शैलजा ज्या वेळेस कोकणांत होती त्यावेळेस योगायोगाने मीही माझ्या कुटुंबियासमवेत कोकणातच होतो. म्हणून हा कोकणसय भाग २.
माझा जन्मच मालवणातला. नंतर काही महिन्यांनी आम्ही मुंबईत आलो. त्यानंतर दर वर्षी मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही भावंडं आजोळी जात असू. आणि मग महिना, दोन महिने कुणी कल्पनाही केली नसेल एवढी धम्माल करून पुन्हा अनिच्छेनेच मुंबईला परतत असू. मुंबईहून निघताना व्यवस्थित दिसणारे आम्ही परतताना मात्र अंगावर ठिकठिकाणी धडपडल्याच्या खूणा घेऊन परतत असू. या खूणांमध्ये काजीच्या डिंकापासून, नदीवर पोहायला गेल्यावर लागलेल्या करपांपर्यंत (खाडीत असलेल्या धारधार दगडांना करपं असं म्हणतात. पाय नुसता ठेवला तरी फाडून निघतो) सर्व प्रकारच्या आघातांचे व्रण असत. उन्हाळ्याच्या मोसमात आंबे, रातांबे, करवंद, फणस, काजू... सर्वच फळं आमच्यावर मेहेरबान असत. नुसती चंगळ.
कोकणातल्या आठवणीत लाल डब्याच्या एस टी पासून ते लाल मातीपर्यंत आणि घरामागच्या 'घाटी'पासून ते नदीवरच्या छोट्याश्या पुलापर्यंत सगळ्या गोष्टींना अगदी अढळ स्थान आहे.
नारळी - पोफळींच्या भरगच्च बागा, त्यात लपलेली ती कौलारू घरं, घरासमोरच 'खळं', खळ्यातलं तुळशीवृंदावन, सकाळपासून केलेली दिशाहीन भटकंती, कधी समुद्र, कधी नदी, कधी डोंगर, भर दुपारी डोंगर उतरताना जाळ्यामध्ये शिरून शिरून काढलेली काळीभोर करवंद, कुणाच्याही आंब्याच्या कलमांत हळूच घुसून तोडून आणलेले आंबे, सकाळी ११ च्या सुमारास हाणलेली भाताची पेज आणि अवीट चवीची फणसाची भाजी, चुलीवर तयार होणार्या जेवणाचा कधीही न विसरता येणारा तो मस्त वास, कलमांत तयार आंब्यांचा सुटलेला घमघमाट, भाजलेल्या काजीचा खरपूस वास, पावसाळ्यात प्रचंड आवाज करत वाहणारा घरामागचा 'व्हाळ'. त्याच्यावरच्या साकवावरून तोल सावरत चालताना वाटलेली भिती, खालचे अफाट वेगाने आवाज करत रोरावत धावणारे लालसर पाणी, दुपारच्या विश्रांतीच्या वेळेस 'भरडा'वर जून्या शाळेच्या आवरात बसून केलेल्या गप्पा.., आजीचा डोळा लागला असताना हळूच तिच्या खोलीत जाऊन फडताळातल्या डब्यातून पळवलेले 'खटखटे' लाडू, कधी आजीला जाग आलीच तर पळता पळता खाल्लेला तिचा लटका ओरडा, नंतर गोठ्यात जाऊन गाईबैलांच्या साक्षीने लाडवांना पोटात दिलेली जागा, संध्याकाळी नदीकिनारी, माडांच्या गर्दीत बसून शहाळी खाता खाता पाहिलेला सूर्यास्त, त्याचवेळेस सूर्यास्ताच्या अप्रतिम देखाव्याची जाणीव नसलेला पण देखाव्याच सौंदर्य आणखी वाढवणारा, पाण्यात जाळं टाकून शांतपणे मासेमारी करणारा कुणी मच्छिमार..
तिन्हीसांजेला आ़जीबरोबर देवळांत जाऊन लावलेला दिवा, परत येऊन आजोबांच्या कडक शिस्तीत म्हटलेलं शुभं करोती कल्याणम.., रात्री जेवणं झाल्यावर खळ्यात बसून पाहीलेलं तार्यांनी तुडूंब भरलेलं आकाश.. तर पौर्णिमेच्या रात्री चांदण्याच्या दुधात न्हाऊन निघालेला आजुबाजूचा निसर्ग..
हं.... असे कित्येक.. कित्येक छोटे छोटे क्षण मनांत साठवलेले आहेत.
खरच.. शैलजा म्हणते त्याप्रमाणे हे आठवणींचं जग कधीही बदलत नाही.. बदलणार नाही..
आज तिथे गेल्यावर आठवणीतल्या या गोष्टी पुन्हा शोधण्याकरता डोळे भिरभिरतात.. सगळ्याच गोष्टी सापडतात अस नाही पण अजूनही बर्याच गोष्टी सापडल्याचा आनंद होतो.
आज माझी आजी नाही, आजोबा नाहीत, मामा नाहीत पण तरीही तो सूर्यास्ताचा देखावा अजुनही तितकाच ताजा, घरं थोडीफार बदलली पण माणसांची मनं बदलली नाहीत, देवळांत आणि तुळशीवॄंदावनापूढे तिन्हीसांजेचा दिवा आजही पूर्वीसारखाच लागतो.
कोकणात गेल्यावर माझा कॅमेरा अगदी अधाशासारखा चालतो.
यावेळच्या कोकणभेटीत टिपता आलेले काही क्षण..
चिपळूणहून पुढे जाता जाता एका वळणावर अचानक वशिष्ठी सामोरी येते. आणि मग तिचा पाहुणचार घेतल्याशिवाय तुम्ही तिथून जाऊच शकत नाही. नजरबंदी होईल असं सौंदर्य आहे या स्पॉटच.
सावंतवाडीला जाताना.. हिरव्यागर्द झाडांतून दिमाखादार वळणं घेत जाणारा देखणा मुंबई - गोवा रस्ता तुमच्या कॅमेर्याला सहजच आव्हान देतो..
रेडीला जाताना वाटेत थांबायलाच लागलं.. ही हिरवाई टिपायला.
सूर्यदेव जाताजाताही सृष्टीला परीसस्पर्श करून जातात.
रेडीचं स्वयंभू गणेशाचं देऊळ. तिथे पोहचेपर्यंत सूर्यास्त झाला होता. देवळाच्या पुढेच समुद्र आहे..
देवबागवरून दिसणारा भोगव्याचा किनारा
वाळूत खेळणारं आमचं दीड वर्षांच पिल्लू.. आर्या
माझं आजोळ - परूळे - कौलारू घरं, तुळशीवृंदावन
गावातली पहिली ते पाचवीची शाळा..
ही गोड मुलगी वीणा.. सावंतवाडीची.. आर्याच्याच वयाची. थोड्याच वेळांत हिने आम्हा सगळ्यांना आपलसं करुन घेतलं. अगदी आर्याला सुद्धा..
हिरवीगार सुपार्यांची बाग.. आणि बागेत लपलेलं पुरुषोत्तमाचं देऊळ.
तारकर्ली नदी आणि त्यावरचा हा छोटासा पूल. सूर्यास्त अनुभवण्याचं अप्रतिम ठिकाण तर आहेच. पण चांदण्या रात्री भुरभुरणारा गार वारा आणि चमचमणारं चंदेरी पाणी हा स्वर्गिय अनुभव याच छोट्याश्या पुलावर बसून घेता येतो.
होडीतून फेरफटका -
होडीतून फिरताना असंख्य माड किनार्यावर दाटीवाटीने उभे असतात.. संचलनाला उभे असल्यासारखे
पण ते वेड लावतात हे मात्र नक्की..
आणि असे कित्येक शांततेचे क्षण अनुभवण्याकरता पुन्हा पुन्हा इथे यावेसे वाटते.
माझ्या प्रत्येक कोकण भेटीत मी या 'सनसेट पॉईंटवर' अगदी येतोच येतो.. हे आरसपानी सौंदर्य टिपण्याकरता.. डोळ्यांनी आणि कॅमेर्याने..
कोकणातून निघताना मात्र पाय अगदी पूर्वीसारखेच अडखळतात, हे एवढं ऐश्वर्य सोडून निघायचं प्रचंड जिवावर येतं. आपल्या माणसांचे निरोप घेताना मनांत कुठेतरी गलबलतं. पण निघायचच असतं. मग लगेच पुढल्याच वर्षी परत यायचे प्लॅन्स होतात तेंव्हा कुठे पाय हलतात.
कोकणातली लाल मातीही तिथल्या माणसांसारखीच.. या मातीच्या पोटातही आईची वेडी माया.
सहजा सहजी पाठ सोडत नाही. परत मुंबईला घरी येईपर्यंत सोबत करते.
सुंदर... I am feeling so
सुंदर... I am feeling so jealous!
म स्त !!
म स्त !!
हे ही छान आहे!
हे ही छान आहे!
किरु, कोकणाची व्हर्चुअल सहल
किरु, कोकणाची व्हर्चुअल सहल घडवल्याबद्दल आभार आणी तुझी पोरगी कित्ती कित्ती गोड आहे आणी नाव सुद्धा छानै.. इतर सर्व फोटोसुद्धा अप्रतिम्..खूप आवडला लेख
छानै!!!
छानै!!!
किरु, फोटो आणि वर्णन
किरु,
फोटो आणि वर्णन झकास,घरबसल्या कोकण दर्शन घडवलंस
किर्या लेका बेस्ट, एकदम
किर्या लेका बेस्ट, एकदम झ्याक वर्णन आणि जबरी फोटो...
वर्णन आणि फोटो खुपच छान
वर्णन आणि फोटो खुपच छान !:)
कोकणसय भाग ३...४...५.... आले तर तेही असेच सुंदर असतील..
मस्त लिहलंय्स...
मस्त लिहलंय्स...
आम्ही मैत्रिणी , खुपच छान
आम्ही मैत्रिणी , खुपच छान !!!!!!!!!
खूप आवडले. आर्याचा तर
खूप आवडले. आर्याचा तर गालगुच्चाच घ्यावासा वाटतोय तिचे फुंदके गाल पाहून
परुळ्याचे आहात तुम्हि? कुठे
परुळ्याचे आहात तुम्हि? कुठे आहे घर तुमच?
मालवणच्या भरडावर पण घर आहे का?
बाकि फोटो तर अप्रतिम छान. आणि लिहिलय सुध्धा सुंदर.
कौतुकाबद्दल धन्यवाद
कौतुकाबद्दल धन्यवाद मित्रांनो.
भ्रमर :), नक्की जाऊया रे एकदा एकत्र कोकणात.
सचिन, रेडीचा गणपती हा स्वयंभू आहे एवढं निश्चित.
माझ्या माहितीप्रमाणे एका ग्रामस्थाला दृष्टांत झाला होता. मिळालेल्या दॄष्टांताप्रमाणे थोडे खणल्यावर गावकर्यांना ही गणपतीची मूर्ती सापडली. तिथेच देऊळ बांधले आहे.
मूर्ती सापडल्यावर प्रतिष्ठापनेपूर्वी रंगरंगोटी केली असावी.
किरू, अप्रतिम आहेत फोटो,
किरू,
अप्रतिम आहेत फोटो, बघतंच रहावंसं वाटतंय... माडाच्या बागेचे आणि
सुर्यास्ताचे फोटो सुरेख आलेत.
लेक भलतीच गोड आहे, आईवर गेलेय ना?
>>>>लेक भलतीच गोड आहे, आईवर
>>>>लेक भलतीच गोड आहे, आईवर गेलेय ना?
हो.. माझ्यावर गेली असती तर आणखी गोड झाली असती.
फार्फार सुंदर!!
फार्फार सुंदर!!
वा काय नजारा आहे कोकणाचा..
वा काय नजारा आहे कोकणाचा.. फोटो अगदी मस्तच...
आर्या तर गोडच आहे..
भ्रमर म्हणतात त्याप्रमाणे.. जसा मुंबईला जिटिजि होतो ना तसा कोकणात देखील व्हायला हवा...
मस्तच! घराचा फोटो तर अहाहा
मस्तच! घराचा फोटो तर अहाहा
किरण, हा निसर्ग आणि तिथली
किरण,
हा निसर्ग आणि तिथली प्रेमळ माणसं ओढ लावत असतात कारण निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली माणसे प्रेमळच आसणार निसर्ग प्रेम करायला शिकवतो सगळ्यांना घेऊन जगायला शिकवतो. शहरात राहुन कोरडेपणा आणि क्रुत्रिमपणा आलेला आसतो त्याचा उबग येऊन आपोआप पाय गावाकडे वळतात. आणि देवाच्या दयेनी ( लोक म्हणुदेत की गाव सुधारला नाही) पण गावाचे गावपण शिल्लक राहिले आहे असे निदान मला तरी वाटते.
खुप सुंदर फोटो आहेत. आर्याची द्रुष्ट काढायला सांगा आजीला.
विठ्ठ्ल रखुमाईच्या मुर्ती खुप तेजस्वी आहेत रे.आणी सगळे वर्णन अगदी डोळ्यासमोर गाव उभा करते. असे जीवन जर जगायला मिळाले परत तर मला तरी नाही वाटत की या पेक्षा दुसरा कुठला आंनंद असेल , दुसरे कुठ्ले समाधान असेल आयुष्यात.
सह्ही. लिहलेस पण मस्त. त्या
सह्ही. लिहलेस पण मस्त.
त्या कोंकण टुरिझमला शैलजा अन तुझा लेख द्यायला हवा. (फोटो फिचर सहीत).
वसिष्ठी खासच. चिपळून हुन पुढे लोटे परशूरमाला एकदम जबरी नजारे आहेत. तसेच चिपळून- संगमेश्वर- गणपतीपुळे रस्ता पण अफाट आहे.
अनेकदा जाउनही मन भरत नाही कोकणांत हेच खरे, त्यासाठी परत जावेच लागणार.
किर्या, एक प्रॉमिस कर. आपण
किर्या, एक प्रॉमिस कर. आपण एकदा कोकणात एकत्र भटकायचं.
ए , मी पण मी पण
आर्या + वीणा कित्ती छानेयत
खुप शांत आणि छान वाटतंय किरु हे सारं पाहुन आणि वाचुन, अभिनंदन
किरुभाऊ, झक्कास..... फोटो आणि
किरुभाऊ, झक्कास..... फोटो आणि वर्णन सहीच. पुढच्या भारतवरीत कोकण ट्रीप नक्की गटगच करु कोकणात...
कोकणात मायबोलिची भटकंतीच
कोकणात मायबोलिची भटकंतीच अरेंज करा.
पुढच्या भारतवरीत कोकण ट्रीप
पुढच्या भारतवरीत कोकण ट्रीप नक्की, गटगच करु कोकणात..
य्येह्
किर्या... अप्रतिम!!
किर्या... अप्रतिम!!
khuppach surrekh re photo
khuppach surrekh re photo किरुदादा
सर्वाना कोकनात यायचे
सर्वाना कोकनात यायचे माझ्याकडून आमंत्रण!!
नक्की या.. इथेच एक गटग करू या. गणपतीपुळे पावस परशुराम अशी प्रसिद्ध देवस्थाने ज्याची फिरून झाली असतील त्याना कनकादित्य, महाकाली आणि कर्हाटेश्वर अशा सुंदर आणि शांत ठिकाणी फिरवायची जबाबदारी माझी. (च्यायला, या अशा ठिकाणावर मी कोकणसय भाग ३ लिहू का??)
नंदिनी, तू आणि किरु आधी
नंदिनी, तू आणि किरु आधी 'कोकणसय' ह्या शब्दाची रॉयल्टी द्या मला! प्रताधिकाराचा भंग करताय तुम्ही!
सुंदर फोटो. मुली फारच गोड...
सुंदर फोटो. मुली फारच गोड...
शैलजा, नंदिनीनं कोकणात यायचं
शैलजा, नंदिनीनं कोकणात यायचं निमंत्रण दिलय - त्यामुळे उद्या कोर्टात वाद उभा राहिला तर मी तिच्या बाजुनं
खरच येऊ का ग नंदिनी?
Pages