***
सरत्यावेळी आज माझं
कातरलं रे मन..
चंद्रसाक्षी आठवल्या अन
पेटला कणन कण!
***
आम्हाला पाहून मृत्यूही
जन्म घेऊन ओशाळतो-
तीनशे चौसष्ठ मरणे जगल्यावर
आमचा एक जन्मदिवस येतो!
***
मृत्यू समोर आल्यावर त्याच्या
गळ्यातच हात टाकला..
म्हटलं, बरं झालं, आजपर्यंत
कुणी भेटलाच नव्हता आपला-!
***
शेवटी एकदा वाटून गेलं,
जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं
हे आयूष्य नव्हतंच!
***
आता वेलमोगरा बघितला,
की तुझीच आठवण येते..
तो तुला कधीच भावला नाही-
याची हटकून याद येते..!
***
स्वतःलाच जपत राहण्याचा
आता कंटाळा येऊ लागलाय्,
कुठेतरी झोकून देण्यार्याचा
मला हेवा वाटू लागलाय..!
***
माझ्या डायरीने आजच्या
पावसाची नोंद केली..
तिच्या नितळ पावलांत मला
थेंबांची प्रतिबिंबे दिसली-!
***
अलीकडे माझ्या घरचा
आरसाही बेईमान झालाय,
चेहेर्याऐवजी त्यात माझा
मुखवटाच दिसू लागलाय..
***
तुझ्यासारखीच हट्टी रातराणी,
कधी अवेळी फुलते..
मग चंद्रसाक्षी नसतानाही
श्वासांत होळी पेटते..!
***
पाण्यात पडल्यावर एकदा
पाणी आपलंच असतं..
अंधाराची सवय झाल्यावर
त्याचं भय नसतं..
***
जन्मल्यावर काय करावं-
याचं मनास कोडं पडलं
आता करावं तरी काय,
म्हणून हे आयूष्य जगून टाकलं!
***
तुला समजतंय का बघू- म्हणून
मी काही बोललो नाही,
पण न समजण्यातलं नाटक किती-
हेच कधी उमगलो नाही..
***
निशेच्या कुशीतलं
श्रावणाचं कोसळणं..
अन ओलेत्याने तुझं
माझ्यावर बरसणं..
***
मन आज कातरलं गं,
श्रावण कोसळला तेव्हा..
पण डोळ्यांमुळे, की पावसामुळे गं?
अन पापण्या भिजल्या केव्हा?
***
बर्याचश्या विचारांचा प्रवास
मनात कुठेतरी सुरु होतो
आणि कवितेपाशी येवुन थांबतो...
पण काहीकाही प्रवास मुळात सुरुच होतात कवितेपाशी
आणि मग रेंगाळत रहातात मनभर...
घरट सापडत नसलेल्या पिलासारखे
कावरेबावरे.... कातरकातर!
eye.gif (44.37 KB)
eye.gif (44.37 KB)
श्रध्दा या
श्रध्दा या शब्दातच
जगण्याचं सामर्थ्य आहे,
डोकं गहाण ठेवून जगणं
हा अंधश्रध्देचा अर्थ आहे...
सुरेख! दवात
सुरेख!
दवात भिजल्यासारख॑ वाटल॑
पैसा
पैसा म्हणजे सर्वस्व
हेच आयुष्यभर मानतात
त्यामुळे दानधर्म बहुदा
स्मॄतिप्रित्यर्थ करतात.
काय करावे
काय करावे काही सुचेना
जीव कसा हा गुन्तला
श्वास जणु येता येता
वेशिवर खुन्ट्ला
आरोही
दूर ओल्या
दूर ओल्या क्षितीजावर आकाश टेकलेले,
ढग प्रुथ्वीच्या ओढीने हळवे झालेले,
मनाला येई भरते ग,
कधी दुपार हि सरते?
दूर ओल्या
दूर ओल्या क्षितीजावर आकाश टेकलेले,
ढग प्रुथ्वीच्या ओढीने हळवे झालेले,
मनाला येई भरते ग,
कधी दुपार हि सरते?
दूर ओल्या
दूर ओल्या क्षितीजावर आकाश टेकलेले,
ढग प्रुथ्वीच्या ओढीने हळवे झालेले,
मनाला येई भरते ग,
कधी दुपार हि सरते?
छान......! नाना
छान......!
नानासाहॅब
तुझ्यासाठ
तुझ्यासाठी मी नेहमीच अश्रु ढाळलेत
बघ माझ्या गालावर तसेच वाळलेत
अश्रुलाच माहीत नाही मी कोणासाठी झुरतोय
मी तुझ्यावर मात्र फार प्रेम करतोय
चार ओळी
चार ओळी खुपच सु॑दर! आवडल्या.
नरे॑द्र दाभोळकरा॑ना वाचण्यास पाठवल्या पाहिजेत.
ती कळी
ती कळी "प्रेमाची" मनात फुललेली..
मैत्रीपुर्ण धुक्यात सुंदर नटलेली..
दवबिंदुचा तो अल्पसा सुखद स्पर्श सरताना
मात्र फुलण्याआधीच.. ती कोमेजलेली..
*** सरत्यावे
***
सरत्यावेळी आज माझं
कातरलं रे मन..
चंद्रसाक्षी आठवल्या अन
पेटला कणन कण!
***
आम्हाला पाहून मृत्यूही
जन्म घेऊन ओशाळतो-
तीनशे चौसष्ठ मरणे जगल्यावर
आमचा एक जन्मदिवस येतो!
***
मृत्यू समोर आल्यावर त्याच्या
गळ्यातच हात टाकला..
म्हटलं, बरं झालं, आजपर्यंत
कुणी भेटलाच नव्हता आपला-!
***
शेवटी एकदा वाटून गेलं,
जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं
हे आयूष्य नव्हतंच!
***
आता वेलमोगरा बघितला,
की तुझीच आठवण येते..
तो तुला कधीच भावला नाही-
याची हटकून याद येते..!
***
स्वतःलाच जपत राहण्याचा
आता कंटाळा येऊ लागलाय्,
कुठेतरी झोकून देण्यार्याचा
मला हेवा वाटू लागलाय..!
***
माझ्या डायरीने आजच्या
पावसाची नोंद केली..
तिच्या नितळ पावलांत मला
थेंबांची प्रतिबिंबे दिसली-!
***
अलीकडे
अलीकडे माझ्या घरचा
आरसाही बेईमान झालाय,
चेहेर्याऐवजी त्यात माझा
मुखवटाच दिसू लागलाय..
***
तुझ्यासारखीच हट्टी रातराणी,
कधी अवेळी फुलते..
मग चंद्रसाक्षी नसतानाही
श्वासांत होळी पेटते..!
***
पाण्यात पडल्यावर एकदा
पाणी आपलंच असतं..
अंधाराची सवय झाल्यावर
त्याचं भय नसतं..
***
जन्मल्यावर काय करावं-
याचं मनास कोडं पडलं
आता करावं तरी काय,
म्हणून हे आयूष्य जगून टाकलं!
***
तुला समजतंय का बघू- म्हणून
मी काही बोललो नाही,
पण न समजण्यातलं नाटक किती-
हेच कधी उमगलो नाही..
***
निशेच्या कुशीतलं
श्रावणाचं कोसळणं..
अन ओलेत्याने तुझं
माझ्यावर बरसणं..
***
मन आज कातरलं गं,
श्रावण कोसळला तेव्हा..
पण डोळ्यांमुळे, की पावसामुळे गं?
अन पापण्या भिजल्या केव्हा?
***
साजिरा, मृत
साजिरा,
मृत्यू समोर आल्यावर त्याच्या
गळ्यातच हात टाकला..
म्हटलं, बरं झालं, आजपर्यंत
कुणी भेटलाच नव्हता आपला-!
अप्रतिम...शब्दच नाहीत.
सुमा (उमेश पवार)
बर्याचश्
बर्याचश्या विचारांचा प्रवास
मनात कुठेतरी सुरु होतो
आणि कवितेपाशी येवुन थांबतो...
पण काहीकाही प्रवास मुळात सुरुच होतात कवितेपाशी
आणि मग रेंगाळत रहातात मनभर...
घरट सापडत नसलेल्या पिलासारखे
कावरेबावरे.... कातरकातर!
-स्वरुप
इथे काव्य
इथे काव्य संपले दोन ओळीत सारे
चालीत त्या मग वाचले पुढचे उतारे
सगळ काही
सगळ काही चालीत वाचण्याची सक्ती कशाला
गझल नावाचा वेगळा विभाग केलाय ना त्याला
Pages