Submitted by गणेश भुते on 20 February, 2008 - 02:07
लालबुंद अंग तयाचे
पंख लाभले केशराचे
बघता मनात भरते
फुलणे गुलमोहराचे
आकाश अवनी त्रस्त
ग्रिष्माच्या असह्य दाहाने
कोमेजती वॄक्ष वेली
वायुच्या तप्त प्रवाहाने
जरी जग त्राग्यात सारे
स्वारी मात्र हसरी दिसते
सुकुमार तांबुस कांती
सतेज उन्हात भिजते
कढत उन्हे अंगावर घेत
हसरे जगणे कसे जमावे
गुलमोहरासम जगणे फक्त
त्यानेच एकट्याने जगावे
गणेश भुते
(माझ्या 'अलगद' ह्या काव्यसंग्रहात पुर्वप्रकाशित)
गुलमोहर:
शेअर करा
छान कविता
छान कविता आहे गुलमोहोरावर.
गुलमोहोर माझे आवडते झाड आहे.
धन्यवाद
धन्यवाद ,
दाद मिळाल्याने लिहीण्यास प्रोत्साहन मिळते.
वा,
वा, गुलमोहराचं कौतुक छानच आहे.
छान.
छान.
सुन्दर मला
सुन्दर मला ही गुलमोहर खुप आवडतो...........छान कविता.........
सुहास शिन्दे
कढत उन्हे अंगावर घेत हसरे
कढत उन्हे अंगावर घेत
हसरे जगणे कसे जमावे
गुलमोहरासम जगणे फक्त
त्यानेच एकट्याने जगावे>>> सुरेख कविता गणेशभौ !
गणेशराव, आवडला तुमचा गुलमोहर
गणेशराव, आवडला तुमचा गुलमोहर !
आवडली !
आवडली !
खरंय. पळस फुलला तर भडकलेला
खरंय. पळस फुलला तर भडकलेला वाटतो; गुलमोहराचं मात्र तसं नसत.
छान !
गणेश गुलमोहर आवडला .
गणेश गुलमोहर आवडला .
वाह! कविता गणेश, खूप
वाह! कविता
गणेश, खूप दिवसांनी..
क्या बात है गणेशजी...अप्रतीम
क्या बात है गणेशजी...अप्रतीम शब्द रचना , सुरेख मांडणी..मस्त कविता.
"कढत उन्हे अंगावर घेत हसरे
"कढत उन्हे अंगावर घेत
हसरे जगणे कसे जमावे
गुलमोहरासम जगणे फक्त
त्यानेच एकट्याने जगावे"
....अप्रतिम
मस्त वर्णन.
मस्त वर्णन.
सुंदर कविता
सुंदर कविता
गुलमोहर,,,,,,,, गुलमोहरा
गुलमोहर,,,,,,,, गुलमोहरा सारखी गुलमोहर कविता!
फार फार सुंदर! खूप आवडली.
फार फार सुंदर!
खूप आवडली.
प्रतिसादाबद्दल खुप आभार...
प्रतिसादाबद्दल खुप आभार...
गणेशराव, मस्तच!
गणेशराव, मस्तच!
अरे वाहा फारच छान...
अरे वाहा फारच छान...
खूप छान वर्णन आहे
खूप छान वर्णन आहे