पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाफड्यासाठी पीठ भिजवताना, थोडा पापडखार घालतात. रुचिरामधे कृति आहे.

कैरीचे पन्हे आणि खस्ता कचोरी आहेत इथे.

जूयी, वाळवण आणि साठवण, मधे हे प्रकार आहेत.

अरुंधती,
मी खाल्लेल्या दराब्याच्या लाडवासाठी, गहू धुवून त्याची पुरचुंडी बांधून ठेवतात. मग ते वाळवतात. मग दळून पिठ करतात. ते मैद्याच्या चाळणीने चाळतात. मग त्या पिठाचे भाजून तूप साखर घालून लाडू करतात. ते खूपच चवदार लागतात. डाळीच्या पिठाचा मात्र खाल्ला नाही मी.
मायबोलीकर गिरिराजची आई, जरा वेगळ्या पद्धतीने करते. खाल्लेत मी, (पण आयते मिळत होते म्हणून )
कृति विचारली नाही कधी !!!

दिनेशदा, माहितीबद्दल धन्यवाद! मी खाल्लेला दराबा न भाजता केलेला होता, एवढे खात्रीने सांगू शकते. दिसायला बाह्यतः आपल्या खव्यासारखा पांढराशुभ्र दिसतो. आमचे तेथील (अन्तुर्लीचे) स्नेही कायम पुण्याला आम्हाला भेटायला आले की घेऊन येतात. पण त्यांना कृती माहित नाही. तुम्हाला मिळाली तर अवश्य कळवा! Happy

मी वर लिहिलेले लाडू, पण पिठ फार न भाजताच केलेले असतात. पण अजिबात न भाजता, हा प्रकार मलाही नवीनच वाटतोय. कदाचीत, उन्हात (खानदेशी कडक उन्हात !!!) वाळवत असावेत.
आता त्याना विचारुन, इथे लिहावेच लागेल !!!

दिनेशदा, धन्यवाद!
एकुणात हे बुंदीचे कडक लाडु म्हणजे जरा किचकट काम दिसते, काश एकडे अमेरिकेत पण मिळत असते Sad

दिनेशदा, नक्की विचारा आणि सांगा! मी वाट पाहात्ये! Happy मला आश्चर्य हे वाटले की आंतरजालावर दराब्याची पा. कृ. कोठेच मिळाली नाही. आणि खानदेशातला तर तो लोकप्रिय पदार्थ! त्या खान्देशमहोत्सव साईटवर इतरही काय काय पदार्थ होते, जसे: फौजदारी वरण, दाल-गंडोरी, वाल दाणे भाजी, पातोळा भाजी, एडण्या (की न्या?), उडीमा, बिबड्या (की द्या?), फुकणे, कान्होले, धसले, सुरडा, चिखोल्या, कळणाची भाकरी, डुबकल्या, पाटाच्या शेवई असे आधी न ऐकलेले ( खाणे तर सोडूनच द्या!) प्रकार दिसले. ह्या वेगळ्या पा. कृ. ची माहितीही कोणास असली तर अवश्य द्यावी, म्हणजे खान्देशी पदार्थांची लज्जत अनुभवता येईल!! Happy

आपल्याकडे अहिराणी बोलणारे सभासद आहेत. हा गिर्‍या आता खुप बिझी असतो ना, पण बाकिचे (आणि त्यांच्या माऊल्या ) मदत करतील.

दिनेशदा तेथेच बघितलेले .. पहिल्यांदाच करणार आहे म्हणून काहि शंका होत्या म्हणून विचारल्या.

साबुदाणे रात्री नेहमीप्रमाणे भिजवून, सकाळी हाताने मोकळे पाण्यात शिजवायवचे. ते सहसा खराब होत नाहीत.
फेण्यामधे साबुदाणे जवळ जवळ अख्खे दिसतात. पापड्या करताना, ते वाटून घेतात. मला वाटते इतकाच फरक.
साबुदाणे न शिजवता, पातळ पसरुनही एक प्रकार करतात. त्याचा उल्लेख आहे तिथे. (मस्त रंगला होता तो बीबी )

व्वाव! सह्ही आहे.... ज्वारी, गहू आणि तांदळाच्या कण्यांच्या ह्या एक प्रकारचा पापडच की... पण कॉम्बिनेशन एकदम वेगळे आहे!! आणि भाजून/ तळून खाताना त्याबरोबर शेंगदाणे? धन्य त्या माऊली ज्या इतके कष्ट घेऊन असे सर्व चविष्ट पदार्थ करून आपल्या पोटी घालतात!!
[ कोणी आहेत का तिथे? :-)]

प्राजक्ता, धन्स इतकी मस्त वेगळी पा.कृ. दिल्याबद्दल आणि ती नजरेत आणून दिल्याबद्दल! Happy

स्वरा, माझी आई अतिशय सुंदर मलई कोफ्ता(आणि आलु मटर पण) बनवते. तीची रेसीपी लिहिते थोड्या वेळान.

माझी वहिनी जळगाव भागातली आहे, तिच्यामुळेच या क्रुती मिळाल्या.दराब्या ची क्रुती मिळाली तर टाकेल.

अरुन्धती, माझ मुळ गाव खानदेशातलच आहे. आणि दराबा हा तर तेथिल अगदी प्रसिद्ध लाडुचा प्रकार.
हे लाडु म्हणजे रवा, मैदा आणि भरपुर तुप त्यामुळे मला तरि फार पौष्टिक कधि वाटले नाही, पण खायला मात्र छान लागतात. आईला विचारुन मी क्रुति टाकेन इथे.
त्याच पध्दतिने हिवाळ्यात मुगाच्या पिठाचेपण लाडु करतात. हिवाळ्यात खान्देशात कोणाकडे गेलिस तर तुला दराबा, मुगाचे लाडु, गव्हाच्या उम्ब्याचे लाडु हमखास खायला मिळतिल.
तु वर उल्लेखलेल्या बिबड्या माझ्या अत्यन्त आवडत्या (चार वर्षांपुर्वी भारत वारित आणलेल्या अजुनहि पुरवुन खाते आहे :)). मी लहान असताना, मावशी कडनं कोणि येणार असेल तर ती दरवेळी खास माझ्या करिता पाठवित असे. आजकाल जळगावला या म्हणे तयार मिळतात, या वेळी भारतात गेली कि मी घेउन येणार आहे तिकडनं.
अगदी nostalgic झालेय या पदार्थांच्या आठवणिने.....कधि मी जाणार भारतात Sad

जळ्गावात गव्हाचे वडे असा प्रकार मिळ्तो. ते वा़ळव्लेले असतात. व भिजवुन कान्दा दाणे घालुन भाजि करतात. कोणास माहित आहे का. मी बरेच दिवस शोधत आहे.

जुइ, आज बघितला तुझा प्रश्न.
य पापडाला ४ वाटी शाबुदाणा असेल तर साधारण एक मध्यम बटाटा असे प्रमाण घेतआत.

उद्याला उसळ करायला हिरवे मूग भिजत घातलेत. आज नेमकी कणिक संपली त्यामुळे उद्या पोळ्यांना सुट्टी. आता त्या मुगाची धिरडी घालायची असतील तर ते मिक्सर मधून सरबरीत वाटल्यावर त्यात बेसन किंवा तांदुळाचं पीठ घालावं लागेल का?

पियू विचार गं बाई लवकर Happy आणि इथं त्या रेसिपीजचं संकलन होऊ देत. दराब्याचं पण विचार! बहुधा मी तो खावा म्हणून 'पौष्टिक' आहे असं सांगितलं गेलं असणार..... मी खाल्लेल्या प्रकारात तूप जाणवतं, पण जास्त वाटत नाही. त्यात मैदाही असतो हे माहित नव्हतं. आणि आमच्या घरी येणारा प्रकार लाडू नव्हे तर खव्यासारखा घट्ट गोळ्याच्या स्वरूपात येतो. कधीकधी गुलाबाचा स्वादही असतो. Happy

स्वरा :संजीव कपूरची रेसिपी-मलई कोफ्ता नवीन पाककृतींमधे टाकली आहे.

सासुबाईनी दराब्याचे जे वर्णन सांगितले ते अगदी दिनेशनी लिहिलेय तेच आहे. गव्हाची सपिठी आणि तुप समप्रमाणात घेउन भाजुन पिठीसाखर घालुन लाडू करतात. त्यामुळे 'हेल्दी' असेल असे वाटत नाही. सपिठी भाजताना अगदी बारीक आचेवर भाजतात त्यामुळे रंग बदलत नाही असे त्यांचे म्हणणे!

प्राजक्ता, डाय गंडोरीमधे अंबटचुक्याची भाजी पण असते. अर्थात आमच्या घरी तरी असतेच.

ज्वारीच्या एडण्या हे एक प्रकरण एक्दम भारी लागते. इथे ज्वारी मिळात नाही त्यामुळे करणे शक्य होत नाही.

सध्या घरी बिबडे, गव्हाची पानं आहेत Happy पुरवुन खाणे चाल्लेय Happy

फौजदारी वरण, डाळ गन्डोरी, वाल दाणे भाजी, पातोळा भाजी, एडण्या (की न्या?), उडीमा, बिबड्या (की द्या?), फुकणे, कान्होले, धसले, सुरडा, चिखोल्या, कळणाची भाकरी, डुबकल्या, पाटाच्या शेवई असे आधी न ऐकलेले ( खाणे तर सोडूनच द्या!) प्रकार दिसले. ह्या वेगळ्या पा. कृ. ची माहितीही कोणास असली तर अवश्य द्यावी, म्हणजे खान्देशी पदार्थांची लज्जत अनुभवता येईल<<<

अरुंधती ताई! यात मला बिबड्या, फुनक, कान्होले, चिखोल्या, कळण्याची भाकरी, डुबकवड्या, पाटाच्य शेवया आणि धसले नव्हे ढासले हे माहीतीये. या सर्व प्रकारांची रेसिपी वेळ मिळेल तशी टाकेल्.
तुर्तास ढासल्याची रेसिपी टाकतेय.

ढासले म्हणजे बाजरीची खिचडी म्हणा हवे तर.
७-८ माणसांसाठी एक किलो बाजरी धुवुन निथरुन ठेवावी...थोडीशी सुकल्यावर ओलसर असतांनाच कांडावी. पाखडावी म्हणजे टरफले निघुन जातात. नंतर चाळणीने चाळुन घ्यावी ..म्हणजे पीठ, कोंडा काढता येतो. आता ही बाजरी त्यात अर्धी अर्धी वाटी तांदुळ ( खिचडीचा) आणि दाळ (तुरीची किंवा हरभ-याची) घालुन मीठ, किंचीतशी हळद , हिंग घालुन कुकरमधुन २-३ शिट्ट्या करुन काढावी. खिचडीला पाणी जास्त लागते कारण बाजरी आणी तुरीची दाळ! गरमागरम खिचडीवर गुळ, तुप घालुन खातात.
थंडीच्या दिवसात उत्तम.

हीच खिचडी आम्ही तिखट करतो. कांदा, लसुन, हळद, हिंग,लाल तिखट, शेंगदाणे, (ओले वाटाणे ही घालतात)घालुन फोडणी करुन घ्यावी. त्यात पाणी ओतुन वर सांगितल्या प्रमाणे पाखडलेली बाजरी, तांदुळ, तुरीची दाळ धुउन टाकावे. ही खिचडी शिजत असतांनाच असला खमंग वास पसरतो....की रस्त्यावरच्या माणसांनाही समजते...काहीतरी खमंग चाललय....:) खिचडी शिजली की वरुन चिरलेली कोथिंबिर पसरावी.
आणखी एकः खान्देशी माणुस आणि खिचडीच वेगळच नातं आहे. खिचडी आणी वर तेलाची(शेंगदाणा/गोडेतेल) धार...कसली सर नाही त्याला. आणि हो, तेल कच्चेच असावे... Happy
मग त्याबरोबर कैरीचेच लोणचे, पापड, हा सरंजाम असला किंवा नसला तरी चालते.

Pages