Submitted by नानबा on 10 February, 2010 - 16:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पोहे (पातळ - जाड कुठलेही चालतील)
दही
कढीपत्ता
२ हिरव्या मिरची
कोथिंबीर,जीरे,मोहोरी, हळद
मीठ
क्रमवार पाककृती:
१ वाटी पोहे भिजवून घ्या. त्यात दोन मोठे चमचे दही (जेवढ आंबट तेवढ चांगलं) घाला.
ह्यात जीरे, मिरच्या, मीठ आणि जराशी कोथिंबीर घालून मिक्सर मधून फिरवा.
जीरे, मोहोरी कढीपत्ता, जराशी हळद घालून चळचळीत फोडणी करा आणि त्यात हे सगळं मिश्रण घाला.
एकदा हलवून झालं की एक वाफ येऊद्या.
वाफ आली की बाऊलमध्ये घालून थोडं तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खा.
वाढणी/प्रमाण:
अंदाजे सव्वा माणूस ;)
अधिक टिपा:
आवडत असेल तर जराशी साखरही घालू शकता.
ह्याची कृती जवळपास तांदळाच्या उकडीसारखीच असली तरी चव वेगळी लागते (पोह्यांच्या स्वत:च्या चवीमुळे आणखीन छान!)
गरम गरमच भारी लागतं.
माहितीचा स्रोत:
प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्याच पिठाचे डोसे पण मस्त
ह्याच पिठाचे डोसे पण मस्त लागतात (पण तेल जास्त पितात आणि मिश्रण थोडावेळ मुरायला लागतं - अगदी लगेच करून खाता येत नाहीत.)
मस्तय!! उद्याचा ब्रेकफास्ट
मस्तय!! उद्याचा ब्रेकफास्ट हाच!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्म्म, वेगळीच आहे रेसिपी.
ह्म्म, वेगळीच आहे रेसिपी. पोह्यांची आहे म्हणजे करुन बघायला हरकत नाही.
मस्तच. करुन बघणार
मस्तच. करुन बघणार आज-उद्यातच.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सव्वा माणूस
वेगळी वाटतेय रेसिपी. नक्की
वेगळी वाटतेय रेसिपी. नक्की करुन बघेन.
मी केली आत्ता. छान चव आहे.
मी केली आत्ता.
छान चव आहे. मी ती फोडणी घातली नाही, नुसते वाफवताना वरुन तेल घातले.
दगडी पोहे होते ते वापरले.
वॉव लालू लगेच करुन खाल्लीसही.
वॉव लालू लगेच करुन खाल्लीसही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोडणीतलं तेल, वरून तूप...
फोडणीतलं तेल, वरून तूप... बापरे नानबा वजन ????
सोप्पी पाकृ दिसत्ये.. !
फोडणीतलं तेल, वरून तूप...
फोडणीतलं तेल, वरून तूप... बापरे नानबा वजन![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>> हे हे हे.. कृतीत दिलय, म्हणजे मी घालून खाते असं नाही!
पग्या लेका खाउदे तिला. ती
पग्या लेका खाउदे तिला. ती आधीच तळलेले बैंगन खात नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पग्या, केदार... -- भेटा
पग्या, केदार...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
-- भेटा कुठल्यातरी जीटीजी मध्ये!
(खूप हसले!)
दगडी पोहे म्हणजेच जाड पोहे
दगडी पोहे म्हणजेच जाड पोहे ना?
चांगली आहे कृती नानबा.
मी पण करुन खाल्ली. झकासच्
मी पण करुन खाल्ली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकासच् ,
भरपुर कोथिंबीर घातली.
मी जाड पोहेच वापरले होते [ते कसे संपवायचे हाही मोठ्ठा प्रश्न होता तोही मस्तपैकी सुटला]
सही.. उद्या करुन बघेन
सही..
उद्या करुन बघेन
मी पण केली.. सही लागतेय. मला
मी पण केली.. सही लागतेय. मला तांदळाच्या उकडीपेक्षा ही जास्त आवडली.
मलापण
मलापण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी परवा करुन पाहीन नानबा (
मी परवा करुन पाहीन नानबा ( उद्या महाशिवरात्र आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोप्पी, आणि लो कॅलरी वाटतेय कृती छानपैकी.
धन्यवाद.
अरे वा!! वेगळी कृती आहे ही..
अरे वा!! वेगळी कृती आहे ही.. मी पण करून बघणार.
रैना, शिवरात्रीचा उपास सोडायला लसूण घातलेली उकड का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भारी वाटते आहे! माझ्याकडे
भारी वाटते आहे! माझ्याकडे (चुकुन) आणलेले दगडी पोहे आहेत ते पण संपतील :))
मस्त कृती आहे. पोह्याची अजून
मस्त कृती आहे. पोह्याची अजून एक यम्मी पण तेलकट रेसिपी नुकतीच कळलिये, पण नानबाला तेल आवडत नाही म्हणून लिहित नाही
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
पूनम
पूनम![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
.
.
पोह्याची अजून एक यम्मी पण
पोह्याची अजून एक यम्मी पण तेलकट रेसिपी नुकतीच कळलिये, पण नानबाला तेल आवडत नाही म्हणून लिहित नाही
>> हे हे हे.. थांबा मी माझं तेलाचं पोस्ट डिलीट करते.. (नाहितर पुढच्या प्रत्येक पाक कृतीत माझा उद्धार व्हायचा!;) )
लालू, मनिषा, HH - लगेच केलीत, सही आहात!
आज करुन बघतेय ब्रेफाला.
आज करुन बघतेय ब्रेफाला. कालपासून खुणावतेय.
आज सकाळी खाल्ली, मस्त एकदम!!
आज सकाळी खाल्ली, मस्त एकदम!! नवर्याला तांदुळाच्या पिठाची आवडत नाही पण ही आवडली. मला पण जास्त हिच आवडली. मी पातळ पोहे घेतले, मिक्सरची पण गरज पडली नाही. स्माशरने मस्त मऊ झाले. एकदम यम्म!! धन्यवाद नानबा!! फोटो काढणार होते गं, सकाळी घाई झाली पण जरा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता आज संध्याकाळी घरी गेले की
आता आज संध्याकाळी घरी गेले की करुन खाणारच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रेसिपी.. मला तांदळाची
मस्त रेसिपी.. मला तांदळाची उकड एवढी आवडत नाही, ही करुन बघेन आता.
नानबा, मी केली आजच. पोहे
नानबा, मी केली आजच. पोहे भिजवले आणि दही भरपूर असणारच घरात ह्या गैरसमजात होते. डबा उघडून पाहिला तर पावही नव्हतंपण तोवर परतीचा मार्ग बंद झाला होता म्हणून केली. वाईट नाही लागली पण दही व्यवस्थित असायलाच हवं असं वाटलं तेव्हा आता जास्त दही असेल तेव्हाच करेन.
या पिठाच्या सालपापड्याही
या पिठाच्या सालपापड्याही होतील की. करुन पाहिल्या पाहिजेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नानबा, तळायच्या नसतील तर मायक्रोवेवमध्ये करता येतील.
नानबा. मस्त! पोह्याचे पापड
नानबा. मस्त! पोह्याचे पापड असेच करता येतील अवन मध्ये थापून ठेवून. उकड जराशी कमी पातळ व दही न टाकता,थोडा सोडा टाकून. मी केले होते छान लागतात.
Pages