Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47
इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशु कन्व्हेक्शन मोडमध्ये
आशु कन्व्हेक्शन मोडमध्ये अॅल्युमिनियमचे भांडे चालेल, पण प्लास्टिक चालणार नाही. कन्व्हेक्शन मोडमध्ये नेहेमीच्या ओव्हनमध्ये करतात त्याप्रमाणेच केक करता येतो. केकची कोणतीही रेसेपी चालेल.
मायक्रोमोडमध्ये काचेचे किंवा प्लास्टिकचे भांडे चालते. पण माझे मत प्लास्टिकचे भांडे सहसा वापरु नये, अगदी गरज पडलीच तर एखादी वस्तु गरम करण्यापुरते वापरायला हरकत नाही. पण केक वैगरेला शक्यतो नको. मायक्रोव्हेव मोडमध्ये करायच्या केकची रेसेपी प्राचीने दिलिये.
http://www.maayboli.com/node/12186
ही अजुन एक
http://www.maayboli.com/node/7743
कविता पण करते बहुतेक मावेमध्ये केक. बहुतेक याच धाग्यावर मागे तिने थोडक्यात रेसेपी लिहिली होती.
मला एगलेस केकचि रेसिपी हवि
मला एगलेस केकचि रेसिपी हवि आहे. पन माझ्याकदे मा वे नाही.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
माझ्याकडे बोरोसिलचं
माझ्याकडे बोरोसिलचं प्लॅस्टीकचं झाकण असलेलं भांड आहे. त्यात ते झाकण लाउन भाज्या शिजायला ठेवल्या तर त्या लवकर शिजतात का? मी श्रावण घेवडा, पापडीच्या शेंगा, गवार अशा भाज्या त्यातच करते... पण मला प्लॅस्टीकचं झाकण वापरण्याबाबत शंका आहे ..
मी इथे खरेच बायकात पुरुष
मी इथे खरेच बायकात पुरुष लाम्बोडा आहे. मी गेले ९ वर्षे मावे वापरत आहे. सुरुवातीला नोकरीतल्या बदलीमुळे आणि आता आवड म्हणून.
मावे चा एक फायदा म्हणजे कमी तेल तूप वापरून पदार्थ तितकेच छान करता येतात.
मी सर्वात प्रथम शिरा केला...१ कप रव्याला २ मोठे च तूप वापरून.
एक विनन्ती..मावे क्रुति मधे प्रमाण अणि वेळ यान्चे गणित पर्फेक्ट बसायला हवे. म्हणून नेहेमी दिलेल्या वेळेपेक्शा कमी वेळ शिजवून वर थोडा वेळ थाम्बून पहावे.
ओव्हर कूक केल्याने माझ्या काही रेसिपी बिघडल्या आहेत.
वर कोणीतरी म्हट्ले आहे त्या
वर कोणीतरी म्हट्ले आहे त्या प्रमाणे कट्लेट्स
मावे मधे shallow fry कशी
मावे मधे shallow fry कशी करायची? माझ्याकडे सॅमसंगचा मावे आहे...कृपया लवकर सान्गा मला शनिवारि करायची आहेत............
शॅलो फ्राय करायला त्या
शॅलो फ्राय करायला त्या पदार्थावर चमच्याने तेल सोडून मायक्रो करावा....
बाजू परतून पुन्हा तेल सोडून मायक्रो.
पापड कुरड्याना तेल लावून मायक्रो केले तर न तळता तललेले पापड खाल्ल्याचे समाधान मिळ्ते.
भारतात फक्त शाकाहारी
भारतात फक्त शाकाहारी पदार्थांसाठी कोणत्या ब्रँडचा मायक्रोवेव्ह चांगला आहे? त्याची कोणी सविस्तर माहिती देऊ शकेल का?
छोटे कप केक्स असतात त्याचे
छोटे कप केक्स असतात त्याचे मा.वे प्रुफ साचे मिळतात का?
माझा मावे बिघडलाय. तसा तो
माझा मावे बिघडलाय. तसा तो जुनाही झालाय. शक्यतो तो मी गरम करण्याकरता वापरायची. त्यात केलेले केक, नॉनव्हेज मला कधीच फारसे आवडले नाहीत. साबुदाना खिचडी, शेंगदाणे भाजणे फार तर भाज्या लवकर शिजवणे या साठी तो वापरला. आता मी नवा ओव्हन घ्यायचा म्हणतेय. पण मला काही प्रश्न पडलेत.
पहिले म्हणजे मावे घावा की साधा ओव्हन घ्यावा? कारण मावे तले पदार्थ मला पटत नाही.
पण सध्या भारतात साधे ओव्हन - ओटिजी फार कमी आहेत. आहेत ते मावे किंवा कन्वेन्शन्ल . पण मी कन्हेन्शनल वापरलेला नाही. यात प्रामुख्याने केक कसा होतो? मावेत कितीही केलं तरी केकेला जो एक पांढरट्पणा अन कोरडेपणा ( घशाला कोरडा वाटतो तो) येतो तसा कन्वेन्शनल मध्ये होते का ? का साध्या ओव्हनमधल्या केक सारखाच त्यात होतो केक ?
अन त्याहूनही महत्वाचे म्हणजे मावे मधला रेडिएशनचा प्रश्न . त्या साठी टाळावा का मावे वा कन्हेन्शनल ?
प्लिज मला जरा गाईड कराल ?
धनश्री, मायक्रोव्हेवमध्ये
धनश्री, मायक्रोव्हेवमध्ये वापरण्यासाठी काचेचे मफिन्सचे भांडे बाजारात मिळते. सहा ते आठ कपकेक होवू शकतात त्यात.
त्याशिवाय मायक्रोव्हेव मध्ये वापरता येतिल अश्या अगदी छोट्या छोट्या वाट्या मिळतात. त्यात पण करता येतिल केक.
पण मी कन्हेन्शनल वापरलेला
पण मी कन्हेन्शनल वापरलेला नाही. यात प्रामुख्याने केक कसा होतो? >> एकदम मस्त
साध्या ओव्हनमधल्या केक सारखाच त्यात होतो केक ? >> हो
मी कालच केक केला... केक जवळपास झाला आणी फॅन चा आवाज यायला लागला. आवाजावरुन तरी फॅन अडकतो आहे असे वाटले. कुणाला माहित आहे का कूठे दुरुस्त करतात पुण्यात ?
पण मी कन्हेन्शनल वापरलेला
पण मी कन्हेन्शनल वापरलेला नाही. यात प्रामुख्याने केक कसा होतो? >>>
"कन्हेन्शनल" ही टर्म च मुळात चूकीची आहे, त्याला "कन्व्हेक्शन" (Convection) म्हणतात! त्यामधे केवळ गरम हवेच्या झोता मुळे पदार्थ भाजला जातो ! मुख्यत्वे Browning करण्यासाठी कन्व्हेक्शन मोड वापरतात.
मायक्रोवेव्ह हानीकारक आहे,
मायक्रोवेव्ह हानीकारक आहे, याबद्दल मला शंका नाही >>>
इलेक्ट्रोलक्सचा मावे वापरलाय
इलेक्ट्रोलक्सचा मावे वापरलाय का कोणी?
शैलजा, माझ्या बहिणीकडे आहे.
शैलजा, माझ्या बहिणीकडे आहे. चांगला आहे, ती गेल्या पाच वर्षांपासून वापरतेय.
हो का मंजूडे? गुड. मी हे
हो का मंजूडे? गुड. मी हे मॉडेल घ्यायचा विचार करतेय. कारण एलजी, पॅनासॉनिक, आयएफबी वगैरेंची त्याच कॅटेगरीतली मॉडेल्स कंपेअर करुन, हाच बरा वाटतोय आणि तुलनेत स्वस्त.
30 लिटर म्हणजे जंबो आहे एकदम.
30 लिटर म्हणजे जंबो आहे एकदम. काळा रंग म्हणून किंमतीत काही फरक आहे का? SAMSUNG मध्ये मॉडेल तेच पण काळ्याची पांढऱ्यापेक्षा दीड हजार रुपयांनी किंमत जास्त आहे. कारण माहित नाही.
सगळी काळ्या रंगाचीच आहेत
सगळी काळ्या रंगाचीच आहेत मॉडेल्स. हे मी बघतेय ते ९५००/- ला आहे. रंगामुळेही फरक पडतो हे नव्हतं ठाऊक. आणि ते एवढे ऑटो कुक मेन्यूज तरी उपयोगी पडतात का हा एक मला नेहमीच प्रश्न पडतो.
मा.वे चा उपयोग मी उपासाला
मा.वे चा उपयोग मी उपासाला मखाने थोड्या तुपावर परतुन मीठ व थोडे तिखट घालुन नुसते अन्न गरम करण्याच्या मोड वर ठेवुन पहिले २ मिनिटे ,नंतर १ ,१ मिनिट चांगले क्रिस्पी होई पर्यंत ठेवते.तूप अगदी थोडे लागते.
माझ्याकडे IFB चा मावे आहे.
माझ्याकडे IFB चा मावे आहे. कोथिंबिरिच्या वड्या, भाताचे वेगवेगळे प्रकार, सूप्स, सार, गाजर हलवा, सुरळिच्या वड्यासुद्धा छान होतात. अर्थात सौ सुधा कुलकर्णी ह्यांचे पु़स्त़़क जवळ पाहिजे.
Plz मला सागांल का, Insta cook
Plz मला सागांल का, Insta cook म्हनजे काय? आणि तो कसा वापरायचा????????????
मावेमधला ग्रिल स्टँड पर्केक्ट
मावेमधला ग्रिल स्टँड पर्केक्ट त्या टर्नटेबलवर बसावा यासाठी काय युक्ती करता? की चक्क टर्नटेबल काढायचेच असते ग्रिल करताना? मला काही ते नीट बसवता येत नाही कधीच. एक पाय कायम खाली सरकतो आणि मावे नीट काही फिरत नाही, त्यामुळे अजूनही काहीही ग्रिल केलेले नाही मावेत
ग्रिलस्टँड कसा असतो? त्याचा
ग्रिलस्टँड कसा असतो? त्याचा प्लिज फोटो टाका कृपया... माझ्याकडे नाहीये आणि ग्रिल ऑप्शन वापरून बघायचाच आहे.
माझ्याकडे दोन स्टँड आहेत
माझ्याकडे दोन स्टँड आहेत ग्रिलचे जाळीचे- अपर रॅक आणि लोअर रॅक. आकार गोल आणि त्यांना तीन पाय आहेत. ते पाय टर्नटेबलवर बसावेत आयडीयली.
मॉडेल- एलजी, २६ लि.
माझ्याकडे पण सेम स्टँड आहेत
माझ्याकडे पण सेम स्टँड आहेत पौर्णिमा. टर्न टेबल नाही काढायचं. त्यावरच ठेवायचे असतात दोन्ही रॅक. थोडसं अॅडजस्ट करून माझे तरी दोन्ही रॅक बसतात मावेमध्ये.
ओह.. तेच का ग्रिल स्टँडस?
ओह.. तेच का ग्रिल स्टँडस? माझ्या डोक्यात काहीतरी स्क्यूअर्स सारखं होत.
ते मिळालेत. त्यावरच करंज्या बेक केल्या. पण मला ब्रेडची स्लाईस टोस्ट करण्याचं तंत्र अजून जमत नाहीये. त्या racks वर पनीर टिक्का वगैरे करता येईल का? एकावेळी दोन्ही racks ठेवले तर खालच्या rack वरचे पदार्थ नीट होतात का?
स्क्यूअर्स किंवा नॉनस्टिक
स्क्यूअर्स किंवा नॉनस्टिक रोटेसरी यांचा उल्लेख असेसरीज मध्ये आहे माझ्या रेसेपी बुकमध्ये. पण माझ्या मावेच्या मॉडेलवर मला या दोन्ही असेसरीज मिळाल्या नाहीत. त्या एलजीच्या दुकानातून किंवा अजून कुठून वेगळ्य मिळू शकतात का? कुणाला माहिती आहे का?
स्क्यूअर्स किंवा नॉनस्टिक
स्क्यूअर्स किंवा नॉनस्टिक रोटेसरी दोन्ही मिळालेत मला ओव्हनबरोबरच .
Pages