१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
दिनेश्दा, मला स्वीस रोल
दिनेश्दा, मला स्वीस रोल बनवायचयं. त्यामध्ये जे डेसिकेटेड खोबरे आहे त्या एवजी सुके खोबरे व ड्रिंकींग चॉकलेट एवजी कॅडबरी किंवा इतर चॉकलेट वाह्रू शकते का?
दिनेशदा, मला स्वीस रोल
दिनेशदा, मला स्वीस रोल बनवायचयं. त्यामध्ये जे डेसिकेटेड खोबरे आहे त्या एवजी सुके खोबरे व ड्रिंकींग चॉकलेट एवजी कॅडबरी किंवा इतर चॉकलेट वापरू शकते का?
स्विस रोल म्हणजे चॉकलेट चा
स्विस रोल म्हणजे चॉकलेट चा रोल ना ? त्यात सुके खोबरे चालेल पण ते बारिक करुन घ्यावे लागेल. तसेच ड्रिंकिंग चॉकलेट म्हणजे पावडर स्वरुपात ते वापरायचे असेल तर कोको पावडर हा जास्त चांगला पर्याय ठरेल.
मिसळीवर घालायला शेव किंवा
मिसळीवर घालायला शेव किंवा फरसाण घरात नाहिये व भारतीय दुकान खुप लांब म्हणुन फक्त ह्या करता जाणे जीवावर आले आहे. तर त्या ऐवजी काय घालु शकते जे अमेरिकन दुकानात मिळेल? घरी शेव करायची तर बेसन कमी आहे म्हणुन तो पर्याय पण गेला. दुसर्या कशाची शेव करता येईल का? दोन्ही सांगा प्लिज.
सॅलडमधे घालायला ड्राय नूडल्स
सॅलडमधे घालायला ड्राय नूडल्स मिळतात ना ते घालता येतील.
ते तळावे लागतील का सिं?
ते तळावे लागतील का सिं?
नाही. मला नक्की नाव माहिती
नाही. मला नक्की नाव माहिती नाही. पण माझ्या ऑफिसमधे सॅलदबारमधे असायचे हे नूडल्स. रेडी टू ईट मिळतात.
फ्राईड नूडल्स तयार मिळतात.
फ्राईड नूडल्स तयार मिळतात. बरेच मोठे पाकिट असते. (अमेरिकन चॉपसुई मधे वापरतात ) अगदी हलक्या असतात.
सुनिधी एक शेवेचा प्रकार
सुनिधी एक शेवेचा प्रकार आहे.
बटाटा उक्डून मॅश करून घ्यायचा. मग त्यात तिखट मीठ हळद वगैरे आपले नेहमीचे घालून त्यात मावेल एवढेच
बेसन घालायचे. कमी पड्लेच तर तांदळाचे पीठ/ मैदा एखादा दोन चमचे. व सोर्याला तेल लावून तळून घ्यायचे.
तुझी गरज भागेल बहुतेक. पेप्सीच्या लहर आलू भुजिया सारखे पण आण खी चान्गले लागते.
मामी, मस्त शेव आहे.. ते
मामी, मस्त शेव आहे.. ते नुडल्स पण आणुन पाहाते. थँक्स मंडळी.
मंजु, खोबर डिप फ्रिजर मध्ये
मंजु, खोबर डिप फ्रिजर मध्ये कडक नाही होणार?
माझ्या नणंदेच्या सासूबाइ
माझ्या नणंदेच्या सासूबाइ करतात. एकदा करून बघते व इथे रेसीपी टाकते. मिसळ झाली का?
माझ्याकडचा गूळ इकडच्या
माझ्याकडचा गूळ इकडच्या कोरड्या हवामानामुळे एकदम कडक झाला आहे, अगदी दगडासारखा. गूळपोळी किंवा तिळवड्या करण्यासाठी तो किसता येणार नाही. काय करू?
इथे कोणीतरी प्रेशर कूकरमधे
इथे कोणीतरी प्रेशर कूकरमधे घालुन मऊ करण्याची आयड्या दिली होती. मनुने गूळपोळीची कृती दिलीये तिथे बघ.
अरेच्चा, मामी मी प्रश्न वाचला
अरेच्चा, मामी मी प्रश्न वाचला नव्हता. मिसळ झाली की. पण मी काय केले, चक्क कॉनफ्लेक्स वापरले शेवेऐवजी. मस्त लागले ते पण.
मिक्स फ्रुट जॅमची एक्स्पायरी
मिक्स फ्रुट जॅमची एक्स्पायरी डेट २ महिन्यावर आली आहे. अजून फक्त २ चमचे खाल्ला गेलाय. घरी कुणी लहान नाही, शिवाय इतकं गोड खायला कुणाला आवडत नाही. ब्रेड जॅम , जॅम पोळी तरी किती खाणार? त्याचं काय करता येईल की वायाच जाईल?

जॅम टार्ट बनवून त्यात वापरता
जॅम टार्ट बनवून त्यात वापरता येइल व कोणातरी मैत्रीणीला भेट देता येइल.
शाळेत जाणारी मुले असतील तर हे प्रकार संपतात. नाहीतर बघ,
वेनिला आइस्क्रीम त्यावर दोन चमचे जॅम फळांचे तुकडे घालायचे. वर एक आइस्क्रीम् वेफर. घरी कोणाचे केळ्वण वगैरे करताना त्यात डेजर्ट देता येइल. जॅम एका पातेल्यात थोडेसे पाणी घालून गरम लिक्वीडी करायचा.
मंद ग्यास वरच.
प्लेन स्पॉन्ज केक करून त्याचे पातळ आड्वे काप करायचे, मध्ये जॅम घालून रोल करायचे व वरून शुभ्र पांढरे सुके खोबरे लावायचे. सर्व हाय कॅलरी पदार्थ आहेत.
१ कप दूध २ चमचे घट्ट साय
१ कप दूध
२ चमचे घट्ट साय (विरजणाची)
२ चमचे जॅम
२ आईसक्यूब्स
हे मिक्सरमधे फिरव आणि मिल्कशेक पी....
अंक्या, ही आयडिया मस्त आहे.
अंक्या, ही आयडिया मस्त आहे. ज्यांना वजन वाढवायची आवश्यकता आहे त्यांना तर छानच. आमच्यासारख्यांनी साय वजा करावी.
अँक्या, महिनाभर रोज प्यावा
अँक्या, महिनाभर रोज प्यावा लागेल.. नॉट बॅड!
मामी, जॅम टार्ट काय असते? कसे बनवायचे? तुमचे बाकी पर्याय हेवी ड्यूटी आहेत करायलाही आणि वजनालाही !
फ्रुट सॅलेड मधेही छान लागतो
फ्रुट सॅलेड मधेही छान लागतो जॅम !!!
१. ट्रायफल पुडींग कर.
१. ट्रायफल पुडींग कर. त्यामध्ये जॅमचा लेअर छान लागतो.
२. फ्रीज करून ठेव. म्हणजे expiry date चा प्रश्ण येणार नाही.
आशुडी, जॅम मधे थोड कोमट पाणी
आशुडी, जॅम मधे थोड कोमट पाणी घालुन पातळ कर. बर्फाच्या ट्रे मधे ते ओत आणि फ्रिझ कर. मग हे खडे एका सेल्फ सिलींग बॅग मधे काढुन ठेव (म्हणजे तुझा ट्रे मोकळा होईल) हे खडे फ्रिझ कर. पाहिजे तेव्हा गार पाणी/सोडा यात एक्/दोन खडे टाकायचे....इन्स्टंट सरबत तय्यार...
परत फ्रिझ केल्यामुळे खराब होन्याची शक्यता नाही... बच्चे कंपनी पण आवडीने पितील हे जॅमसरबत 
वॉव! सही ऑप्शन्स! धन्यवाद
वॉव! सही ऑप्शन्स! धन्यवाद सगळ्यांना.
मला पण कोणीतरी जॅम च्या
मला पण कोणीतरी जॅम च्या चांगली ६ बाटल्या भेट दिल्यात. वरील उपाय करेन आता. अँकी च्या उपायात ice cream घालेन सायीऐवजी व लहान मुलांना देईन.
माझ्या आईने चकल्या केल्यात पण
माझ्या आईने चकल्या केल्यात पण त्या मउ पडल्यात पण चवीला चांगल्या आहेत मउ पडल्यामुळे आम्ही कोणी खात नाही त्याचं काही करता येईल का?
हसरी, चकली चाट करून
हसरी, चकली चाट करून खा.
त्यावर दही पुरीसारखं दही, हिरवी चटणी (पुदीना, कोथींबीर, मिरची), चिंचेची चटणी घालायची आणि हवी तर शेव घालून काऊन टाकायची.
थोड्या वेळ मायक्रोवेव्ह मध्ये
थोड्या वेळ मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्या तर ? आधी एकच चकली ठेवून पहावी. प्रयोग जमला तर बाकीच्या
मंद गॅसवर तव्यावर ठेवल्या तर
मंद गॅसवर तव्यावर ठेवल्या तर ?
मायक्रोवेव्ह नाही आहे
मायक्रोवेव्ह नाही आहे
Pages