दिवस कसा बसा सरला संध्येला देत हाक
मावळत्या क्षितिजाशी आली अंधाराला जाग
आठवांच्या काजळीने मनात झूरली सांजवात
आसवांच्या स्पर्शाने पून्हा थरथरली सांज रात !!
स्वर तुझे ऍकण्यास
मन आतूर हे जाहले....
तुझ्या अबोल त्यागा चरणी
मी सूर माझे वाहीले....
नाहीस तू मज पाशी, तरी
स्पशाने तुझ्या नाहले....
नसशील तू नसेन मी
प्रेम ऊणे राहीले....
स्वर तुझे.........
चारोळी
दिवस कसा बसा सरला संध्येला देत हाक
मावळत्या क्षितिजाशी आली अंधाराला जाग
आठवांच्या काजळीने मनात झूरली सांजवात
आसवांच्या स्पर्शाने पून्हा थरथरली सांज रात !!
माणक्या...
माणक्या... वेलकम बॅक
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलय.
-प्रिन्सेस...
काटे
प्रत्येक गुलाबाच्या देठावर
असतात भरपुर काटे
ती फुलांच्या संरक्षणार्थ तर...
नसावीत असं मला सारखं वाटे !
गणेश (समीप )
चारोळी
चारचौघात बसल्यावर हसेनही मी
किमान तूम्ही तरी त्याला फसू नका
कारण जाणून घेण्याचा विचारही नका करु
पण किमान उत्तरादाखल तरी हसू नका!
हाय
अरे माणक्या, कुठे गायबला होतास?
तुझ्या झुळुका नेहेमीप्रमाणेच मस्त रे!!!
दवबिंदू...
दवबिंदूचा धागा धरुन माझी एक जुनी कविता पोस्ट करतो आहे.
रात्रभर खेळ खेळून
एक दवबिंदू थकलं
मग गवताच्या पात्यावर
निमुटपणे झोपलं
कोंबड्याने बांग देताच
मोत्या सारखं हसलं
त्याला रविचं बाळ समजून
सारं रान फसलं
वार्याने शीळ घालताच
सारं रान हललं
ते ही येडं घाबरून
धरेच्या कुशीत शिरलं.
-सत्यजित
दवबिंदू...
deleted
मनोज
खुपच छान रे मनोज खरंच आवडलं मला मस्त .
....होळी स्पेशल
कडकडून मिठीत शिरुन
चुंबनांचा वर्षाव करुन
रंगली भेट कालची
शत-रंग डोळ्यांत भरुन
खुपच सुंदर
किती कमी शब्दामंध्ये कितीतरी जास्त सांगितल आहेस. खरोखर मनापासुन आवडल.
आला पाऊस अवेळी
आला पाऊस अवेळी
तुझी आठवण घेऊन
माझ्या मनातल्या तुझ्या हिरवाईला
गेला उजाळा देऊन
पापणि.......
सुखात् आणि दु:खात्
पापण्या एकसारख्या वागतात!!!!!
डोळ्यातून ओसरणार्या भावना
आपल्या पदराखालि झाकतात!!!!!
वाह्...माणक्या....
आप आये बाहार आइ........
छानच.........
अभिव्यक्तींना आपल्या
तरी स्वतंत्र स्पंदन आहे......स्वारा छानच....
Keep it up dear...
विरह....
भाव नयनी ऊभा,
आता, शब्द कंठी दाट्ले...
विरहाने डाव साधला,
अन्, काळिज पुन्हा फाट्ले...
छान.....
वार्याने शीळ घालताच
सारं रान हललं
ते ही येडं घाबरून
धरेच्या कुशीत शिरलं.
-सत्यजित छान लिहीले आहेस.....
मिली सेकंद, मेगॅ सेकंद
तिच्याशी नजरा नजर झाली,
त्या कांही मिली सेकंदातील
ती दिव्य अनुभूति सांगण्यास,
अनेक मेगॅ सेकंद लागतील
( १ मिली सेकंद=सेकंदाचा हजारांवा भाग
१ मेगॅ सेकंद = १० लाख सेकंद = सुमारे १२ दिवस)
(अस्मादिकांची १९७१ मध्ये कॉलेजातील चारोळी)
प्रा.(इं)सुरेश खेडकर ( नागपूर)
एकटेपणा
फांदीचा एकटेपणा
नविन पालवी दूर करेल
निर्विकार पाचोळा मात्र
मुळाशी जमिनीत मिसळेल.
एकटेपणा
मी जेव्हा झुळुकेच पान ओपन केल तेव्हा मला शेवटी मेघधारा यांची पानगळती दिसली. मी तीच शेवट्ची झुळुक समजुन तिला हा प्रतिसाद दिला आहे.
स्वर....
स्वर तुझे ऍकण्यास
मन आतूर हे जाहले....
तुझ्या अबोल त्यागा चरणी
मी सूर माझे वाहीले....
नाहीस तू मज पाशी, तरी
स्पशाने तुझ्या नाहले....
नसशील तू नसेन मी
प्रेम ऊणे राहीले....
स्वर तुझे.........
भावनेत भाव नाही...
भावनेत भाव नाही...
आज शब्दांची साथ नाही...
वाट पाहतो हाथ माझा,
सोबती तुझा हाथ नाही...
माझ्या शब्दांचे हुंद्के....
माझ्या शब्दांचे हुंद्के
तुला कधी कळलेच नाही....
म्हणे सोबती जीवनाचे,
पण, मन कधी जुळलेच नाही....
माझ्या शब्दांचे हुंद्के....
खुप छान!
मोकळे आकाश दिले...
बंधने प्रिय झाली
तेव्हा, तोडून तू पाश दिले...
हरूनी पंख माझे
मग, मोकळे आकाश दिले...
छान.
छान. नदी...झरा...मस्तच्...किनारा
सुमा
छान...झक्का
छान...झक्कास
सुमा
शब्दांचे
शब्दांचे खेळ पूरे आता,
क्षण हे अबोल राहुदे...
प्रेमाच्या मेघधारा
ह्रुदयातून वाहुदे...
कंठ नि:शब्द जाहला
भाव नयनी पाहूदे...
शब्दांचे खेळ पूरे आता....
पाऊस पडत
पाऊस पडत होता,
आकाश रडत होत ,
तुझ्या माझ्या विरहाच दु:ख,
त्यालाही कळत होत!
तुला नाही
तुला नाही पाहीले,
तर ह्रुदय पिळवटून निघते,
तुझ्या शिवाय जगणे,
केवळ अशक्य!
पाऊस पड त
पाऊस पड त होता,
आकाश रडत ,
तुझ्या-माझ्या विरहाच दु:ख,
त्यालाही कळल होत!
Pages