Submitted by प्रिती on 1 February, 2010 - 04:26
एकटाच चालतोय मी
एकटाच चालत जाणार
पैशांमागे पळतापळता
एकटाच मी रहाणार
मला हवि प्रसिद्धि
प्रसिद्ध मी होणार
व्याकुळ हाक तुझि
कधि ऐ़कु मज येणार
एकटाच मी रहाणार
मज हवे कौतुक
अनेकजण करणार
प्रेमाचे शब्द तुझे
त्यासमोर तुच्छ मज वाटणार
एकटाच मी रहाणार
माझि स्पर्धा स्वतःशी लागलि
मी मजच हरवणार
थांबायचे कोठे हे मज न माहित
मी न कोठे थांबणार
एकटा न होतो कधि हि
परी एकटाच मी रहाणार
एकटाच मी रहाणार...
प्रिति
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे .. अगदी माझ्यसाठी
छान आहे .. अगदी माझ्यसाठी लिहलीय असं वाटलं ..
छान आहे कविता!
छान आहे कविता!
धन्यवाद गणेशजी धन्यवाद
धन्यवाद गणेशजी

धन्यवाद सुहासजी....पण असे काहि होवु देऊ नका हो