बोलगाणी- प्रवेशिका ११- (सिंडरेला)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:39
नाव : इशान
वय : २.५ वर्षे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे मस्तग... इशान चा आवाज मी पहिल्यांदाच ऐकत आहे... Happy

तो गाणं म्हणताना तु रिकाम्या जागा भरल्या वाट्ट्ते Wink

मामाचा वाडा लै ब्येष्ट. शाब्बास इशान.
आमच्या तुपात माशी पडते, मग चांदोबा उपाशी राहतो. Happy
तुपातली पोळी पण आवडली एकदम.

धन्यवाद Happy त्याच्या आवडत्या चांदोबाला उपाशी का ठेवायचे म्हणून मी थोडे बदलून शिकवले आहे:
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी

मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खाऊन जा
तुपात पडली पोळी
चांदोबाने वाजवली टाळी

तुपात पडली पोळी
चांदोबाने वाजवली टाळी
>> हे हे हे..

मी भाचीला असं शिकवलेलं:
तुपात पडली माशी
चांदबोनं खाल्ली पोळी जॅमशी

तुपात पडली पोळी
चांदोबाने वाजवली टाळी>>> मस्तच

मला चिरेबन्दी च्या पुढचे माहीतच नव्हते, आता असेच शिकवेन ओजलला Happy

च्यांदुबा च्यांदुबा हे खूपच आवडलं! खळीदार बाळाचा व्हिडिओ बघायचा होता हे गाणं म्हणताना. आईचं मॉडिफाइड व्हर्जन मस्तंय!

खूप गोड ग! मीपण पोरांना शिकवताना चांदोबाला उपाशी ठेवत नव्हते..मजा वाटली तुझही त्याच बरंचस तसच गाणं वाचून

Pages

Back to top