गुलमोहर

Submitted by गणेश भुते on 20 February, 2008 - 02:07

लालबुंद अंग तयाचे
पंख लाभले केशराचे
बघता मनात भरते
फुलणे गुलमोहराचे

आकाश अवनी त्रस्त
ग्रिष्माच्या असह्य दाहाने
कोमेजती वॄक्ष वेली
वायुच्या तप्त प्रवाहाने

जरी जग त्राग्यात सारे
स्वारी मात्र हसरी दिसते
सुकुमार तांबुस कांती
सतेज उन्हात भिजते

कढत उन्हे अंगावर घेत
हसरे जगणे कसे जमावे
गुलमोहरासम जगणे फक्त
त्यानेच एकट्याने जगावे

गणेश भुते
(माझ्या 'अलगद' ह्या काव्यसंग्रहात पुर्वप्रकाशित)

गुलमोहर: 

छान कविता आहे गुलमोहोरावर.

गुलमोहोर माझे आवडते झाड आहे.

धन्यवाद ,
दाद मिळाल्याने लिहीण्यास प्रोत्साहन मिळते.

वा, गुलमोहराचं कौतुक छानच आहे.

छान.

सुन्दर मला ही गुलमोहर खुप आवडतो...........छान कविता.........

सुहास शिन्दे

कढत उन्हे अंगावर घेत
हसरे जगणे कसे जमावे
गुलमोहरासम जगणे फक्त
त्यानेच एकट्याने जगावे>>> सुरेख कविता गणेशभौ !

आवडली !

"कढत उन्हे अंगावर घेत
हसरे जगणे कसे जमावे
गुलमोहरासम जगणे फक्त
त्यानेच एकट्याने जगावे"
....अप्रतिम