेशदा, तुमच्याच प्रतिसादाची वाट बघत होते. धन्यवाद. इथे बघेन कुठे मिळतंय कां ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको
आडो नेसले/नेसक्वीकची पावडर
आडो
नेसले/नेसक्वीकची पावडर मिळते ड्रींकींग चॉकलेटची. आपल्या बोर्नव्हिटासारखा मोठा डबा मिळतो किंवा छोटी छोटी पाकीटेपण असतात एका वेळी एक वापरायला. त्यात बहुदा साखर मिसळलेली असते. ते पाण्यात/दूधात टाकून प्यायचे. बाहेर मिळणारे हॉट चॉकलेट बहुदा गरम पाण्यात पावडर टाकून दिलेले असते.
अल्पना ! मक्याच्या पिठाची
अल्पना !
मक्याच्या पिठाची थालीपीठे मस्त होतात.
कोकण भागात मिळतात तसे कडक
कोकण भागात मिळतात तसे कडक बुंदीचे लाडु घरी कसे करतात?
भाग्य, त्यासाठी चिक्कीचा गूळ
भाग्य, त्यासाठी चिक्कीचा गूळ लागतो. साखरेत थोडा तो गुळ घालून पाक करायचा. पण हा पाक थोडा थोडाच करावा लागतो, नाहीतर मिश्रण कडक होते व लाडू वळता येत नाहीत. बूंदी पाडायचा वेगळा उपद्व्याप असतो.
असेच साबूदाण्याचे लाडू करता येतात. साबुदाणा, भिजवून, शिजवून, वाळवून, तळून तो पाकात घालायचा (नाहीतर नायलॉन साबुदाणा तळून वापरायचा ) ते त्यामानाने करायला सोपे आहेत.
फरासाण मध्ये जी पापडी घालतात
फरासाण मध्ये जी पापडी घालतात ती कशी करतात ?
कौरिचे पन्ह कसं करतात? आणि ते
कौरिचे पन्ह कसं करतात? आणि ते किती दिवस टिकतं
मला खास्ता कचोरी कशी बनवायचि
मला खास्ता कचोरी कशी बनवायचि त्याची रेसिपी हवी आहे! मिळेल का?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105407.html?1152909571
ईथे धनर्षीनी दिलेल्या साबुदाण्याच्या पापडाविषयी विचारायचे होते.
१ आदल्या दिवशी सकाळी भिजवायच्या साबुदाण्यात नेहमी भिजवतो तसा भिजवून रात्री उकळलेले पाणी घालायचे का ? आणि घालायचे असल्यास तसेच रात्रभर ठेवायचे ? खराब तर नाही ना होणार ?
२. बटाटे किती घ्यायचे ?
३. साबुदाण्याच्या फेण्या आणि पापड यात काय फरक आहे.?
प्लिज कोणी सांगाल का लवकर .. ? मला करायचे आहेत.
मनीशा (की मनीषा?) गुजराती
मनीशा (की मनीषा?) गुजराती फाफडा करण्यासाठी बेसन, ओवा व मोहन घाल्?ऊन घट्ट भिजवतात. पिठाची छोटी गोळी घेऊन पोळपाटावर ठेऊन तळव्याच्या मागच्या भागाने दाबून लांबट चपटा आकार देतात व तळतात.
हे कृती मी इ-टीव्ही गुजरातीवर पाहिली होती.
खानदेशात, खास करून जळगाव,
खानदेशात, खास करून जळगाव, भुसावळ व मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे ''दराबा'' नावाची मिठाई मिळते. त्याबद्दल कोणास माहित आहे काय? मी खाल्लेला दराबा हा रवा, साखर व शुध्द तूप यांपासून बनवला होता. बुरहानपुरमधील सुप्रसिध्द दुलिचंद यांच्या मिठाईच्या दुकानातून आला होता.
असाच दराबा डाळीच्या पीठाचा पण बनवतात असे ऐकले आहे. ह्या पदार्थाची खासियत म्हणजे अग्नीचा स्पर्शही न होता, केवळ घर्षणाच्या माध्यमातून ऊर्जा उत्पन्न करून हा पदार्थ बनवला जातो असे ऐकले आहे. दराबा महिना महिना टिकतो, अत्यंत पौष्टिक असतो हे अनुभवाने माहित आहे. खानदेशात व म.प्र. मध्ये पित्तप्रकृतीच्या लोकांनी सकाळी हा दराबा खाल्ला तर त्यांचे पित्ताने डोके दुखणार नाही असे तेथील बुजुर्ग मंडळी सांगतात. परंतु त्याची रेसिपी अद्याप कोठेच मिळाली नाही. अरेबिक संस्कृतीत दराबा नावाचा वेगळाच पदार्थ असतो, पण हा तो नव्हे.
तर त्याच्या पाककृतीची आणि त्याचे मूळ, इतर अवांतर माहिती असल्यास कोणी देऊ शकेल काय?
मी खानदेशमहोत्सव वेबसाईटवर दराबा लाडू हा प्रकार पाहिला. पण तिथे कृती कोठेच नाही.
Pages