Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47
इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईलेक्ट्रोलक्स चा मावे वापरलाय
ईलेक्ट्रोलक्स चा मावे वापरलाय का कोणी?
स्टार सी.जे वर बघुन घ्य्यायचा मोह होतोय.. रिव्हुज असतील तर सांगा प्लीज.
सॅमसंग. एलजी, आ एफ बी पैकी
सॅमसंग. एलजी, आ एफ बी
पैकी कुठला चांगला?
सिरॅमिक आणि स्टेन्लेस स्टील कॅव्हेटि म्हणजे काय? कुठली चांगली?
राजगिरा लाह्या मावेमध्ये
राजगिरा लाह्या मावेमध्ये भाजता येतात का ? असल्यास कश्या ?
लाटलेल्या चपात्या भाजु शकतो
लाटलेल्या चपात्या भाजु शकतो का microwave मधे?
नाही. एकदा भाजून गार झालेल्या
नाही.
एकदा भाजून गार झालेल्या चपात्या पुन्हा गरम मात्र करू शकतो.
मी नेटवर, पुस्तकात, इधे वाचून
मी नेटवर, पुस्तकात, इधे वाचून कोणताही ग्रिलवाला पदार्थ मावेत करायला घेतला की दिलेल्या मिनीटांपेक्षा दुप्पट वेळ ग्रिल केले तर खरपूस लाल भाजले जात नाही. मग पेशन्स संपतो आणि पदार्थाची मजाच जाते. ग्रिल करताना तपमान सेट करता येत नाही. तंदूर टाईप इफेक्ट मावे वापरून कसा आणायचा? काल इब्लिसांनी लिहीलेले तंदूर गोभी अर्धा तास ग्रिल करूनही फुसकेच राहिले. काय करावे?
आशूडी, मला भारतातल्या मावेत
आशूडी, मला भारतातल्या मावेत काय ऑप्शन्स असतात ते माहित नाही. पण इथे गॅसच्या खाली जी रेंज्/अवन येतो त्यात ब्रॉईल असा ऑप्शन येतो. त्यातच बार्बेक्यु टाईप जळकट चव/ टेक्श्चर मिळतं. नुसत्या मावेत ओलागिच्च दिसणार तो फ्लॉवर.
आशूडी,. पदार्थ ग्रिलच्या एकदम
आशूडी,. पदार्थ ग्रिलच्या एकदम जवळ येईल असा ठेवते आहेस ना? कन्वेकशनसाठी छोटी तिपई आणि ग्रिलसाठी उंच तिपई ठेवते आहेस का?
ग्रिलला तापमान सीलेक्ट होत नाही, पण प्दर्थ ग्रिलच्या पुरेसा जवळ ठेवला की मस्त खरपूस होतो.
हो गं, हाय Rack वरच ठेवते.
हो गं, हाय Rack वरच ठेवते. मला टेन्शन येतं कधीकधी की खाली फिरणारी ग्लास प्लेट तडकेल का का काय!
नाही सायो, ब्रॉईल अॉप्शन
नाही सायो, ब्रॉईल अॉप्शन नाहीये ५ वर्षं जुन्या LG micro+grill+convection मधे.
नाही तडकत. मी केकसाठी तासभर
नाही तडकत. मी केकसाठी तासभर वगैरे ठेवलंतरी तडकलेली नाही. तेवढ्या तापमानाला ती सेट केलेली असते.
ब्रॉइल चा ऑप्शन माझ्या ओटीजीमध्ये होता, माय्क्रोवेव्हमध्ये ग्रिल एकच ऑप्शन आहे, पण पदार्थ मस्त होतो.
मावेत ग्रील पर्याय असला तरी
मावेत ग्रील पर्याय असला तरी ते खरं ग्रिलींग होत नाही. त्यामुळे मी ते स्क्युअर्स थेट गॅसवर धरून भाजते.
माझ्या इंडियातल्या घरच्या LG
माझ्या इंडियातल्या घरच्या LG कन्वेक्शन मावेमध्ये पनीर वगैरे मस्त ग्रिल होतं. पण मी त्यांच्या कुकबुकमधल्या ग्रिल सेक्शनमधल्या रेसिपीजच करते. ओटीजी ओव्हनवाली रेसिपी मावे ओव्हनमध्ये कधीच ट्राय नाही केली.
मला भावाला लग्नाचे गिफ्ट
मला भावाला लग्नाचे गिफ्ट द्यायला मावे घ्यायचाय. १०००० पर्यंतच्य बजेट मध्ये कुठला मावे घ्यावा? कृपया कुणी मदत करेल का?
मुग्धमानसी बाकी कुणी मॉडेल
मुग्धमानसी बाकी कुणी मॉडेल कोणते वापरते किन्वा वापरले आहेत, हे माहीत नाही कारण हा बाफ पूर्ण वाचायला वेळ मिळाला नाही. पण वेळ मिळाला की वाचणार आहे.
मागेच ४ वर्षापूर्वी चुलत भावाने सॅमसन्ग घेतला, कन्वेक्शन आहे. अजून नीट चाललाय.वहिनीने मात्र न वाचता काहीतरी घोटाळा केला होता. पण लगेच कम्पनीचा माणुस येऊन दुरुस्त करुन गेला. त्या वेळी ११,००० किम्मत होती आता काय आहे माहीत नाही. पण एखाद्-दीड हजाराचा फरक पडत असेल तर सॅमसन्ग उत्तम. नाहीतर खाली बघा. आणी नीट डिल करा.
http://www.snapdeal.com/products/appliances-microwave-ovens-otgs
माझ्या मावेत ग्रिल ऑप्शनला
माझ्या मावेत ग्रिल ऑप्शनला रंग बदलतो, पदार्थ खरपूस होतो. पण ’तंदूर’ इफेक्ट येणार नाही मावेत. तंदूर प्रोसेसच निराळी असते.
तंदूर ईफेक्टसाठी कन्व्हेक्शन
तंदूर ईफेक्टसाठी कन्व्हेक्शन + ग्रिल वापरून मी करते (या पद्धतीनं आजवर केवळ फिश आणि चिकन केलंय) पहिल्यांदा चिकन केलं ते डिझास्टर होतं, नंतर शेजारणीनं सांगितलेल्या पद्धतीनं केलं ते महान झालं होतं.
हल्ली बर्याचदा मासे अशा पद्धतीनं केले जातात.
बाकी. ग्रिलिंगमध्ये पिझ्झा आणि सॅंडविच नित्यनेमानं होतात. त्याव्यतिरीक्त नाही.
मुग्धमानसी, माझा सॅम्संगचाच आहे. घेऊन पाचेक वर्ष झाली. आजवर नो प्रॉब्लेम.
मुग्धमानसी, माझा ओनिडाचा
मुग्धमानसी,
माझा ओनिडाचा आहे.३ वर्षे पुढल्या महिन्यात होतील.छान आहे.त्यावेळी ७५००/- किंमत होती.
गॅस शेगडीच्यावर लावायचा मावे
गॅस शेगडीच्यावर लावायचा मावे मुंबईत कुठे मिळेल ते कोणाला माहित आहे का?
<गॅस शेगडीच्यावर लावायचा
<गॅस शेगडीच्यावर लावायचा मावे> हे काहीतरी नवीन दिसतंय. काय असतं ते?
मी दसर्याला पॅनासॉनिकचा २० लिटर कपॅसिटीचा विथ ग्रिल मायक्रोवेव्ह घेतलाय. (माझा दुसरा).
आमच्या मावे डॉक्टरच्या मते रँक्स : १ पॅनासॉनिक २ सॅमसंग ३ एल्जी. (या रँकिंगला याच क्षेत्रातल्या विक्रेत्याकडून निष्पक्ष दुजोरा मिळालाय) त्याने इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीवाला घेऊ नका असे मुद्दाम सांगितले होते.
मयेकर पॅनासोनिकच्या या मावेची
मयेकर पॅनासोनिकच्या या मावेची काय किंमत आहे? मलाही मावे घ्यायचा आहे, बाजारात चांगला कोणता याची चौकशी करण्याकरताच इथे डोकावले.
मला ७३९० ला पडलाय. त्यांचे एक
मला ७३९० ला पडलाय. त्यांचे एक स्टार्टर किट मिळालेय ज्यात इडलीपात्र, सिलिकॉन कप केक मोल्ड्स आहेत.
धन्यवाद. हा ग्रील+कन्व्हेक्शन
धन्यवाद. हा ग्रील+कन्व्हेक्शन कॉम्बो आहे का?
>>गॅस शेगडीच्यावर लावायचा
>>गॅस शेगडीच्यावर लावायचा मावे> हे काहीतरी नवीन दिसतंय. काय असतं ते?>>
जागा वाचवायला गॅस शेगडीच्या वर मावे लावतात. माझ्या अपार्टमेंट मधे होता तसा. पण मला भारतीय स्वयंपाकाच्या हिशोबाने वेंटिलेशन पुरेसे वाटले नाही. आता घरात काउंटर टॉप मावे आहे.
माझ्या भाचीने किचन मधे मावे ठेवायला स्टॅड करुन घेतला ओट्याच्या वर. काउंटर स्पेसही वाचली आणि नवा मावेही घ्यावा लागला नाही.
कन्व्हेक्शन नाही. ग्रिल आहे.
कन्व्हेक्शन नाही. ग्रिल आहे.
स्वाती२, ही मावेची वेगळी मॉडेल्स आहेत का?
त्यांचे एक स्टार्टर किट
त्यांचे एक स्टार्टर किट मिळालेय ज्यात इडलीपात्र >> मला तरी मावेतल्या इअडल्या आवडल्या नाही. बहुदा मला जमल्या नसाव्यात. कुणी करत असेल तर टीप शेअर करा प्लीज
भरत, इथे अमेरिकेत तरी वेगळी
भरत, इथे अमेरिकेत तरी वेगळी मॉडेल्स आहेत. इंस्टाल करायला प्रोफेशनल लागतो.
कन्व्हेक्शन मधे स्टेनलेस
कन्व्हेक्शन मधे स्टेनलेस स्टील चे ताट वापरले तर चालेन का? प्री-हीटेड अवन मधे 12-15 मिनिट बेक करायचा आहे.
मायक्रोवेव च मॅगनेट्रॉन गेलय
मायक्रोवेव च मॅगनेट्रॉन गेलय हे कस ओळखायचं, अजिबात गरम होत नाही का? मी परवा पापड भाजले, तेव्हा खुप वेळ लागला ५-७ मिन. आणि चहा रिहीट करयला पण २-३ मिन. पेक्षा जास्त वेळ गेला हाय पॉवरवर. ह्या गोष्टी मी फ़ार वेळा केल्या नाहियेत, पण दाणे भाजलेत खुप वेळा आज ते करुन बघणारे.
अजुन एक प्रश्न आहे,
अजुन एक प्रश्न आहे, ग्रील-मायक्रो कॉम्बी मोड मध्ये मेट्ल रॅक वापरली तर चालते का? माझा ओवन नुसताच पडुन आहे. कनव्हेक्शन मोड वर कधिही केक केला प्रिहीट आणि बाकी इनस्ट्रक्शन्स जरी फ़ॉलो केल्या तरी केक तळाला ओलसर आणि चिकट राह्तो. ग्रील मोड वर तर खुप वेळ लागतो तरी पदार्थ ढिम्म काही बदललेला नसतो. डेमोवाला दोन वेळा येउन काहिबाही सांगुन गेला होता घेतला तेव्हा आता २ वर्ष झाली असतील अजुन म्हणावा तसा वापर झाला नाहिये.
कृपया मदत करा.
Pages