१ वाटी पातळ केलेलं साजूक तूप
१ वाटी पिठीसाखर
सेल्फ रेझिंग फ्लावर किंवा मैदा
थोडंसं दही किंवा दुध
केशर वेलची सिरप किंवा कुठलाही आवडीचा इसेन्स
काजू/बदाम/चारोळी सजावटीसाठी
एका पसरट भांड्यात तूप घेऊन हाताने भरपूर फेसावे. त्यात पिठीसाखर घालून ती विरघळेपर्यंत परत फेसावे. त्यात इसेन्स घालावा. आणि मग मावेल तितका मैदा घालून कणकेप्रमाणे भिजवावे. मैदा वापरला तर त्यात पाव टिस्पून बेकिंग सोडा घालावा लागेल. सेल्फ रेझिंग फ्लावर घेतल्यास सोडा घालायची आवश्यकता नाही.
साधारण घट्टसर असं पीठ भिजवून ७-८ तास झाकून ठेवावे.
अवन १८० डिग्रीला तापण्यास ठेवावा. दह्याचा किंवा दुधाचा हात लावून नानकटाईचे पीठ भरपूर मळून कणकेप्रमाणे तलम मऊसर करून घ्यावे. मग त्याचे बोराएवढे गोळे करून जरा चपटवून त्यावर काजू/बदाम/चारोळी लावून बेक करण्यास ठेवावे. साधारण ४० मिनीटात नानकटाई तयार होते.
घटक पदार्थ थोडकेच आहेत. कृती सुद्धा फार क्लिष्ट नाहीये.
नानकटाई बेक करायला ठेवल्यावर साधारण २५ मिनीटांनी तपासून बघावे. वरून गुलाबी - चॉकलेटी रंग आला की नानकटाई तयार झाली असे समजावे. गरम असताना ती मऊ लागू शकेल पण थंड झाल्यावर छान खुसखुशीत होते.
मी ऑफिसला जायच्या अगोदर म्हणजे सकाळी आठ वाजता हे पीठ भिजवून ठेवलं आणि संध्याकाळी आल्यावर म्हणजे साडेआठ वाजता एक बॅच बेक करायला ठेवली. उरलेलं पीठ डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवलं. आणि दुसर्या दिवशी तासभर बाहेर काढून मग बेक केलं. ती बॅच पण एकदम मस्त खुसखुशीत झाली.
मंजुडी मस्त ग, करुन बघेन
मंजुडी मस्त ग, करुन बघेन शनिवारी
अरे हे सेव झालं वाटतं. मगाशी
अरे हे सेव झालं वाटतं. मगाशी त्यात काहीतरी एरर येत होती म्हणून ती विंडो तशीच क्लोज करून टाकली होती.
आता दुपारी एडिट करते आणि फोटो पण टाकते.
ओवन नसेल तर कसे करता
ओवन नसेल तर कसे करता येईल.एकदम सोपी रेसिपी वाटली
छान आहे कृती, आधी निम्म्याने
छान आहे कृती, आधी निम्म्याने करून बघेन. फोटो टाक लवकर.
मस्तच! मी जवळच असलेल्या
मस्तच! मी जवळच असलेल्या बेकरीतून भाजून आणेन
पूनम, खरंच नैवेद्याच्या
पूनम, खरंच नैवेद्याच्या वाटीच्या प्रमाणात करून बघ.
अश्विनी, बाहेरून बेक करून आणणार असशील तर तुला चार-पाच वाट्यांच्या प्रमाणात करून बघायला हरकत नाही. कारण बाहेर अक्षरशः ७-८ मिनीटात एक ट्रे बेक होतो ज्यात १००-१२५ नानकटाया एका वेळी मावतात.
१००-१२५ तुझ्या
१००-१२५ तुझ्या प्रमाणाप्रमाणे ४-५ वाट्यांमधे २००-२५० होतील. इतक्या किती दिवस खात बसू आम्ही गं ! १ वाटीचंच बरं आहे. १ छोटा ट्रे भरुन होतील १ वाटीच्या.
कमालच करतेस केश्विनी.. २५०
कमालच करतेस केश्विनी.. २५० करून आण आणि घरी \चहाला बोलाव माबोकरांना, हाकानाका
फोटो मस्त आलाय मन्जूडे. मला हुरूप की कायसा आलाय
(No subject)
माबोकरांना नानकटाईतच कटवू
माबोकरांना नानकटाईतच कटवू म्हणतेस !
नको गं. चांगलं पोटभरीचं करेन काहीतरी तुम्ही लोक्स आल्यावर (पोटभर नानकटाई नाही बरं का ! )
फोटोतल्या नानकटाया जरा जास्त
फोटोतल्या नानकटाया जरा जास्त भाजल्या गेल्यात आणि हप्त्याहप्त्याने करायचा कंटाळा आला म्हणून सगळ्या एकदम ठेवल्या बेक करायला तर त्या चिकटल्या एकमेकिंना आणि आकार बिघडला. पण चव छान आली आहे.
म्स्तच गं मंजु... मीही करुन
म्स्तच गं मंजु... मीही करुन पाहते. कालच आईने केल्या होत्या. ती बेकरीतुन भाजुन आणते.
इतक्या किती दिवस खात बसू आम्ही गं
अश्विनी, माझा फोन नं. दिलाय ना मी तुला? वापर की मधुन्मधुन....
साधना किती अल्पसंतुष्ट आहात
साधना किती अल्पसंतुष्ट आहात गं सगळ्या !
मस्त! खूप सोपी आहे कृती.
मस्त! खूप सोपी आहे कृती.
मस्त रेसीपी आहे मंजुडी!! मी
मस्त रेसीपी आहे मंजुडी!! मी करुन पाहाणार आहे.
छान सोप्पी रेसिपी.. करुन बघेन
छान सोप्पी रेसिपी.. करुन बघेन नक्की.
मंजूडी मस्त होतात या
मंजूडी मस्त होतात या नानकटाया.
माझी मुलं लहान असताना मी बर्याच वेळा करायची. अगदी पहिल्यांदा केल्या तेव्हा घरात भाच्या वगैरे धरून पाच मुलं होती. ताट भरून थंड होण्यासाठी पाण्याच्या पिपावर ठेवलं व बाहेर गेले आल्यावर पहाते तर ताट रिकामं!
यात सुक्या खोबर्याचा कीस
यात सुक्या खोबर्याचा कीस घालुन करुन पहा.. चांगल्या लागतात.
कालच करुन पाहील्या..छान
कालच करुन पाहील्या..छान झाल्या..धन्स मंजुडी...
फार सुंदर झाली. थोडी पसरट
फार सुंदर झाली. थोडी पसरट झाली पण साजुक तुप, केशर वेलचीचा स्वाद मस्त. मी बेकरीतून भाजून आणली. बेकरीवाला म्हणाला अजून थोडं घट्ट हवं होतं. असो, पुढच्या वेळेस ! पण आत्ताही अगदी खुसखुशीत झालीय. आता बाहेरुन आणायला नको वाटेल. मंजूने दिलेल्या मापात ४४ झाल्या. पण पटकन संपतील असं वाटतंय बाहेरच्या ४४ नानकटाया संपायला वेळ लागला असता. ती डीश मला ववीच्या गेम्स मधे बक्षिस मिळालीय. मस्त दिसतेय ना? आणि खालचं मॅट टाकाऊतून टिकाऊ प्रकारे केलेलं आहे.
धन्यवाद मंजू
वा, काय एकसारखा आकार आहे
वा, काय एकसारखा आकार आहे केश्वि मीही करतेच आता ह्या आठवड्यात.
मस्तच दिसतायत ह्या.
मस्तच दिसतायत ह्या. टेंप्टिंग. करेन आता विकांताला
पुढची बॅच डबल तिबल करणार सेम
पुढची बॅच डबल तिबल करणार सेम अशाच प्रकारची, पुतण्याची फर्माईश आहे. नंतर कोकोनट क्रंची (सुकं खोबरं घालून).
मंजु मायक्रो मध्ये करायच्या
मंजु मायक्रो मध्ये करायच्या असतिल तर किति वेळ ठेवायच्या आणि किति डिग्रि वर ?
थंडू, अगं जवळ बेकरी असेल तर
थंडू, अगं जवळ बेकरी असेल तर तीच प्रिफर कर भाजायला. १० रु. पत्रा घेतली भाजणावळ. आपल्याला लक्ष ठेवयला नको.
अश्वे अग बेकरि जवळ नाहिये ,
अश्वे अग बेकरि जवळ नाहिये , आणि रविवार पर्यत थांबता नाहि येणार, लगेच करुन पहायच्या होत्या!
मावेच्या बाफवर बघ कुणी दिलंय
मावेच्या बाफवर बघ कुणी दिलंय का सेटिंग
अश्विनी, सही दिसताहेत नाक
अश्विनी, सही दिसताहेत नाक
थंड, अगं वर दिलंय ना तसंच.. अवन 180 डिग्रीला प्रिहीट करायचा आणि 25 ते 40 मिनीटात बेक करून होतात.
मंजे ग माझ्या कडे अवन नहिये
मंजे ग माझ्या कडे अवन नहिये ना ग , माय्क्रोवेव आहे !
थंड- मायक्रोवेव्हमध्ये
थंड- मायक्रोवेव्हमध्ये 'कन्व्हेक्शन' सेटींग असतं- ते सेटींग म्हणजे ओव्हनचं सेटींग.
तरी, मावे सेटींगवरच करायचं असेल, तर ४ मिनिटं हाय पॉवरवर ठेवून बघ. ह्या सेटींगवर केक होतो, नानकटाईही व्हायला हरकत नाही. नंतर वेळ कमी-जास्त करून ठरवता येईल फायनल सेटींग. ते केलंस, की इकडेही लिही किंवा ग्रिल मोडही आहे. ट्रेमध्येही होतील. मावेसोबत एक पुस्तक येतं, त्यात नक्की असतील केक-बिस्किट्सची सेटींग्ज. मी संध्याकाळी बघून लिहिन हवी तर.
Pages