१ वाटी पातळ केलेलं साजूक तूप
१ वाटी पिठीसाखर
सेल्फ रेझिंग फ्लावर किंवा मैदा
थोडंसं दही किंवा दुध
केशर वेलची सिरप किंवा कुठलाही आवडीचा इसेन्स
काजू/बदाम/चारोळी सजावटीसाठी
एका पसरट भांड्यात तूप घेऊन हाताने भरपूर फेसावे. त्यात पिठीसाखर घालून ती विरघळेपर्यंत परत फेसावे. त्यात इसेन्स घालावा. आणि मग मावेल तितका मैदा घालून कणकेप्रमाणे भिजवावे. मैदा वापरला तर त्यात पाव टिस्पून बेकिंग सोडा घालावा लागेल. सेल्फ रेझिंग फ्लावर घेतल्यास सोडा घालायची आवश्यकता नाही.
साधारण घट्टसर असं पीठ भिजवून ७-८ तास झाकून ठेवावे.
अवन १८० डिग्रीला तापण्यास ठेवावा. दह्याचा किंवा दुधाचा हात लावून नानकटाईचे पीठ भरपूर मळून कणकेप्रमाणे तलम मऊसर करून घ्यावे. मग त्याचे बोराएवढे गोळे करून जरा चपटवून त्यावर काजू/बदाम/चारोळी लावून बेक करण्यास ठेवावे. साधारण ४० मिनीटात नानकटाई तयार होते.
घटक पदार्थ थोडकेच आहेत. कृती सुद्धा फार क्लिष्ट नाहीये.
नानकटाई बेक करायला ठेवल्यावर साधारण २५ मिनीटांनी तपासून बघावे. वरून गुलाबी - चॉकलेटी रंग आला की नानकटाई तयार झाली असे समजावे. गरम असताना ती मऊ लागू शकेल पण थंड झाल्यावर छान खुसखुशीत होते.
मी ऑफिसला जायच्या अगोदर म्हणजे सकाळी आठ वाजता हे पीठ भिजवून ठेवलं आणि संध्याकाळी आल्यावर म्हणजे साडेआठ वाजता एक बॅच बेक करायला ठेवली. उरलेलं पीठ डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवलं. आणि दुसर्या दिवशी तासभर बाहेर काढून मग बेक केलं. ती बॅच पण एकदम मस्त खुसखुशीत झाली.
धन्स पुनम , पुस्तकात ४
धन्स पुनम , पुस्तकात ४ मिनिट्च आहे , बघते तसच करुन
मी पण काल करुन बघितल्या
मी पण काल करुन बघितल्या ...मस्तच झाल्या आहेत..धन्स मंजुडी
फोटो आणि कृती मस्त आहे
फोटो आणि कृती मस्त आहे दोन्ही..
७ तास भिजवून ठेवने जरुरी आहे
७ तास भिजवून ठेवने जरुरी आहे का? लगेच नाहि करता येणार का.
मि आज सकाळि भिजवुन आलेय मैदा,
मि आज सकाळि भिजवुन आलेय मैदा, संध्याकाळि करुन पाहिन!
स्वरा, लगेच केल्या तर
स्वरा, लगेच केल्या तर नानकटाया खुसखुशीत होणार नाहीत. मैदा तूपात व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. कमीत कमी तीन तास तरी पीठ भिजायला हवे.
(माकाचुवर ही पाकृ आली म्हणून
(माकाचुवर ही पाकृ आली म्हणून तरी का होईना) अडीच वर्षांनी मुहूर्त लागला ह्या करायला!
एक नंबर झाल्या. खमंग आणि खुशखुशीत. पहिलाच प्रयोग म्हणून नैवेद्याची छोटी वाटी घेतली होती. त्यात चौदा नानकटाया झाल्या. आता कणिक, नाचणीचे पीठ वगैरे घालून व्हेरियेशन करता येतील. यशस्वी झाले, तर त्याचेही फोटो इथे चिकटवेन.
मावे सेटिंग- ग्रिल (लोअर रॅक) वेळः ४.३० मिनिटे
अरे वा! मस्तच. ग्रील
अरे वा! मस्तच.
ग्रील सेटींग? आणि फक्त साडेचार मिनिटं? सहीच आहे!!!!
ग्रील सेटींगला प्रीहीट करावं लागलं का? किती वेळ केलंस?
ग्रिल सेटिंगला प्रीहीट करावे
ग्रिल सेटिंगला प्रीहीट करावे लागत नाही.
आधी तीन मिनिटं ठेवलं. तेव्हा पाहिलं तर व्हायच्या होत्या. म्हणून अजून २ मिनिटं ठेवलं, तर काही जराशा 'अधिक खमंग' झालेल्या दिसत आहेत एकसलग ग्रिल सेटिंग लावलं तर साडेचार मिनिटं पुरावीत. नंतर एक तास तरी मावेतच (मावे बंद करून) ठेवाव्यात, म्हणजे पुरेशी गरमी-नरमी मिळते.
ग्रील सेटींग? आणि फक्त
ग्रील सेटींग? आणि फक्त साडेचार मिनिटं? सहीच आहे!!!! +१
पौर्णिमा, हा छान फोटो आहे.
पौर्णिमा,
हा छान फोटो आहे. खुशखुशीत दिसताहेत.
वा! मस्तच पूनम. ग्रील
वा! मस्तच पूनम. ग्रील सेटींगचा शोध लावून तू मला मोहात पाडलंयस पूनम, आता नानकटाया करतेच मी. उद्या अनायासे 'मातृदिन' आहे आणि अम्मासाहेब भेटणारही आहेत.
मी पण केल्या.. मस्त झाल्या
मी पण केल्या.. मस्त झाल्या होत्या.
धन्स,
पण पांढर्याच राहील्या. रंग काही आला नाही. असं का?
मस्तच. उद्या करून बघणार.
मस्तच. उद्या करून बघणार.
मी संडेला करणार नक्की...सोपी
मी संडेला करणार नक्की...सोपी वाटतेय पण जमेल का??????
सोपी आहे, या वीकएंडला नक्की
सोपी आहे, या वीकएंडला नक्की !!
हे सगळे वाचून नानकटाई करून
हे सगळे वाचून नानकटाई करून बघायचा खूप मोह होतो आहे, पण तुप वापरले की माझी नानकटाई एकदम तुपट होते आणि लेकीला आवडत नाही. भिजवून ठेवल्याने फरक पडेल का?
बाहेरच्या सारखी खुसखुशीत होते का?
मावे नसेल तर कुकर मधे करता
मावे नसेल तर कुकर मधे करता येतील का? केक सारखे?
दीपा, बाजारची नानकटाई आणि घरी
दीपा, बाजारची नानकटाई आणि घरी केलेली नानकटाई, दोन्हींच्या चवीत फरक असतो. ही नानकटाई तू करून पहा, लेकीला नक्की आवडेल.
प्रिती, मी कूकरचा उपयोग 'भाजण्यासाठी' कधी केला नाहीये, त्यामुळे सांगू शकत नाही.
तू थोड्या प्रमाणात जिन्नस घेऊन प्रयोग करून बघू शकतेस.
धन्यवाद मंजूडी, छान खुसखुशीत
धन्यवाद मंजूडी, छान खुसखुशीत झाली नानकटाई. पण २५ मिनीटात जरा जास्त भाजली गेली पुढच्यावेळी कमी भाजीन
सहिचे हे.. आजच बघते करुन..
सहिचे हे..
आजच बघते करुन..
तूप फेसायचं म्हणजे नक्कि काय करायच?
काल रात्री करुन पाहिल्या कुकर
काल रात्री करुन पाहिल्या कुकर मधे आधी १५ मिन ठेवायचे ठरवले पण उघडुन चाकुने डोचवुन बघितल्या वर मऊ वाटल्या आणखी १० मि ठेवु तर थोड्याश्या करपटल्या
चवीला चागंल्या झाल्यात [अर्थात करपट भाग सोडुन]
कमे गोड झाल्या
यात माझा साईड प्रयोग
१ चमचा नाचणी पिठ
१ चमचा गव्हाचे पिठ
बे पावडर किंचित जास्त
पुढच्या वेळी नाचणी चे प्रमाण जास्त करुन ट्राय करते
मज्याकडे OTG आहे, त्यावर किती
मज्याकडे OTG आहे, त्यावर किती डिग्री ला किती वेळ ठेवावे लागेल.
आणि मैद्यैवाजी पूर्णपणे गव्हाचे पीठ वापरले का कोणी...मी तसे करायचा विचार करतेय
गीतु, विपू पहा. OTG मध्ये १८०
गीतु, विपू पहा. OTG मध्ये १८० डिग्री से. ला both side option select kara aani 20 minutes bake kara.
अवनी, परातीत तूप घेऊन
अवनी, परातीत तूप घेऊन हाताच्या बोटांनी भरपूर वेळ गोल गोल फिरवून घे. ते तूप कणीदार असेल तर हलकं झालेलं तुझ्या बोटांना जाणवेल, मग त्यात पिठीसाखर मिसळून ती विरघळेपर्यंत पुन्हा बोटांनीच फेटव. तूप कणीदार नसेल, पातळ असेल तरी हरकत नाही. साधारण पाचेक मिनीटं गोल गोल फिरव आणि मग त्यात पिठीसाखर घालून ती विरघळेपर्यंत फेटवून घे.
ओके.. \ आता कळल..
ओके.. :)\
आता कळल..
मी अन लेकीनं आजच केल्या.
मी अन लेकीनं आजच केल्या. मैद्याच्या केल्या. भविष्यात शेफ होण्याची मनिषा सध्या मनात बाळगून असल्याने परिक्षेसारख्या क्षूद्र गोष्टींकडे दुर्लक्ष करून केल्या. जवळ जवळ ४०-४५ झाल्या (होत्या). मस्त खुसखुशीत झाल्या (आहेत).
त्यात व्हेरीएशन म्हणजे शेफच्या सांगण्यानुसार रोझ इसेन्स घालण्यात होता. त्यामुळे मिठाईचा वास घरभर दरवळला. ते जरा बोअरच झालं. कृपया नानकटाईत रोझ इसेन्स वापरू नका अशी कळकळीची विनंती.
आणखी एक व्हेरीएशन म्हणजे एका बॅचमध्ये नानकटायांत डार्क चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे ठेवले. मस्त लागतात. नानकटाईत चॉकलेट वापरलेले चालते पण रोझ इसेन्स कृपया वापरू नका.
खरंतर भाजल्यावर अजिबात वाईट लागत नाहीत. तरीही नानकटाईत रोझ इसेन्स वापरू नका.
खाली फोटो देत आहे. काही नानकटायांना शेफतर्फे मेकअप केला गेला आहे.
या पोटात चॉकलेट असलेल्या. आवनमध्ये जाण्यापूर्वी :
आवनफ्रेश चॉकलेटवाल्या नानकटाया :
आतलं मेल्टेड चॉकलेट दिसत आहे.
भाजायला बरोब्बर ४० मिनिटं लागली म्हणजे टेंपरेचरही योग्यच होते म्हणायचे.
मामी, मस्त दिसत आहेत
मामी, मस्त दिसत आहेत नानकटाया. शेफ भारी आहे तुमची. मेकअप भारी केला आहे. ह्या नानकटाया गोल ओव्हन मधे केल्या आहेत का की ओटीजीमधे?
धन्यवाद सुमेधाव्ही. गोल
धन्यवाद सुमेधाव्ही. गोल आवनमध्ये.
मामी तुमच्या शेफचे आणी तुमचे
मामी तुमच्या शेफचे आणी तुमचे पण अभिनंदन. अगदी उचलुन तोंडात टाकावे वाटतेय. पौर्णिमाच्या पण मस्त खुसखुशीत वाटतायत.
आणी मंजुडीला अनेक धन्यवाद ही सोपी पण माझी फेवरीट अशी नानकटाई इथे दिल्याबद्दल.
मामी तुम्हाला माझा प्रश्न खूपच मुर्खासारखा वाटेल, पण माझा विचारण्यातच नाईलाज आहे.:अरेरे:
ह्या गोल ओव्हनचे नाव नीट सांगु शकाल? किंवा त्याचे स्पेलींग, brand name वगैरे लिहाल का प्लीज? कारण मी मागेच ओव्हन, अवन, या नावाने सर्च केले तर मिळत नाही. दुसरे असे की ओटीजी नकोय, हा छोटाच गोल अवन मला हवाय. मी पुण्यात असते. काहींना विचारुन पाहीले तर त्यांच्या ते डोक्यात येईना, बहुतेक मोठी कुकिंग रेंज त्यांना अपेक्षीत असावी.
Pages