Take a bow master!
'हल्ली तू क्रिकेटबद्दल लिहित नाहीस का?'
माझ्याकडून लिखाण का होत नाही किंवा मी लिहित का नाही? याबद्दल आस्थेने चौकशी करणारा अजून एक प्रश्न मला एका मित्रानी अगदी कालच विचारला.
आणि ...त्याला मी उत्तर दिलं ...
' लिहावसं खूप वाटतं. हेडन, गिलख्रिस्ट निवृत्त झाले तेव्हा, सचिन तेंडूलकरने क्रिकेट कारकीर्दीची २० वर्ष नुकतीच साजरी केली तेव्हा, शाहीद आफ्रीदीनी नुकताच 'बॉल खाल्ला (की हुंगला?), ...आणि असं काही 'खास' घडत नसतानाही मला क्रिकेटबद्दल खूप लिहावसं वाटतं.
पण या विषयावर 'emotions बाजूला ठेवून rationally लिहीण्याची maturity अजून तरी माझ्यामधे नाहीये' असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून मी इच्छा असूनही क्रिकेटवर लिहीत नाही, किंवा लिहिलं तरी ते माझ्यापुरतंच मर्यादित ठेवते'.
आणि या उत्तरानंतर अवघ्या २४ तासात मी क्रिकेट संबंधी काहीतरी लिहीतीये....जे लिहितीये त्यात कोणतीही 'आकडेवारी नाही, कोणताही analysis नाही..कोणताही तुलनात्मक अभ्यास नाही...कोणत्याही जबरदस्त innings ची किंवा एखाद्या खेळाडुची style, 'नजाकत' सांगणारं वर्णन नाही....'
पण तरीही मी हे लिहीतीये...
मनापासून ,खूप emotional स्थितीत.. आज 'जबरदस्त मस्त वाटतंय... मी खूप खुष आहे' हे एक कारण मला लिहितं करायला पुरेसं आहे !
इथे अमेरिकेत ३ जानेवारी २००८ ची संध्याकाळ. माझ्या हातात नवीन कोरा-करकरीत blackberry... आणि त्यावर मी ball-by-ball follow करत असलेली SCG वर चाललेली India-Aus test match...आणि ती नाबाद १५४ ची innings ! माझ्यासाठी तो blackberry खरेदी केलेल्या दिवशीच वसूल झाला!
खूप लिहावसं वाटलं होतं त्या दिवशी... आणि त्यानंतरही अनेकदा... प्रत्येक नवीन record च्या वेळी !
...पण माझ्याकडून काहीही लिहिलं गेलं नाही...म्हणून आज ठरवलं ' आज लिहायचंच. कितीही फालतू वाटलं स्वत:लाच आपणच केलेलं हे लिखाण, तरीही लिहायचं....आज त्याच्याबद्दल खूप लोकं लिहीतील, कदाचित त्यातल्या अनेकांचं लिखाण वाचलंही जाणार नाही, अनेकांच्या लिखाणाचं कौतुक होईलं, काहींच्या लिखाणाची चेष्टाही... पण आज ह्या 'दिंडीमधे' आपणही सामील व्हायचं...आज त्याच्यासाठी लिहायचं' !
कोणतेही विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, ते मोडलेही जातात...जावेत... कारण त्यात विक्रम करणारा आणि विक्रम मोडणारा ह्या दोघांचाही सन्मान असतो. पण तरीही 'पहिला' हा मान कायम 'पहिल्याकडेच राहतो'...
सचिनला आजचा हा सलाम ह्या पहिल्या २०० साठी
एक दिवस कदाचित सचिनचा हा आजचा विक्रम मोडला जाईल.
या मधल्या काळात कदाचित ' सचिनचा खेळ आपण बघू शकतो आणि त्याहीपुढे जाऊन तो appreciate करण्याची क्षमता आपल्यात आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. ह्यातच मी खूप समाधानी आहे ' .. या दोन ओळींच्या वर 'त्याच्याबद्दल' माझ्याकडून काही लिहिलंही जाणार नाही.
तरीही 'त्या' एके दिवशी " २४ फेब्रुवारी २०१०" ला सचिनसाठी आपण हे लिहायला हवं होतं अशी हुरहुर मनाला वाटू नये म्हणून केलेलं हे तुटकंफुटकं लिखाण...केवळ सचिनसाठी आणि त्याच्या आजच्या नाबाद २०० साठी !
(No subject)
मस्त ग ! मला तर आधीच हुरहूर
मस्त ग !
मला तर आधीच हुरहूर लागायला लागलीय की आपण काहीच लिहिलं नाहीये !
पण मस्त ... मस्त !
तू म्हणाल्याप्रमाणे >> ' सचिनचा खेळ आपण बघू शकतो आणि त्याहीपुढे जाऊन तो appreciate करण्याची क्षमता आपल्यात आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. ह्यातच मी खूप समाधानी आहे ' ..>> ह्याच्याशी एकदम सहमत.
च्यायला .. अमेरिकन वेळेप्रमाणे आज पहाटे इतिहास घडताना मी झोपलो होतो ही हुरहुर तर आता कायमची लागणार आहे !!
सही! आज बर्याच जणांना असे
सही! आज बर्याच जणांना असे लिहावेसे वाटले असेल. तसे सचिन बद्दल इतर कोणीही न लिहीलेले काही असणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे लिहीत राहा.
आताच तुनळीवर पाहिली सचिनची
आताच तुनळीवर पाहिली सचिनची ईनिंग
चला - रार परत एकदा लिहायला
चला - रार परत एकदा लिहायला लागली !
[अजून एका कारणासाठी] धन्यवाद सचिन !
रार.. भावना पोहोचल्या...
रार..
भावना पोहोचल्या... बरोबर बोललीस. नंतर बोलुच
भा पो
भा पो
नंद्या.. अगदी अगदी...
नंद्या.. अगदी अगदी...