एकटा

Submitted by प्रिती on 1 February, 2010 - 04:26

एकटाच चालतोय मी
एकटाच चालत जाणार
पैशांमागे पळतापळता
एकटाच मी रहाणार

मला हवि प्रसिद्धि
प्रसिद्ध मी होणार
व्याकुळ हाक तुझि
कधि ऐ़कु मज येणार
एकटाच मी रहाणार

मज हवे कौतुक
अनेकजण करणार
प्रेमाचे शब्द तुझे
त्यासमोर तुच्छ मज वाटणार
एकटाच मी रहाणार

माझि स्पर्धा स्वतःशी लागलि
मी मजच हरवणार
थांबायचे कोठे हे मज न माहित
मी न कोठे थांबणार
एकटा न होतो कधि हि
परी एकटाच मी रहाणार
एकटाच मी रहाणार...

प्रिति Happy

गुलमोहर: