Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47
इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा याच धाग्याच्या पान
दक्षिणा याच धाग्याच्या पान दोनवर मृण्मयीने उपाय दिलाय मावे स्वच्छ करायचा आणि वास घालवायचा.
स्वातीने दिलेलाच उपाय आहे.
व्हर्लपूलचा २५ लिटरचा
व्हर्लपूलचा २५ लिटरचा कन्व्हेक्शन मावे घेतलाय. आत्तापर्यंत फक्त सोलोच वापरल्यामुळे जरा धाकधूक वाटतेय.
कन्व्हेक्शन मोडवर प्री-हीटसाठी मावे चालू केल्यावर मधली काचेची प्लेट फिरते का ? ( ती फिरायला लागली की मावेचा फॅनही सुरु होतो ) माझ्या मॉडेलमध्ये ती फिरली नाही आणि प्रिहीट होताना मावे वरुन खूप तापला होता. त्यानंतर टाईम सेट केल्यावर मात्र फॅन सुरु झाला आणि मावे थोडाफार निवला***
कंपनीकडून डेमो द्यायला माणूस आला होता तेव्हाच हा प्रकार लक्षात आला होता. डेमो दाखवायला आलेला माणूस प्रचंड अडाणी होता. कन्व्हेक्शनसाठी टेंप. सेट करायचे बटण दाबल्यावर म्हणतो "आता हा एकशे ऐंशी मिनिटं फिरेल." मी म्हटले वेडा की खुळा ! त्याला अक्षरशः काहीही माहीत नव्हते !
हा गरम होण्याचा प्रकार तेव्हाच लक्षात आला होता पण तो माणूस अर्थातच त्याबद्दल काही सांगू शकला नाही.
मॅन्युअलमध्ये प्रिहीट मोडमध्ये प्लेट फिरते की नाही ह्याबद्दल काही माहिती नाही.
तर कन्व्हेक्शन मोडमध्ये असा मावे इतका तापणे बरोबर आहे का ?
तसे नसेल तर लगेच तक्रार करावी म्हणते.
अगो, कन्व्हेक्शन मोडमध्ये
अगो, कन्व्हेक्शन मोडमध्ये (आणि ग्रील मोडमध्येसुद्धा) ओव्हन खूप गरम होतो. फॅनसुद्धा सुरु होतो.
पण प्रिहीट मध्ये प्लेट फिरते की नाही याकढे लक्ष नाही गेलं आधी. आज बघून घेते आणि सांगते.
धन्यवाद अल्पना ! ***पोस्ट
धन्यवाद अल्पना !
***पोस्ट लिहिली आणि वाटलं परत एकदा चेक करावं. मला चुकीचं आठवत होतं. प्रिहीट होताना प्लेट फिरली आणि तेव्हा फॅन सुरु असल्याने ठीकठाकच गरम होता मावे. पण जेव्हा बंद केला तेव्हा मात्र एकदम वरुन सरफेस खूपच जास्त तापलाय. मी मेन स्विच बंद केला नाहीये आणि दार उघडून ठेवलंय हीट बाहेर जावी म्हणून ! मेन स्विच बंद नसेल तर ऑटोवर फॅन चालू राहतो का हीट निघून जाईपर्यंत ?
त्यादिवशीही हेच झालं असणार !
हो. चालूच रहातो फॅन. इनफॅक्ट
हो. चालूच रहातो फॅन. इनफॅक्ट मेन स्विच बंद केल्यावर पण त्या फॅनचा आवाज चालूच राहातो बहूतेक. (खूप दिवसात कन्व्हेक्शन मोडवर काहीही केलं नाहीये)
अगं कन्व्हेक्शन्मध्ये आपल्या जुन्या ओटीजी सारखाच (नॉर्मल ओव्हन सारखाच) गरम होतो भरपूर. कन्व्हेक्शन आणि ग्रील मोडवर भांडी आतबाहेर करताना खूप काळजी घ्यावी लागते. ग्लोव्हज घालूनही चटका बसू शकतो भांड्याचा.
मायक्रोवेव केमिकल्सने स्वच्छ
मायक्रोवेव केमिकल्सने स्वच्छ करणे टाळावे असे माझे मत आहे.
वास घालवण्यासाठी गूगलवर सापडलेल्या टिप्सः
१. एका लिंबाच्या फोडी दोन चहाचे कप पाण्यात घालून मावेसेफ बोलमध्ये ३-४ मिन गरम करायच्या. जरा वेळ ठेवून मावे पुसून घ्यायचा. मी संत्र्याची सालं पण वापरली आहेत.
२. २ चमचे व्हिनेगर दोन चहाचे कप पाण्यात घालून वरचीच स्टेप करायची.
३. २ चमचे बेकिंग सोडा दोन चहाचे कप पाण्यात घालून स्टेप#१ करायची.
हे सगळं झाल्यावर मी पुन्हा एकदा साधं पाणी गरम करून मावे पुसून घेते.
एवढं करूनही वास गेला नाही तर डॅम्प कपडा, वर्तमानपत्र अथवा टिशु पेपर रात्रभर ठेवायचा मावेमध्ये. एलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद ठेवायचा. वास शोषला जातो.
इनफॅक्ट मेन स्विच बंद
इनफॅक्ट मेन स्विच बंद केल्यावर पण त्या फॅनचा आवाज चालूच राहातो बहूतेक. >>> हे जरा खात्री करुन सांगशील का प्लीज ? माझ्याकडे येत नाहीये ह्या फॅनचा आवाज टायमर थांबल्यावर ! युकेत गॅस रेंजच्या साध्या अवनमध्येही नंतर फॅन चालू राहायचा हे आठवतेय.
मेन स्विच बंद केल्यावर फॅन
मेन स्विच बंद केल्यावर फॅन फिरत असेल तर तो आतल्या गरम हवेच्या एक्स्चेंजमुळे आपोआप फिरत असावा.
या यंत्रात अशी अंगची ब्याट्री वगैरे नसते, जिच्यायोगे फॅन फिरत राहील
मी मावे जेंव्हा वापरात नसतो
मी मावे जेंव्हा वापरात नसतो तेंव्हा बेकिंग सोडा + अॅक्टिव्ह चारकोल ( पेट स्टोअरमधे मिळतो)एका प्लेटमधे मिक्स करुन ठेवते कायम.
अॅक्टिव्ह चारकोल ने पण सगळे वास शोषले जातात .
असेल तसंच असेल. मला फक्त
असेल तसंच असेल. मला फक्त फॅनचा आवाज येत असल्याचं आठवतंय. (हे आठवण्याचं कारण, ओव्हनमध्ये असं काय ठेवलंय, एवढा आवाज कसला येतोय हे नवरा बघून गेला होता पहिल्यावेळी)
आत्ता परत नवर्याला विचारुन कन्फर्म केलं. तोही म्हणतोय की स्विच बंद केल्यावर पण फॅन फिरत असतो.
इब्लिस, त्यासाठीच मुद्दाम मेन
इब्लिस, त्यासाठीच मुद्दाम मेन स्विच चालू ठेवला होता पण तरी ऑटोवर फॅन चालू राहिला नाही.
नॅचरल्स चे रोस्टेड आलमंड्स
नॅचरल्स चे रोस्टेड आलमंड्स म्हणून एक आईस्क्रीम असते. ते आणि त्यापेक्षा त्यातले बदामाचे तूकडे मला आवडतात. इथे बाजारात सोललेले बदाम मिळाले. ते मी पाण्याने ओले करून मिडियम लो वर सात मिनिटे आणि मिडियम वर दोन मिनिटे मावे केले. अगदी तस्सेच झाले. भाजताना ते डिशमधे रिंगप्रमाणे गोलाकार रचले होते.
शेंगदाणे पण मी नेहमी असेच भाजतो.
मेन स्विच = पॉवर सप्लाय ची
मेन स्विच = पॉवर सप्लाय ची कॉर्ड ज्या सॉकेटमधे खोचली त्याचे बटन असे वाचावे.
युरोप/अमेरिकेत सॉकेटला सोबत वेगळे बटन नसते, व त्या कायम 'ऑन' असतात असे कुठेतरी ऐकले/वाचलेले आठवते. तसे असेल तर मेन स्विच = उपकरणावरचा 'ऑफ' स्विच.
तो बंद केल्यावर आतील कॉईल थंड होईपर्यंत पंखा फिरत राहील. मायक्रोस्कोप आदी उपकरणांत अशी सोय असते. त्यांना स्विच ऑफ केल्यावर ('मेन स्विच' बंद : पॉवर सप्लाय कॉर्ड काढून टाकणे इक्विव्हॅलंट) क्रीया करू नये, पंखा फिरायचा थांबल्यानंतरच ते करावे असे मॅन्युअल मधे लिहिलेले असते.
या हिशोबाने मी पॉवर स्विच ऑफ बद्दल लिहिलेले आहे.
व्हिनिगर वगैरे मझ्याकडे
व्हिनिगर वगैरे मझ्याकडे नाहिये. आणले तर कोणते आणि किती आणावे? मला व्हिनिगर बद्दल शून्य माहिती आहे म्हणून विचारतेय. त्याचा अजून काय उपयोग असतो? (लईच बाई अडाणी)
लिंबाच्या सालीचा उपयोग उद्याच करून पाहिन.
मायक्रोवेव्ह वापरल्याने
मायक्रोवेव्ह वापरल्याने अन्नातील कलरी कमी होतात , हे खरे आहे का?
माझा रोजचा मायक्रोवेव्हचा वापर खुप असतो.
पण गस वापरल्याने कलरी टिकुन राहतात , मायक्रोवेव्हच्या तुलनेत ?
काय खरे
कृपया, मावे स्वच्छ करायला
कृपया, मावे स्वच्छ करायला कॉलिन इ. वापरू नका. (सिंडरेलानं सांगितलेला) लिंबाचा रस + पाणी / व्हिनेगर + पाणी हे आणि हेच वापरा.
>>> असं माझ्या मावेच्या माहितीपुस्तकात बोल्ड टाईपमध्ये दिलेलं आहे.
दक्षे, व्हीनीगर वर भरपूर
दक्षे, व्हीनीगर वर भरपूर चर्चा झालीय इथे. कुठलेही आण. भरपूर उपयोगी पडते.
स्वयंपाकात वापरण्यासाठी, केस धुण्यासाठी, तुंबलेले सिंक मोकळे करण्यासाठी, पदार्थ ( लोणची वगैरे ) टिकवण्यासाठी, भाज्या ( मिरच्या वगैरे ) मुरवण्यासाठी, दूध फाडण्यासाठी, कोंडलेला धूर घालवण्यासाठी, पदार्थाचे वास ( फ्रीजमधले ) घालवण्यासाठी....... अजिबात वाया जात नाही. अगदीच नाही तर जादूचे प्रयोग करण्यासाठी देखील.. ( त्यात उकडलेले अंडे बुडवून ठेवलेस तर साल मऊ होते आणि ते निमुळत्या तोंडाच्या बाटलीत ढकलता येते. बारीक हाडे त्यात बुडवून ठेवलीस तर ती लवचिक होतात आणि त्यांची गाठ मारता येते. )
(No subject)
दिनेश बाप रे.. मी व्हिनिगर
दिनेश बाप रे.. मी व्हिनिगर बद्दल काही वाचलं नाहिये त्यामूळे त्याचे इतके उपयोग आहेत हे माहित नव्ह्तं.
http://www.thekitchn.com/how-
http://www.thekitchn.com/how-to-clean-your-microwave-with-just-a-lemon-c...
इतक्या सोप्या गोष्टीसाठी सुद्धा सचित्र इंस्ट्रक्शन्स आहेत.
यासगळ्यानंतर एक बेसिक प्रश्न
यासगळ्यानंतर एक बेसिक प्रश्न माझा
मला ६००० (रूपये) पर्यंत एकाना मायक्रोवेव्ह भेट द्यायचाय, कुठला बेष्ट होईल? कनव्हेक्शन नसले तरी चालेल पण ग्रील हवे.
(जुन्या स्टाफपैकी एकाचे लगीन झालेय नुकतेच, जरा कामसू होता व उपयोगी होता, दिव्यश्री च्या भाषेत आमच्या प्यांटवाल्यांकडं).
मी नुकताच Sharp 1000W
मी नुकताच Sharp 1000W Microwave घेतला आहे. त्यात rice करायचा काही program नाहीये. माझ्या आधिच्या मायक्रोवेव्ह मधे होता. पुलाव वगैरे साठी मोकळा भात कसा करावा? काही tips?
मोकळा भात हा मुख्यत्वे कसा वा
मोकळा भात हा मुख्यत्वे कसा वा कशात शिजवता या पेक्षा कोणता तांदूळ व किती पाणी यावर अवलंबून असतं असं माझं मत आहे. हे प्रमाण सांभाळलं की झालं. मी सर्व प्रकारच्या भातासाठी राईस कुकर वापरते. मावे वेगवेगळ्या पावरचे असल्यामुळे लागणार्या वेळात फरक पडू शकतो. मावेत सहसा भात करत नाही.
दक्षे सगळ्यात उत्तम म्हणजे
दक्षे सगळ्यात उत्तम म्हणजे लिंबूपाणी.
एका मावेसेफ वाटीत पाणी घे. आख्खं लिंबू पिळ त्यात. आणि उकळव ते मावेत. बंद केल्यावर लगेच बाहेर ककाढू नकोस ती वाटी. ती वाफ आतमधे सगळीकडे पोचली पाहिजे. ५ मिनिटांनी काढ. पुसून घे कोरड्या फडक्याने. किंवा मग ते उकळलेलं लिंबूपाणी हात घालता येईल एवढं नॉर्मलला आलं की त्यानेच एकदा पुसून मग स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घे. आणि नंतर रात्रभर मावेचे दार उघडे ठेव.
एकदा नवर्याने माश्याची आमटी की माश्याचं काहीतरी झाकण न ठेवता गरम केले होते मावेत. दुसर्या दिवशी सकाळी दूध गरम करायला उघडला मावे तर असं मळमळून आलं की काय सांगू. नंतर हाच उपाय केला होता.
वास जाईपर्यंत रिपीट केला. (२ वेळा).
मायक्रोवेव्ह जुना झाल्याने
मायक्रोवेव्ह जुना झाल्याने त्याची power कमी होते का? ती पुन्हा वाढावी म्हणून काही उपाय आहे का? (नवीन घेण्यात सध्या काही कारणांमुळे काही अर्थ वाटत नाहीये.)
हो power कमी होते. माझ्या
हो power कमी होते. माझ्या मायक्रोवेव्हचा मॅग्नेट्रॉन गेला होता. तो बदलल्यावर मावे. फारच पॉवरफुल झालाय.
इथे ६००० पर्यंत दोन
इथे ६००० पर्यंत दोन मायक्रोवेव्ह ओव्हन दिसताहेत. पण ......
नी धन्यवाद तुझा उपाय माझ्या
नी धन्यवाद तुझा उपाय माझ्या आवाक्यातला आहे. लिंबाच्या सालीने वास गेलाय, पण थोडा आहेच अजून.
पण जरा रिव्ह्यू नाहीत असेच ना
पण जरा रिव्ह्यू नाहीत असेच ना भरतजी?
मायक्रोवेवमध्ये चपाती करता
मायक्रोवेवमध्ये चपाती करता येते का?
Pages