



आपली छोटी मायबोलीकर "जुई" हिने वरील मजकुर लिहिण्यास मदत केली आहे.
ही स्पर्धा खालील वयोगटात घेण्यात येणार आहे:
गट क्रमांक १: प्रिस्कुल ते इयत्ता पाचवी
गट क्रमांक २: इयत्ता सहावी ते नववी
गट क्रमांक ३: इयत्ता दहावी ते बारावी
स्पर्धेचे विषय :
१. आवडता मराठी सण
२. आईबाबांबरोबर घालवलेला सुट्टीचा दिवस
३.मला मराठी बोलायला का आवडते वा आवडत नाही
४.आईबाबांच्या कामाची अदलाबदल
५.माझी आवडती व्यक्ती/मित्र/मैत्रिण
६. आई सुट्टीवर जाते
स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Evalese Rop असे नमूद करावे.
स्पर्धेसाठी माध्यम: लिखीत (स्कॅन करुन), व्हिडीओ, ऑडिओ
साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०
अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha at maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच धाग्यावर आपला प्रश्न विचारावा.
अरे वा!. जुईबरोबर तुम्हा
अरे वा!. जुईबरोबर तुम्हा दोघांचही कौतुक घरात मराठी अगदी जागी ठेवल्याबद्दल.
आता घरुन इथे आल्यावर जुईचा
आता घरुन इथे आल्यावर जुईचा आवाज ऐकला


कस्ला गोड हे! उच्चारही स्पष्ट!
अन ही लहान मुलगी परदेशात रहात असलेली असेल असे वाटतही नाही इतके छान मराठी बोललीये
आर्चला अनुमोदन, पालकान्चे खास अभिनन्दन अन जुईला शुभेच्छा-शुभाशिर्वाद
'आपण स्पेशल आहोत, म्हणून आपली
'आपण स्पेशल आहोत, म्हणून आपली भाषा मराठी आहे- असं आई म्हणते!!!' किती गोड आणि निरागस! अमृता, जुईला स्पेशल पाणीपुरी करून घाल बरं यासाठी
धन्यवाद! हा मजकूर रैना ने
धन्यवाद!
हा मजकूर रैना ने लिहुन दिलेला. फक्त जुईने तिच्या स्टाइलने म्हंटलय.
सोमवार, फेब्रुवारी २२ पर्यंत
सोमवार, फेब्रुवारी २२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
धन्यवाद
संयोजक, फेब्रुवारी २२ पर्यंत
संयोजक,
फेब्रुवारी २२ पर्यंत मुदतवाढ देण्याबद्दल धन्यवाद!
माझ्या मुलीची एक प्रवेशिका पाठवली आहे. कृपया मिळाली की नाही ते कळवाल का?
मंजिरी. तुमच्या मुलीची
मंजिरी.
तुमच्या मुलीची प्रवेशिका मिळाली.
धन्यवाद.
माझ्या मैत्रिणीच्या मुलीची
माझ्या मैत्रिणीच्या मुलीची (अणुरिमा चट्टोपाध्याय) प्रवेशपत्रिका मिळाली की हे नाही कळु शकेल का? काल दुपारी पाठवली होती ई-मेल. धन्यवाद.
मंडळी, प्रवेशिका आमच्यापर्यंत
मंडळी,
प्रवेशिका आमच्यापर्यंत पोचवण्याची मुदत संपलेली आहे. ह्यापुढे आलेल्या प्रवेशिका स्विकारण्यात येणार नाहीत.
आपल्या सक्रिय सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तसंच, सगळ्या प्रवेशिका शेवटच्या दिवशी इथे प्रदर्शित केल्या जातील.
अनुदोन,तुमच्या मैत्रिणीची
अनुदोन,तुमच्या मैत्रिणीची प्रवेशिका मिळालेली आहे.
शेवटचा दिवस म्हणजे कधी ? २७
शेवटचा दिवस म्हणजे कधी ? २७ फेब्रुवारी का ? ( माझे ) इवलेसे रोप वाट बघत आहे , " मायबोली " एव्हढे मराठी वाचता यायला लागलंय . ( मराठी भाषा दिवस स्पर्धेचा परिणाम छान झालाय
)
>>(माझे) इवलेसे रोप वाट बघत
>>(माझे) इवलेसे रोप वाट बघत आहे>>
अगदी अगदी... आमच्याकडे पण रोज वाट बघणं सुरु आहे. आणि "मोठया लोकांच्या पत्रांची टर्न लहान मुलांच्या पत्रांच्या आधी का?" अशी विचारणा पण होत्ये
उद्या खरा महत्वाचा दिवस ना?
उद्या खरा महत्वाचा दिवस ना? २७ फेब्रुवारी 'मराठी भाषा दिन' ? मग "खास" दिवसासाठी त्यांना राखून ठेवलंय म्हणून सांगा.
Pages