Submitted by रंगासेठ on 23 January, 2010 - 10:21
जोगवा या चित्रपटाला ५ राष्ट्रीय मिळाले आहेत.
उत्क्रुष्ट अभिनेता : उपेंद्र लिमये
उत्क्रुष्ट संगीतकार : अजय-अतुल
उत्क्रुष्ट गायक (पुरुष) - हरीहरन
उत्क्रुष्ट गायिका (स्त्री) - श्रेया घोषाल
उत्क्रुष्ट सामाजिक चित्रपट
तसेच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' याला सर्व्श्रेष्ठ प्रादेशिक चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
जोगवा व 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या सर्व कलाकारांचे व टीम चे अभिनंदन.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मराठीनं अजून तीन पारितोषिकं
मराठीनं अजून तीन पारितोषिकं पटकावली आहेत.
'विठ्ठल' या चित्रपटातील भूमिकेसाठी बालकलाकार अनिकेत रुमाडेला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.
श्री. सचिन कुंडलकर यांना 'गंध' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
'गंध' चित्रपटासाठीच श्री. प्रमोद थॉमस यांना सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचं पारितोषिक मिळालं आहे.
आणि आपल्या सर्वांना अतिशय अभिमानास्पद गोष्ट अशी की मायबोलीकर श्री. मंदार कमळापूरकर यांचा 'गंध'च्या ध्वनिमुद्रणात सहभाग होता.
मंदारचे व इतर सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
जोगवा, हरिश्चंद्राची फॅक्टरी
जोगवा, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि गंध शी संलग्न असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...
तसंच, 'थ्री ऑफ अस' या उमेश
तसंच, 'थ्री ऑफ अस' या उमेश विनायक कुलकर्णी यांच्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
चिनूक्स, उमेशच्या थ्री ऑफ अस
चिनूक्स, उमेशच्या थ्री ऑफ अस ला बेस्ट नॉन फीचर फिल्म दिग्दर्शनाचे सुवर्ण कमळ आहे (लघुपटाचा पुरस्कार नव्हे). गिरणीला लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
श्वास नंतर एका मराठी कलाकृतीला एव्हडा मोठा पुरस्कार प्रथमच.. (अर्थात थ्री ऑफ अस मध्ये संवाद नाहियेत)..
अभिनंदन! हरिश्चंद्राची
अभिनंदन! हरिश्चंद्राची फॅक्टरीला ऑस्करपण मिळाले असते तर कित्ती छान झाले असते!
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी बातमी... सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि या सर्व कलाकृतींमध्ये सहभागी असणार्या प्रत्येकाचे हार्दिक अभिनंदन....
खरेच अभिमानास्पद. या
खरेच अभिमानास्पद. या चित्रपटांचे वितरण कसे झालेय ? निदान आतातरी लोकानी बघावेत ते.
सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि
सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि या सर्व कलाकृतींमध्ये सहभागी असणार्या प्रत्येकाचे हार्दिक अभिनंदन !!!!
जोगवा हा चित्रपट खरंच खूपच
जोगवा हा चित्रपट खरंच खूपच विचार करायला लावणारा आहे आंणि उपेंद्र लिमयेचा अभिनय अप्रतिम.
दिनेश, लघु चित्रपटांचे वितरण
दिनेश, लघु चित्रपटांचे वितरण होत नाही भारतात हीच तर गोची आहे.. थ्री ऑफ अस ही खरेच एक बघण्याजोगी कलाकृती आहे.. सुदैवाने मला एका चित्रपट महोत्सवात बघायला मिळाली..
कालच "जोगवा" हा चित्रपट
कालच "जोगवा" हा चित्रपट पाहीला.
खूप विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे.
उपेंद्र लिमये यांचे हार्दिक आभार!!!
विकल्प या बॅनरखाली
विकल्प या बॅनरखाली लघुपटांच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले जाते. दर महिन्याला. अजून छोट्या प्रमाणात आहे हे. बहुतांशी प्रेक्षक हे चित्रपट क्षेत्रातले विद्यार्थी, विद्यार्थी फिल्ममेकर्स असे आहेत. त्याला सर्वसाधारण प्रेक्षकवर्गाचा रिस्पॉन्स तितकासा नाही.
लघु चित्रपटांच्या वितरणासंदर्भात प्रक्रिया सुरू करायचा मधे एकदा प्रयत्न केला होता पण ते अजून तेवढ्या यशस्वीपणे घडत नाहीये दुर्दैवाने.
पण होईल कधी ना कधी तरी डिस्ट्रिब्युटर्स आणि एक्झिबिटर्सना लघुपट व माहीतीपटांसाठी दारं किलकिली करावी लागतीलच.
NDTVवर दर शनिवारी दोन लघुपट
NDTVवर दर शनिवारी दोन लघुपट असतात.
परवा असाच एक सुंदर लघुपट पाहिला. भूजमध्ये एक डॉक्टर आहेत. त्यांनी चार्ली चॅप्लीन फॅन क्लब सुरू केला आहे. भूजच्या भूकंपानंतर त्यांनी चार्ली चॅप्लिनचे चित्रपट, त्याची वेशभूषा वापरून लोकांना कसं परत हसतं केलं, याचं ते चित्रण होतं.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
आपण लघुपटांबद्दल वेगळा बीबी
आपण लघुपटांबद्दल वेगळा बीबी करूया का?
अभिनंदन!
अभिनंदन!
हो, कर सुरू असा बाफ.
हो, कर सुरू असा बाफ.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/13611 लघुचित्रपटांसंदर्भात इथे नवीन धागा सुरु केलेला आहे.
कर ना मग. नेकी और पूछ पूछ!!
कर ना मग. नेकी और पूछ पूछ!!
उत्क्रुष्ट संगीतकार :
उत्क्रुष्ट संगीतकार : अजय-अतुल
उत्क्रुष्ट गायक (पुरुष) - हरीहरन
उत्क्रुष्ट गायिका (स्त्री) - श्रेया घोषाल
मला या पुरस्कारांबाबत जास्त कौतुक आहे.. कारण खुप इच्छा होती "अजय-अतुल" या जोडीच्या उत्तम कामगिरीची उच्च पातळीवर नोंद व्हावी.. सर्व स्तरावर प्रसिद्धी मिळावी... नि नेमके घडलेच त्यात तर वरील गायक नि गायिकेने म्हटलेले "जीव रंगला" हे गाणे ऐकले की ह्यांना पुरस्कार का मिळाला ते सांगुन जातो !!
>>गायक नि गायिकेने म्हटलेले
>>गायक नि गायिकेने म्हटलेले "जीव रंगला" हे गाणे ऐकले की ह्यांना पुरस्कार का मिळाला ते सांगुन जातो !!<< खरय्,अफलातून गाणे आहे.
अभिनंदन. गाणी ऐकणार.
अभिनंदन. गाणी ऐकणार.
<<< श्री. मंदार कमळापूरकर
<<< श्री. मंदार कमळापूरकर यांचा 'गंध'च्या ध्वनिमुद्रणात सहभाग होता. >>
मंदार नी 'गंध' साठी 'sync sound/ location sound recording' च काम केलं आहे.
एक बदल - त्याच नाव 'श्री. मंदार कमलापुरकर' आहे.
दर्जेदार चित्रपट.
दर्जेदार चित्रपट.
अभिमानास्पद यश आहे खरंच.
अभिमानास्पद यश आहे खरंच. टण्या आणि लोकहो लघुपटाचा वेगळा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
जोगवा साठी कुणी भरभरुन
जोगवा साठी कुणी भरभरुन लिहिताना दिसत नाहे. का? तर त्यात कुनी 'कुलकर्णी' नाही. म्हनुन.
इथ फक्त अभिनंदन.
अरे भटुड्यांनो सुधरा.
जोगवा साठीचा दुसरा बाफ
जोगवा साठीचा दुसरा बाफ पाहिलेला दिसत नाही तुम्ही... आणि हो जोगवातील मुख्य पात्रं लिमये, बर्वे आहेत हे पण माहित नाही का??
कालच मी "जोगवा" पाहिला.फारच
कालच मी "जोगवा" पाहिला.फारच अप्रतिम भुमिका आहे "उपेंद्र लिमये" ह्यान्चि.
Very nice movie