चित्रक

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

जंगलात चालताना नजर पायाखाली ठेवावीच लागते आणि अश्यावेळी खुपदा पायवाटेच्या शेजारी आपल्याला चित्रकाची साधीशी फुले दिसु शकतात.

हा फोटो जरा जास्तच डिटेलमधे घेतलाय, कारण हे फुल जेमेतेम १ सेमी व्यासाचे असते, आणि यासारखी दिसणारी अनेक फुले असु शकतात. पण पुष्पकोषावरच्या लहान लहान ग्रंथी या, चित्रकाची खासियत, यामूळे हे झुडुप सहज ओळखता येते.
याची निळसर राखाडी फ़ुले येणारी जात दिसते शिवाय क्वचित लाल फुले येणारी जातही दिसते. यापैकी निळी करडी जात खुपदा शोभेसाठी लावलेली दिसते.
134659.jpg

वरचा फोतो बघुन अनेकजणाना जे झुडुप ओळखीचे वाटले असणारच. पण वाटते तितके हे झुडुप साधे नाही बरं का.
Plumbago zeylanica असे याचे शास्त्रीय नाव. याचे छोटेसे झुडुप असते आणि सदा हिरवेगार दिसते. याचा दांडा गोल असतो आणि याला पुष्कळ फांद्या फ़ुटलेल्या असतात.
पानाना देठ नसतो. पाने एका आड एक येतात आणि साधारण मोगर्‍याच्या पानासारखी दिसतात.
झुडुपाच्या मानाने मुळे मोठी, आणि लांब असतात. याच्या मूळात एक दाहजनक द्रव्य असते. चित्रकाची ओली साल ठेचुन अंगाला लावली तर त्या भागावरील कातडीचा खुप दाह होतो आणि ती भाजल्यासारखी दिसते.

पण तरिही चित्रक खुप औषधी आहे. ( परत एकदा सूचना, कुठलेही आयुर्वेदिक औषध जाणकार वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचे असते. आयुर्वेदिक औषधे करण्याची प्रक्रिया हि खुपदा गुंतागुंतीची असते. या प्रक्रियेनंतर वनस्पतिंचा विखार नष्ट होतो, व केवळ उपयोगी सत्व शिल्लक राहते. )
चित्रक वात आणि पित्तावर खुप उपयोगी आहे. गुप्तरोगात आणि तत्सम विकारात चित्रकाचा वापर करतात. खरुज, मूळव्याध व पांडुरोगावरही त्याचा उपयोग होतो.
बाजारात चित्रक हा घटक असलेली अनेक औषधे उपलब्ध आहेत.

पण आपण मात्र या फुलांचे सौंदर्य नजरेने टिपून घेऊ या. यात मात्र कुठलाच धोका नाही.

विषय: 
प्रकार: 

छान आहे चित्रक,
दिनेश, गेल्या आठवड्यात रायगडावर गेलो होतो आम्ही तेव्हा अर्जुनासारखाच दिसणारा वृक्ष दिसला पण त्याच्या हिरव्या फळांच्या मध्ये एक काटेरी गोल होता हिरवाच. मी सरळ हा अर्जुन म्हणुन सांगितले सगळ्यांना पण तरिपण मनात शंका आली कि नक्कि अर्जुन कि त्याच्यासारखाच कुणितरी दुसरा??
बाय द वे, माहिमची सहल ठरत असेल तर मी पण आहे. तुमच्यासारखा झाडाड्या (वाट दाखवणारा वाटाड्या, मग झाडे दाखवणारा?) नवसाने पण सापडणार नाही कुठे....
साधना

दिनेश

छान आहे माहीती आणि फोटोही चित्रक चे.

<<< बाय द वे, माहिमची सहल ठरत असेल तर >>>
खरच का रे ? मला विसरू नका रे. प्लिज.....

फुल एकदम नाजुक दिसतय. फुलाचं नाव आणि माहितीपण छानच.

सुंदर चित्रक .

फोटो आणि माहिती दोन्ही सहीच!

मस्तच! न्रेहमीप्रमाने माहितीपुर्ण.
आता ही लेखमाला अशीच सुरु राहणार ना?

खरच का रे ? मला विसरू नका रे. प्लिज.....

अमित तारिख पाहिली नाही काय??? नोव्हेंबर २००७ चा प्लान होता तो, जो अजुनही ठरतोयच Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...